अमृता ला आता दवाखान्यात ऍडमिट केलं होत , डॉक्टर प्रीती स्वतः तिच्यावर उपचार करणार होत्या . शिवाय शिवानी आणि कुणाल सुद्धा हजर होते .
प्रीती - " हाय , काय ग शिवानी , आज वेळ मिळाला का तुला मला भेटायला ?"
शिवानी - " तस नाही ग प्रीती . तू तुझ्या कामात आणि मी माझ्या कामात . पण तुझी आठवण मात्र रोज व्हायची मला ."
प्रीती - " तर तर . म्हणून तर मला रोज उचकी लागायची "
शिवानी - " ते जाऊ दे . आज मी एका महत्वाच्या कामासाठी आलेय तुझ्याकडे ."
प्रीती - " बोल ना . "
शिवानी - " आधी याची ओळख करून देते . हा कुणाल . आर्मी मध्ये आहे . "
प्रीती - " हॅलो "
कुणाल - " हाय "
शिवानी - " प्रीती , एक पेशंट घेऊन आलेय तुझ्याकडे . अमृता भोसले . तिची मानसिक स्थिती ठीक नाहीये . खुप अत्याचार झालेत तिच्यावर . पण मला तिला बोलत करायचं आहे . काहीही करून . "
प्रीती - " तिला सोबत घेऊन आली आहेस का तू ?"
शिवानी - "हो . रूम नंबर ४०३ मध्ये आहे . "तशी प्रीती वॊर्डबॉय ला अमृता ला घेऊन यायला सांगते . तसे दोन वॊर्डबॉय तिला धरून आणतात . पण पुरुषाचा स्पर्श झालेला बघून ती अजूनच चिडते . कसेबडे ते वॊर्डबॉय तिला प्रीती च्या केबिन मध्ये आणतात .
अमृता - " आआआआ. सोडा मला सोडा . नका नेऊ मला कुठं . आई ग .. मेले मेले ..... आआआ " तशी प्रीती वॊर्डबॉय ना बाहेर जायची खूण करते . वॊर्डबॉय बाहेर जातात . तरीही अमृता अजून थरथरत असते .
प्रीती - " पुरुषाच्या स्पर्शाला खूप घाबरते आहे हि . " असं म्हणत तिने अमृता च्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत केलं .
अमृता - " ते आले ... बघ ते आले ... एक , दोन तीन , चार. पाच ... किती जण . जा . पाल इथून , जा , नाही तर तुला पण ते मारतील . जा जा . "
प्रीती - "रिलॅक्स अमृता . तुला इथं कोणीही काहीही करणार नाहीये . मी डॉक्टर आहे . "
अमृता - " डॉक्टर .. नको नको . आई ग .. शॉक. आई ग . "
शिवानी - " हे बघ , निखिल पण आलाय ना आपल्या सोबत . " तशी अमृता आपली नजर कुणाल वर टाकते .
अमृता - "निखिल , निखिल . निखिल आला . निखिल आला " असं म्हणत टाळ्या वाजवू लागते . आणि इतक्यात प्रीती तिच्या डोक्याला एक वायर लावते . तशी ती . घाबरते .
प्रीती - " घाबरू नकोस . काहीही होणार नाही . " पण अमृता तिचं ऐकण्याच्या मनस्थितीत नसते . ती वायर तोडून टाकते .
शिवानी - " हि असं वागत राहिली , तर हिला बोलत कस करायचं ?"
प्रीती - एक मार्ग आहे . हिप्नॉटिझम . पण तिने त्या लाल खड्याकडे बघत राहील पाहिजे . "
शिवानी - " हे काम कुणाल करू शकतो . कारण ती कुणाल ला निखिल समजते आहे . आणि प्रश्न काय विचारायचे ते पण कुणाल ला सांग . तोच विचारेल . "
प्रीती - " ठीक आहे . " असं म्हणत ती ते लोलक कुणाल च्या हातात देते . तसा कुणाल पुढे होते .
कुणाल - " अमृता इकडं बघ "
अमृता - " निखिल आला . माझा निखिल . " असं म्हणत ती त्याला मिठी मारते .
कुणाल - " अमृता , आता या खड्याकडे बघत राहायचं . त्यात तुला तुझी एंगेजमेंट रिंग दिसेल . "यावर खुश होत अमृता खुश होते आणि त्या खड्याकडे बघू लागते . थोड्याच वेळात ती पूर्ण हिप्नोटाईज होते .
प्रीती - " तुझं नाव काय आहे ?"
अमृता - " अमृता भोसले . "
प्रीती - " तू पुरुषाच्या स्पर्शाला का घाबरतेस ? गुन्हा का कबूल केलास ? सांग . " आणि आता अमृता मागे जाऊन सांगायला लागते .
त्या दिवशी मी आमदार खंडागळे च्या मुलाला म्हणजे युवराज ला अटक केली . सगळे जण माझ्या धाडसाचे कौतुक करत होते . पण इतक्यातच आमदार खंडागळे रागाने लाल होत आले .
आमदार खंडागळे - " कोण आहे ती इंस्पेक्टर , ज्याने माझ्या मुलाला आत टाकलं आहे . ?"
अमृता - " बस सर "
आमदार खंडागळे - " मी बसायाला आलेलो नाही . माझ्या मुलाला सोडून दे ."
अमृता - " सॉरी . चार्जशीट बनलेली आहे . एका मुलीने तुमच्या मुलावर छेडछाडीच्या आरोप केला आहे . "
आमदार - " कोण आहे ती मुलगी ? किंमत बोल म्हणावं तिला ."
अमृता - " मुलींची इज्जत अनमोल असते सर "
आमदार खंडागळे - " पण त्यांच्या इज्जतीपेक्षा आमची इज्जत जास्त महत्वाची असते. त्यांना किडा- मुंगीसारखं जगायची सवय झाली असते . आमचं तस नसत ."
अमृता - " सर तुम्ही तुमच्या मुलाचा गुन्हा पाठीशी घालत आहेत . "
आमदार - " मग बाप असतो कशासाठी ? पोराचे गुन्हे पोटात घेण्यासाठीच ना ."
अमृता - " माफ करा सर . जसे तुम्ही बाप आहेत , तसे त्या मुलीचे पण बाप आहेत .आणि कायद्याच्या पुढे सगळे सारखे असतात . "
आमदार - " तुम्ही माझ्या मुलाला आत्ता च्या आत्ता सोडा , नाही तर मला एस पी कडे तक्रार करावी लागेल " आणि इतक्यात एस पी सर येतात .
एस पी - " काय भानगड आहे ?" तशी झालेला सगळं प्रकार अमृता एस पी सरांना सांगते .
आमदार - " बघा कि साहेब आता , पोरांच्या हातून लहान - मोठ्या चुका होतच असतात , म्हणून काय असं जेल मध्ये टाकयच होय ?"
एस पी - " अमृता , कळत नाही का तुला ?"
अमृता - " पण सर .."
एस पी - " असं अटक करतात का अशा गुन्ह्याला . डायरेकट रिमांड मध्ये घ्यायचं ना ." आता आमदारांचा चेहेरा भीतीने पांढरा पडला पण अमृता ला हसू आलं .
अमृता - " येस सर "
आमदार खंडागळे - " ए एस पी . सगळं महागात पडेल तुला ." आणि इतक्यात एक जोरात कानाखाली आमदाराला बसते . अमृता चा राग अनावर झालेला असतो
अमृता - " आमदार साहेब , हे पोलीस स्टेशन आहे . तुमचं पक्ष कार्यालय नाही . इथं वर्दी आणि वर्दीतील माणूस , दोघांचा हि मान ठेवायचा असतो . "
आमदार - " बघून घेईन सगळ्यांना . आणि ए लेडी दबंग . तुला तर नाही आयुष्यतून उठवलं ना , तर नाव नाही सांगणार आपलं . " गाल चोळत खंडागळे बोलले
एस पी - " आम्हाला बघाल तेव्हा बघा , पण आणि मुलाच्या जामिनाच बघा . कारण आता तुमचा मुलगा वाघिणी च्या ताब्यात आहे . " असं म्हणत त्यांनी अमृता ला इशारा केला आणि लगेचच अमृता आतगेली . तिने आता युवराज ला रिमांड वर घेतलं होत . मुलीची छेड काढल्याचे काय परिणाम असतात हे आता आता युवराज ला समजून चुकले होते . पण दोनच दिवसात आमदारांनी युवराज ला जामीन मिळवून देऊन त्याची सुटका केली .
आपल्या झालेल्या अपमानाने पेटून उठलेल्या आमदार खंडागळे नि एक फोन लावला आणि काय करायचं ते सगळं सांगितलं . आता रात्रीचे दहा वाजून गेले होते , आणि एस पी सरांना खबर लागली , कि अमली पदार्थांची एक मोठी डील होणार आहे . आता वेळ घालवण्यात अर्थ न्हवता . पाणी आपल्या बाजूलाच असलेल्या नलावडे आणि अमृता ला सोबत घेतलं . त्या ठिकाणी गेल्यावर धुमश्चक्री सुरु झाली . पहिल्यांदा नलावडे मारले गेले . मग अमृता बेशुद्ध झाली आणि सगळ्यात शेवटी एस पी ना पकडून एका माणसासमोर उभं करण्यात आलं . बाजूलाच आमदार खंडागळे हसत उभे होते .
एस पी - " अस्स. हि तुझी चाल होती तर ."
आमदार - " खूप उशिरा समजलं तुला एस पी . " असं म्हणत आमदार आपलं पिस्तुल काढतात . पण तो माणूस त्या आमदारांना अडवतो .
माणूस - " खंडागळे ,त्या अमृता च पुस्तूल उचला आणि याना गोळ्या घाला . "
खंडागळे - " असं का बॉस ?"
माणूस - " कारण आपल्याला एस पी ना मारायचं आहे आणि अमृताला मरण यातना द्यायच्या आहेत . " यावर हसत खंडागळे नि अमृतच पुस्तूल उचललं आणि एस पी ना गोळ्या घातल्या . आणि सगळा अमली पदार्थांचा साथ तिथून दुसरीकडे हलवण्यात आला .
कोण आहे हा बॉस ? असं काय झालं , कि अमृता ने न केलेला गुन्हा स्वतःच्या माथ्यावर घेतला . या सगळ्या प्रश्नाची उत्तर जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचा .

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा