आम्हीच का करायचं !

आम्हीच का करायचं भाग १
" हे ग काय वागणं तुझ स्नेहा, तु शुभम ला तुमच्या कडे राहुन कॉलेज करण्यासाठी नकार दिला. हे वागणं तुला तरी शोभत का ?

मग काय फायदा तुमचा पुण्यात राहून. इतकं पैसा पैसा करते. हा पैसा अडका घेउन जाणारं आहेस का ? "

शशिकला बाई त्यांच्या सुनेला स्नेहाला बोलत होत्या. आवाजातील चिड लपत नव्हती.

" आई माझं म्हणण थोड ऐकून तरी घ्या." स्नेहा बोलण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

" काय ऐकून घेऊ. शुभम तुझाही कोणी तरी लागतो. त्याची काकू आहेस तू. आणि तू आहेस की त्याच्या शिक्षणात खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेस. शत्रू आहेस का त्याची.?" तिला बोलण्याची संधी न देता शशिकला बाई तण तणल्या.

"आई मी कुठं त्याला शिक्षण घेण्यापासून रोखल. मी कधी खोडा घातला.?. मी फक्तं इतकचं म्हणत आहे की, त्याला हॉस्टेल मध्ये ठेवा." स्नेहा स्पष्ट शब्दात म्हणाली.

" बघितलं आई कशी बोलातीय ही. माझा मुलगा यांच्या घरी राहिला तर काय हरकत आहे. आपण तर यांना आपली माणसं समजतो." मनीषा शशिकला बाई कडे बघून म्हणाली. मग स्नेहा कडे बघून म्हणाली,

" स्नेहा शुभम तुमच्या घरी राहिला तर काय प्रोब्लेम आहे. तो तुमच्या रूटीन मध्ये थोडीच डिस्टर्ब करणार आहे. की तुमच्या स्वातंत्र्यावर गदा घालणार आहे.?"

" पुण्यात तुमचं घर आहे. आपली माणसं शहरात राहतात. तर सगळं सोयीचं होईल. मग अस असताना तू कस काय म्हणू शकते त्याला हॉस्टेल मध्ये ठेवा.त्याच्या बाबांना समजलं तेंव्हा खुप चिडले होते ते." मनीषा स्नेहाला म्हणाली.

" ते तर म्हणत होते, स्नेहा अशी बोलूच कशी शकते. तिला काही मोठ्यांचा आदर सन्मान आहे का नाही !."मनीषा ने तिला टोमणा मारला.

" हे बघ स्नेहा तु या घरची धाकटी सून आहे. तर सुन बनुन राहा. तिची कर्तव्य काय आहेत ते आता काय नव्याने शिकवायच का तुला.?." शशिकला बाई तिच्या वर चिडल्या.

" आम्ही कुठं सगळ्या खर्चाचा बोजा तुमच्यावर ठेवत आहोत. " मनीषा म्हणाली.

" आम्ही कुठं तुला खर्च करायला सांगत आहोत.शुभम या घरचा मुलगा आहे. माझा मुलगा विनय तितका तर कमावतो की त्याला शुभमला शहरात ठेवण परवडणार नाही. दिनेश पैसे देणार आहे. फुकट नाही राहणार तो तुमच्या घरात." शशिकला बाई म्हणाल्या.

" मनीषा आणि दिनेश शुभम चे कॉलेजच्या फी चे पैसे तर देणार आहेतच. त्यामुळे तुला फक्त त्याच्या जेवणा खाण्याचा ,राहण्याचा खर्च तर करायचा आहे. त्यात हि तुला त्रास होत आहे का ?

हे बघ स्नेहा तूझ्या अशा वागण्याने तु माझ्या मुलांच्या मधे फूट पाडत आहेस. हे तुला शोभत तरी का ?" शशिकला बाई म्हणाल्या.

" आई जेवणा खाण्याचा रहाण्याचा खर्च करायला माझी काहीचं हरकत नाही. मी करेन पण. फक्त तोच खर्च नसतो ना."

" आता पण कशाला.? " शशिकला बाई म्हणाल्या

" आणि बाकी काय खर्च असतो. ज्यामुळे तू त्याला हॉस्टेल मध्ये ठेवायला सांगते." मनीषा ने विचारलं. तिचा आवज किंचित् चढला होता.

" आई मागच्या वेळी पण स्वराज ला शिकायला ठेवलं होतं शहरात. दादांच्या सांगण्या नुसार. दादांनी तर त्याचे कॉलेजचे फीचे पैसे भरले होते. पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी इतर खर्च पण असतात. ते सगळे खर्च आम्हीच उचलले होते."

" त्याचा पॉकेट मनी, क्लास कोचिंग, प्रॉजेक्ट, ट्रॅव्हलींग, अजुन काही असाईनमेंट वगेरे असतात. कधी कुठं प्रोग्रॅम आहेत. कुठं बाहेर जायचं आहे. कुठं फॅक्टरी विझिट करायची आहे. त्याचे पैसे भरा. हे सगळे खर्च आम्हीच उचलले आहेत.त्याच्या साठी दादांनी नाही पैसे पाठवले."

" शिवाय महिना पंधरा दिवसात सतत गावाकडून कोणी ना कोणी त्याला भेटायला येत. आल्यावर तीन चार दिवस आमच्याकडे राहतात. येताना ऐकटेच नाही येत. किमान तीन चार लोकं तर असतातच.

क्रमशः

🎭 Series Post

View all