आनंदाचे झाड

lalit lekh _ anandache zad

आनंदाचे झाड

एखाद्या  गोष्टी  मधून आपल मन कसं बाहेर काढायचं? असा विचार केला तर मला उत्तर मिळालं मनाला दुसरीकडे गुतंवयाच . सोप्पं आहे जसं आपण लहान मुलांना एखादी गोष्ट द्यायची नसली तर त्यांना दुसरी वस्तू खेळायला देतो आणि त्यांना त्यात मवायचं प्रयत्न करतो तीच पद्धत आहे . मन म्हणजे एक नंबरच हट्ट करणारं लहान मूल आहे असं समजायचं .हल्ली मुलींचा ब्रेकअप होतो आणि मुली खूप नैराश्यामध्ये जातात आणि ऐन तारुण्यात नैराश्यात जातात .त्याचे वाईट परिणाम तब्बेतीवर होतात. कामावर होतात ,करिअर वर पण परिणाम होतो . ब्रेकअप मुळे झालेले दुःख मी समजू शकते . पण तरीही जर समोरच्या व्यक्तीला आपल्या भावनांची कदर नसेल तर आपण त्यामध्ये किती गुंतायचं आणि किती वेळ गुंतायचं यावर पण विचार केला पाहिजे . कारण या जगात फक्त बॉयफ्रेंड च नाही अशी अनेक लोक आहेत जी कि तुम्हाला पुढे जाऊन दुःख देणार आहेत .

हिला काय ज्ञान पाजळवायला ज्याचं जळत त्याला कळतं असे हि वाटू शकते पण माझ्या ह्या लेखाने एका जरी मुली अथवा मुलाने स्वतः ला दुःख तुन बाहेर काढुन  नवीन आव्हानं पेलण्यासाठी तयार केलं तरी मला समाधान मिळेल . लव्ह यु जिंदगी या शाहरुख च्या सिनेमा मध्ये एक डायलॉग घेण्यासारखा आहे . बॉयफ्रेंड हा खुर्ची सारखा आहे आपण जर खुर्ची घ्यायला गेलो तर आपण सर्व खुर्चीत बसून बघतो आणि ज्या खुर्चीत सर्वात जास्त comfortable वाटते तो खुर्ची मग ती महाग असली तरी घेतो . इथे पण तेच लॉजिक लावायचं. चुकीची खुर्ची घेतल्यावर पुढे जाऊन पाठ दुखून घेण्याआधी त्यात बसून बघा त्या शिवाय कळणार नाही . असो पुन्हा मुद्दा हाच आहे को इमोशनल attachment झाली कि त्यातून बाहेर पाडण्यासाठी वेळ जातो आणि तो वेळ मनाला द्यावाच लागतो .वेळ हेच सर्व प्रश्नांचे उत्तर 'देत असते .पण हा जो डिप्रेशन येणार काळ असतो ना तो फार वाईट असतो .तेवढा काळ तग धरून ठेवता आलं पाहिजे . नाहीतर मग मुलं बनतात देवदास आणि मुली बनतात पारो .

आता ह्या हट्टी मनाला समजवायचं कसं ?हा एक मोठा प्रश्न आहे

ह्यावर मी खूप विचार केलाय कारण मला स्वतः ला छोट्या छोट्या गोष्टी मनात धरून ठेवायची सवय आहे . आणि जरा काही मनासारखे नाही झाले कि मला वाटतं कि माझ्यावर अन्याय होतोय आणि मग मी खूप दुःखी होते किंबहुना व्हायचे .हल्ली मी त्यातून बाहेर पडायला शिकलेय किंवा मी तसा  प्रयत्न करत असते

        सगळ्यात माईंड रिफ्रेश करणारी गोष्ट म्हणजे लहान मुलांबरोबर वेळ घालवणे . वेळ घालवणे म्हणजे त्यांच्या सोबत खेळ खेळायचे . लपाछपी ,पकडापकडी ,लगोरी,क्रिकेट . हे सर्व खेळ आपण लहानपणी पण खेळलो आहोत .आणि मुख्य म्हणजे हल्ली आपल्याला  आपल्या जीवन शैलीमुळे घाम येत नाही. हे असले खेळ खेळल्यावर शरीर पण खुश होत आणि मन तर आनंदाने नाचायला लागत. कारण ते पण एका हट्टी बाळा सारखेच आहे ना!

आपल्या आवडीची गाणी लावायची आणि बेधुंद नाचायचं लाज शरम हया हे काय आहे ते विसरून मनमोकळं दमेपर्यंत नाचायचं .किंवा नाचत येत नसले तर किमान गाणी तरी ऐकायची.काही वेळेला गाणी ऐकून रडायला पण येत खरं सांगते एकांतात गाणी ऐकताना आपला इतिहास डोळ्यासमोर येतो आणि दुःख  डोळ्यातून ते वाहत. आणि मग बघा किती हलकं वाटत . मनावरचं दडपण उडून जात आणि   मग आपोआप मार्ग दिसत जातात आणि अडकली कोडी आणि  मनाची कोंडी या दोघांना बांध सुटतो

बाकी  वाचन करणे ,मित्र मैत्रिणीनं बरोबर वेळ घालवणे ,कुठेतरी लॉन्ग ड्राईव्ह ला जाणे या गोष्टी पण मनाला शांत करतात

बरिच लोक म्हणतात मेडिटेशन करावं पण  तिथपर्यंत जाण्यासाठी किंवा मेडिटेशन समजून घेण्यासाठी तरी मनाला तयार करावं लागेलच ना असं अचानाक उठून आपण मेडिटेशन  नाही करू  शकत

चला तर मग जेव्हा जेव्हा मन दुःखी होईल ,मनात नैराश्य येईल तेव्हा तेव्हा मनाला दुसरा मार्ग दाखवुंया आणि यासाठी प्रत्येकाने आपल्या मनात एक  आनंदाचं झाड लावूया म्हणजे आपला आनंद नक्की कशात आहे ह्याच शोध घेणे म्हणजे मग दुःखाला सुखाचा मार्ग  सुख सुखी सापडेल.