अंधाराची चाहूल.. भाग - १
रात्रीचे साडेदहा वाजले होते. महाबळेश्वरच्या जंगलात धुकं दाटून बसलं होतं. शांतता इतकी होती की स्वतःचा श्वासही ऐकू येत होता. त्या शांततेतून एक जीर्ण, धुळकटलेला बोर्ड हळूच वाऱ्याने हलत होता,
“सावली हिल रेसॉर्ट – Since 1964”
या रेसॉर्टमध्ये पाय टाकणारी पहिली व्यक्ती होती आर्या देशमुख, २२ वर्षांची. तिला भीतीदायक ठिकाणांना भेट द्यायची खूप आवड. तिच्या यूट्यूब चॅनेलसाठी ती नवीन भुताटकी लोकेशन्स शोधत असायची. पण आजचं ठिकाण… काहीतरी वेगळंच होतं. अवघड, जड, दडपणारी शांतता.
रेसॉर्टचा मालक, शंभूसिंग, एक ६५ वर्षांचा, खूपच विचित्र नजरेचा माणूस, तिला रिसेप्शनवर दिसला.
“एकटी आलीस?” तो विचित्र हसत म्हणाला.
“हो… व्हिडिओ शूट करायला,” आर्याने नम्रपणे उत्तर दिलं. शंभूसिंगच्या चेहऱ्यावर क्षणभर काळोख पसरला.
“हो… व्हिडिओ शूट करायला,” आर्याने नम्रपणे उत्तर दिलं. शंभूसिंगच्या चेहऱ्यावर क्षणभर काळोख पसरला.
“आमच्याकडे… रात्री राहायला कोणी येत नाही. इथे बरेच दिवस झाले, कोणतीच बुकिंग नाही.”
आर्या जरा हसली. “कुठेतरी शूट करायला शांत जागा हवी होती. इथे खोली मिळेल ना?”
शंभूसिंग थोडा विचारात पडला, मग हळूच म्हणाला,
“मिळेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव…
खोली क्रमांक 13 कधीही उघडू नकोस.
ती खोली रिकामी असली तरी रिकामी नसते.”

आर्याला थोडं विचित्र वाटलं. पण तिला असं आव्हानच आवडतं. तिला खोली क्रमांक 11 दिली गेली. मोठी खिडकी, धुळकट पडदे, थंड वातावरण. रेसॉर्टमध्ये आणखी कोणताही पाहुणा नव्हता. सगळीकडे एकांत.
रात्री 12 वाजता तिने कॅमेरा ऑन केला आणि शूट सुरू. व्हिडिओमध्ये ती हसत हसत रेसॉर्टची माहिती देत होती. पण जेव्हापासून शूट सुरू केलं तेव्हापासून काहीतरी तिच्या मागे फिरत होतं… पावलांसारखा आवाज… हलकेच. ती सतत मागे वळून बघत होती. पण कुणीच नव्हतं.
साडेबारा वाजले. तिला एक मंद आवाज आला,
ठक… ठक… ठक… ती दचकली.
आवाज कुठून येतोय? ती कॅमेरा घेऊन त्या आवाजाच्या दिशेने गेली. आवाज वाढत होता…ठक… ठक… ठक…
ठक… ठक… ठक… ती दचकली.
आवाज कुठून येतोय? ती कॅमेरा घेऊन त्या आवाजाच्या दिशेने गेली. आवाज वाढत होता…ठक… ठक… ठक…
तिच्या नजरेसमोर एक दार उभं होतं.
खोली क्रमांक – 13
तीचंहृदय जोरात धडधडायला लागलं. शंभूसिंगचे शब्द आठवले, “कधीही उघडू नकोस.”
पण तिची उत्सुकता जास्तच होती. ती दाराजवळ गेली. आवाज अचानक थांबला. तिने हळूच कॅमेरा पुढे धरला.
क्षणभर शांतता झाली आणि नंतर दाराच्या तळातून कोणाचातरी हात बाहेर आला… काळा… लांब… अगदी मृतदेहासारखा. आर्या किंचाळत मागे पडली. तिचा कॅमेरा खाली पडून बंद झाला. जशी ती धडपडत उठली, तसा हात गायब झाला. दार पुन्हा शांत झालं.

आर्याचे पाय थरथरत होते. ती सरळ स्वतःच्या खोलीत धावत गेली आणि दार बंद करून घेतलं. तिला झोप येत नव्हती. एकटक दाराकडे पाहत तीने रात्र काढली.
पण भीतीपूर्ण रात्रीनंतर पहाट मात्र नेहमीसारखीच आली. सूर्यकिरणांनी खोली उजळली.
पण भीतीपूर्ण रात्रीनंतर पहाट मात्र नेहमीसारखीच आली. सूर्यकिरणांनी खोली उजळली.
आर्याला कालचं स्वप्न होतं का? की खरंच? प्रश्न कायम होता. ती झटपट कॅमेरा उचलून फुटेज पाहायला बसली. पण, फुटेज गायब होतं. सगळं कालच्या रात्रीचं एक सेकंदही नव्हतं. ती हादरली.
अचानक बाहेरून पुन्हा आवाज आला, “आर्या… आर्या…”
हा आवाज तिच्या मित्र अमेयच्या आवाजासारखा होता. पण तो इथे कधी आला? ती दार उघडून पाहते,कोणीही नाही. गॅलरी रिकामी. शांत. धुळकट.
पण दूरवर… खोली क्रमांक 13 चं दार उघडं होतं. पूर्णपणे.
हा आवाज तिच्या मित्र अमेयच्या आवाजासारखा होता. पण तो इथे कधी आला? ती दार उघडून पाहते,कोणीही नाही. गॅलरी रिकामी. शांत. धुळकट.
पण दूरवर… खोली क्रमांक 13 चं दार उघडं होतं. पूर्णपणे.
अंधारात कोणीतरी उभं होतं. लांब केस… पांढरा कुर्ता… आणि विकृत चेहरा. आर्या भीतीने पळाली. जिना उतरता उतरता तिचा पाय घसरला… आणि जोरात पडताच तिची शुद्ध गेली. तिने शेवटचं पाहिलं, ती पांढरी आकृती तिच्याकडे धावत येताना.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा