आम्हीच का करायचं भाग २

आम्हीच का करायचं ! भाग २
आता पाहुणे आहेत तर नुसत खायला प्यायला घालुन नाही चालत. त्यांना शहरात फिरायच असत. त्यांची खातिर दारी पण करावी लागते. रिकाम्या हाताने तर नाही ना त्यांना घरी पाठवू शकत. म्हणून मग त्यांना काही ना काही वस्तू घेउन द्यावी लागते.

त्यांचा पाहुणचार नीट व्यवस्थित केला नाही तर ते लोक इकडं येऊन सांगतात. तुमच्या सुनेवर काही संस्कार नाहित. तुम्ही लगेचच फोन करुन तुमची नाराजी बोलून दाखवणार.

तुम्हाला माहीत आहे महिन्याच बेजेट कोलमडून गेल होत आमच." स्नेहा म्हणाली.

" त्याला आमच्या ठेवलं होतं. तेंव्हा लोकांनी आम्हाला किती टोमणे ऐकवले होते. आम्ही स्वराज कडून घरची काम करून घेतली. फुकट नाही त्यातला ठेवलं.आई माझी पण मूल आहेत.

ती पण त्यांची काम स्वतः करतात. तसचं स्वराजला देखील त्याची काम स्वतः ची काम स्वतः करायला लागणार ना.?." स्नेहा म्हणाली.

" हे बघा आई. मी पक्क सांगते. मी नाही शुभम ला माझ्या घरी ठेवु शकणार. आम्हाला पण आमचे खर्च आहेत. माझीही मुल आता कॉलेज मध्ये जायला आली आहेत.

आम्ही नोकरी करणारी लोकं. नोकरी शिवाय अजुन कोणताही इन्कम सोर्स नाही आमच्याकडे. मला माफ करा. यावेळी मी नाही ठेवणार त्याला आमच्या घरी."स्नेहा स्पष्ट शब्दात ठाम आवाजात म्हणाली.

" अच्छा म्हणजे तुम्ही दोघं कमावता. तरी काय पैसे कमी आहेत म्हणता.तुमच्या कडे तुमचे शौक पूर्ण करण्यासाठी पैसै आहेत. पण कुटुंबा साठी खर्च करण्याची वेळ आली तर पैसे नसतात. अस म्हणत आहे का तु ?" शशिकला बाई फणकारल्या.

" माफ करा आई शहरात राहायचं म्हणजे काय फुकट नाही रहात. सगळ्या गोष्टी विकत घ्याव्या लागतात. दोघं कमावतो तरी देखील काटकसर करून संसार चालु आहे. दोघं दिवस रात्र मेहनत करत आहोत तेव्हा कुठं दोन घास सुखाचे मिळतात."

" आई एकाचा पगार तर मुलांच शिक्षण घर खर्च घर भाड दुध भाजी पाला हे देण्यातच खर्चून जातो. दुसऱ्याच्या पगारात काय काय करायचं. शेवटी मुलांच पुढचं शिक्षण आहे. आमचं स्वतःच घर घ्यायचं आहे. म्हातारं पणाची सोय करायची आहे."

" अच्छा म्हणजे अस म्हणायचं आहे का? आम्ही इथ फुकट राहतो. आम्ही काही खर्च करत नाही. तुम्ही लोकं तर तिकडे शहरात जाऊन बसले. पण गावात तर आम्हालाच सगळं बघावं लागतं. देणं घेणं ,पै पाहुणा, सण वार सगळं काही आम्हीच बघतो." मनीषा म्हणाली.

" माफ करा वहिनी बाकी तुम्ही करत असाल. नाही करता त्यात वाद नाही. पण देण्या घेण्याच बाबतीत तर आम्ही आमचा हिस्सा बरोबरीने शेअर करतो. आई फोन करून पैसे मागुन घेतात." स्नेहा ठसक्यात म्हणाली.

" किती तरी प्रोग्रॅम मध्ये आम्हाला यायला जमत पण नाही. पण आमच्या कडून भेटवस्तु पैसे मान अगदी बरोबर जात. तुम्हाला तर फक्तं घ्यायचं काम असत." स्नेहा आज बरोबरच बोलत होती.त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं तिच्या कडे बरोबर उत्तर होत.

स्नेहाच हे उधटा सारखं बोलणं ऐकून मनीषा चिडून आत निघुन गेली.शशिकला बाई गाल फुगवून बसल्या होत्या. पण स्नेहा ने त्यांना मनवण्याचा प्रयत्न केला नाही.

असच काहीसं झालं होतं या आधी. जेव्हा दादांनी त्यांचा मोठा मुलगा स्वराजला पुण्याला शिकायला पाठवल होत. स्वराज तर जेमतेम वर्ष भर पुण्यात राहिला होता. पण त्याच मन अभ्यास करण्यात नाही रमल. त्याला बिझनेस करायचा होता. तर तो पुण सोडुन मुंबईला निघुन गेला.

दादांनी तर स्वराजच्या कॉलेज ची फी भरली. त्यानंतर काहीचं नाही. त्याचा पॉकेट मनी क्लास कोचिंग फी, कॉलेज मधे जाण्या येण्याचा खर्च, त्याचा कॉलेजच्या प्रॉजेक्ट असाईन मेंट चा खर्च तर या दोघांनाच करावा लागला होता.

क्रमशः


🎭 Series Post

View all