Login

अन् त्यांना प्रेम झाले. ( भाग - ७ )

प्रेमाची सुरवात
भाग - ७

" अन्,
अखेर ते दोघं लग्न बंधनात अडकले. "

माई विकीकडे बघत अण्णांना सगळी हकीकत सांगत होती. या क्षणी अण्णांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली होती.

सोबत,
पोटी इतका गुणी बाळ जन्माला याचा अभिमान ही वाटत होता. विकीला स्वतः जवळ बोलावून अण्णांनी त्याची पाठ मोठ्या अभिमानाने थोपटली.

तसा,
एखादा मोठा खजिना भेटल्यागत विकी सुखावला. 

" माफ कर, बाळा.
तुला न विचारता तुझ्या आयुष्याचा इतका मोठा निर्णय मी घेतला."

माईंच्या बोलण्यात हळव्यापणाची झालर चढली होती. अन्, त्यांचे डोळे ही हलकेसे पाणावले होते.

" अगं आई.
असं का बोलतेयस्? माझ्यासाठी तु नक्किच निर्णय घेऊ शकतेस. कारण, तुझा प्रत्येक निर्णय माझ्या हिताचा असतो हे चांगलंच ठाऊक आहे. हा ही निर्णय माझ्यासाठी योग्यच असेल." 

माईंच्या डोळ्यातलं अलगद गालावर उतरु पाहणाऱ्या अश्रूंना विकी हाताने पुसत म्हणाला. 

एका आईसाठी हा क्षण म्हणजे अभिमानाने डोळ्यात अश्रू आणण्याचा होता. माईंच ही काहीसं असेच झाले होते. डोळे अश्रूंनी गच्च भरले होते तर उर गर्वाने भरुन आले होते. 

..

..

काही मिनिटांचा काळ लोटल्यावर माई स्वतःला सांभाळत त्यांच्या खोलीत आल्या.

समोर,
रेवा अजून जागी होती. बऱ्याच मिनिटापूर्वी आरामासाठी आलेली रेवा अजून जागी होती. याचा एक अंदाज माईंना होता.

कारण,
एका क्षणाने तिचं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं होतं. हाच विचार तिला नक्कीच सतावित असणार याची खात्री होती माईंना. अन्, नेमके तेच होत होते.

शून्यात नजर गढवून रेवा बेडच्या एका कोपऱ्यात बसली होती.

तिचा अंदाज घेत माई हळू हळू एक एक पाऊल पुढे टाकीत होत्या. मात्र, कुणाच्यातरी येण्याची चाहूल अखेर रेवा झालीच. तिने गडबडीने दाराकडे पाहिले. तर, समोर माई उभ्या होत्या. माईंना बघून पुन्हा तिच्या अस्वस्थ मनाला बरे वाटू लागले.

" झोप येत नाहीय का?  "

रेवा समोर येऊन माईंनी तिच्या खांद्यावर हात ठेवून विचारले.

तिला झोप येणार नव्हतीच हे माहीत असूनही ही माईंनी तिला सवाल केला होता. कारण,तिला बोलतं जे करायचं होतं. विचारांच्या मुशीतून तिला बाहेर जे काढायचे होते.

समोरुन रेवाने ही नकारार्थी मान हलवून काहीच न बोलता माईंच्या प्रश्नांचे उत्तर दिले होते.

" बरं, ये.
थोडा वेळ माझ्या मांडीवर डोकं ठेवून पड. बरं वाटेल तुला." 

बेडवर व्यवस्थित बसून मांडीवर हात ठेवत माईंनी रेवाला डोकं टेकविण्याचा इशारा केला. तशी, रेवाने ही विलंब न करता माईंच्या मांडीवर डोकं टेकविले.

डोकं टेकविता रेवाच्या बांधील अश्रूंना मोकळी वाट मिळाली. आई विन वाढलेल्या रेवाच्या नशिबी अशी आईची माया फार दुर्मिळ असायची.

अन्,
आज तीच माया, प्रेम तिला मिळत होते.

माई सुद्धा तिच्या केसांवरून मायेचा हळूवार स्पर्श करीत होती. तिच्या मनाची अवस्था माईंपासून काही लपून नव्हती. 

कारण,
माईंसाठी रेवा दूरची नव्हती किंवा रेवासाठी माई काही अनोळखी नव्हत्या. दूरची का होईना पण माई म्हणजे तिच्या वडिलांची बहिण.

थोडक्यात काय तर, 
माई ही रेवाची दूरची आत्या होती. माईं समोरच रेवा लहानाची मोठी झाली होती. रेवाच शिक्षण तिचे संस्कार सगळं काही माईंच्या नजरे खालूनच झालं होतं.

शिवाय,
लग्नसराईत किंवा सणावाराला त्यांची भेट व्हायचीच. तसं पाहायला गेलं तर, माईंच्या माहेरात नात्यांचा व् माणसांचा गोतवाळा खूप मोठा असायचा.

अन्,
यांचा हा एकोपा कुण्या सोहळ्याला दिसून यायचा. सगळ्यांची घर जरी वेगवेगळे असले तरी मन अजूनही एकत्रच होतं.

प्रत्येक सणाला माई माहेरात जाता आवरजून रेवासाठी काही ना काही भेट वस्तू घेऊन जायच्या. त्या आजवर कधी ही विसरल्या नव्हत्या.

माईची अन् रेवाची चांगली गट्टी जमली होती. एखाद्या मैत्रिण प्रमाणे माई सुध्धा तिच्याशी वागत होत्या. रेवाला आई नव्हती तर माईंना मुलगी.

म्हणूनच
कदाचित त्या दोघांच्या आयुष्यातली ती कमी रेवा अन् माई एकमेकांत पूर्ण करुन घ्यायच्या. ते म्हणतात ना , माय लेक लोकांची अन् आत भांची एकाची.

अगदी तसंच काहीसं रेवा व् माईच नात होतं.

वर वरच्या गप्पा गोष्टी असो किंवा मनातलं काही गुपित असो रेवा सगळं काही माईंजवळ बोलून मोकळी व्हायची. माई सुद्धा तिला जज न करता तिची प्रत्येक गोष्ट आधी शांतपणे ऐकून घेत होत्या.

अन्,
मगच काही रिएक्ट व्हायच्या. कारण, त्यांना चांगलंच ठाऊक होतं रेवा विनाकारण काही बोलणार नाही की काही करणार नाही. तिच्या बोलण्यामागे नेहमीच तथ्य असायचं.

म्हणूनच,
रेवा अन् माईंचं नातं दिवसेंदिवस घट्ट अन् खुलत जात होतं. 

पण,
आज मोकळ्यापणाने बोलणारी रेवा खूप शांत शांत होती.

( क्रमशः )