" लक्ष्मी ? म्हणजे मुलगी झाली तर ? शेवटी देवाने माझी एकही इच्छा पूर्ण नाही करायची असच ठरवलंय तर . घ्या हिला . मी खूप थकलेय . घरी जाऊन आराम करते ." असे बोलून मम्मीने बाळाला सुधाबाईंच्या हातात दिले आणि कोणी काही बोलायच्या आत त्या निघून गेल्या .
" किती गोड आहे ना , अगदी अनुवर गेलीय . घ्या हो जावईबापू तुमची लक्ष्मी " असं बोलून आईने बाळाला सगळ्यांना दाखवलं आणि हळूच विनयच्या हातात दिलं . त्या निष्पाप इवल्याश्या जिवाला जवळ घेताच आपण जगातले सगळ्यात सुखी माणूस आहोत असे विनयला वाटले . सगळ्यांच्याच डोळ्यात आनंदाश्रू होते .
विनय बाळाला घेऊन अनघाकडे गेला . " थँक्यू डियर आज तू मला जगातलं सगळ्यात मौल्यावान गिफ्ट दिलस . तिला हातात घेतल्यावर अचानक मी सगळ्यात नशीबवान समजू लागलो ग स्वतःला . तू कशी आहेस ? ह्या आनंदासाठी फार सहन करावं लागलं तुला . पण आता हिला बघताच सगळं विसरशील " विनयने अनघाच्या कपाळावर ओठ टेकवले .
अनघा सगळं विसरून आपल्या चिमुकल्या अंशाला बघत होती . आज ती सुद्धा जगातली सगळ्यात आनंदी स्त्री होती . तिचे सगळे त्रास कुठल्या कुठे पळून गेले होते .
आई बाबा अंजू सगळेच खूप खुश होते . पप्पा आणि बाबा अगदी चढा ओढीने सगळ्या नातेवाईकांना फोन करत होते . सगळ्या हॉस्पिटलला त्यांनी मिठाई वाटली .
अनघाने मम्मीबद्दल विचारलं पण \" तिला जरा बरं वाटत नाहिये म्हणून ती घरी गेली \" असं मोघम बोलून विनयने विषय बदलला . सगळेजण बाळाच्या कौतुकात मग्न होते .

लताबाई मात्र मुलगी झाली म्हणून नशिबाला दोष देत होत्या . त्यातही ती दिसायला अगदी अनघासारखी होती त्यामुळे त्यांना अधिकच राग यायचा . बाळाला साधं जवळ घेणं सोडा पण दुरूनही बघायचं त्या टाळायच्या .
विनय अनघाला लेकीच बारस धूमधडाक्यात करायचं होतं पण मम्मीची इच्छा नव्हती म्हणून घरच्या घरीच नामकरण सोहळा झाला . \" परी \" असं गोड नाव ठेवलं . मम्मीने आजिबात इंटरेस्ट घेतला नाही . बारस झाल्यावर अनघाच्या आईने काही दिवस अनघाला आपल्या घरी घेऊन जायची परवानगी मागितली आणि या वेळी काही आडकाठी न घेता मम्मीनी ती दिली .
आई , बाबा , अंजू अनघा आणि छोट्या परीला घेऊन घरी आले . आजी आजोबा आणि मावशी परीच्या कौतुकात मग्न होते . आईच्या हातचं खाऊन आणि आराम करून अनघाची तब्येत सुद्धा आता सुधारली होती .

" लवकर ये , मला परीची खूप आठवण येते " असा लकडा विनयने लावला होता . त्याच्या तब्येतीच्या सुद्धा कुरबुरी चालू होत्या . मनसोक्त माहेरपण उपभोगून अनघा परत आली . तिची रजाही संपत आली होती . आता पुढे कसं करायचं याची चिंता तिला लागून राहिली होती . मम्मी तर परीला आजिबात घेत नव्हत्या .
त्यांच्या घरी स्वयंपाकाला येणाऱ्या मावशीची मुलगी होती \" राधा \" ती बऱ्याचदा मावशींसोबत घरी येई . तिला मूल होत नाही म्हणून नवऱ्याने सोडून दिले होते .परीशी तिची चांगली गट्टी होती . अनघाने तिला \" परीला सांभाळशील का ? \" म्हणून विचारल्यावर तिला खूप आनंद झाला .तिने लगेच तयारी दाखवली . घरकामात सुद्धा मदत करायला तिची तयारी होती .
मम्मीला हे आजिबात आवडलं नव्हतं . त्यांच्या कुरबुरीकडे आजिबात लक्ष द्यायचं नाही हे अनघाने ठरवलं होतं .
कॉलेज जॉईन करण्याआधी आठ दिवस राधा घरी येऊन परीला सांभाळू लागली . परीला तिची छान सवय झाली होती त्यामुळे आता अनघाला हायस वाटत होतं .

अनघा पुन्हा कॉलेजला जाऊ लागली . सगळ्यांनी तिचं खूप अभिनंदन केलं आणि तिच्या जिद्दीला सलाम केला . तिला वेळ पडल्यास मदत करण्याचीही तयारी दाखवली . परीही राधासोबत छान रमली होती . मम्मी मात्र तिचा राग राग करायच्या . विनय आणि पप्पा मात्र तासनतास परीशी खेळायचे . राधा घरकामात सुद्धा होईल तशी मदत करायची . परीमध्ये तिचा जीव गुंतला होता . अनघा आता निश्चिंत मनाने कामात लक्ष देऊ लागली .
परी हळूहळू मोठी होऊ लागली होती . तिच्या बाललीला घराचं गोकुळ करत होत्या . आजूबाजूच्या परिसरात ती सगळ्यांची लाडकी होती . पण त्या चिमुकल्या जीवाला आजीची माया मिळत नव्हती .
एकदा अनघा परीला घेऊन बागेत गेली होती . मुलं खेळत होती .कोणीतरी परीला नाव विचारले . तिने \" काळी परी \" असं उत्तर दिलेलं अनघाने ऐकलं . " बाळा असं बोलू नये , तुझं नाव किती छान आहे ना \" परी \" मग असं का म्हणालीस तू ? "
" मम्मी आजीने सांगितलं मला तू काळी परी आहेस . मी काळी आहे ना म्हणून . " निरागसतेने परी उत्तरली .

अनघाच्या जीवाची घालमेल झाली . ती तडक घरी निघून आली .सगळ्यांच्या समोर तिने मम्मीला जाब विचारला .
" मग काय झालं ? आहेच की ती काळी . तिलाही कळायला हवं ना . आणि नाव ठेवतांना तुलाही कळायला हवं ते .मुलगी सुंदर असली तरच \" परी \" नाव शोभून दिसतं . हिला काय शोभणार आहे ते ? " मम्मीने आपले मत मांडले आणि त्या तिथून निघून गेल्या .

हे आता नेहमीचच झालं होतं . परीला सगळ्यांसमोर वाईट बोलणं , तिच्या रूपाबद्दल तिच्याच मनात काहीतरी भरवण हे सगळं मम्मीच वागणं अनघाला असह्य होत होतं .
परी शाळेत जाऊ लागली . ती खूप हुशार आणि लाघवी होती . थोड्याच दिवसात ती सगळ्यांची लाडकी झाली .

काही दिवसांनी शाळेतून फोन आला . अनघा आणि विनयला त्यांनी भेटायला बोलावलं होतं . दोघं शाळेत पोचले .
" परी ही खूप गोड मुलगी आहे . अभ्यासातही हुशार आणि खूप छान संस्कार दिलेत तुम्ही तिला . फार लाघवी पोर आहे पण अलीकडे तिचा आत्मविश्वास फार कमी होत चाललाय . ती स्वतःला खुप कमी लेखते . कोणी तिचं कौतुक केलं की \" मी वाईट आहे , मी काळी आहे , मी छान दिसत नाही , मला काही कळत नाही , मी खूप वाईट आहे \" असं काहीतरी बोलते . तिला त्यातलं सगळंच कळतं असं नाही पण तिच्यातली ही वृत्ती कमी व्हावी म्हणून मी तुम्हाला सांगितलं . नक्कीच कोणीतरी हे तिच्या मनात भरवत आहे . त्याशिवाय ती असं म्हणणं शक्य नाही . मम्मीआज्जी असं म्हणते असं ती परवा गीताला म्हणत होती . तुम्ही प्लीज त्यांच्याशी बोला . या वयात असा न्यूनगंड येता कामा नये . " टीचरनी काय घडतंय ते सांगितलं .

विनय आणि अनघा खूपच संतापले .
" मम्मी , हे काय चाललंय तू ? परी तुला आवडत नाही याचा अर्थ असा नाही की तू तिच्या मनात काहीही भरवावं . हे सगळं ताबडतोब बंद कर . " विनय रागाने बोलला .
मम्मीने डोळ्याला पदर लावला . " देवा हाच दिवस दाखवण्यासाठी जिवंत ठेवलेस का मला ? काहीच बोलायचं नाही मी आता . आणि काय चुकीचं बोलले रे मी . आज बायकोच्या ताब्यातला बैल झालास आणि आईला बोलतोस का रे ? तुला मी नकोय आता . पाठवा मला वृद्धाश्रमात . उचल रे देवा मला . सख्या मुलाला मी जड झालीय आता ." मम्मीने नेहमीसारखा तमाशा सुरू केला.

अनघा रूम मध्ये निघून गेली . घरच्या किरकिरीचा तिला विट आला होता . परीच्या बालमनावर त्याचा काही परिणाम झाला तर ? कल्पनेनेच तिच्या पायाखालची जमीन सरकली .
" विनय मला वाटतं आता इथे राहण्यात काही अर्थ नाही . परी वर याचा वाईट परिणाम होऊ शकतो . तीच्याबाबतीत मला कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही . माझ पी.एच.डी साठी सिलेक्शन झालंय . चार वर्षाची फेलोशिप आहे . स्कॉलरशिप सुद्धा मिळणार आहे . फक्त दुसऱ्या शहरात आहे त्यामुळे मला जाण्याची इच्छा नव्हती . पण आता वाटू लागलंय जाऊया आपण . तिकडे जॉब सुद्धा इथल्या इतकाच पगाराचा मिळेल .तू तुला हवा तो बिझनेस कर . तोपर्यंत माझं इन्कम आहेच ." अनघा विनयला म्हणाली .
" अनु मला वाटतं तू म्हणतेस ते बरोबर आहे . तू राधाला विचार आणि परीला घेऊन पुढे जा . मी इथलं सगळं मार्गी लावतो आणि येतो . आई बाबा सुद्धा जवळच आहेत तिथून तुला त्यांचीही मदत मिळू शकते ." विनयलाही अनघाचं बोलणं पटलं होतं.

अनघाने आई बाबांना सगळी परिस्थिती सांगितली . सगळं ऐकून आधी तर त्यांना खूप धक्का बसला . पण ते अनघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार होते . तिच्या निर्णय त्यांना पटला होता .
पप्पा सुद्धा तयार झाले .
मम्मीच सुद्धा हेच म्हणणं होतं .\" ही ब्याद ह्या घरातून जातेय ह्याचा खूप आनंद आहे . पण माझ्या विनुला मी सहजा सहजी जाऊ देणार नाही हे नक्की . \" मम्मीने मनोमन ठरवलं .
राधा अनघासोबत जायला आनंदाने तयार झाली . अनघा आणि राधा परीला घेऊन निघाल्या . सोबत जुजबी समान होतं . बाबा आणि विनय आधी तिकडे जाऊन एक घर भाड्याने घेऊन आले होते .अनघा सोबत थोडेदिवस बाबा राहणार होते . विनयला सगळं आटोपून यायला थोडा वेळ लागणार होता. राधा होतीच सोबतीला .

घर अगदी मोक्याच्या ठिकाणी होतं . अनघासाठी सगळ्या दृष्टीने सोयीचं होतं . अंजूही बाबांसोबत आली होती . अनघाला सेटल करून ती परत जाणार होती .
सामान लागलं . चारच दिवसात आजूबाजूला ओळखी झाल्या . अनघा खुश होती . उद्यापासून इथल्या कॉलेजमध्ये तिची नवी सुरुवात होणार होती .बाकी कामासाठी एक छान मावशी मिळाल्या होत्या . राधा तर होतीच . आणि मुख्य म्हणजे बाबांचे आधार होता .
एका नव्या जोमाने आणि आत्मविश्वासाने अनघाच्या नवीन आयुष्याची सुरुवात झाली होती .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा