तिचे शिक्षण चालू होते तेव्हापासूनच तिला स्थळ यायला सुरुवात झाली. तो त्याच्या आईवडिलांना नेहमी सांगायचा की तिला स्वतःच्या पायावर उभे राहू द्या मगच तिच्या लग्नाचे पाहा. तर ते तू लहान आहेस, योग्य वयात मुलीचे लग्न झालेलं चांगलं असतं नाही तर समाज नावं ठेवतं असे बोलून ते त्याला गप्प बसवत असतं.
"आम्हांला काही नको. काय द्यायचे असेल तर तुमच्या मुलीला द्या. तिच्या सुखातच आमचे सुख आहे." असे म्हणत सुशीलच्या आईवडीलांनी लग्नात अप्रत्यक्षपणे हुंडा मागितला.
----------------------------------------------------------------
लोकप्रिय कथा : वापर
"अगं सुजाता, जरा लवकर उठ ना. मला डबा तयार करून द्यायला उशीर होईल." विवेकने सकाळीच ओरडत आवाज दिला.
सुजाता डोळे चोळत उठली आणि स्वयंपाकघरात धावली. तिला उठवून विवेक पुन्हा झोपी गेला. खरंतर सुजाताला रात्री थोडा ताप होता. पण विवेकच तिच्याकडे लक्षच नव्हतं. विवेकचं रोज असंच होतं, स्वतः उठून काही करायचं नाही, पण सगळं वेळेवर हवं. सुजाताला कधी कधी वाटायचं, तो तिला बायकोपेक्षा जास्त एक नोकर मानतो का ? पण ती गप्प राहायची.
लग्नाला आता पाच वर्षं झाली होती. सुरुवातीला विवेक खूप प्रेमळ होता, तिच्या प्रत्येक गोष्टीत भाग घेत असे. पण नंतर हळूहळू त्याने जबाबदाऱ्या टाकून दिल्या. घर चालवणं, खर्च सांभाळणं, दोघांसाठी नातेवाईकांची कामं बघणं अगदी सगळं सुजाताच करत होती.
विवेकचा पगार चांगला होता, पण तो कधी घरखर्चाला पैसे देत नव्हता. नेहमी सांगायचा, "माझे EMI आहेत, मी बघतोय, तुझा पगार तरी तू टाक." सुजाता शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करत होती. तिला स्वतःसाठी काही शिल्लक उरत नव्हतं, पण घरासाठी तिने तेही केलं.
"आज संध्याकाळी मी मित्रांसोबत बाहेर जाणार आहे. जेवणाचं काहीतरी साधं ठेव," विवेकने ऑफिसला निघताना सांगितलं.
"आपण दोघंही थकतो, पण मला मात्र नेहमी स्वयंपाक करावा लागतो, तुला कधी वाटत नाही का?" सुजाताने हळुवार विचारलं.
"अगं, तुला जमतं म्हणून तू करतेस. मला एवढ्या गोष्टीत रस नाही. तू आहेस ना, मग मला का टेन्शन घ्यायचं?" विवेकने हसून टाळलं.
अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी सुजाताच्या मनात साठत गेल्या. विवेकला तिच्या भावना महत्त्वाच्या नव्हत्या, त्याला तिचा उपयोग जास्त हवा होता. तिचं स्वतःचं अस्तित्व, स्वप्नं, इच्छा काहीही महत्त्वाचं वाटत नव्हतं.
एक दिवस शाळेत सुजाता एका कार्यक्रमाला गेली होती. तिथे एक वक्ते म्हणाले, "जगण्यात तुम्हाला सतत वापरणारे लोक भेटतात. जर तुम्ही त्यांना जशास तसे उत्तर दिलं नाही, तर ते कायम तुमचाच फायदा घेत राहतात." त्या वाक्याने तिच्या मनात ठिणगी पेटली. ती घरी आली आणि ठरवलं की आता आपला दृष्टिकोन बदलायचा.
दुसऱ्या दिवशी सकाळी विवेक म्हणाला, "अगं, माझ्या शर्टला इस्त्री केलीस का?"
सुजाता शांतपणे म्हणाली, "नाही केली. आज मला प्रोजेक्टसाठी शाळेत तयारी करायची आहे. तू करशील ना ?"
विवेक अवाक झाला. "काय ? इतकी वर्षं तू करतेस, आता अचानक?"
"इतकी वर्षं मी केलं, आता थोडं तूही शिकलास तर काही वाईट नाही."
हळूहळू सुजाता बदलू लागली. तिने तिचा पगार पूर्ण घरखर्चाला देणं थांबवलं.
पूर्ण वाचा लिंकवर
https://irablogging.com/blog/vapar._42497
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा