Login

अनघाची तप्तपदी ( भाग 2 )

आता मात्र अनघा गप्प बसणार नव्हती " माफ करा पण लग्न झालं म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघांचंही आयुष्य बदलतं पण मग फक्त मुलीचंच नाव का बदलायच ? आम्ही मुली लहान पणापासून जे नाव लावतो ते एका क्षणात बदलायच ? का तर लग्न झालं म्हणून ? तुम्ही सगळ्यांनी सांगा हे खरंच योग्य आहे का ? मला कोणालाही दुखवायचं नाहीये पण माझ्या आई बाबांनी प्रेमानं माझं हे ठेवलेलं नाव मला आवडतं ते बदलू नये असं मला वाटतं.तुम्ही मला प्रेमाने कुठल्याही नावाने बोलावलं तर माझी काहीच हरकत नाही " काही क्षण शांततेत गेले , आणि मग सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.जमलेल्या प्रत्येकाच्या मनातलं जणू अनघा बोलली होती.

लग्नाचा मुहूर्त फारच जवळचा असल्यामुळे दोन्हीकडच्या मंडळींना खूपच गडबडीत तयारी करावी लागली. अनघा आणि विनय फोनवर बोलून एकमेकांच्या प्रेमाला प्रतिसाद देत होते. दिवस भुर्रकन उडून गेले आणि एकदाची लग्नघटिका समीप आली. लग्न अगदी साग्रसंगीत पार पडले. साश्रू नयनांनी सगळ्यांनी अनघाची पाठवणी केली. आता अनघाच्या नवीन आयुष्याला सुरूवात होणार होती. विनयच्या साथीने सुखासमाधानाचा संसार करण्याचं मनोमन वचन तिने स्वतःला दिले. विनयच्या घरात आनंदाचं वातावरण होतं. खूप पाहुणे असल्यामुळे घर भरलेलं होतं. घरातले विधी , पूजा सुरू होते. गुरुजींनी तांदूळ भरलेलं ताट विनयच्या समोर धरलं आणि " तुझ्या पत्नीचं नाव काय ठेवायचं ते ह्या ताटात लिही. " असं सांगितलं.

विनयने ठरल्याप्रमाणे \" विभावरी \" असं ताटात लिहिलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.

" आजपासून तू आमची विभावरी बरं का , आवडलं ना नाव ? विनयला साजेसे आहे अगदी. " मम्मीने अनघाला पेढा भरवत विचारलं.

तितक्यात अनघा हळूच म्हणाली , " गुरुजी , मलाही ताट द्या आता. मलाही नाव बदालयच माझ्या नवऱ्याच. " 

सगळीकडे एकच कुजबुज सुरू झाली.

" ही काय नवीन थेरं आजकालच्या मुलींची ? " 

" बाई बाई असं कधी ऐकलं नव्हतं हो , ऐकावं ते नवलच. " 

" असं कुठे असतं का ? " 

" लता सांभाळ बाई , सून डोक्यावर मिरे वाटणार तुझ्या. " 

सगळ्या लोकांची बोलणी ऐकून घरच्यांना राग आला आणि काळजीही वाटली.

विनय रागाने म्हणाला , " काय हे असलं अनघा ? मुलीचं नाव बदलतात मुलाचं नाही. तू शिकलीस म्हणजे कुठलेही अधिकार नाहीत तुला. " 

" विनू जरा शांत हो बेटा. हे बघ अनघा , शास्त्राप्रमाणे असते ते. आपण काही बोलू नये यात. चल उठ तू जेवणाची तयारी करू या. " लताबाई उगीच वाद वाढू नये म्हणून बोलल्या.

" मम्मी , यात काही शास्त्र असेल तर माझी काही हरकत नाही. गुरुजी तुम्ही सांगा काय ते. " अनघा म्हणाली.

" मुलाचं नाव बदलण्याविषयी शास्त्रात काही सांगितलेलं नाही. " गुरुजींनी क्लिअर केलं.
 
आता मात्र अनघा गप्प बसणार नव्हती.

 " माफ करा पण लग्न झालं म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघांचंही आयुष्य बदलतं. पण मग फक्त मुलीचंच नाव का बदलायच ? आम्ही मुली लहानपणापासून जे नाव लावतो ते एका क्षणात बदलायच ? का तर लग्न झालं म्हणून ? तुम्ही सगळ्यांनी सांगा हे खरंच योग्य आहे का ? मला कोणालाही दुखवायचं नाहीये पण माझ्या आईबाबांनी प्रेमानं माझं हे ठेवलेलं नाव मला आवडतं ते बदलू नये असं मला वाटतं. तुम्ही मला प्रेमाने कुठल्याही नावाने बोलावलं तर माझी काहीच हरकत नाही. " 

काही क्षण शांततेत गेले आणि मग सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. जमलेल्या प्रत्येकाच्या मनातलं जणू अनघा बोलली होती.

सरिताने तर वहिनीला मिठीच मारली.

" वॉव वहिनी. खूप ग्रेट आहेस तू. माझं नाव बदललं तेव्हा मलाही खुप वाईट वाटलं होतं. पण मी बोलू शकले नाही. आज तू खूप छान समजावलं सगळयांना. " सरिता म्हणाली.

सगळ्यांनीच अनघाचं कौतुक केलं. लताबाईंना आणि सुरेशरावानासुद्धा अशी सून मिळाली म्हणून खूप अभिमान वाटला.

विनयचासुध्दा राग पळून गेला. त्याने हळूच अनघाची माफी मागितली.

सगळी पाहुणे मंडळी निघून गेली . आता अनघाला आणि विनयला मात्र मिलनाची ओढ लागली होती. आज त्यांची मधुचंद्राची रात्र होती .अनघा सजून धजून , थोडी धास्तावलेली आणि आसुसलेली सजलेल्या पलंगावर विनयची वाट बघत बसली होती. बराच वेळ झाला तरी विनयचा पत्ता नव्हता . अनघाला झोप येऊ लागली होती .तितक्यात लताबाई आल्या .

" अग विनयची तब्येत जरा बरी नाही. फार काही नाही दगदग झालिये ना फार म्हणून असेल. तो वरच्या खोलीत झोपलाय. तू सुद्धा झोप आता ." असं म्हणून अनघाला काही बोलायची संधी न देता त्या निघून गेल्या .

त्यांचा चेहरा काहीतरी वेगळंच सांगत होता. अनघाला काहीच कळेना.

 \" नक्की काय झालं असेल ? संध्याकाळपर्यंत तर विनय एकदम ठीक होता. आता अचानक इतकं काय झालं ? \" अनामिक शंकेने अनघा बावरली .
काय झालं ? ते समजायलाच हवं म्हणून ती तडक रुमच्या बाहेर आली .

हे घर तिच्यासाठी नवीनच होतं. कुठे जावं ? कोणाशी बोलावं काहीच कळत नव्हतं .एका खोलीतून दबक्या आवाजात बोलणं ऐकू आलं आणि नकळत तिचे पाय त्या खोलीकडे वळले .

" लता , सरू तुम्ही दोघीही असतानाही असं झालंच कसं ? लक्ष द्यायला हवं होतं ना तुम्ही . नशीब सगळे पाहुणे गेले नाहीतर सगळ्यांसमोर शोभा झाली असती " सुरेशराव म्हणाले.

" अहो , लक्ष होतंच आमचं पण पाहुण्यांच्या गडबडीत विन्याला गोळ्या द्यायची विसरले .आणि आता त्याने स्वःताहून नको का घ्यायला ? लहान आहे का तो ? मी काय जन्माला पुरणार आहे का त्याला ? " लताबाई त्रागा करत बोलल्या.

" आई , अगं हळू. वहिनी आली आणि तिने ऐकलं तर ? " सरिताचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच अनघा दारात उभी राहिली .

" काय झालंय विनयला ? संध्याकाळी तर काहीच त्रास नव्हता .कसल्या गोळ्या ? काय लपावताय तुम्ही माझ्यापासून ? " अनघाने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली .

" अग कुठे काय ? तुला सांगितलं ना मघाशी दगदग सहन नाही होत त्याला .आता गोळी घेऊन झोपलाय सकाळी बघ कसा फ्रेश होऊन येईल .झोप तू काही काळजी करू नको ." लताबाईंनी अनघाला ताकास तुर लागू दिला नाही .

अनघाचा या सगळ्यांवर विश्वास बसत नव्हता .पाणी कुठेतरी मुरतयं हे तर नक्कीच होतं पण कोणी काहीच पत्ता लागू देत नव्हतं .

नाईलाजाने अनघा परत जाऊ लागली आणि तिच्या पायाला काहीतरी लागलं . औषधांच्या गोळ्यांच पाकीट होतं ते . सरीताचं लक्ष गेलं आणि तिने ते ताबडतोब स्वतःकडे घेतलं .

" दादा पण ना गोळ्या घेतल्या आणि बघ ना कसं फेकल पाकीट . आण मी ठेवते बॉक्स मध्ये .गुड नाईट वहिनी " सरिता पाकिट घेत म्हणाली.

सरिताने गोळ्यांच पाकीट घेतलं तरीही अनघाने त्यावरचं नाव बघून घेतलं होतं .रूम मध्ये जाऊन तिने गुगल वर सर्च केलं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली . फिट्स येणाऱ्या लोकांना देण्यात येणाऱ्या त्या गोळ्या होत्या .

म्हणजे..म्हणजे..विनयला फिट्स ? अनघा मनातून पूर्णपणे हादरून गेली .कितीतरी वेळ ती सुन्नपणे बसून होती .तिचे डोळे सारखे वाहत होते .
कितीतरी वेळ गेला आणि मग अनघाने डोळे पुसले .काहीतरी मनात ठाम करून ती निघाली .अजूनही बाकी सगळे बोलतच बसले होते .अनघाने धाडकन दरवाजा उघडला.

" मला कळेल का नक्की विनयला काय प्रोब्लेम आहे ते ? तुम्ही सगळे माझ्यापासून काहीतरी लपवता आहात .आता मी पत्नी या नात्याने माझ्या नवऱ्याला काय होतंय ते माहिती असण्याचा मला पूर्ण अधिकार आहे .प्लीज सांगा खरं काय ते " अनघाने काकुळतीला येऊन विनंती केली .

सगळ्यांनी एकमेकांकडे बघितलं . आता खरं काय ते सांगावच लागणार म्हणून लाताबाईंनी अनघाला बसायला सांगितलं .

" इतका काही इशू करण्याची गरज नाहीये अनघा .आम्ही काही लपवलं नाहीये. फक्त सांगितलं नाही इतकचं .तुला सगळं कळणारच होतं की हळू हळू . तसं फारसं काही नाही ग फक्त अधून मधून फिट्स यायचे विनयला. पण रेगुलर गोळ्या घेतल्या ना की काहीच प्रोब्लेम नाही .तू बघितला ना याआधीही त्याला काहीच नव्हतं त्रास .आता लग्नाच्या गडबडीत ना त्याच्या गोळ्या घ्यायच्या राहिल्या म्हणून आज जरा त्रास झाला त्याला .उद्या बघ सकाळी तुला काहीच वाटणार नाही " लताबाई अगदी सहज साधी गोष्ट असल्यासारखं सांगत होत्या .

" मम्मी अहो इतकी मोठी गोष्ट तुम्ही इतक्या सहजतेने कसं काय सांगू शकता ? किती मोठा प्रॉब्लेम आहे हा .शुद्ध फसवणूक आहे ही आणि तुम्ही म्हणताय फारसं काही नाही ते ? माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हा " अनघा हतबल होऊन बोलत होती .तिच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहत होते .

" बस कर अनघा . इतकं काही झालेलं नाहीये .आणि आरशात बघ स्वतःकडे .विनयसारखा राजबिंडा नवरा मिळणार होता का तुला ? थोडेफार प्रॉब्लेम्स सगळीकडेच असतात .त्यात इतका तमाशा करण्यासारखं काही नाही .घरातली गोष्ट घरातच राहायला हवी .इथे तुला काहीच कमी पडणार नाही हे लक्षात ठेव .जा आता झोप जाऊन उगीच त्रास करून घ्यायची काही गरज नाही . झोपा आता सगळे गुड नाइट " सुरेशराव जराश्या चढ्या आवाजात बोलले . 

अनघा बिचारी हतबल होऊन तिथून निघाली आणि आपल्या रूम मध्ये आली .डोळ्यासमोर फक्त अंधार दिसत होता तिला . तिचं मन तळमळत होतं.

" काय पाप केलं असेल आपण ? नुसत्या रूपाला भुललो हे काय घडलं देवा ? कुठल्या चुकीची शिक्षा देतोयेस तू ? आई बाबांनी किती हौसेने सगळं केलं .किती स्वप्न पहिली होती मी सुखी संसाराची आणि एका फटक्यात सगळं असं उध्वस्त व्हावं ? इतकी घोर फसवणूक ? ते काही नाही आता इथे राहण्यात काही अर्थ नाही . उद्या सकाळी उठून कायमचं निघून जायचं ..." तिरमिरीत अनघाने दागिने काढून फेकले , ती साडी , तो गजरा किती हौसेने तयार झाली होती ती पण आता तिला स्वतःचा राग येत होता .

ती सामान आवरू लागली आणि तिला तिच्या आई बाबांचा विचार आला , \" त्यांना काय वाटेल ? बाबांना बीपीचा त्रास आहे , त्यांना धक्का बसला तर ? किती हळवे आहेत ते आणि आपण म्हणजे त्यांचा जीव की प्राण .आणि अंजु ? तिचं कसं होईल \" तिचं होतं नव्हतं ते अवसान गळून पडलं .

काय करावे काहीच समजत नव्हतं .तिची इथे राहायची सुद्धा तयारी नव्हती की आई बाबांना त्रास होईल म्हणून घरी परत जायची सुद्धा...