भाग - ५
नवरदेव निघून गेला त्याच्या मागे मागे त्यांच्याकडची माणसं ही स्टेजवरुन निघून गेली. बघता बघता अर्धा स्टेज रिकामा झाला.
नक्कीच,
हा नवरदेव अन् त्यांच्या मित्रांचा खोडकरपणा असेल असे ही काही जणांना वाटून गेले. पण, नाही ती मस्करी नसून खरं होतं. हे एक तासा नंतर ही रिक्त असलेला स्टेज ओरडून सांगत होता.
हा नवरदेव अन् त्यांच्या मित्रांचा खोडकरपणा असेल असे ही काही जणांना वाटून गेले. पण, नाही ती मस्करी नसून खरं होतं. हे एक तासा नंतर ही रिक्त असलेला स्टेज ओरडून सांगत होता.
रेवा अजूनही हातात वरमाला घेऊन तशीच उभी होती नवरदेवाची वाट बघत.
हे सगळं मी दुरुन स्वतःच्या रागाला नियंत्रणात ठेवून शांतपणे बघत होते. पण, तेव्हा माझ्या रागाची मूठ उघडली गेली जेव्हा रेवाच्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंब तिच्या गाली उतरला.
माझ्या समोर असलेल्या गर्दीतून मी वाट काढीत अखेर नवऱ्या मुलाच्या रेस्ट खोलीत पोहचले. अन्, समोरचं दृश्य बघून कपाळी आठ्या आल्याशिवाय राहिल्या नाहीत.
सगळी वडीलधारी माणसं विनंती करीत उभे होते अन् तो नवरा मुलगा उद्धटपणे एका चेअरवर बसला होता.
मुलाच्या वयाच्या त्या मुलासमोर जयदीप हात जोडून उभा होता. त्याचे अश्रू सुकून डोळे ही कोरडे झाले होते. मात्र, त्या मुलाला काही एक फरक पडत नव्हता.
आपली मुलीकडची बाजू म्हणून रागाचा आवंढा गिळून मी गप्प दारात उभी होते. पण, पुन्हा त्याचे शब्द कानी पडले.
" आधी गाडी मगच लग्न. नाहीतर, मी निघालो."
हे ऐकताच माझी पावलं रागाने आपोआप आत खेचली गेली. व् दुसऱ्याच क्षणी माझा हात अन् त्या नवऱ्या मुलाचा गाल.
सप sss ss sss
एकाएकी त्या खोलीत निरव शांतता पसरली. कुणाच्या ही तोंडून शब्द फुटेना इतकं सगळ्यांना धक्का बसला होता. पण, जे झालं त्याच्याशी सगळे सहमत होते एवढं नक्की. कारण, सगळ्यांच्या मनात त्या क्षणी तीच भावना डोकावित होती.
पण, जयदीपला हे आवडलं नव्हतं.
" अगं,
काय केलंस हे? तू गप्प रहा नाहीतर जा बरं इथून."
काय केलंस हे? तू गप्प रहा नाहीतर जा बरं इथून."
नक्कीच,
एका मुलीच्या बापाला माझं असं वागणं पटणारं नव्हतं. अखेर तिच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न जो होता. पण त्याला समजावणं गरजेचं होतं.
एका मुलीच्या बापाला माझं असं वागणं पटणारं नव्हतं. अखेर तिच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न जो होता. पण त्याला समजावणं गरजेचं होतं.
" हे बघ.
मला ठाऊक आहे माझं असं वागणं तुला आवडलं नाहीय.
मला ठाऊक आहे माझं असं वागणं तुला आवडलं नाहीय.
पण तू एकदा शांत डोक्याने विचार कर. हा मुलगा एक गाडी वेळेवर न मिळाल्याने आपल्या रेवाला भर मांडवात एकटीला सोडून इथे आला.
तो उद्या दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी तिला सोडणार नाही याची काय खात्री?"
नुसती शक्यता ऐकूनच त्याचे डोळे पुन्हा भरुन आले होते. त्याची नजरेतली ती भीती त्या क्षणी मला चांगलीच कळत होती.
" दादा ss
जे झालं ते बरं झालं. या मुलाची खरी वृत्ती आपल्यासमोर आली. आपल्या रेवाच आयुष्य वाचलं रे दादा."
जे झालं ते बरं झालं. या मुलाची खरी वृत्ती आपल्यासमोर आली. आपल्या रेवाच आयुष्य वाचलं रे दादा."
जयदीप दादाचा हात हाती घेऊन त्याला पोटतिडकीने सांगत होतेच. की, आजू बाजूला जमलेल्या घोळक्यातून एक गृहस्थ त्यांचं मत मांडू लागले.
" खरंय, कृष्णाईचं.
याचा खरा चेहरा आताच दिसला. थोडक्यात वाचली तुझी पोर जयदीप."
याचा खरा चेहरा आताच दिसला. थोडक्यात वाचली तुझी पोर जयदीप."
" अशा पोरांना पायतानानं हानावं लागतंय. " त्यातल्याच एका वयस्क गृहस्थांनी आपलं खडतर मत प्रखरपणे मांडले.
" अगं पण,
आपली रेवा मांडवात एकटी उभी आहे गं. हे लग्न नाही झालं तर लोकं."
आपली रेवा मांडवात एकटी उभी आहे गं. हे लग्न नाही झालं तर लोकं."
हे बोलताना दादाची नजर विचारात गढली होती. रेवाच्या भविष्याला घेऊन अंतर्मनात उठलेल्या प्रश्नांचे पडसाद चेहऱ्यावर उमटू लागले होते.
" कळतंय मला.
तुझ्या मनात काय विचार प्रश्न रेंगाळतायत. पण तू काळजी करु नकोस. आपल्या रेवाला या पेक्षा कैकपटीने चांगला जोडीदार मिळेल. "
तुझ्या मनात काय विचार प्रश्न रेंगाळतायत. पण तू काळजी करु नकोस. आपल्या रेवाला या पेक्षा कैकपटीने चांगला जोडीदार मिळेल. "
" ओ ssss न झालेले सासरेबुवा.
तुमच्या लेकीला माझ्या नावाची उष्टी हळद लागलीय. तिच्या हातात माझ्या नावाचा चुडा भरलाय. मी पण बघतो.
अशा मुलीशी कोण करतंय लग्न??"
अशा मुलीशी कोण करतंय लग्न??"
गाल लाल अन् डोळ्यात अंगार घेऊन तो नवरा मुलगा मोठ्या गुर्मिनं कधी जयदीपला तर कधी मला बघून बोलत होता.
अन् सोबत उपहासात्मक हसू हसत तिथून तो निघून गेला.
..
..
अर्धा तास लोटून गेला तरी रेवा जशीच्या तशीच जाग्यावर उभी होती, तिथेच त्या पाट्यावर. तितक्यात एक कुजबुज तिच्या कानी पडली.
" लग्न मोडलं."
ते दोन शब्द तिच्या डोळ्यातल्या अश्रूंचा डोह अनुभवण्यासाठी पुरेसे होते. अन् अखेर तिच्या आसवांचा बांध फुटलाच. या क्षणापर्यंत खंबीरपणे उभी असलेली रेवा खाली कोसळली.
आधीच आईविन वाढलेली पोर. आणि आता हे लग्न मोडण्याचा डाग ती कसं सहन करणार होती.
लग्न मोडलं म्हणून दुःखी व्हावं की , रेवाच्या आयुष्यात अशी व्यक्ती आली नाही म्हणून आनंद मानावा कळत नव्हतं.
खरं तर,
आनंदच मानावा.
आनंदच मानावा.
साध्या एका गाडीसाठी हातात वरमाला घेऊन उभ्या असलेल्या आपल्या रेवाला भर मांडवात तो एकटीला सोडून निघून गेला. असा जोडीदार न मिळणंच योग्य.
धिराचा आधार देत भाऊंना कसे बसे मांडवात आणले. तोवर, लग्न मोडलं हे सगळीकडे आगीसारखं पसरलं. कारण, मांडव अर्धा रिकामा झाला होता.
जिथे नवरदेवच निघून गेला. तिथे त्याच्या सोबत आणलेलं वऱ्हाड किती काळ राहणार होतं. त्यांनी ही तिथून काढता पाय घेतला.
अन्,
एकाएकी मांडवात हळू हळू कुजबुज सुरु झाली.
एकाएकी मांडवात हळू हळू कुजबुज सुरु झाली.
" शेवटी पोरगीच कमनशिबी. जन्म होताच आईला गिळून बसली. अन् आता बापाला बी गिळून बसते वाटतं. "
( क्रमशः )
- रेखा खांडेकर स्वरा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा