ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (लघुकथा फेरी)
शीर्षक:अनामिका
"माझे अस्तित्व संपले आहे. या जगात मी म्हणजे कोणीच नाही. या सावल्या माझ्याकडे येत आहेत. त्यांचे चेहरे खरे आहेत की माझ्या मनाचे खेळ? हा बाहुला हसतोय माझ्याकडे पाहून.ए,दूर हो,नको येऊ माझ्याजवळ. सावल्यांनो दूर व्हा माझ्यापासून.मला त्रास देऊ नका.मला असं का होतंय? मला वेड लागलंय का? (आपले डोके दोन्ही हातांनी गच्च धरत) नको,नको,नको sss.. सोडा मला..”
अनामिका खाली कोसळली. खोलीत बराच वेळ ती एकटीच थरथरत होती. दाही दिशा अचानक झाकोळून मंद दिसत होत्या. मघाशी अंगावर आलेल्या सावल्या दूर गेल्या असल्याचे पाहून घाबरतच तिने फोन हातात घेतला.
“ हॅलो, आई ..”
“बोल, अनू बेटा. काय म्हणतेस?”
“ आई,आई..”
“ बाळा, काय झालंय तुला? तू ठीक आहेस ना?”
“(रडत रडत,हंबरडा फोडत) आ हा..आ हा..”
आई चांगलीच घाबरली. मुलीच्या वेदनांचा टाहो एका आईच्या हृदयाला चिरत वेगळेच इशारे देत होता. तरीही स्वतःला सावरत ती अनामिकाला म्हणाली,
“ शांत हो बाळा. मी आहे ना.काय झालं सांग बरं.”
“ शांत हो बाळा. मी आहे ना.काय झालं सांग बरं.”
“आई,( डोळे पुसत ,स्वतःला सावरत) मला घेऊन जा इथून. आता मी एकटी नाही राहू शकत. हे घर, हे एकटेपण,या वस्तू मला संपवायला निघाल्या आहेत. प्लीज ये ना आई.”
“तू काहीही काळजी करू नकोस. मी लगेच निघते.”
थोड्या वेळातच अनामिकाची आई आली. अनामिकाचा चेहरा कोमेजलेला होता तर डोळे खोल गेलेले होते. आईने अनामिकाला मिठीत घेतले. जत्रेत वाट चुकलेले लेकरू आईला भेटल्यावर, तिला बिलगून जसे आनंदी होते, निर्धास्त होते तशी अनामिकाची कळी खुलली होती. इतक्या वेळ चहूकडून दाटून आलेला अंधार अचानक आशेच्या तेजस्वी उजेडात बदलला. अनामिका आईच्या कुशीत शांत झाली. अशा स्थितीत तिला काहीही प्रश्न विचारणे योग्य नाही हे आईला कळून चुकले.
डोळ्यांतून दुःखाचे अश्रू काढत आई म्हणाली,"बाळा, मी तुझ्यासाठी लढेन. डॉक्टर, औषधं, प्रार्थना, माझं सगळं आयुष्य,सारे काही तुझे हास्य,तुझे अस्तित्व परत मिळवण्यासाठी पणाला लावीन.तू काहीही काळजी करू नकोस.”
अनामिका खूप कमकुवत,हळवी झालेली होती.तरीही आईच्या अशा बोलण्याने तिला जरा हायसे वाटले. आई नावाचे मायेचे नाते आपल्याजवळ असल्याने तिचे अशांत मन शांत झाले. ती हळू आवाजात म्हणाली,"आई,खरंच तू आहेस ना माझ्यासाठी? मग मला काहीच भीती नाही. आई,मला खरंच जगायचं आहे.”
“ हो माझ्या लेकरा, तुला जगायचे आहे, स्वतःसाठी, आपल्या आईसाठी...”
मायलेकी भाऊक होऊन बराच वेळ रडत होत्या.
आई आणि अनामिका तिथून निघाले. अनामिका माहेरी आली.
आई आणि अनामिका तिथून निघाले. अनामिका माहेरी आली.
अनामिकाची सासूबद्दल, नवऱ्याबद्दल आधीही तक्रार होतीच.त्यामुळे तिची ही अवस्था त्यांच्यामुळेच झाली हे तिच्या आईला माहित होते.आईने पुन्हा एकदा आपल्या निरागस, साध्या मुलीकडे पाहिले.तिने रागातच मोबाईल हातात घेतला आणि अनामिकाच्या सासूला फोन केला,
पलीकडून आवाज आला,
“ हॅलो..”
पलीकडून आवाज आला,
“ हॅलो..”
अनामिकाची आई धगधगत्या आवाजातच बोलली," माझ्या मुलीचा आत्मविश्वास तुम्ही हिरावून घेतला. तिच्या शिक्षणाचं स्वप्न दाबलं. लग्नाआधी नोकरी करू देऊ असे म्हणून, आमिष दाखवून फसवलं. का हो? तुम्हीही एक स्त्री आहात, स्वतः नोकरी करता,तरीही असं अमानुषपणे का वागवलं तिला?"
एवढे सगळे घडूनही सासू मात्र उपहासाने उन्मत्त सुरात म्हणाली," आमच्या घरात सगळं असंच चालतं. तिने जुळवून घ्यायला हवं होतं. तिचं चुकलं म्हणूनच तिची अशी अवस्था झाली."
घायाळ वाघिणीच्या हृदयात अन्यायाचा तीव्र बाण शिरला आणि ती वाघीण आई प्रचंड रागात, आवेशाने चवताळून बोलली," जुळवून घेणं म्हणजे स्वतःचा नाश करणं नाही. लग्नानंतर मुली म्हणजे केवळ कामाला लावायच्या बाहुल्या किंवा रोबोट होत नाहीत!”
अनामिकाच्या आईने रागातच फोन ठेवला. आईला लहानपणीची अनामिका आठवली. अगदी निरागस,हसरी आणि हुशार. आई अनामिकाच्या बालपणात हरवली.
लहानगी अनू म्हणाली,
"आई, मी मोठी होऊन तुझी सगळी स्वप्नं पूर्ण करेन. मला तुझ्यासारखं असं सतत घरातलं काम करत बसायचं नाही.मला इंजिनियर होऊन बाहेर कंपनीत जाऊन, जॉब करायचा आहे. "
"आई, मी मोठी होऊन तुझी सगळी स्वप्नं पूर्ण करेन. मला तुझ्यासारखं असं सतत घरातलं काम करत बसायचं नाही.मला इंजिनियर होऊन बाहेर कंपनीत जाऊन, जॉब करायचा आहे. "
आईचे डोळे पाणावले.आईला अनामिकाचा आतपर्यंतचा सारा प्रवास डोळ्यांसमोर जसाच्या तसा दिसू लागला.
अनामिकाची लग्नाची बोलणी झाली आणि आई शेजारच्या काकूंना मोठ्या आनंदात म्हणाली,"पुण्याहून स्थळ आलंय अनामिकाला.मुलगा नोकरदार आहे,कुटुंब देखील सुशिक्षित आहे. माझी मुलगी सुखी होईल त्या घरात."
अनामिका देखील आईला म्हणाली,"आई,तू खुश आहेस ना,मग मी पण खुश आहे. माझा होकार आहे..”
हे सर्व आठवून आई मनातल्या मनात म्हणाली, ‘किती आनंदात होती माझी मुलगी.कोणाची नजर लागली तिच्या आयुष्याला?'
आईला हुंदका अनावर झाला आणि ती ओक्साबोक्सी रडू लागली. आपल्या हुशार लेकरावर आलेली ही वेळ कोण्या शत्रूवर सुद्धा येऊ नये असे आईला मनोमन वाटले.
इकडे बेडरूममध्ये एकटीच बसलेली अनामिकासुद्धा तिच्या भूतकाळात हरवली. प्रेम, स्वप्नातला राजकुमार, आपला सुखी संसार अशा सतरंगी स्वप्नाच्या दुनियेत सुरुवातीला हरवत गेलेल्या तिला लग्नानंतरचा तिचा जीवनपट मात्र जसाच्या तसा आठवू लागला.
अनामिकाचे लग्न झाले,नव्या नवलाईचे दिवस संपले. एक दिवस सासूबाई तयार होत,अनामिकाला म्हणाल्या,
"अनामिका, घरातलं सगळं काम आजपासून तू करायचं. मी ड्युटीवर असते. त्यामुळे मी परत येईपर्यंत तुझं सगळं व्यवस्थित आवरून झालं पाहिजे. स्वयंपाक, फरशी,कपडे, धुणं सगळं.. यातूनही वेळ मिळाला तर गहू, तांदूळ निवडून घे..”
"अनामिका, घरातलं सगळं काम आजपासून तू करायचं. मी ड्युटीवर असते. त्यामुळे मी परत येईपर्यंत तुझं सगळं व्यवस्थित आवरून झालं पाहिजे. स्वयंपाक, फरशी,कपडे, धुणं सगळं.. यातूनही वेळ मिळाला तर गहू, तांदूळ निवडून घे..”
त्यावर अनामिका मात्र हळू आवाजात म्हणाली,
“आई तुमच्यासारखी मलाही नोकरी करायची आहे.."
“आई तुमच्यासारखी मलाही नोकरी करायची आहे.."
सासुबाईंना सगळं ऐकू आलं तरीही त्यांनी न ऐकल्यासारखे केले आणि म्हणाल्या,
“काही म्हणालीस का?”
“काही म्हणालीस का?”
त्यावर अनामिका मात्र काही नाही म्हणून मान डोलावून गप्प बसली.
त्या दिवशी रात्री अनामिका डोळ्यात पाणी आणत,आपल्या पतीला, अविनाशला अगदी विनवणी करत म्हणाली,“माझी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मलाही बाहेर पडायचंय, अवि.. फक्त घरकाम करणारी बाई नाही मी. या घरात आल्यापासून मी घरातच राब राब राबत आहे..”
तिच्या नवऱ्याला देखील सगळं काही कळत होतं पण आईच्या दबावाखाली येत तो तिला म्हणाला,"माझी आई जसं सांगेल तसं कर. मी माझ्या आईचा आज्ञाधारक मुलगा आहे. ती म्हणेल तसं चालतं या घरात.ती जर म्हणाली की तुला सोडून दे, तर मी तुला सोडूनसुद्धा देईन."
नवऱ्याचे हे बोल ऐकताच अनामिकाचे हातपाय गळून गेले. तिच्या संपूर्ण शरीरात जणू अशक्तपणाचा कंप उसळला. ती थरथरून खालीच बसली. आपल्या स्वप्नांची राख रांगोळी डोळ्यांदेखत पाहून तिच्यासमोर दुःखाचा डोंगर आ वासून उभा राहिला.
तिचा नवरा मात्र तिला अजिबात समजून न घेता तशाच अवस्थेत तिला सोडून निघून गेला.
अनामिका मनातल्या मनात म्हणाली,' याला मी प्रिय नाही? माझं इथे कुणीच नाही का?'
या सगळ्याचा परिणाम म्हणून तिची मानसिक अवस्था दिवसेंदिवस बिघडतच गेली.
असा सारा जीवनपट,एक दुःखद भूतकाळ तिच्या डोळ्यांसमोर जिवंत होऊ लागला. त्यामुळे तिला पुन्हा एकदा तिच्या माहेरी असूनही जिवंत सावल्या दिसू लागल्या. त्या अन्यायाच्या अंधकाराने बळ येऊन, दाही दिशा सावलीप्रमाणे तिच्याकडे रागाने पाहत धावून आल्या.ती जोरात ओरडली,
“आई,आई. वाचव मला. या सावल्या माझा जीव घेण्यासाठी माझ्याजवळ येत आहेत.”
“आई,आई. वाचव मला. या सावल्या माझा जीव घेण्यासाठी माझ्याजवळ येत आहेत.”
आईने तिचा आवाज ऐकला आणि तिची आई अनामिकाकडे धावत गेली.
अनामिका सोबत हल्ली असे रोजच व्हायला लागले होते. हे त्वरित थांबावे म्हणून अनामिकाची आई तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली.
डॉक्टर म्हणाले,
“अनामिकाला झोपेच्या गोळ्या चालू कराव्या लागतील. शी इज इन डिप्रेशन. तिला पॉझिटिव्ह राहायला मदत करा. तिला स्वतःचा आत्मविश्वास संपादन करण्यासाठी मदत करा.”
“अनामिकाला झोपेच्या गोळ्या चालू कराव्या लागतील. शी इज इन डिप्रेशन. तिला पॉझिटिव्ह राहायला मदत करा. तिला स्वतःचा आत्मविश्वास संपादन करण्यासाठी मदत करा.”
त्यानुसार आईने खूप प्रयत्न केले. तरीही अनामिकाला काही फरक पडेना. शेवटी अनामिकाला झोपेच्या गोळ्या चालू झाल्या. ती रात्री तसेच दिवसाही झोपू लागली.
आईने अनामिकाचा आणि लग्नानंतर घडलेल्या घडामोडींचा सविस्तर अभ्यास केला. अनामिका,म्हणजे एक हुशार, होतकरू ,सुसंस्कारीत तसेच अभियांत्रिकी प्रशिक्षण पूर्ण केलेली देखणी मुलगी होती. आईने मनाशीच एक ठाम निर्धार केला, ‘उद्यापासून अनामिकाची सगळी औषधं बंद. तिची संपूर्ण जबाबदारी मी घेणार. तिला या नैराश्यातून मी वर काढणार.'
आर्ट ऑफ लिविंग, जिम, मुलांना शिकवणे,अध्यात्म, आपला छंद जोपासणे अशा अनेक ऍक्टिव्हिटीजमध्ये आईने अनामिकाला गुंतवून टाकले. याचाच परिणाम म्हणून काही दिवसांतच अनामिका पुन्हा आधीसारखी झाली. आनंदी,समाधानी आणि हुशार.
सदर कथा ही सत्य घटनेवर आधारित आहे.आज अनामिका एका मोठ्या कंपनीत इंजिनियर म्हणून कार्यरत आहे.
वाचकहो, आता सांगा,यात चूक कोणाची? अनामिकाची? नवऱ्याची? सासूची की तिच्या आईची? तुम्ही सगळे म्हणाल सासूची! परंतू खरी चूक कोणाची आहे माहित आहे? आपल्या समाजाची. मुलगी शिकली की आपण तिच्या लग्नाची खूप घाई करतो. कोणाच्या सांगण्यावरून? तर लोकांच्या.आपल्या मुलींना आपण लग्न म्हणजे काय? संसारात अन्यायाशी दोन हात कसे केले पाहिजे हे शिकवायला हवं. मान्य आहे मुलींनी मर्यादा जपायला हव्यात, पण स्वतःचं अस्तित्वही टिकवायला हवं.
मुलींनो,अन्यायाला आवाज द्या,अन्यायाविरुद्ध जोरदार लढा द्या! तुम्ही सुशिक्षित असा नाहीतर अडाणी,एक लक्षात ठेवा, लग्नानंतरचं जगणं हे दुसऱ्यांसाठी जितकं महत्त्वाचं तितकं स्वतःसाठी सुद्धा महत्त्वाचं असतं. नाहीतर अनामिकासारख्या अनेक मुलींची स्वप्नं मरण पावतील कारण आपल्या स्वप्नांची तेवती मशाल आपण जिवंत असेपर्यंत तेवत ठेवण्याचा आपल्याला पूर्णपणे अधिकार आहे.हो ना?
मुलींनो,अन्यायाला आवाज द्या,अन्यायाविरुद्ध जोरदार लढा द्या! तुम्ही सुशिक्षित असा नाहीतर अडाणी,एक लक्षात ठेवा, लग्नानंतरचं जगणं हे दुसऱ्यांसाठी जितकं महत्त्वाचं तितकं स्वतःसाठी सुद्धा महत्त्वाचं असतं. नाहीतर अनामिकासारख्या अनेक मुलींची स्वप्नं मरण पावतील कारण आपल्या स्वप्नांची तेवती मशाल आपण जिवंत असेपर्यंत तेवत ठेवण्याचा आपल्याला पूर्णपणे अधिकार आहे.हो ना?
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे