भाग - ३
अन्,
एक सडपातळ बांध्याची मुलगी विकी शेजारी येऊन उभी राहिली जिच्या भांगेत कुंकू अन् गळ्यात मंगळसूत्र होते.
.
.
तिच्या येण्याने तो क्षण तिथेच थांबला होता.
एकीकडे अण्णांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला माई व्याकूळ होती. तर, दुसरीकडे तोंडाचा आ ss वासून अण्णा दाराकडे बघत होते.
त्यांना काहीच समजत नव्हते. ते पाहतायत ते खरे आहे की अजून काही. त्या मुलीकडे बघत अण्णा स्तब्ध उभे होते.
" अहो ss"
मागून माईने आवाज दिला. तेव्हा कुठे अण्णांची नजर तिच्यावरुन हटली. गोंधळेल्या नजरेने अण्णा माईकडे बघत होते.
" आपली सून. "
माई हळू आवाजात म्हणाल्या. इतकंस वाक्य बोलायला माईंची जीभ अडखळत होती. त्यांच्या डोळ्यात पाणी असलं तरी चेहऱ्यावर काही ही चूक न केल्याचं समाधान होतं.
अन्,
तितकं अण्णांसाठी पुरेसं होतं. म्हणूनच, पुढे काही एक प्रश्न न विचारता ते गाली स्मित हास्य करत माईंना शांत केले.
तितकं अण्णांसाठी पुरेसं होतं. म्हणूनच, पुढे काही एक प्रश्न न विचारता ते गाली स्मित हास्य करत माईंना शांत केले.
अन्, म्हणाले.
" अगं ss
बघतेयस काय?
बघतेयस काय?
आपल्या घरची लक्ष्मी दारात उभी आहे. तिच्या स्वागतासाठी आरतीचं ताठ आणणार नाहीस का?"
अण्णांच्या या वक्त्यामुळे विकी अन् माई पुरते गोंधळून गेले. जिथे काय उत्तर द्यावी हा प्रश्न पडला होता तिथे उत्तर देण्याची वेळच आली नव्हती.
अण्णांचा प्रसन्न चेहरा बघून माईचा चेहरा ही खुलून आला होता. डोळ्यातलं पाणी एकाएकी विरुन गेलं होतं. मनात अनेक प्रश्न होते पण ते या क्षणी महत्वाचे नव्हते.
तात्काळ माईं स्वयंपाक घरात गेल्या. अन्, थोड्याच वेळात त्या बाहेर आल्या.
त्यांच्या हातात तांदळाने भरलेलं कलश अन् आरतीचं ताठ होतं. तेच कळश त्यांनी रेवाच्या पायाजवळ ठेवला.
आधी रेवाच्या कपाळी कुंक लावून मग तिला माप ओलांडून आत यायला सांगितले. तसे, रेवाने हळूच अंगठ्याने कळसाला लोटून दिले.
अन्,
सांरंग कुटुंबाची नवी लक्ष्मी घरात आली.
सांरंग कुटुंबाची नवी लक्ष्मी घरात आली.
आत येताच माईंनी अण्णांकडे बघून रेवाला खूनविले. तशी, दुसऱ्याच क्षणी रेवाने अण्णांच्या पायांना स्पर्श करीत त्यांचा आशीर्वाद घेतला.
" सुखी रहा बाळा.
आणि हो, स्वागत आहे तुझं आपल्या घरात." म्हणत, अण्णांनी ही रेवाच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशिर्वाद दिला.
आणि हो, स्वागत आहे तुझं आपल्या घरात." म्हणत, अण्णांनी ही रेवाच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशिर्वाद दिला.
अण्णांच्या चेहऱ्यावर हसू बघून घाबरलेली रेवाला ही जरासे हायसे वाटले. तिच्या ही गाली हास्याची छटा पसरुन आली.
तिच्या पाठोपाठ विकीने ही चाचरतच अण्णांना सामोरे जाण्याची हिम्मत दाखवली. काहीच न बोलता विकीने अण्णांसमोर झुकला.
तसे,
अण्णांनी नजर रोखत त्याच्या खांद्यावर नुसताच हात ठेवला. त्यांच्या अशा वागण्याचं विकीला जरा ही वेगळं वाटले नाही. कदाचित त्याने असेच काही अपेक्षित केले होते.
अण्णांनी नजर रोखत त्याच्या खांद्यावर नुसताच हात ठेवला. त्यांच्या अशा वागण्याचं विकीला जरा ही वेगळं वाटले नाही. कदाचित त्याने असेच काही अपेक्षित केले होते.
अण्णांकडे बघत विकी त्यांच्याच बाजूला उभा राहीला. मात्र, अण्णांच सगळं लक्ष माईं व् रेवाकडे होते.
अण्णांचा आशिर्वाद घेऊन रेवा आता माईंकडे वळली होती. जसं जशी ती पाऊल पुढे टाकीत होती तसं तसे तिचे डोळे भरुन येत होते.
माईं सुध्दा तिलाच बघत होत्या. तिच्या ओल्या डोळ्यांना बघून त्यांच्या ही डोळ्यांची किनार भिजत चालली होती. तरी माईंच्या मुखावर तेज होते.
" आतू ss" म्हणतच, रेवाने माईंना मिठी मारली. अन्, तिने डोळ्यांत साचलेल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली.
डोळ्यांपासून अश्रूंना वेगळं करीत ती तिचं मन ही मोकळं करीत होती. माई कधी तिच्या डोक्यावरुन तर कधी पाठीवरुन फक्त मायेचा हात फिरवीत होत्या.
माईंनी तिला रडण्यापासून रोखले नाही की त्या क्षणी तिला काही समजावले नाही. कदाचित, तिच्या मनावर असलेल्या अश्रूंचा भार कमी करण्यासाठी मुद्दामूनच माईंनी तिला रडू दिले होते.
अण्णा व् विकीने त्या क्षणी गप्प राहून फक्त प्रेक्षकाची भूमिका घेतली होती.
आली तशी काही मिनिटे सरुन गेली तरी, रेवाने माईंवरली मिठी सैल केली नव्हती की अश्रू गाळण्याचे थांबवले नव्हते.
" रेवा ss"
म्हणत माईंनी तिला स्वतः पासून वेगळे केले.
म्हणत माईंनी तिला स्वतः पासून वेगळे केले.
रडून रडून रेवाचा चेहरा पार सुकून गेला होता. तरी, अश्रू काही थांबले नव्हते. संथ गतीने अश्रू ओघळतच होते. त्याचमुळे तिचे डोळे लालबुंद झाले होते शिवाय काहीसे सुजले ही होते.
" ए बाळा ss
आधी हे रडणं थांबव बरं."
" ए बाळा ss
आधी हे रडणं थांबव बरं."
रेवाच्या डोळ्यातलं पाणी पुसत माई म्हणाल्या. तशी, रेवाने पुन्हा माईंना मिठी लागली. तिचे उसासे मावत नव्हते.
प्रेक्षकांची भूमिका घेणारे विकी अन् अण्णा प्रश्नार्थक चेहऱ्याने एकमेकांना बघत होते. माईंनी पुन्हा एकदा रेवाला स्वतः पासून दूर करत पुन्हा तिला समजावू लागल्या.
" ए, राजा ss
माझं ऐक तरी. भाऊंना काही एक होणार नाही. सगळं ठीक आहे आता. मी आहे ना. "
माझं ऐक तरी. भाऊंना काही एक होणार नाही. सगळं ठीक आहे आता. मी आहे ना. "
हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर असलेलं हसू कितपत खरे होते कुणास ठाऊक? पण, याची त्यांना अन् रेवाला खूप गरज होती.
( क्रमशः )
- रेखा खांडेकर स्वरा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा