कोकणी पद्धतीच्या मऊ.. लुसलुशीत.. जाळीदार आंबोळी घरच्या घरी बनवण्याची रेसिपी
साहित्य
३ वाटी साधे तांदूळ
१ वाटी उडीद डाळ
१/४ वाटी हरभरा डाळ
१/४ वाटी पोहे
१ छोटा चमचा मेथी दाणे
तेल गरजे प्रमाणे
१ वाटी उडीद डाळ
१/४ वाटी हरभरा डाळ
१/४ वाटी पोहे
१ छोटा चमचा मेथी दाणे
तेल गरजे प्रमाणे
कृती
सर्व प्रथम सर्व धान्य पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. वेगळे धुवून घ्या.. आणि वेगवेगळे भिजत घाला.
चार पाच तासानंतर वेगवेगळ वाटुन घ्या. हे सर्व वाटण एकत्र करून एका हवाबंद डब्यात भरून ठेवा. रात्र भर आंबवून घ्या. कमीत कमी सात ते आठ तास तरी आंबवून घ्या.
दुसऱ्या दिवशी आंबवलेले पीठ मीठ घालून सारखं करा. त्यात एक चमचा तेल घाला. किंचित गरज असेल तर पाणी घाला.
तव्यावर थोडे तेल घालुन पसरवून घ्या. तर टिश्यू पेपरवर ने सर्व बाजुला पसरवून घ्या.
नंतर गरम तव्यावर एका खोलगट डावाने हे मिश्रण तव्यावर घाला आणि डावाने पसरवून घ्या. झाकण ठेवून एक ते दीड मिनिट शिजवून घ्या. नंतर बाजूने तेल सोडा. दोन्हीं बाजूने भाजून घ्या.
मऊ.. जाळीदार..लुसलुशीत..आंबोळी तयार आहे. हि आंबोळी ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला द्या..
टीप
थंडीच्या दिवसांत पीठ अंबावण्या साठी हे मिश्रण लाकडी पोळपाटा वर ठेवून दया. बंद झाकणावर उबदार कापड अंथरूण ठेवा. पीठ लवकर आंबत.
या साठी मापाची वाटी म्हणून आपली आमटीची वाटी घ्या. पोहे खायचा चमचा वापरा.तांदूळ शक्यतो जुने आणि साधे तांदूळ वापरा.
चटणी
एक वाटी खोवलेला नारळ.. तीन कमी तिखट हिरव्या मिरच्या.. १/२ वाटी कोथिंबीर.. आणि थोड्या कोथिंबिरीच्या कोवळ्या काड्या. १ चमचा लिंबू रस.. किंचित साखरेचे दाणे.. चवी नुसार मीठ.. फुटाण्याच डाळ याची बारीक पावडर.हे सर्व साहित्य मिक्सर मध्ये वाटून घ्या. त्यावर हिंग जिरं कढीपत्ता याची खमंग फोडणी दया. लिंबू रस वापरायचा नसेल तर आंबट पणासाठी दही पण वापरू शकता.
किंवा
या बरोबरच पूड चटणी आणि तेल देखील सर्व्ह करु शकता.
पूड चटणी साठी
साहित्य
दोन मोठे चमचे किंवा अर्धी वाटी उडीद डाळ.
दोन मोठे चमचे किंवा अर्धी वाटी हरभरा डाळ
दोन मोठे चमचे किंवा अर्धी वाटी पांढरे तीळ
लाल तिखट
मीठ
हळद
हिंग
दोन मोठे चमचे किंवा अर्धी वाटी हरभरा डाळ
दोन मोठे चमचे किंवा अर्धी वाटी पांढरे तीळ
लाल तिखट
मीठ
हळद
हिंग
कृती
सर्व प्रथम उडीद डाळ हरभरा डाळ आणि पांढरे तीळ थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्या.
थंड झाल्यावर त्यात आवडी प्रमाणे लाल तिखट.. चवीनुसार मीठ किंचित हळद आणि हिंग घालुन मिक्सर मध्ये वाटून घ्या. बारीक वाटून घ्या.
सर्व्ह करताना त्या कोरड्या चटणी मध्ये थोड कच्च तेल घाला. लज्जत वाढते.
मापासाठी वाटी हि नेवेद्याची छोटी वाटी घ्या. या इतक्या साहित्यात बऱ्यापैकी चटणी तयार होते.
हि कोरडी चटणी पंधरा दिवस हवा बंद बरणीत ठेवल्यास चांगली टिकते. प्रवासात न्यायल पण चांगला पर्याय आहे. हि चटणी पराठा.. डोसा.. घावण.. धिरड.. पोळी बरोबर पण छान लागते.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा