आमची पद्धत भाग 5 अंतिम
©️®️शिल्पा सुतार
लग्न दणक्यात झालं. भरपूर खर्च केला. मीना सासरी गेली. सुरेखाताई खूप हळव्या झाल्या होत्या. अदितीने त्यांना खूप आधार दिला.
मीना सासरी गेल्यामुळे घरात जरा एकटं वाटत होतं. तिचा रोज फोन येत होता. ते दोघे छान फिरून आले. त्यांचा संसार सुरू झाला. पहिलाच सण आला.
सुरेखाताईंनी मीनाला आमंत्रण दिलं. त्या दोघांना जेवायला बोलावलं. मीना खूप खुश होती. तिने जावूबाईला सांगितल. तिने जेवताना बरोबर विषय काढला.
" उद्या मोहन भाऊजी, मीना घरी नाहीत."
" कुठे जाताय? " सासुबाई विचारत होत्या.
" तिच्या आईने त्या दोघांना जेवायला बोलावलं."
" अस कस त्या दोघांना बोलावलं? मोहन हे काय आहे?"
मीना घाबरली होती. मोहन चिडला होता. रात्री ती रूम मधे आली.
" मीना हे काय आहे? असं काय फक्त आपल्या दोघांना जेवायला सांगितलं. आपल एकत्र कुटुंब आहे. तुझ्या घरच्यांना समजत नाही का? काही कार्यक्रम असेल तर सगळ्यांना सांगायचं. मी एकटा येणार नाही. यापुढे असं चालणार नाही." तो खूप बोलला.
मीना नाराज होती. या वहिनी छान पिन मारतात. मला ओरडा बसला. तिने लगेच आईला फोन केला. सगळं सांगितलं." आई तू घरी फोन कर. माझ्या सासुबाईंशी बोल. त्यांची माफी माग."
" असे काय लोक आहेत ग. " सुरेखाताईंनी तिच्या सासरी फोन करून सगळ्यांची माफी मागितली.
" सगळ्यांनी जेवायला या. "
अदिती ऐकत होती. आता कस नम्र पणे बोलता आहेत . स्वतः च्या मुलीला त्रास होतो तर सगळे हळहळता आहेत. जेव्हा आमच्याकडे दिवाळीत बोलावलं होतं तेव्हा सेम असच माझ्या घरच्यांसोबत वागले होते.
पहाटे पाच वाजेपासून अदिती कामात होती. यावेळी सुरेखाताई सुद्धा किचनमध्ये आलेल्या होत्या. त्या सुद्धा स्वयंपाक करत होत्या. समीरने सामान आणून दिल. तो आणि बाबा मिळून घर आवरत होते. एक मदतनीस सोबत होती.
मीनाच्या घरचे सगळे आले. जरा वेळ गप्पा मारल्यानंतर अदितीने सगळ्यांना जेवायला वाढलं. बाकीचे हातचं राखूनच खात होते.
"काय झालं स्वयंपाक आवडला नाही का?" सुरेखा ताईंनी विचारलं
" स्वयंपाक छान झाला आहे. पण तुम्ही यातलं काहीच मीनाला शिकवलं नाही. तिला काही येत नाही. अदिती खूपच हुशार आहे." तिच्या सासूबाईंनी सगळ्यांसमोर म्हणाल्या.
मीना किचन मध्ये अदितीशी बोलत होती. ती नाराज होती." अस का असत ग वहिनी? "
" बघ बाई आता तूच." अदिती कामात होती. मला त्रास देतांना काही वाटल नाही का?
"काय झालं ग? " सुरेखाताई आत आल्या.
" आई सासुबाई किती बोलतात ग. आणि आज वरण किती गोड केलं होतं. आता यावरून त्या मला परत बोलतील."
"आपल्याकडे तसंच करतात ना. "
" आमच्याकडे चालत नाही आमच्याकडे फोडणीचं वरण करतात." मीनाने सांगितलं.
" मग आधी सांगायचं ना."
" वहिनीने तिच्यासाठी केलं होतं ना तेच वरण सगळ्यांनी घेतलं. आमच्याकडे तसं वरण करतात. पण मला तुझ्या हातच वरण आवडत आई. " ती सुरेखाताईंच्या गळ्यात पडली.
"कशी आहेस बेटा? तिकडे सगळे ठीक आहे ना? जावई बापू चांगले वागतात ना. "
" हो आई काही प्रॉब्लेम नाही पण मला तुझ्याकडे एकदा दुपारी यायचं आहे आणि तुझ्या हातच भरपूर जेवायचं आहे. "
"काय झालं? "
"ईकडच्या पद्धती वेगळ्या आहेत आणि आमच्या पद्धती वेगळ्या आहेत. "
"तुझ्यासाठी थोडसं करून घ्यायचं. जसं अदिती करते तस."
" आमचं घर मोठ आहे. इतक्या लोकांचे करता करता मी दमून जाते. परत माझ्यासाठी सेपरेट करायला कंटाळा येतो आणि एकदा दोनदा मी आपल्या पद्धतीने भाजी केली होती. पातोड्यांची कोणालाच आवडली नाही. अर्ध्या जेवणातून सासूबाईंनी उठून बटाट्याची भाजी केली होती." मीना सांगत होती.
" बाई काय लोक आहेत ग. जरा म्हणून समजून घेत नाही. एखाद्या वेळी वेगळ्या चवीची भाजी खायला काय हरकत आहे. " सुरेखाताई म्हणाल्या.
"हो आई काहीही घ्यायचं तर तीन वस्तू घ्यायच्या. मोठ्या वहिनींना, आईंना, मला. हे नुसत घरच्यांच ऐकतात. पर्वा मला खूप ओरडले."
" का? काय झालं होतं? "
" काही विशेष नाही आई. मी वहिनींना काही म्हणाले नाही तरी त्यांनी यांचे कान भरले. हे म्हणाले त्या म्हणतील ते ऐकायचं. स्वतः च डोक वापरायचं नाही. आई मला ते घर माझं वाटत नाही. नुसती भीती वाटते. सगळया गोष्टी विचारून करा. हे नको ते नको." मीना हळू हळू सांगत होती.
अदिती त्या दोघींकडे बघत होती. मीना काय सांगते ते ऐकत होती. ती काहीच म्हणाली नाही.
कर्माच फळ इथेच मिळतं. म्हणून कर्म नीट ठेवा. सगळ्यांची वेळ येते.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा