Login

आंबट गोड भांडणं

आंबट गोड भांडणं
हे नवरा बायकोच नातं म्हणजे एक अजब गजब रसायन आहे. हे दोघं एकमेकांशी न भांडता राहूच शकणार नाहीत. भांडणं नाही झालं तर जेवण आळणी लागत असेल यांना. मी गोष्ट सांगत आहे माझ्या सासू सासऱ्यांची. दोघं जणं भांडत असतात. छोटया छोटया कारणांवरून भांडणं तर नेहमीच होत असत. तर त्याचं झालं असं,

काल रात्री बाबांना जरा खोकल्याचा त्रास होत होता. तर आईंनी त्यांच्या साठी काढा बनवला. तो कडू काढा प्यायला बाबांना आवडत नाही. त्यावरून त्याचं भांडणं चालू होत,

" अहो हा काढा प्या. म्हणजे खोकला कमी होईल."

" मी नाही पिणार तो काढा. कडू असतो." नाक आकसून घेत बाबा म्हणाले.

" काढा आहे तो. कडूच असतो. पण प्यायला हवा. औषध म्हणून प्यायच आहे."

" नाही प्यायला तर ?"

" नाक दाबून जबरदस्ती ने पाजेन."

आईंचा निश्चयी चेहरा बघून बाबांनी गपचूप काढा प्यायला. तोंड कडू झालं होतं. तर आईंनी गुळाचा खडा समोर ठेवला. तेव्हा कुठं बाबांचा चेहऱ्यावरचं हसू पुन्हा जागेवर आलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी नाष्टा करताना बाबांनी आईंची खोडी काढली. ते आईंना म्हणाले,

" तु कायम तुझंच म्हणणं खरं करते. काय गरज होती काल रात्री इतका कडू काढा प्यायला देण्याची. तोंडाची चव बिघडली."

बाबांनी पुन्हा कालच्या सारख नाक आकसून घेतल. कपाळाला नापसंतीच्या आठ्या दिसल्या.

" काढा प्यायला दिला नसता तर रात्र भर नुसते खोकत बसला असता." पेपरच्या पानाची घडी करत आईंनी शांत आवाजात सांगितल.

बाबा आईन कडे वैतागून बघत होते. मग हळु आवाजात पुटपुटले.

' काढा प्यायला नंतर माझी खोकल्याची उबळ जरा कमी झाली होती. हे बरोबर आहे. पण म्हणून कडू काढा का प्यायचा !' बाबा अगदी लहान मुलांच्या सारखं कुरकुरत होते.

' यांना सरळ शब्दात सांगितल काढा प्यायला तर अजिबात ऐकत नाहीत. मग जबरदस्ती करावी लागते. माझी मुल पण औषध घेताना इतका त्रास देत नाहीत जितक हे माझ्या सासूबाईंच् बाळ देत.'
सासू बाई बडबडत होत्या.

बाबांची किरकिर ऐकून त्या किचन मध्ये पुन्हा एकदा बाबांच्या साठी काढा बनववायला आल्या होत्या. त्यांची बडबड चालू होती.

त्यांची अशी मजेदार भांडणं ऐकून माझ्या दिवसाची सुुरवात होते. आता याची सवय झाली आहे. मी पोळ्या करत होते.

" हिला तिचा मनमानी कारभार करण्याची सवय आहे."

" मनमानी कोण करत या घरात ? तुम्ही का ? मी ? आजपर्यंत एक साधी साडी देखील तुमच्या मर्जी विरूध्द घेतली नाही. आणि म्हणायचं मी मनमानी कारभार करते."

" मी कधी साडी घ्यायला नकार दिला ?"

" तुला सांगते सुनबाई, या पुरुषाचं असच असतं. बायकोच मन राखण्यासाठी म्हणायचय तुला काय हवं ते करं. आणि बायकोने तिच्या मनासारखं केलं मग घरातली शांतता भंग करायची. यांचा तांडव नृत्य सहन करायच."

आई मला सांगत होत्या. मी नुसती मान हलवत होते. या दोघांच्या भांडणात मी काय बोलणारं ? दिवसभर आई बाबांची अशी धुसपुर चालूच होती.

रात्री आईंची कंबर दुखत होती. मी त्यांना पाठ शेकायला गरम पाण्याची पिशवी द्यायला गेली होती. तर आई बाबा नेहमी प्रमाणे भांडत होते.

" मी तुला मुव्ह लावुन देतो." बाबा आईंना म्हणाले.

" नको. तुमचा हात खूप कडक आहे."

" हे तुझं चांगलं आहे. आता मी तुला त्रास होऊ नये म्हणून मुव्ह लावुन देतो म्हणतो. तर नको. नाही लावलं तर रात्रभर तळमळत बसशील."

हळू आवाजात म्हणाले,

" आई ग उई ग करत बसशील नी माझ्या झोपेचं खोबरं करशील."

" मला मुव्ह लावुन देऊन काय उपकार करता असं म्हणायचं आहे का ? "

आईंनी एक भुवयी उंचावून विचारलं. तशी बाबांनी ' आपली बदमाशी पकडली गेली असे चेहऱ्यावरचे भाव लपवले.'

