अंधाराची चाहूल.. भाग - २ (अंतिम भाग)
आर्या शुद्धीवर येते तेव्हा ती एका धुळकट खोलित असते. डोकं दुखतंय. हातापायात त्रास. ती उठते… आणि लक्षात येतं, ही खोली क्रमांक 13 आहे. तिचं रक्त गोठतं.
भिंतीवर जुन्या वर्तमानपत्राचे तुकडे चिकटलेले. त्यांच्यावर हेडलाईन,
“1964 – सावली हिल रेसॉर्टमध्ये रहस्यमय मृत्यू.”
“तरुणीचा मृतदेह खोली क्रमांक 13 मध्ये सापडला.”
“खून आजपर्यंत न सुटलेला.”
“1964 – सावली हिल रेसॉर्टमध्ये रहस्यमय मृत्यू.”
“तरुणीचा मृतदेह खोली क्रमांक 13 मध्ये सापडला.”
“खून आजपर्यंत न सुटलेला.”
आर्या वाचत राहते. त्या वर्षी कॉलेजला जाणारी मुलगी, समीरा राऊत रेसॉर्टमध्ये आलेली. सकाळी तिचा मृतदेह तिच्या खोलीत सापडला. चेहरा विद्रूप. कोणताच पुरावा नाही. तिचा फोटो भिंतीवर चिकटलेला होता.
धक्कादायक गोष्ट म्हणजे, त्या फोटोतील मुलगी…
काल दिसलेल्या पांढऱ्या सावलीसारखीच होती.
काल दिसलेल्या पांढऱ्या सावलीसारखीच होती.
आर्या भीतीने कापते. अचानक मागचा दरवाजा आपोआप बंद होतो. खोली अंधारात जाते. आर्या किंचाळते. हळूहळू एका कोपऱ्यातून कुजबुज सुरू होते,
“मी इथे आहे…”
“मला न्याय मिळाला नाही…”
“तू माझं ऐकशील…”
“मी इथे आहे…”
“मला न्याय मिळाला नाही…”
“तू माझं ऐकशील…”
आर्या कोपऱ्याकडे कॅमेरा लावते. कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर काही तरी दिसत होतं… पण प्रत्यक्षात काहीच नव्हतं.
स्क्रीनवर समीराचा चेहरा. रक्ताने भरलेले डोळे. विद्रूप हसू. आर्या कॅमेरा खाली फेकते.
स्क्रीनवर समीराचा चेहरा. रक्ताने भरलेले डोळे. विद्रूप हसू. आर्या कॅमेरा खाली फेकते.
समीराचा आवाज वाढतो, “माझा खून करणाऱ्याला शिक्षा नाही मिळाली…” “शंभूसिंग…”
“माझ्यावर हात टाकला… मारून टाकलं… आणि आता म्हणतो खोली रिकामी आहे…”
“माझ्यावर हात टाकला… मारून टाकलं… आणि आता म्हणतो खोली रिकामी आहे…”
आर्याच्या अंगावर काटा येतो. तिला आठवतो, शंभूसिंगचा विचित्र चेहरा. तेवढ्यात दार बाहेरून जोरात ठोठावलं जातं. “आर्या! दार उघड! काही नाही त्या खोलीत!”, शंभूसिंगचा आवाज.
आर्या थरथरत्या आवाजात म्हणते, “तू तिचा खून केलास… तुच तिचा…” दार उघडून आत शंभूसिंग संतापाने धावत येतो. “चुप! त्या भुताच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नकोस!”
पण खोलीत अचानक थंड वारा सुटतो. दिवा लुकलुकतो.
समीराचा चेहरा पुन्हा भिंतीवर काळ्या धुरासारखा दिसतो. “तू मला मारलं…आता तुझी पाळी…”
समीराचा चेहरा पुन्हा भिंतीवर काळ्या धुरासारखा दिसतो. “तू मला मारलं…आता तुझी पाळी…”
शंभूसिंग किंचाळतो. दाराकडे पळू लागतो. पण काहीतरी त्याला पकडतं… त्याचे पाय ओढले जातात. खोलीच्या कोपऱ्यात. त्याचा ओरडा अचानक थांबतो.
सर्वत्र शांतता पसरते. आर्या स्तब्ध. धुरकट आकृती तिच्याकडे वळते. पण या वेळी तिचा चेहरा शांत. दुःखी.
सर्वत्र शांतता पसरते. आर्या स्तब्ध. धुरकट आकृती तिच्याकडे वळते. पण या वेळी तिचा चेहरा शांत. दुःखी.
“मला न्याय मिळाला. आता मी मुक्त आहे.”
ती हळूहळू हवेत विलीन होते… अंधारात मिसळते.
आर्या दार उघडून बाहेर धावते. रेसॉर्टच्या बाहेर जाऊन थेट पोलिसांना कॉल करते. पोलिस येतात. शोध घेतात.
ती हळूहळू हवेत विलीन होते… अंधारात मिसळते.
आर्या दार उघडून बाहेर धावते. रेसॉर्टच्या बाहेर जाऊन थेट पोलिसांना कॉल करते. पोलिस येतात. शोध घेतात.
खोली क्रमांक 13 रिकामी. शंभूसिंग कुठेच नाही.
कुठलाही पुरावा नाही.
कुठलाही पुरावा नाही.
पण भिंतीवर एकच गोष्ट दिसते, आर्याच्या कॅमेऱ्यावर धूसर लिहिलेला शब्द, “धन्यवाद.”
ती धडधडत्या हृदयाने रेसॉर्टकडे पाहते. खिडकीतून कुणीच नाही… पण कुणीतरी पाहत असल्यासारखी भावना तिच्या आत निर्माण होते. ती परत कधीही तिथे गेली नाही.
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा