Login

आमच्या सारखे आम्हीच

बहिण भावाच्या नात्याची धमाल गमंती-जमती
भावा बहिणीचे नाते जुळले
व्यक्त होण्या संबंध सेतूची साथ
अनोखे बंध रक्षाबंधनात गुंफले
भरभरुन लिहण्याची संधी गवसली

एका पेक्षा एक आहेत ज्याला नावं. एखाद्या विषयाच्या तळाभोवती जावून सखोल ज्ञान प्राप्त जाणून घेण्यात आहे ज्याचा हातखंड. प्रत्येकाला त्याच्या कलेने घेतं त्याच्याशी संवाद साधत सर्वांनाच आपला मित्र, भाऊराया वाटतो. दबक्या पावलांनी ज्याच्या आयुष्यात वहिनींनी प्रवेश करुन साखरपुडा झाला आहे.
अस कोणाबद्दल मी सबंध सेतू विषयी लिहणार आहे याची पुसटसी कल्पना सर्वांनाच आली असणार. हो ना..?
हो.. अगदी बरोबर.
तोच तो राघव, रिषभ, आर. के., ट्रिपल आर या चित्रपटाच्या शीर्षकानुसार रिषभच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी वाढिस लागो. कोणावरही झालेला अन्याया विरुद्ध बंड पुकारत त्याला न्याय मिळवण्याकरता बंड करत रिषभ परीस्थिती उत्तम रीतीने पार पाडत असतो.

रिषभ म्हणजेच राघव ह्या नावाने मागच्या वर्षी चॅम्पियन ट्राॅफीच्या निमित्ताने ओळख झालेला. आमच्या ग्रुपचा कॅप्टन. आम्ही नऊ मुली आणि तो एकटाच मुलगा संघात होता. तो आम्हा सगळ्यांना नवदुर्गा बोलायचा. कधी कधी आम्हांला पोरी म्हणायचा. आमच्या पेक्षा लहान असून देखील आमचा मोठा भाऊ वाटतो. तितक्याच जबाबदारीने ग्रुप साचोरीबद्ध हाताळला आणि बेस्ट कॅप्टन हा किताब पटकावला.
चॅम्पियन ट्राॅफी पुन्हा सुरु होणार. यावेळी आपला हा ग्रुप असाच राहिल का? आपल्या बरोबर कोण असेल? ओळखीतले असतील का सोबत? असे एक ना अनेक प्रश्न मनात रेंगाळत होते. संघाची नावे एका मागून एक संजना मॅडम जाहिर करत होत्या. रिषभ आणि मी एकाच ग्रुप मधे आलो. भावा - बहिणीची हि जोडी यावेळी देखील सोबत असणार या विचाराने नाव जाहिर करताच मी कमेंट मधे लगेच भावा - बहिण सोबत आहोत असे लिहले. त्यावर संजना मॅम बोलल्या सेलिब्रेशन झाल असेल तर., पुढच्या संघाची नाव जाहिर करुया. तेव्हा हसायलाच आले खूप.
रिषभ कडे प्रत्येक‌ समस्येवर रामबाण उपाय हमखास सापडतो. तो वेळोवेळी नवनवीन‌ गोष्टी शिकण्यास प्रोत्साहन देत असतो.

स्टॅण्ड अप काॅमेडी करण्याकरता मला रिषभने प्रज्ञा ताई तू व्हिडिओ नक्की करु शकते असे सांगितले. पहिल्यांदाच प्रयत्न केला तो‌ पण स्पर्धा संपायला अवघा एक‌ तास बाकी असताना व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. तो व्हिडिओ पाहून मलाच हसायला येत होत खरतरं. चारोळी आणि कविता फेरी करता तुम्ही चारोळी‌ बनवा मी ती एडिट करुन देतो. स्वत:हून अस प्रत्येकाला हुरुप देत रिषभने एडिटिंग करायला शिकवले. चारोळी व्हिडिओ बनवताना साजेसे चित्र आणि पार्श्व संगित अचूक लावल्याने चारोळी आणखी खुलू लागली. यामुळे व्हिडिओ बनवण्याचा उत्साह जोमाने वाढिस लागला होता. तीन - चार‌ व्हिडिओ कधी झाले याचा थांगपत्ताच लागला नव्हता. रिषभ व्हिडिओ बनवण्यात माहिर आहे. ती कला त्याला दैवी स्वरुपात लाभलेली आहे. रिषभकडे मल्टि टॅलेंट आहे. तो एकाच वेळी अनेक गोष्टीत निपुण आहे.

फेरी दरम्यान विविध विषयांवर आमचे बोलणे चालूच असते. मी नविन पदार्थ बनवले की त्याचा पहिला फोटो काढून ग्रुपवर पाठवला की रिषभ लगेच सुगरण आहेस बहिण माझी अशी कौतुकाची थाप द्यायचा. जेव्हा मी मिसळ- पाव, पाव-भाजी, फोटो टाकल्यावर मी नाशिकला आल्यावर बनवून दे अस मला नेहमी बोलत असतो. तो नाशिकला आला की त्याला त्याच्या आवडीचे पदार्थ बनवून खायला घालणार आहे. एक नविन गोष्ट रिषभ बद्दल त्याचे आत्मचरीत्र वाचताना लक्षात आले की, त्याला देखील नविन पदार्थ बनवायला आवडतात. आमच्या बहिण भावाची आवड इथे जुळली. ग्रुपवर मेसेज केल्यावर पहिली प्रतिक्रिया रिषभची हि ठरलेली.

सांस्कृतिक वारसा जपत रिषभ देवपूजे बरोबरच गीतेचे रोज न चुकता पठण करतो. त्याने मला देखील गीतेचा ग्रुप जाॅईन करण्यास सांगितले. तेव्हा पासून गीतेच्या उच्चारणातून सकारात्मक स्पंदने निर्माण होवून मन एकाग्र होण्यासाठी खूप मदत झाली.
ब-याच वेळा आपण कुठे चुकतो, आपल्या हातून असं काय घडतं की कोणी आपल्याला दोष देत नकारत्मकतेच्या गर्तेतेत ओढत नेत असते. कितीही त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तरी मन विचार करणे काही केल्या थांबत नसते. अश्यावेळी सर्व प्रश्नांची उत्तरे गीतेत सामाविष्ट असतात असे म्हटले जाते. रिषभ प्रमाणेच मला‌ देखील अध्यात्माची ओढ हि होतीच. गीतेच्या पठणाने चंचल मन स्थिर झाले असे मी नक्की सांगेल.

कोणत्या कारणाने जर कधी राग आला तर तो राग भावा प्रमाणेच रिषभशी बोलून‌ व्यक्त झाल्यावर त्याने घातलेली समजूतीतून लगेच निवळला जातो. त्याला तू लग्न कधी करतोय म्हणजे मला कलवरी बनून मिरवता येईल. आम्हांला सर्वांना छान साड्या हव्या असा तगादा देखील रिषभच्या मागे लावलेला असतो मी. तो देणार ना. असे हसत उत्तर देतं असतो.

लवकरच रक्षाबंधन येत आहे. भावाबद्दल थोडेसे शब्द व्यक्त होण्याचा दुग्धशर्करा युक्त योग सबंध सेतू या फेरीमधून मांडता आला. त्याबद्दल ईरा परीवाराची मी आभार मानते.

©®प्रज्ञा पवन बो-हाडे
0