Login

अनघाची तप्तपदी ( भाग 4 )

" विनू किती फालतू खर्च केलास रे . तिच्या माहेरच्या माणसांसाठी इतकी शॉपिंग करायला कशाला हवी . आपल्याला बघितलं ना कसा भिकारडा आहेर केला ते . आतापासूनच कंट्रोल मध्ये ठेव तिला नाहीतर डोक्यावर बसेल ." अनघाने चहा घेऊन येता येता अर्धवट ऐकलं आणि पुन्हा एकदा तिच्या हृदयाला घरे पडली .अनघा सगळ्यांना आपलंसं करून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती . विनय तिच्याशी छान वागत होता पण अट एकच तिने त्याच्या मनाप्रमाणे वागणे , बोलणे . घरात नोकर होते पण स्वयंपाक मात्र मम्मी करायच्या. अनघाला कामाची आवड होती म्हणून अनघाने मम्मीला विचारून स्वयंपाक केला . सगळं अगदी छान झालं होतं पण भाजीत जिरे मोहोरी थोडी कमी झाली या शुल्लक कारणावरून मम्मी भडकल्या " तुझ्या माहेरी काटकसर करत असशील पण इथे मात्र आम्हाला चांगलं चुंगल खायची सवय आहे .आता दुसरी भाजी करावी लागेल . जमत नसेल तर कशाला पुढे पुढे करायचं ? माझ्या मेलीच्या नशिबात सुखच नाही . सून आली आता छान मोकळं राहता येईल असं वाटतं होतं पण कसच काय . विचारत जा जरा इथे काय चालतं ते " बिचारी अनघा काही न बोलता रूम मध्ये निघून गेली . सततचे टोमणे , सारखी होणारी घुसमट तिचा जीव इथे गुदमरत होता .



अनघाच्या आई बाबांकडूनही हनिमून बद्दल सारखी विचारणा होतं होती मग शेवटी एकदाची अनघाने मनाची तयारी केली .मम्मी पप्पाचा आशिर्वाद घेऊन दोघे निघाले . विनय तिची खुप काळजी घेत होता .

मनालीला वातावरण खूपच छान होतं . अनघाला अगदी फ्रेश वाटत होतं .ती मस्तपैकी गुलाबी रंगाचा स्लिव्हलेस ड्रेस घालून तयार झाली होती . विनय तिच्याकडे बघतचं राहिला . दोघं फिरायला निघाले . विनय अनघाचा हात हातात घेऊन फिरत होता .सोबत बरीच नवीन लग्न झालेली जोडपी होती . त्यांचं हसणं खिदळण , परस्परांना मिठ्यामारणं बघून अनघाला आपल्या नात्यात काहीतरी कमी आहे असं भासत होतं .
सगळेजण एकमेकांची ओळख करून घेत थोडफार बोलत होते .हास्य विनोद चालू होता . अनाघाही मोकळेपणाने बोलत होती पण विनयच्या कपाळावर मात्र अढी दिसत होती . त्याचं वागणं बदललेल होतं असं अनघाला जाणवलं .तिने विचारलं पण विनायने काहीच न बोलता फक्त तिला \" चल निघुया \" असं म्हणून रूम वर आणलं .

अनघाला खरंतर शॉपिंग करायची होती , पण विनय म्हणाला म्हणून ती परत रूम वर आली आणि कपडे बदलून बसली .
" वाह हे बरं आहे तुझं , लोकांदेखत अंग उघडे टाकणारे कपडे घालायचे आणि नवऱ्यापुढे मात्र असल काही घालायचं ? कश्या नजरेने बघतात लोक काही कळत नाही का तुला ? आणि तुझी नजरही मला समजली बर का , तू खुश नाहीस माझ्यासोबत तर खुशाल जा निघून पण ही असली थेर खपवून घेणार नाही मी . " विनयचे शब्द अनघाला घायाळ करत होते . आपलं काय चुकलं ? हेच तिला कळत नव्हतं .

विनय रागाने बाहेर निघून गेला . बिचारी अनघा मुसमुसत बसून राहिली . आपण काय अशी मोठी चूक केली हेच तिला समजत नव्हतं . स्लिव्हलेस ड्रेस घातला म्हणून इतकी नाराजी ? दुसऱ्या माणसाशी बोललं म्हणून चीड चीड ? हे असं वागणं बघुन खरंतर ती खूप सुन्न झाली होती . परक्या ठिकाणी तिला एकटीला सोडून विनय कितीतरी वेळ बाहेर होता . आणि ते ही तिची काहीच चूक नसताना , तिला बोलण्याची एकही संधी न देता ...

कितीतरी वेळाने विनय परत आला . त्याच्या हातात एक मोठी बॅग होती . चेहेरा आनंदी होता पण डोळे लाल होते .
" सॉरी डियर , पण खरंच तुझ्या बाबतीत मी खूप पझेसिव आहे . तू कोणाशीही जास्त जवळीक केलेली मला चालणार नाही . तू फक्त माझी आहेस . माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर . पण प्लीज पुन्हा अशी वागू नकोस . हे बघ मी किती छान ड्रेस आणले आहेत तुझ्यासाठी . चल तयार हो पटकन बाहेर जाऊ मस्त "
विनयचे वागणे बघून अनघा पुन्हा विचारात पडली . \" काय म्हणावे या माणसाला ? हसावं की रडाव हेच तिला कळलं नव्हतं. पण अश्या विक्षिप्त वागण्याने तिला त्रास तर होणारच होता .

अनघा एक शांत समंजस मुलगी होती . खूप मोकळ्या वातावरणात वाढल्यामुळे अश्या गोष्टी तिच्यासाठी नवीन होत्या .
" विनय , काय हे वागणे ? म्हणजे मी आता कोणाशी काय बोलायचं याची सुद्धा परवानगी घ्यायची का तुझ्याकडून ? आणि काय घालायाचं ? हे सुद्धा तूच ठरवणार का ? मला खूप त्रास होतोय . सरळ काही न सांगता मला एकटीला सोडून निघून गेलास ? मी ही माणूस आहे ना . खेळणं नाही वाटेल तसं वागवायला ." अनघाच्या डोळ्यातून धारा वाहत होत्या .

" हे बघ हे असं फालतू कारणासाठी रडणं मला आवडत नाही .इतकं काही झालेलं नाही . माझं प्रेम आहे तुझ्यावर म्हणून म्हणालो . मी आहे असा आहे . त्यात काही बदल होणार नाही . बघ काय करायचं ते कर . रडून पडुन तमाशा करणं बंद कर . आणि आवर पटकन मला भूक लागलीय . बघ तरी माझा चॉईस किती छान आहे ते . " विनय म्हणाला तशी अनघा अजूनच वैतागली . चडफडत ती बाथरूम मध्ये गेली . मनसोक्त रडली . पुन्हा विनयची हाक आली तशी तिने तोंडावर पाणी मारलं आणि तयार होऊन बाहेर आली .

विनयचा मुड आता एकदम छान होता . " बोल राणी तुझ्या आवडीच खाऊया , काय ऑर्डर करायचं ते कर "
" मला जास्त काही नको . थोडासा भात चालेल फक्त ." रडून रडून अनघाच डोकं दुखत होतं . मन तर खूपच थकलं होतं .
विनयने जबरदस्ती जेवण ऑर्डर केलं आणि प्रेमाने अनघाला भरवल . तिला जवळ घेतलं . जणू काही झालंच नाही अश्या थाटात विनय होता . पण अनघा मात्र विनयच्या चमत्कारिक वागण्याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेत होती .पण त्याच्या मनासारखं वागल , त्याला विचारून काही केलं की तो खुश असायचा , तिला हवं ते करू द्यायचा हे तिने ओळखलं होतं .

पुढचे दिवस अनघा सगळं विनयला विचारून करू लागली त्यामुळे तो खुश होता . \" तुला हवं ते कर \" \" तुला हवं ते घे \" \" तू सांग कुठे जायचं ? काय खायचं ? \" त्यामुळे अनघा सुखावली होती . तिने आई , बाबा , अंजू , तिच्या मैत्रिणी , मम्मी , पप्पा , सरिता सगळ्यांसाठी मस्त शॉपिंग केली . विनयसाठी सुद्धा बरीच खरेदी झाली . अनघासाठी पण खूप काही घेतलं . पण सगळी शॉपिंग विनयच्या आवडीची झाली . कितीही पैसे खर्च झाले तरी विनय आनंदात होता . \" तुला अजून काय घ्यायचं ते घे \" असं त्याने प्रेमानं बजावलं.

अनघाने विनायसाठी गुपचूप थोडी खरेदी केली .रात्री ती त्याला सरप्राइज देणार होती .

रात्री अनघाने विनयने तिच्यासाठी घेतलेला ड्रेस घातला आणि विनयसाठी तिने घेतलेला कुर्ता त्याच्या हातात दिला आणि गोड हसली .
" हे काय असल ? मी नाही घालत असे मटेरियल . " असं म्हणून विनयने तो कुर्ता बाजूला टाकला . त्याने निदान आपल्या आवडीसाठी फक्त एकदातरी तो घालावा असं खूप वाटत असूनही अनघा गप्प बसली . इथे आपल्या मनाची खूप उपासमार होणार हे तिला कळून चुकलं होतं.

बाकीचे दिवस मजेत गेले . अनघाने त्याचे औषधांचे वेळापत्रक अगदी व्यवस्थित सांभाळले होते त्यामुळे विनयची तब्येत आणि अनघा त्याला हवं तसं वागत होती म्हणून त्याचा मुड दोन्ही छान होते.

दोघेही परत आले . मम्मीने दोघांची दृष्ट काढली . अनघाला खूप बरं वाटलं . अनघाने खरेदी दाखवली . स्वतःसाठी आणि सरिता साठी आणलेल्या वस्तू बघून मम्मी पाप्पा खुश झाले . पण अनघाच्या माहेरच्यांसाठी आणलेल्या वस्तू बघून त्यांचे तोंड पडले . चेहेर्यावर राग स्पष्ट दिसत होता . अनघा चहा करायला गेली तशी मम्मी म्हणाल्या,
" विनू किती फालतू खर्च केलास रे . तिच्या माहेरच्या माणसांसाठी इतकी शॉपिंग करायला कशाला हवी . आपल्याला बघितलं ना कसा भिकारडा आहेर केला ते . आतापासूनच कंट्रोल मध्ये ठेव तिला नाहीतर डोक्यावर बसेल ." अनघाने चहा घेऊन येता येता अर्धवट ऐकलं आणि पुन्हा एकदा तिच्या हृदयाला घरे पडली .

अनघा सगळ्यांना आपलंसं करून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती . विनय तिच्याशी छान वागत होता पण अट एकच तिने त्याच्या मनाप्रमाणे वागणे , बोलणे . घरात नोकर होते पण स्वयंपाक मात्र मम्मी करायच्या. अनघाला कामाची आवड होती म्हणून अनघाने मम्मीला विचारून स्वयंपाक केला . सगळं अगदी छान झालं होतं पण भाजीत जिरे मोहोरी थोडी कमी झाली या शुल्लक कारणावरून मम्मी भडकल्या " काय ग हे अनघा , इतकी कमी फोडणी कोणी टाकत का भाजीला , आणि तेल इतकं कमी ? तुझ्या माहेरी काटकसर करत असशील पण इथे मात्र आम्हाला चांगलं चुंगल खायची सवय आहे .आता दुसरी भाजी करावी लागेल . जमत नसेल तर कशाला पुढे पुढे करायचं ? माझ्या मेलीच्या नशिबात सुखच नाही . सून आली आता छान मोकळं राहता येईल असं वाटतं होतं पण कसच काय . विचारत जा जरा इथे काय चालतं ते "

बिचारी अनघा काही न बोलता रूम मध्ये निघून गेली . सततचे टोमणे , सारखी होणारी घुसमट तिचा जीव इथे गुदमरत होता .
विनय आल्यावर मम्मीने भाजीची गोष्ट अगदी रंगवून सांगितली आणि पुन्हा दोघात वाद झाले . विनय अनघाला खूप बोलला .

" अरे विनू , इतकं कशाला बोलतोस तिला ? नवीन आहे ती . आणि माहेरी सगळं काटकसरीने करावं लागत असणार त्यांना . कमाई फारशी नाही ना तिच्या बाबांची त्यामुळे होत असेल असं . चल जेवायला . मी केलंय तुझ्या आवडीच . लग्न केलस पण आईच्याच हातचं खावं लागणार दिसतय तुला " मम्मी म्हणाल्या

अनघाच्या डोक्यात तिडीक गेली . असं कसं वागू शकतात त्या ? आधी भांडण लावायच आणि नंतर असं बोलायचं ?
तिची घुसमट दिवासोंदिवस वाढतच होती . तिला कुठल्याही गोष्टीचं स्वातंत्र्य नव्हतं . इतकी हुशार , शिकलेली मुलगी पण आज मात्र एक शोभेची वस्तू बनून राहिली होती .

मम्मी तिला कोणतेही काम करू देत नव्हत्या आणि केलं की सारखे दोष काढून तिला नावे ठेवायच्या . विनय तिच्यावर खूप प्रेम करायचा . तो बायकोच्या आहारी जाऊन आपल्याला काही बोलू नये म्हणून मम्मी विनयला अनघाबद्दल भडकावयाच्या . त्याच्यासमोर अनघाशी छान वागायच्या आणि एरवी मात्र सतत टोमणे मारायाच्या .
स्वतःच दोघांमध्ये भांडण लावून पुन्हा आपणच सोडवायचा आव आणायच्या . सगळीकडे अनघाची बदनामी करायच्या . बिचारी अनघा \" तोंड दाबून बुक्क्यांचा मार \" अशी अवस्था झाली असूनही कोणाला काही सांगण्याची सोय नव्हती . आई बाबांचे फोन आले की खोटं हसून सगळं काही ठीक असल्याचा आव ती आणायची .

आई बाबा एकदा येऊन जा म्हणून मागे लागले होते . आईनी मम्मीला फोन केला आणि अनघाला चार दिवस पाठवता का अशी विचारणा केली .
" ताई अहो मला आजिबात करमणार नाही अनघाशिवाय आणि विनय तर तिला सोडून राहणं शक्यच नाही . नवीनच लग्न झालंय दोघांचं आता त्यांना दूर करणं काही बरोबर नाही . असं करा ना तुम्हीच या इकडे . " मम्मीने गोड बोलून परस्पर नाही म्हटलं . ते काही इकडे येणार नाहीत हे त्यांना माहिती होतंच .
आईला मात्र पोर किती पटकन रुळली , किती प्रेम करतात तिच्यावर सगळे हे वाटून मनोमन सुखावली .

सरिता सुद्धा सतत माहेरी येऊन काहीतरी काड्या करून भांडण लावायची . आपल्या आईचे सगळे गुण तिने अगदी छान घेतले होते . त्यामुळेच तिचे सासरी पटत नव्हते आणि ती सारखी माहेरी यायची .

कधीकधी अनघाची खूपच कोंडी होत होती . मूकपणे अश्रू ढळण्याशिवाय तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता .

पण असे करून चालणार नव्हते . आपल्या आई बाबांसाठी तरी तिला आनंदाने जगावेच लागणार होते .मन रमवण्यासाठी तिने तिचा अभ्यास परत सुरू केला .

तिच्या डोक्यात एक कल्पना आली. विनयचा चांगला मुड बघून ही कल्पना प्रत्यक्षात उतरवायची हे तिने मनोमन ठरवलं .

🎭 Series Post

View all