" हां. ठिक आहे. ठीक आहे. मुव्ह लावुन दया. पण हळू लावा." आईंनी मुव्ह ची ट्यूब त्यांच्या हातात देत त्यांना सूचना केली.

बाबांनी अजुन मूव्ह लावुन चोळायला दोन मिनिट पण झाली नसतील तर आई ओरडल्या.

" आ आई आई ग. अहो नको. हात काढा. हात आहे का काय लोखंड आहे." उठून बसत कळवळत आई म्हणाल्या.

" राहू दे. तुम्हाला काहीही करता येत नाही. लग्नाला इतकी वर्ष झाली तरी साधं मूव्ह नाही लावुन देता येत."

आई बाबांना ओरडल्या. बाबांचा चेहरा पडला. त्यांना समजेना त्याचं काय चुकलं. साधं मुव्ह तर कंबरेला लावायच होत.

' मी मदत केलेली हिला चालतं नाही. आणि मदत केली नाही की म्हणायचय बायकोची काळजीच नाही.' बाबा पुटपुटले.

मी आईंना मुव्ह लावुन दिलं. गरम पाण्याची पिशवी पण शेकायला दिली. मी बाहेर पडले.त्यांच्या भांडणात पडायची मला अजिबात हौस नाही.

" तुला फक्त निमित्त हवं असतं माझ्या कामात चुक काढण्याचं." बाबा म्हणले.

" मग तुम्ही कामचं तसं करता. किती जोरात मुव्ह चोळलं. स्कीन बघा कशी लाल झाली आहे."

" जरा काय जोरात मूव्ह चोळलं तर लगेचच लाल झालं. तूझी स्कीन म्हणजे जशी काही फुलाची पाकळीच आहे."

' मी म्हणलं जरा मूव्ह चोळून देऊ. तिचा त्रास कमी होईल तर त्याचं काही नाही. स्कीन लाल म्हणून चिडली.' बाबा वैगतले.

" माझा त्रास कमी करायचा होता , की वाढवायचा होता. आधी फक्त कंबर दुखत होती. आता हे स्कीन लाल झाली तर जळजळत पण आहे." आई कुरकुरल्या.

" हे तुझं बरं आहे. जाss आता परत कधी तुला मदतच करणार नाही. तूझ्या जागी कोणी दुसरी असती तर, तिला माझ्या वागण्याचं कौतुक वाटलं असत. नवरा आपली किती काळजी करतो म्हणुन."

" दुसरी कोणी बघितली का ?"

बायको ने कडक आवाजात प्रश्न विचारला. बाबांनी नजर चोरली.

एक 'ती' तर होती. जिला आठवून हृदयाची हार्ट बीट किंचित् वाढली. पण पुन्हा नॉर्मल झाली.
' ती माझ्या सोबत असती तर आज लाईफ काही वेगळीच असती.' बाबा मनातल्या मनात म्हणाले.

" मला माहिती आहे तुमच्या डोक्यात काय चालु आहे."

बाबांच्या समोर पाण्याचा ग्लास आणि औषधाची गोळी ठेवत आई म्हणाल्या.

" काय चाललंय माझ्या मनात ?" बाबांनी उसन्या अवसानाने विचारलं.

" तिचं तुमची सुरेखा. जिचा उल्लेख तुम्ही अनेक वेळा केला आहे." आई ठसक्यात म्हणल्या.

" मी तिला कधीच विसरून गेलो आहे." त्यांनी गुळमुळीत उत्तर दिलं.

" तुम्ही तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली नव्हती का ? तिने आज पर्यंत ॲक्सेप्ट केली नाही. आता तर तुम्हाला ब्लॉक सुधा केलं आहे."

" तुला कसं कळलं ?"

" बायको आहे तुमची ! मला नाही समजणार तर आणखी कोणाला समजेल ?"

" हि औषध घ्या आणि गप झोपा." आईंनी बाबांना दरडावल. नी कुशीवर झोपल्या.

ते बायकोच्या चेहऱ्याकडे बघत म्हणले,

' बायको खरं बोलत आहे. मी तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. आधी तर तिने ॲक्सेप्ट पण केली. तर माझं मन नुसत गार्डन गार्डन झालं होत. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. दुसऱ्या दिवशी तिने मला ब्लॉक सुधा केलं होतं.

बहुदा तिने माझा आणि हिचा आमच्या कुटुंबा सोबतचा फोटो बघितला असेल. मी प्रोफाइल वर लावलेला. मला ओळखलं असेल. माझ्याशी मैत्री करायला नको म्हणून ब्लॉक केल असेल. आता ती फक्त माझी क्रश नव्हती. कोणाची तरी पत्नी होती.

ती पण टिपिकल बायको झाली असेल. माझ्या बायको सारखा कडू काढा आणि कडू औषध नवऱ्याला जबरदस्तीने ने घ्यायला लावत असेल. बायको म्हणलं की ती अशीच असते का ?

समाप्त

©® वेदा

कथा आवडल्यास कॉमेंट मध्ये सांगा.

या कथेचा वापर यू ट्यूब किंवा इतर कुठेही आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

तुमचं मत कॉमेंट मध्ये सांगा.

🎭 Series Post

View all