Login

अंधश्रध्देच जाळं भाग १

अंधश्रध्देचं जाळं
साक्षी आज खूप खुश होती. तिच्या कॉलेज पासूनचा मित्र मानस त्याच्या आई वडीलाच्या सोबत तिच्या घरी येणारं होता. ते दोघं एकमेकांना कॉलेज पासुन ओळखत होते. त्याच्या घरच्यांना साक्षी पसंत होती. तसं बघायला गेले तर नकार देण्यासारख काहीच नव्हत. दोघं एकमेकांना अनुरूप होते. घर कुटूंब त्यांचे स्वभाव आणि इतर गोष्टी बघता सगळं काही जुळून आलं होत. भेटणं तर फक्तं औपचारिकता होती.

साक्षीच्या आईचं म्हणणं होत मानसच्या घरच्यांना भेटण्या आधी साक्षी आणि मानसची पत्रिका जुळत आहे का ? हे एकदा तपासून बघावं. पण साक्षीची मोठी बहीण विभावरीचे म्हणणं होत की, दोघं एकमेकांना पसंत आहेत, कुटूंब चांगले आहे, शिकलेले आहेत. सगळं काही जुळून आलं आहे तर उगीच पत्रिका जुळत कशाला बघायचा ?

साक्षीची आई रोहिणीबाई एका अमृतानंद बाबा यांना खुप मानत होती. त्यांना विचारल्या शिवाय कोणतेही काम करत नव्हती. त्यामुळे रोहिणी बाईंचा हट्ट होता. मानस आणि त्याच्या आई वडीलांना घरी बोलावण्याआधी बाबाजींना मुलांची पत्रिका बघून जुळत आहे का नाही हे सगळं बघावं. यावेळी विभाने काकुंच न ऐकता मानस आणि त्याच्या आई वडीलांना घरी बोलावलं होत.

मानस नुकताच सी एस झाला होता. त्याला एका मल्टी नॅशनल कंपनी मध्ये नोकरी मिळाली होती. मानसचे कुटूंब एक उच्च वर्गीय कुटूंब होत. त्याच्याशी लग्न झालं तर साक्षी सुखात राहील. सर्वात महत्त्वाचं साक्षीवर त्याचं प्रेम होत. त्यामुळे विभा मानस आणि साक्षीच्या लग्नाच्या फेवर मध्ये होती. म्हणूनच आज मानस घरी येत आहे. साक्षी तर आकाशात उडत होती.

तिचे गाल गुलाबी झाले होते.संध्याकाळी ते तिघ घरी आले. सगळ्यांची ओळख करून झाली. भेटी गाठी झाल्या. औपचारिक बोलणी संपली आणि बोलण्याचा विषय मूळ मुद्यावर आला. मानसची आई माधवी म्हणाली,

" रोहिणी वहिनी , आमच्या कडे देव दयेने सगळं काही आहे. त्याची अपार कृपा दृष्टी आहे. फक्त एका मुलीची कमी आहे. साक्षीच्या येण्याने ती भरून निघेल."

विभावरी म्हणली,

" काकु आम्हाला पण साक्षी साठी अशाच कुटुंबाची इच्छा आहे."

सगळ्यांचा होकार आहे असं समजुन माधवी वहिनींनी साक्षीच्या हातात कड घालण्यासाठी तिचे हात हातात घेतले. इतक्यात रोहिणी वहिनी म्हणल्या,

" माधवी वहिनी मी काय म्हणते , हे सगळे विधी करण्याआधी एकदा आपण मुलांच्या पत्रिका जुळतात का ते एकदा बघून घेऊ. त्या शिवाय या अशा कोणत्याही विधी साठी माझा नकार आहे."

त्यांचा आवज ठाम होता. रोहिणीचे असं वागणं बघुन माधवी वहिनींना अपमान झाल्या सारख वाटलं. मानस आणि त्याच्या वडिलांची अवस्था पण काहीशी तशीच होती. विभावरीचा राग अनावर झाला होता. मनातल्या मनात दहा अंक मोजून तिने कसा बसा राग गिळला. परिस्थिती सांभाळून घेण्यासाठी ती म्हणाली,

" काकु अग ते दोघं एकमेकांना पसंत करतात. "

" तू मध्ये बोलूच नको. तू विसरलीस का तूझ्या लग्नाच्या वेळी तूझ्या सासरच्यांनी पत्रिका जुळत आहे का हे बघितलं होत. तीस गुण पत्रिका जुळत आहे. हे समजल्यावर तुमचं लग्न झालं. वहिनींनी पण त्यावेळीं त्याला होकार दिला होता.

त्यामुळे मी हे पक्क ठरवले आहे, साक्षीच लग्न पत्रिका जुळत आहे का नाही हे सगळं बघूनच करणारं. असच नाही तिला हकलणार. म्हणजे लोकं म्हणायला मोकळी मोठीच लग्न पत्रिका पाहून मग केलं आणि धाकटीला तसचं ढकलून दिलं. नाही बाबा माझ्याकडून हे पाप होणार नाही."

मानसचा विश्र्वास बसत नव्हता, की साक्षी सारखी शिकलेली मुलगी या अशा पुराणिक गोष्टीवर विश्वास ठेवत असेल. तिच्या आईच्या या वागण्या बोलण्यावर निदान साक्षी काहीतरी बोलेल असं म्हणून तो एकटक साक्षीकडे बघत होता.

पण साक्षी ने मान खाली घातली होती. जणू काही वागण्यातून सांगत होती. तिचा तिच्या आईला, तिच्या वागण्या बोलण्याला मूक पाठिंबा आहे. मानसचा भ्रम निरास झाला होता. तो काहीही न बोलता आई वडीलांना घेऊन निघून गेला.

मानस आणि त्याचं कुटूंब गेल्या नंतर विभावरी काकुला म्हणली,

" काकु अग अस का वागते ? त्यांच्यासमोर असं का बोलते ? आज काल कोण विश्वास ठेवत ज्योतिष आणि पत्रिका जुळतात का नाही यावर ? अशी किती तरी जोडपी आहेत, ज्यांच लग्न पत्रिका जुळत आहे की नाही हे बघून ठरवले होते.
पण त्यातील काही जोडपी किती आनंदी आहेत ?

मनाने एकत्र राहतात की शरीराने ? कधी कधी मुलांची जबाबदारी अंगावर आहे, एकट्याने मुलांचं संगोपन करणं अवघड आहे, म्हणून एकत्र राहण्याचा पर्याय निवडला जातो.