त्या माणसाला बघून शिवानी ने अन्वर ला गाडी थांबवायला सांगितली . गाडी थांबताच शिवानी बाहेर आली आणि लगेचच त्या माणसाने शिवानी चे पाय धरले . तशी शिवानी ओशाळली .
शिवानी - " अहो काका , काय करताय ? कोण आहेत तुम्ही ?"
माणूस - " माझ्या लेकीला न्याय द्या मॅडम . माझ्या लेकीला न्याय द्या . "
शिवानी - " अहो काका , जरा स्पष्ट बोला . कोण तुमची लेक ? आणि मुळात तुम्ही कोण ?"
माणूस - " मी बाजीराव भोसले . अमृता चा वडील . "हे ऐकून शिवानी ला आनंद झाला .
शिवानी - " हे बघ काका . काळजी नका करू . मी तिच्या शिक्षेवर स्थगिती आणली आहे . पण मला तुमची मदत लागेल . "
माणूस - " तुम्ही काय सांगाल ती मदत करेन बघा मी . ."
शिवानी - " बसा गाडीत . माझ्या घरी जाऊया आपण ." असं म्हणताच तो माणूस गाडीत बसला . अन्वर ने गाडी घराच्या दिशेने नेली . घरी आले तेव्हा संध्याकाळ चे सात वाजले होते .सखू ने सगळ्यांना चहा दिला आणि स्वयंपाकाच्या तयारी ला लागली .
बाजीराव - " माझी काय मदत हवीय मॅडम ?"
शिवानी - " अमृता बद्दल जे घडलं ते त्याबद्दल तुम्हाला काही माहित आहे का ?"
बाजीराव - " नाही मॅडम .आम्हाला काळजी नको म्हणून ती घरात काहीही सांगत न्हवती . पण गेल्या चार महिन्यात तिचा आवाज फोन वर बदलल्यासारखा वाटत होता . आधी रोज फोन करायची . पण गेल्या चार महिन्यापासून आठवड्यातून एकदा करायला लागली . नंतर नंतर फोन येणं बंद झालं . पेपर मधली बातमी वाचून मला इथली परिस्थिती समजली . पेपर मध्ये बातमी आल्यामुळे सगळ्या गावाने वाळीत टाकलं आम्हाला . मी तिला सोडवायाल इथं आलो आणि वकील बघू लागलो , पण एकही वकील तिची केस घेईना. आणि ज्यांनी घ्यायची तयारी दाखवली त्यांची फी इतकी होती , की मी स्वतःला विकलं तरी इतके पैसे जमा करू शकलो नसतो . पण माझी मुलगी निर्दोष आहे हो . माझी मुलगी निर्दोष आहे . तिला वाचवा " असं म्हणत हात जोडून बाजीवाव रडू लागले .
शिवानी - " काका , नका काळजी करू . काहीही होणार नाही तिला . पण काय झाले हे मला समजायला हवं , त्याशिवाय मी काहीच करू शकत नाही . "
बाजीराव - " अमृता ला डायरी लिहायची सवय होती . अगदी कॉलेज यामध्ये आल्यापासून ती डायरी लिहायची . ती डायरी सापडली तर ......"
शिवानी - " ती डायरी मला मिळाली आहे काका . "
बाजीराव - " त्या डायरीत सगळं असेल मग . वाचवा माझ्या पोरीला . " असं म्हणत त्यांनी पुन्हा हात जोडले आणि आपल्या खिशातून एक डबी काढत शिवानी पुढे ठेवली .
शिवानी - " हे काय ?"
बाजीराव - " अमृता च्या आई च मंगळसूत्र आहे . ते विकून जितके पैसे येतील , तितकेच पैसे देण्याची माझी ऐपत आहे .मी येतो आता . गावी जायला पाहिजे . " तशी ती डबी शिवानी ने पुन्हा त्यांच्याकडे दिली .
शिवानी - "दागिने बायकांच्या अंगावर चांगले दिसतात काका . सोनाराच्या दुकानात नाही . आणि मला एक रुपयाही नको . एका मुलीकडन वडिलांना आणि एका बहिणीकडून बहिणीला हि भेट आहे असं समजा . पण तुम्ही आत्ता जावा आणि काकूंना आणि बाकी कोण असेल त्यांना घेऊन इथं या . आता तुम्ही माझ्यासोबत राहणार आहात . "
बाजीराव - " नको मॅडम , आधी खूप उपकार करताय . त्यात माझ्या बायको आणि मुलाला घेऊन इथं राहायला येऊ म्हणताय होय ?"
शिवानी - " या काका . माल तुमची दुसरी मुलगी समजा . काकू आणि मुलाला घेऊन इथं या . मी वाट बघते आहे . " यावर पाणावलेल्या डोळ्यांनी होकार देत दिला आणि ते गावी निघाले ,पण शिवानी ने त्यांना आधी जेवू घातलं मग पाठवलं . खरं तर शिवानी च जेवणात लक्ष न्हवत . तिला ती डायरी वाचायची होती . त्याची उत्सुकता तिला होती . एखादा पुरावा तिला त्या डायरी मधून च मिळणार होता . कसेबसे चार घास पोटात ढकलून ती तिच्या खोलीत गेली आणि पर्स मधून डायरी काढून ती वाचू लागली . अगदी इथं आल्यापासून तिने डायरी लिहिली होती . शिवानी पाहिलं पण उघडून वाचू लागली .
( डायरी मधील मजकूर )आज मी खूप खुश आहे .स्वतःच्या बळावर मी आज इन्स्पेक्टर झाले आहे . खरंच , अरुण देशमुख सरांचे खूप खूप आभार . त्यांनी खूप मदत केली मला . आज जिवंत असते ते , तर मला वर्दीत बघून खूप खुश झाले असते . माझं पाहिलंच पोस्टिंग मुंबई सारख्या शहरात झालं होत . राहायला पोलिसांची खोली होती . पण मला उद्याच निघावं लागणार होत . आई , बाबा , अनिकेत सगळ्यांना सोडून जायचं जीवावर आलाय खर तर .पण इलाज नाही . जावं लागणारच . आई ला आतापासूनच काळजी वाटत आहे . साहजिकच आहे . आई च काळीज आहे . मी मुंबई आलं जाणार म्हणल्यावर अनिकेत ने त्याला हव्या असलेल्या वस्तूंची यादी काढायला सुरवात केली आहे .
आज सकाळीच गावावरून निघाले आणि दुपारी इथं पोहोचले . कधी शहरात पण गेलं न्हवते मी , आज अचानक मुंबईत नोकरी लागली . पण मुंबई हे गुन्हेगारांचा केंद्रबिंदू असल्यामुळे माझ्यावरचे जबाबदारी मोठी होती . आज आई आणि अनिकेत ची खूप आठवण येतेय . पण इलाज नाही . उद्यापासुन रोज लिहायला मिळेल याची खात्री नाही .पण महत्वाच्या घटना मी नक्की लिहून ठेवेन ,
आज बऱ्याच दिवसांनी लिहिते आहे . आज योगायोगानं ऐक छान मैत्रीण भेटली . शिवानी देशमुख . आतंकवाद्यनि कॅफे च्या सगळ्या स्टाफ ला आणि कस्टमर ला ओलीस ठेवलं होत , तेव्हा त्यांना सोडवायला एकटी निघाली होती वेडी . मीच तिला आडवल आणि खिडकी च्या साह्याने आठ मजले चढून गेले आणि तीन अतिरेक्यांना शूट करून एकाला जिवंत पकडलं . आणि एस पी सरांच्या हवाले केलं .बाहेर आल्यावर शिवानी सोबत कॉफी घेताना समजलं , कि शिवानी अरुण सरांची मुलगी आहे . मग तिला हॉटेल वर राहू न देता माझ्या घरी आणलं . चार दिवस मस्त मजेत गेले . तिची आणि निखिल ची ओळख पण करून दिली निखिल ...... आयुष्यातला सगळ्यात हळवा कोपरा , माझं भविष्य . माझं सर्वस्व . वेडा मोठा बिजनेसमॅन . तरीही माझ्या मागे लागलाय लग्नासाठी . आधी नाही नाही म्हणणारी मी ..... नकार होकारात कधी बदलला तेच समजलं नाही .
बऱ्याच दिवसात लिहायला जमलंच नाही . काल एका कॉलेज ची मुलगी तक्रार घेऊन आली होती कि , कॉलेज मधली काही गुंड पोर मुलींना छेडतात . कर्तव्याच्या भावनेने मी तडक उठले आणि कॉलेज वर जाऊन तडक त्या सगळ्या पोरानं अटक केली आणि चार्जशीट बनवली . त्यातला एक मुलगा बड्या नेत्याचा निघाला . पण कायदा सगळ्यांना सारखाच असतो ना . त्या मुलाचे वडील त्या मुलाला सोडायची विनंती करत होते . समजावून झालं , धमकी देऊन झालं . पण मी बधले नाही . राजकीय वजन वापरून त्या मुलाला सोडवून घेऊन गेले . पोलीस स्टेशन इन्चार्ज पवार साहेबानी पाण्यात राहून माशाशी वैर न करण्याचा सल्ला दिला . पण मी न्यायाने वागले होते . माझं काय चुकलं होत यात ?"
