Login

या वळणावर-11

An

मानसीच्या लग्नाला आता जवळपास चार महिने झाले होते.

स्वप्न तूटलेल्या नवीन नवर्या कोमल आणि मानसी अशाच उदासीनपणे बसल्या होत्या.

मानसी कोमलच्या हातावर हात ठेवत," कोमल आपण आपल्या सासू-सासर्‍यांना आपल्या नवऱ्याबद्दल बोलायचं का?
कोमल- ताई, आपण काय बोलणार आहोत, तुम्ही सांगा ना...तसे हे मला मारत नाहीत पण यांच दारू आणि बाईच व्यसन मला ते अजिबात आवडत नाही. आणि राहिला राणा भाऊजी चा प्रश्न...
सासुबाई आणि मामांजी यांनी लहानपणा पासूनच त्यांच्यावरती वचक ठेवली असती, तर आज त्यांची ही परिस्थिती झालीच नसते ना..

मानसीला कोमलचे विचार पटू लागले. खरच आहे, जर आई-वडिलांनी मुलांना योग्यवेळी संस्कार दिले असते, तर आज राना एवढा अहंकारी अत्याचारी झालाच नसता.

इतक्यात शंकर दोन दिवसानंतर गावाहून येतो. तो समोर त्याच्या दोन वहिनींना बघताच, "काय चाललं मग.. आले दिवस ढकलत आहे का, का मनशांतीसाठी एकमेकांचे त्रास शेअर करून घेत आहे?

मानसी आणि कोमल काहीच न बोलता हलकस हसत, आपापल्या रूम कडे वळाल्या...

शंकर क्षणभर दोघींच्याही जाण्याकडे बघत,
"माहित नाही, या दोघींचे हाल कधी बदलतील?

शंकर रूम मध्ये जाताच तो रवीला कॉल करतो,
"हॅलो रवी, अरे तुला पंधरा दिवसाच्या सुट्टी आहे ना, तर भारतात परतशील का?
रवी- पंधरा दिवसाच्या सुट्टी आहेत पण इथे प्रकृतीच्या बिजनेस मध्ये पण लक्ष घालायचा विचार आहे.
शंकर- रवी, प्लीज पंधरा दिवसा करता येऊन जाणा...कारण आई-बाबांनी सुन म्हणून ज्या बाहूल्या आणल्या त्यांना या राक्षसांचा त्रास सहन होत नाही. त्यांच्या मर्यादा संपण्याच्या आत आपण दोघांनी जर आपल्या भावां ना समजवायचा प्रयत्न केला तर?

रवी- मला नाही वाटत की आपले राक्षस भाऊ काही समजून घेतील..
हं एक वेळ भैरव च्या बाबतीत तरी आपण प्रयत्न करू शकू, पण राणा..  त्याच्या बाबतीत मात्र मी अजिबात प्रयत्न करू शकणार नाही.


शंकर- ठीक आहे, जाऊ देत होऊन काय होईल त्या दोघी कंटाळून जीव देतील, नाहीतर आपल्या घरचे त्यांचा जिव घ्यायला बसलेलेच आहेत ना.
असं म्हणून शंकर कॉल कट करतो.

इकडे रवी विचार करत," मी खरंच एवढा स्वार्थी आणि निर्दयी झालोय का, आणि जे समोरचे आहेत ते माझ्या घरातलेच व्यक्ती आहे.., मी त्यांनाही समजावून सांगू शकत नाही का? तर माझ्या या शिक्षणाचा काय उपयोग आहे? रवी लगेच भारतासाठी तिकीट भाऊ बुक करतो... दुसऱ्या दिवशी सकाळी तो भारताकडे निघाला