आम्हीच का करायचं! भाग ३(अंतिम भाग)

आम्हीच का करायचं भाग ३(अंतिम भाग)
दादांनी तर स्वराजच्या कॉलेज ची फी भरली. त्यानंतर काहीचं नाही. त्याचा पॉकेट मनी क्लास कोचिंग फी, कॉलेज मधे जाण्या येण्याचा खर्च, त्याचा कॉलेजच्या प्रॉजेक्ट असाईन मेंट चा खर्च तर या दोघांनाच करावा लागला होता.

त्यात भर म्हणजे कधी दादा तर कधी वहिनी स्वराजला भेटायला येत. येताना कोणी ना कोणी तरी सोबत असे. कधी त्याची मावशी तर कधी मामा मामी सोबत येत. आल्यावर तीन चार दिवस रहात. ते सगळे आल्यावर स्नेहाला ऑफिस मधून सुट्टी घ्यावी लागायची. किंवा त्यांचं सगळ करून जाण्यात तिला कामावर यायला उशीर व्हायचा. त्यामुळे पगार कमी व्हायचा.

ते लोक पहिल्यांदा आपल्या घरी आले आहेत तर त्यांचा योग्य तो मान सन्मान करावा लागे. पाहुणचार नीट व्यवस्थित करावा लागे. कपडे एखादी भेटवस्तू द्यावी लागे. वर ती लोक येताना रिकाम्या हाताने येत. त्यांना पुण्यात फिरायला घेउन जावं लागे.

कधी तरी हॉटेल मध्ये पण घेऊन जावं लागे. त्यांचा पाहुणचार नीट व्यवस्थित केला नाही तर शशिकला बाई तिला फोन करून संस्कार रीत याबद्दल सुनावत.त्यांचा पाहुणचार करण्यात स्नेहा च घर खर्चाच बजेट कोलमडून पडले होते.

वहिनी तर म्हणत आम्ही तुमच्या पुण्यात आलो आहोत तर पुण नाही का फिरवणार ? तोंडावर बोलायला पण कमी नाही करायच्या. नाहीतर राग धरून बसत.

त्यावरून सासू बाई म्हणत तुम्ही दोघं कमावता तर काय हरकत आहे आपल्या लोकांचं करण्यात? कशाची कमतरता आहे. काही गरज पडली तर मला सांग. मी देते. पण अस वागून घरची इज्जत तर वेशीवर टांगू नको. पण बोलायला काय जात. द्यायची वेळ आली की देतो नंतर. काका काकु आहात त्याचे. जरा पैसे खर्च केले तर काय बिघडणार आहे का.?

हे सगळ तर सहन होत नव्हत. पण बोलता ही येत नव्हत. ते दोघ हे सहन तर करत होते. पण स्वराज ने एक वर्षातच शिक्षणाला राम राम ठोकला. त्याने बिझनेस करणार म्हणून मुंबईला जायचं ठरवलं. त्याप्रमाणे तो मुंबईला पण निघून गेला. पण बदनामी या दोघांची केली.

काका काकु त्याचा सांभाळ करू शकत नव्हते. काकू त्याला घरची काम करायला सांगत. त्यामुळें त्याला अभ्यास करायला वेळ मिळत नव्हता. कोचिंग क्लास मध्ये पण जायला वेळ नव्हता. म्हणून शिक्षण अर्धवट सोडून मुंबईला गेलो. पोटा पाण्या साठी काहीतरी तर करायला हवंच आहे ना !

करून सावरून बदनाम मात्र स्नेहा झाली. त्यामुळें तिने या वेळीं पक्क ठरवल होत. दादा वहिनी म्हणाले शुभम ला शिक्षणासाठी पुण्यात पाठवणार तर ती त्यावेळीं सप शेल नकार देणार. आज सकाळी वहिनींनी हा विषय काढला होता. तर स्नेहा ने शुभम ला तिच्या घरी न ठेवता हॉस्टेल मध्ये ठेवा अस स्पष्ट शब्दात सांगितल होत.

थोडया वेळाने विनय आणि दादा घरी आले. तर आई चिडलेली होती. वहिनी पण गाल फुगवून बसली होती. विनय ने आईच्या चिडण्याच कारण विचारलं.

" आई काय झालं. तू का चिडली आहेस.?"

" हे मला विचरण्या पेक्षा तूझ्या बायकोला विचार.!" शशिकला बाई म्हणाल्या.

" मनीषा ने तिला विचारलं शुभम पुढच्या शिक्षणासाठी पुण्यात जाणार आहे. तर तो तुमच्या कडेच राहील. तर स्नेहाने तिला नकार दिला. त्याला हॉस्टेल मध्ये ठेवायला सांगितल. तिची हिंमत कशी झाली अस बोलायची. मोठ्या लोकांच्या निर्णयात मोडता घालण्याची?"

" विनय तुला तूझ्या बायकोला जरा ताब्यात नाही ठेवता येत. अस कसं म्हणू शकते ती. आपली स्वतः ची माणसं असताना शुभमला हॉस्टेल मध्ये ठेवा." दादा उसळून म्हणाले. विनयला काय घडल असेल याचा लगेचच अंदाज आला.

" विनय तुझी बायको दोन भावांच्या मध्ये फूट पाडत आहे. जरा तिच्या वर वचक ठेव. तिला कोणी अधिकार दिला सासरच्या लोकांनी घेतलेल्या निर्णय मध्ये बोलण्याचा , त्याला नाकारण्याचा ?" शशिकला बाई म्हणाल्या.

" माफ कर आई. दादा. मी या बाबतीत तिला काहीच बोलू शकत नाही. स्नेहा माझ्या सोबत खाद्याला खांदा लावून काम करते. घरातील खर्चात बरोबरीचा वाटा घेते. आई आम्ही दोघं जरी कमवत असलो तरी आमचं घर कस चालत ते आमचं आम्हाला माहिती.

आमच एक मध्यम वर्गीय कुटुंब आहे. नोकर वगेरे ठेवायची ऐपत नाही आमची. घरातली सगळी काम आम्ही आमची मुल मिळुन करतो. स्वराजला देखील आम्ही घरातील एक सदस्य म्हणूनच मदत करायला सांगितली होती. पण त्याने त्याचा वेगळाच अर्थ लावला.

उद्या शुभम राहायला आला. आणि आम्ही त्याला आमच्या परिवारातील सदस्य म्हणून काम सांगितल तर हा पण आमचीच बदनामी करेल. आम्ही त्याला काम करायला लावतो. म्हणून त्याचा अभ्यास नाही होत.

याने देखील शुभम सारखा निर्णय घेतला तर. बदनामी आमचीच होईल. आता अजुन एक बदनामी नाही सहन होणारं. पुण्या पेक्षा शुभम ला मुंबई मधे पाठवा शिकायला. पण पुण्यात पाठवणार असाल तर हॉस्टेल मध्ये ठेवा. या बाबतीत मी स्नेहाच्या सोबत उभा आहे. ती चुकीची नाही.

ती जर माझ्या खांद्याला खांदा लावून काम करते. खर्चात बरोबरीचा वाटा घेते. तर तिला विनाकारण धाकात ठेवण मूर्ख पणा होईल. मला नाही ते करायचं." विनय ने नम्र आवाजात सांगितल.

" समजलं आम्हाला. आमचं कोण आहे नी कोण नाही. येऊ शकतो तू. शुभम कुठं शिकणार ते बघायला मी आहे अजून." दादा म्हणले.

दुसऱ्या दिवशी स्नेहा व विनय त्यांच्या मुलांसोबत पुण्याला निघाले. जाताना आई दादा वहिनी सगळे त्यांच्या वर रुसलेले होते. विनय ने जातांना दादांना सांगितल त्याला पुण्याला ठेवलं तर तो त्याच्या कडून जे होण्या सारखं असेल ते करेल. पण आज त्यांच्या नात्यात गाठ पडली होती. काय माहिती कशी सुटेल का ही गाठ ?

स्नेहा जे म्हणाली ते चुकलं का ?

तिचा निर्णय चुकला होता का ?

©® वेदा

कॉमेंट मध्ये सांगा.


🎭 Series Post

View all