कालच एका मिशन वर जावं लागलं होत .अमली पदार्थाच्या तस्करी करणाऱ्या टोळी ला पकडायचं होत . एस पी सर , नलावडे आणि मी . तिघेच जण होतो आम्ही . नलावडे म्हणजे ताकदीचा माणूस . त्यामुळे घाबरायचं कारण न्हवत . त्या टोळीचा आणि आमचा सामोरा समोर सामना झाला .एस पे सरांचा निशाणा अचूक होता . मी पण आज याना जाऊ द्यायचं नाही या विचाराने पेटून उठले होते . नलावडे च्या अंगात तर साक्षात बलभीम संचाराला होता . पण कुठून तर आलेल्या एका गोळीने नालावडेंच्या छातीचा वेध घेतला . आता त्यांच्याकडे बघायला सुद्धा वेळ न्हवता . दोनच मिनिटात एस पी सरांच्या दंडाला गोळी लागली . त्यांच्या रक्षणासाठी मी तिथं धावले , पण इतक्यात माझ्या डोक्यात मागून प्रहार झाला आणि माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली . मी निपचित पडले . जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा सगळे अमली पदार्थ नेण्यात ती टोळी यशस्वी झाली होती . आणि माझ्या बाजूलाच एस पी सरांच आणि नालावडेंचं प्रेत पडलं होत . बाजूला पडलेली माझी बंदूक मी उचलली . कंट्रोल रूम ला फोन करून सगळं सांगितलं . आमची टीम लगेचच घटना स्थळी आली .नलावडे आणि एस पी सरांच्या बॉडी च पोस्ट मारडंम झालं आणि त्यात एस पी सरांना लागलेल्या लागलेल्या गोळ्या माझ्या बंदुकीतून चालवल्या गेल्या आहेत असं आढळलं . आता माझ्याकडे पाहण्याच्या सगळ्यांच्या नजर बदलल्या होत्या . माझ्यावर चौकशी कमिशन बसवलं गेलं आणि या केस चा निकाल लागेपर्यंत मला सस्पेंड करण्यात आलं आणि रिमांड मध्ये घेण्यात आलं .मी सांगत होते , की बेशुद्ध पडले होते , पण कोणीही माज्यावर विश्वास ठेवला नाही .
आजच पण कदाचित माझं शेवटचं पान असेल . मी गुन्हा काबुल करावा म्हणून माझ्यावर अनन्वित अत्याचार केले आहेत . पण अजूनही इ गुन्हा काबुल केला नाही . जे मी केलंच नाही ते मी काबुल का करू ? वरून सूत्र हलली आहेत , आणि माझ्या बाजूने उभे असणाऱ्या पवार साहेबांची बदली करण्यात आली आहे . आता समोर फक्त मरणाची वाट दिसत आहे . आणि ते सुद्धा कलंकित मरण . वर्दीवर एक ठपका घेऊन आलेलं मरण . देवा , मला माफ कर .माझ्या कर्तव्याला नाही देऊ नाही शकले मी .
डायरी वाचून शिवानी स्फुंदून स्फुंदून रडू लागली . आता तर अमृता ला सोडवायचाच असा निश्चय तिने केला . पण तिचे काही प्रश्न अनुत्तरित होते . एक म्हणजे तो नेता कोण होता , ज्याच्याशी अमृता ने वैर पत्करले होते आणि दुसरा म्हणजे निखिल ....... इतकं सगळं होऊनही निखिल ने हालचाल कशी काय केली नाही ? तो अमृता या भेटायला पण का गेला नाही ? कारण गेला असता तर त्याचा उल्लेख अमृता ने डायरीत नक्की केला असता . आता या सगळ्या प्रश्नाची उत्तर तिला शोधायची होती . आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला आरती माने ना भेटायचं होत .
शिवानी आणि निखिल ची भेट होईल का ? आरती माने शी बोलून शिवानी च्या हातात काही पुरावा येईल का ? काय सांगेल आरती माने शिवानी ला . हे सगळं जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचा . आणि तोवर रेटिंग , लाईक आणि कमेंट्स सोबत कॉईन्स पण देत राहा .