अंधारात परतलेली पायवाट
रात्रीचे अकरा वाजले होते. गावाच्या टोकाला असलेले "कुंभरे वाडी" नावाचं ते छोटंसं खेडं बहुतेक वेळा शांत असायचं. पण गेल्या दोन महिन्यांपासून गावात एक विचित्र भीती पसरली होती, कारण जंगलातून रात्री रडण्याचे आवाज ऐकू यायला लागले होते. कोणीही बाहेर पडत नव्हते. आणि ही भीती कोणालाही समजत नव्हती.
गावातील सुरेखा नावाची मुलगी त्या दिवशी घराबाहेर पडणार होती. दुसऱ्या दिवशी तिची सरकारी नोकरीची परीक्षा होती आणि ती बस पकडण्यासाठी रात्रीच निघणार होती. आई-वडिलांनी सांगितलं होतं, “रात्री जाऊ नकोस, वाट धोक्याची आहे.” पण सुरेखचं मन ठाम होतं.
“आई, काही होणार नाही. गावातून निघताच कोजागिरी रस्ता आहे. फक्त पंधरा मिनिटांचा,” ती म्हणाली.
आईचा चेहरा चिंताग्रस्त झाला. “रडण्याचा आवाज कुणाचा आहे हे आजपर्यंत कळलं नाही. तू एकटी जाऊ नकोस.” पण सुरेखाने सांगितलेलं ऐकून तीचं मन थांबणार नव्हतं. तिने बॅग घेतली आणि घराबाहेर पडली.
आईचा चेहरा चिंताग्रस्त झाला. “रडण्याचा आवाज कुणाचा आहे हे आजपर्यंत कळलं नाही. तू एकटी जाऊ नकोस.” पण सुरेखाने सांगितलेलं ऐकून तीचं मन थांबणार नव्हतं. तिने बॅग घेतली आणि घराबाहेर पडली.
रस्ता अंधाराचा, चंद्र नव्हता. आभाळ काळ्या ढगांनी झाकलं होतं. वाऱ्यात एक विचित्र थंडी मिसळली होती. गावाच्या पलीकडे असलेल्या जंगलातून वाऱ्याबरोबर कोरड्या पानांचा आवाज येत होता.
सुरेखने टॉर्च काढली आणि पायवाटेवर चालू लागली.
पहिल्या पाच मिनिटांपर्यंत सर्व ठीक होतं. झाडं स्थिर होती, पानं शांत होती. पण पुढे जाताच वातावरण बदलायला लागलं. कसलातरी सुगंध... जळलेल्या मातीचा... ती थांबली. टॉर्चची किरणं जिथे जात होती तिथे झाडं नेहमीसारखी दिसत होती. पण एक विचित्र आवाज कानात शिरला. खड… खड… खड…

जणू काही पानांवरून कुणीतरी चालत होतं. “कोण?” सुरेखाने ओरडून विचारलं. उत्तर आलं नाही. ती पुन्हा चालू लागली. पण काही अंतर पार करताच आवाज अगदी जवळून आला, खड… खड… खड…
टॉर्च त्या दिशेला वळवली. टॉर्चचा प्रकाश जिथे पडला, तिथे काहीच नव्हतं. “कदाचित एखादा ससा असेल…” तिने स्वतःलाच धीर दिला.
टॉर्च त्या दिशेला वळवली. टॉर्चचा प्रकाश जिथे पडला, तिथे काहीच नव्हतं. “कदाचित एखादा ससा असेल…” तिने स्वतःलाच धीर दिला.
पण पुढच्या क्षणी एक मोठा, कान भेदणारा रडण्याचा आवाज जंगलात घुमला. सुरेखाचे पाय थिजले.
हा आवाज तिनं आधीही गावातून ऐकला होता… पण इतका जवळून कधीच नाही. “हॅलो? कुणी आहे का?”
तिनं हळू आवाजात विचारलं.
हा आवाज तिनं आधीही गावातून ऐकला होता… पण इतका जवळून कधीच नाही. “हॅलो? कुणी आहे का?”
तिनं हळू आवाजात विचारलं.
रडण्याचा आवाज काही क्षणांसाठी थांबला… आणि मग पुन्हा सुरू झाला, पण यावेळी जणू एखादी बाई तिच्या कानातच ओरडत होती. “माझं मूल… कुठे आहे… माझं मूल दे मला…!”
सुरेखाने टॉर्च घट्ट पकडली आणि पळायला सुरुवात केली. पण पायवाट जणू थांबतच नव्हती. ती जितकी पुढे जायचा प्रयत्न करत होती तितकं जंगल आणखी दाट होत होतं. रस्ता तिला फिरत असल्यासारखा वाटत होता.
जोरात धावताना तिच्या पाठीवर अचानक गरम श्वास जाणवला. जणू कुणीतरी अगदी तिच्या मागे उभा होता.
ती घाबरून मागे वळली.क्षटॉर्चचा प्रकाश झाडांवर फिरला… आणि एका क्षणासाठी तिला एक पांढऱ्या साडीतील आकृती दिसली, विस्कटलेले केस, काळे डोळे आणि चेहऱ्यावर इतकी वेदना की पाहवत नव्हतं.
पण पुढच्या क्षणी ती आकृती गायब झाली. सुरेखाचे हात थरथरू लागले.

ती पुन्हा पुढे निघाली. पण तिला जाणवलं, ही तीच पायवाट नव्हती. गावाचा रस्ता सोडून ती जंगलाच्या आतमध्ये आली होती. कुठेही दिवे नव्हते. कुठेही माणसं नव्हती. पण रडण्याचा आवाज मात्र तिच्या भोवती फिरत राहिला. ती जवळच्या एका मोठ्या झाडापाशी येऊन थांबली.
“देवा… मला वाचव…” तिने कुजबुजत म्हणताच
झाडाच्या मागून कुणीतरी पावलांचे आवाज करत पुढे आलं. सुरेखा भीतीने थिजली.
झाडाच्या मागून कुणीतरी पावलांचे आवाज करत पुढे आलं. सुरेखा भीतीने थिजली.
ते जवळ आलं… अजून जवळ… टॉर्चचा प्रकाश त्या आकृतीवर पडला. एक बाई, पाणावलेले डोळे, ओले केस, विरघळलेली साडी आणि चेहरा… जणू कुणीतरी ओरखडे काढलेले.
ती बाई थेट सुरेखासमोर थांबली. “माझं… बाळ… पाहिलंस का?” शब्द थरथरत होते. आवाजात वेदना होती, पण त्याबरोबर काहीतरी अघोरी.
सुरेखने मान नकारार्थी हलवली. त्या बाईच्या डोळ्यांत अचानक काळोख पसरला. तिच्या चेहऱ्यावरचे जखमा अधिक भयानक दिसायला लागल्या.
“मी शोधतेय… दोन महिन्यांपासून… कुणीही माझं बाळ परत देत नाही!” अचानक ती किंचाळली.
सुरेखा थेट मागे पडली.
सुरेखा थेट मागे पडली.
आईने सांगितलेली गावकथा सुरेखाच्या आठवणीत आली. दोन महिन्यांपूर्वी जंगलात एक बाई आणि तिचं लहान बाळ हरवलं होतं. दुसऱ्या दिवशी त्या बाईचं शरीर सापडलं… पण बाळ कधीच सापडलं नाही.
गावकरी म्हणायचे, ती आत्मा बनून आपलं बाळ शोधते आणि आज ती सुरेखाच्या अगदी जवळ होती.
अचानक ती बाई सुरेखाच्या दिशेने झेपावली. सुरेखाने पूर्ण ताकदीने पळायला सुरुवात केली. जंगलात धावताना काटे तिच्या पायात घुसत होते. टॉर्च हातातून सुटून पडली. तिला रडण्याचा आवाज, हसण्याचा आवाज, पानांचा आवाज, सगळं एकत्र ऐकू येत होतं. जंगल असं वाटत होतं की जिवंत आहे.
शेवटी ती पायवाटेतून बाहेर पडणाऱ्या एका जुन्या कुंपणाजवळ आली. “देवा, मला बाहेर पडू दे…” ती रडत म्हणाली आणि अचानक… सगळं शांत झालं.
तीने धापा टाकत मागे वळून पाहिलं, कोणी नव्हतं.
तिने कुंपण ओलांडले… आणि समोर रस्त्यावरून येणारा बसचा प्रकाश दिसला. सुरेखा जीवाच्या आकांताने रस्त्यावर आली.
तिने कुंपण ओलांडले… आणि समोर रस्त्यावरून येणारा बसचा प्रकाश दिसला. सुरेखा जीवाच्या आकांताने रस्त्यावर आली.
बस थांबली. कंडक्टरने तिला वर घेतलं.
“बाई गं, रात्री या जंगलातून कोण येतं का?” तो म्हणाला.
सुरेखा काहीही न बोलता आसनावर बसली. शरीर थरथरत होतं. पण बस चालू लागली.
“बाई गं, रात्री या जंगलातून कोण येतं का?” तो म्हणाला.
सुरेखा काहीही न बोलता आसनावर बसली. शरीर थरथरत होतं. पण बस चालू लागली.
बस थोडी पुढे गेल्यावर कंडक्टर तिच्याकडे पाण्याची बाटली घेऊन आला. “घ्या… थोडं शांत व्हा…”
सुरेखाने बाटली घेतली आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं.
पण तिचं हृदय थांबलं. कंडक्टरच्या पायाशी एक लहान मुलाचं खेळणं होतं, जंगलात हरवलेलं त्या बाईच्या बाळाचं खेळणं.
पण तिचं हृदय थांबलं. कंडक्टरच्या पायाशी एक लहान मुलाचं खेळणं होतं, जंगलात हरवलेलं त्या बाईच्या बाळाचं खेळणं.
सुरेखने थरथरत विचारलं, “हे… खेळणं… कुठून आलं?”
कंडक्टर शांतपणे हसला. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू पसरू लागलं… विकृत होत गेलं.
कंडक्टर शांतपणे हसला. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू पसरू लागलं… विकृत होत गेलं.
तो हळू आवाजात म्हणाला, “तिचं बाळ फक्त मला दिसतं… आणि तिने आज तुला सोडलं… कारण तिला मी मिळालो आहे.”
सुरेखा किंचाळली. पण बसमध्ये दुसरं कोणीच नव्हतं.
बस रिकामी होती आणि कंडक्टरचे डोळे पूर्ण काळे झाले होते.
बस रिकामी होती आणि कंडक्टरचे डोळे पूर्ण काळे झाले होते.
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा