भाग - १०
( शेवट )
" असं कसं शकू.
दारातच पाहुणचार करु आम्ही. चांगलं आत बोलवून चहाची आंघोळ घालू तुला आम्ही दोघी माय लेकी. काय गं रेवा."
दारातच पाहुणचार करु आम्ही. चांगलं आत बोलवून चहाची आंघोळ घालू तुला आम्ही दोघी माय लेकी. काय गं रेवा."
माईंनी ही लगेच प्रश्नाला सडेतोड उत्तर दिले.
" हो. आत्तू. "
रेवाने ही माईंच्या प्रश्नाला प्रतिउत्तर दिले. तिचं उत्तर ऐकून मुलगी रमतेय हे बघून सगळ्यांनाच बरे वाटले. विशेषतः जयदीपला.
माईंच्या हजरबाबीपणा आधीपासूनच त्यांच्या अंगी गुण होता.
" ये ना आत दादा.
दारातच किती वेळ उभा राहशील? रेवा त्यांना आत घेऊन ये."
दारातच किती वेळ उभा राहशील? रेवा त्यांना आत घेऊन ये."
तसे,
एक एक करुन सगळे आत येऊ लागले. जयदीप सोबत काही बायकांचा घोळका ही आत आला. घोळका म्हणजे माईंच्या बहिणी अन् रेवाच्या आत्या. एकूण चार बहिणी त्यात मुख्यतः म्हणजे शकू मावशी होत्या.
प्रत्येकीच्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक.

शकू मावशी या माईंच्या छोट्या बहिण असल्या तरी, लहान वयापासूनच मस्ती अन् अगवापणात कुणी ही त्यांचा हात धरु शकत नव्हतं.
" कशी आहेस माई?आणि आमचे भाऊजी कसे आहेत?"
शकू मावशी स्वभावाला अनुसरुन बोलून गेल्या. त्यावर माईंनी ही त्यांच्यातला विशेष गुण वापरत त्यांच्या प्रश्नाला साजेसं उत्तर दिले.
समोर ,
अचानक वडील दिसल्याने रेवाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. म्हणूनच ते इथे कसे हा विचारच तिच्या डोक्यात आला नाही.
अचानक वडील दिसल्याने रेवाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. म्हणूनच ते इथे कसे हा विचारच तिच्या डोक्यात आला नाही.
मात्र,
सगळे शांत झाल्यावर किंबहूना थोड्या वेळाने एकाएकी तिच्या लक्षात आले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी सकाळी ते इथे?
सगळे शांत झाल्यावर किंबहूना थोड्या वेळाने एकाएकी तिच्या लक्षात आले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी सकाळी ते इथे?
जयदीप सुखरूप समोर असूनही रेवाचं मन काळजीत पडलं होतं. काल मांडवात इतकं वाईट घडलं की आता कुठली ही छोटीशी गोष्ट ही खूप मोठी वाटत होती.
" तुम्ही इथे?", रेवाने काळजीने जयदीप जवळ विचारपूस केली.
काहीच उत्तर न देता जयदीप फक्त गाली स्मित हास्य करत होते. त्यांचा हा अबोला रेवाला सहन होत नव्हता. काहीच नसताना ही रेवाच्या मनी नको नको त्या शंका डोकावून जात होत्या.
अखेर
तिच्या विचारांच्या गर्तेततून तिला बाहेर काढीत माई बोलू लागल्या.
तिच्या विचारांच्या गर्तेततून तिला बाहेर काढीत माई बोलू लागल्या.
" तुला वाटतंय तसं काही झालं नाहीय. मीच बोलावलं आहे दादाला. तुला अन् त्याला एकमेकांची गरज आहे. शिवाय आम्हा दोघांना ही बरं वाटेल."
माईंनी इतका विचार केला, हेच खूप होतं रेवासाठी.
जयदीप व् अण्णा खूप दिवसांनी किंबहूना खूप वर्षाने एकमेकांशी बोलत होते. बोलता बोलता जुनी आठवनी तुफळून जागी होऊ पाहत होत्या.
" रेवा ss
बाळा, सगळ्यांसाठी चहा आण. या शकुसाठी तर जरा जास्तच.",
बाळा, सगळ्यांसाठी चहा आण. या शकुसाठी तर जरा जास्तच.",
बहिणींच्या घोळक्यात बसलेल्या माईंनी चहाचा फर्मान सोडला. तशी, रेवा तडक उठली व् स्वयंपाक घरात वळली.
तितक्यात आपोआप तिची पाऊलं थांबली. कसलातरी विचार करत रेवा संथ गतीने पाऊल पुढे टाकत होती. तिची ही अस्वस्थता विकीने हेरली.
थांबलेल्या रेवा जवळ जाऊन हळूच विकीने " चला, मी मदत करतो तुम्हाला." म्हणत, स्वयंपाक घरात निघून गेला.
त्याच्या मागोमाग रेवा ही आत स्वयंपाक घरात गेली.
ती आज पहिल्यांदा स्वयंपाक घरात गेली होती. स्वयंपाक घर म्हणजे बायकांचं दुसरं हक्काचं स्थान. ती आज तिच्या हक्काच्या स्थानी होती.
समोर विकी गॅसवर दुधाच पातेलं ठेवत होता. त्या शेजारीच दुसऱ्या पातेल्यात चहा करण्यापुरते पाणी ओतले.
विकी चहा बनवतोय हे लक्षात येता, रेवा तिची अवघडलेपणा बाजूला सारुन पटकन् त्याच्या जवळ जात म्हणाली.
" अहो,
मी ठेवते चहा. तुम्ही उगीच."
मी ठेवते चहा. तुम्ही उगीच."
त्या दोघांचा एकमेकांसोबतचा हा पहिला संवाद होता. मगाशी एकमेकांनी गुड मॉर्निंग विश केलं होतं, पण ते जरा जास्तच औपचारिकता वाटत होतं.
" हरकत नाही.
मला सवय आहे. आई घरी नसली की मीच करतो चहा."
मला सवय आहे. आई घरी नसली की मीच करतो चहा."
खरं तर,
रेवाच्या तोंडून अहो ऐकून विकी सगळं विसरुन बसला होता. ते तर रेवाच्या हातातल्या काकणांनी त्याला वेळेवर जागे केले. म्हणून, तुटक का होईना तो इतकं बोलू शकला.
रेवाच्या तोंडून अहो ऐकून विकी सगळं विसरुन बसला होता. ते तर रेवाच्या हातातल्या काकणांनी त्याला वेळेवर जागे केले. म्हणून, तुटक का होईना तो इतकं बोलू शकला.
विकीच्या बोलण्याचे रेवाला आश्चर्य ही वाटले. ती पुन्हा स्वतः च्याच विश्वात रमली.
" रात्री व्यवस्थित झोप आली ना?"
विकी पुन्हा बोलण्याचे नवे बहाणे शोधून बोलू लागला. कदाचित पुन्हा एकदा तिचा गोड आवाज ऐकण्याचा मोह त्याला झाला असावा.
विकीच्या प्रश्नाचे उत्तर समोर रेवाने होकारार्थी मान हलवली. रेवाची नजर झाली होती. हातांच्या बोटांची एकमेकांत गुंतण्याची जणू स्पर्धाच लागली होती.
" एक विचारु?
तुम्ही हे लग्न का केलात? माझ्यावर तरस खाऊन का?"
तुम्ही हे लग्न का केलात? माझ्यावर तरस खाऊन का?"
रेवाने मोठ्या मुश्किलीने काही विचारण्याचे धाडस केले होते. तिने प्रश्न करता पुन्हा नजर व् मान खाली झुकवली.
विकी आता रागवेल, चिडेल किंबहूना अजून काही करेल याची तिने कल्पना केली होती. पण, झाले याच्या उलट विकी न रागवता ना चिडता तिच्याकडे बघू लागला.
" रेवा sss"
बऱ्याच वेळाने रेवाच्या कानी संथ गतीची हाक ऐकू आली. तिने स्वतःच्या वाढत्या हृदयाच्या धडधडवर काबू ठेवत वर पाहिले. समोर विकिचा चेहरा शांत होता.
तो स्मित हास्य करत म्हणाला.
" तुम्हच्या मनात असा प्रश्न येणं साहजिक आहे, मी समजू शकतो. आणि बरं वाटलं तुम्ही मनात काही न ठेवता सरळ विचारुन मोकळे झालात.
आपल्या नात्यासाठी हे खूप गरजेचं आहे.
तुम्हाला जर वाटत असेल की मी तरस खाऊन तुमच्याशी लग्न केलं आहे. तर, हा विचार मनातून आधी काढून टाका.
असं मुळीच नाहीय. जरी आपलं हे लग्न आपल्या मर्जीने न होता परिस्थितीमुळे झालंय. पण, आपल्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे, हे विसरुन चालणार नाही. "
विकीचे एक शब्द नी शब्द रेवा खूप कान देऊन ऐकत होती. कारण, ते बोलताना विकीच्या चेहऱ्यावरचे हावभाव काहीसे वेगळेच होते.
त्याच्या बोलण्यात माईंचे संस्कार दिसत होते. विकीने आज पहिल्याच दिवशी रेवाला आपलेसे करुन घेतले होते.
नक्कीच ते प्रेम नव्हते.
पण, हो कदाचित प्रेमाची सुरवात नक्कीच होती.
( समाप्त)
- रेखा खांडेकर स्वरा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा