Login

अंधविश्वास

लोकं कसे पाखण्डी बाबांच्या फसवणूकमध्ये येतात. या कथेत बघूया.
"अंधविश्वास "


वेल्हे तालुक्यातील लहानसं पण गजबजलेलं गाव. हिरवळ, पाऊसाळ्यात धबधबे आणि उन्हाळ्यात कडक ऊन. तिथेच देशमुख कुटुंब राहत होतं.


अनंतराव देशमुख - रिटायर्ड मास्तर, सरलमार्गी, शिस्तप्रिय.
लीलताई - घर सांभाळणारी आणि पूजा पाठशिवाय एक दिवसही न जाणारी.
मुलगा —शेखर, आय टी कंपनीत नोकरीला.
मुलगी — स्वरा बारावीत शिकत होती.

घरात साधा पण समाधानचं वातावरण होतं. पण अचानक अनंतरावांना खोकला, थकवा, छातीत दुखणं असं काही जाणवायला लागला. डॉक्टरांकडे तपासणी केली, साधं इन्फेकशन निघालं. औषधं घेतली की ठीक होईल असं डॉक्टर म्हणाले.

पण लिलाताईच्या मनात वेगळाच विचार आला — "हे फक्त आजार नाहीं, काही तरी ग्रहदोष आहे, नाहीं तर अचानक अनंतारावांची तब्येतीवर परिणाम का व्हावा?"

गावात नुकतेच आले होते — पंडित नारायण शास्त्री. कपाळावर मोठा कुंकवाच ठिपक, गळ्यात रुद्राक्ष, हातात चंदणमाळ आणि बोलण्यात गोडवा.

लोक सांगत होते — " शास्त्रीबुवांनी पाटीलच्या मुलाचं भविष्य अचूक सांगितलं. गावातल्या सावकारला वाचवलं. खूप ज्ञानी आहे.

लीलाताईंनी मनात विचार केला —" अनंतरावांच्या आजाराच खरं कारण हेच सांगू शकतील."

त्या एकदिवशी कोणाला नां सांगता त्यांच्याकडे गेल्या.

शास्त्रीबुवांनी कुंडली बघितली, काही मंत्र बोलले आणि गंभीर आवाजात म्हणाले —"आईसाहेब तुमच्या घरावर शनीची सावली आहे . नवऱ्याची तब्येत बिगडत आहे. मुलाचं प्रमोशन थांबलाय आणि मुलीला मंगल दोष आहे. "
लीलाताई घाबरले. त्यांनी विचारला —"बुवा मग यावर उपाय काय??"

बुवा हसले आणि म्हणाले —"उपाय आहेत. पण साधे नाहीत. एक मोठा शनिशांती होम, नवरात्रीचे उपवास आणि खास रत्न. खरंच होईल पण संकट टळेल. "

लीलाताईंनी कोणाला न सांगता घरातील सोना काढलं. " मुलांचं भलं हवंय नां मग सोन्याचं काय करायचं?"

पाहिलं होमं झाला. वेदांचे उच्चार, लोकांची गर्दी. लीलाताईचं मन थोडा हलकं झालं.

पण बुवांनी इशारा दिला —"येवढं पुरेसं नाहीं. ग्रह खूप रागवले आहेत. अजून उपाय हवे."

आता रत्नं. किमान पाच तोळ्याच नीलम, सात तोळ्याच पोवळं किंमत लाखोंमध्ये. लीलाताईकडे तेवढं नव्हतं. त्यांनी शेखरच्या पगारातून हप्त्याने घेतलेले घरकर्जचं पैसे वापरले.

शेखरनी एके दिवशी पाहिलं —सोन्याच्या दागिन्यांची पेटी रिकामी, बँक खात्यात शिल्लक कमी. त्याने आईला विचारलं —"आई हे काय चाललंय? पैसे कुठं गेले? "

आईनं टाळलं —"अरे, तुझ्या वडिलांच्या तब्येतीसाठी उपाय केले. ते बुवा जे बोलतात ते खरं ठरतं. "


शेखर संतापला — "आई हे सगळं ढोंग आहे. डॉक्टरांनी सांगितलंय बाबा ठीक होतील, मग या बुवांच्या मागे का लागतेस??"

लीलाताई रागानं —" तुला काय कळतं? तुझा विज्ञानावर विश्वास असेल, पण माझा श्रद्धेवर आहे."

अनंताराव शांतपणे ऐकत होते. ते एवढंच म्हणाले —"लीला श्रद्धा ठेवणं वेगळं, आणि अंधश्रद्धेत बुडणं वेगळं."

घरात तणाव वाढला. स्वरा आईकडे बघून त्रासली होती.
" आई तुम्ही आम्हाला शिकायला लावता. आणि स्वतः मात्र ढोंगी बुवांच्या मागे लागता? हे बरोबर आहे का? "
पण आईच्या डोक्यात एकच विचार संकट टळलं पाहिजे.


शास्त्रीबुवांनी दर आठवड्याला नवीन भीती दाखवली.
" शेखरची नोकरीं टिकणार नाहीं. "
घरातल्या मोठ्या माणसाच्या आयुष्यात धोका आहे."

ही वाक्य लीलाताईच्या डोक्यात घुमत राहायची. रात्री झोप लागायची नाहीं. त्या सतत मंत्र म्हणत, नवस करत, पैसे गोळा करत.

शेखरला हे सहन होतं नव्हतं. तो ऑफिसमधल्या सिनियर डॉ. मीरा देशपांडे यांच्याशी बोलला. त्या सायकोलॉजिस्ट होत्या.
मीरा म्हणाल्या —
"शेखर हे सगळं फियर सायकोलॉजी आहे. भीती दाखवा, उपाय सांगा आणि पैसे उकळा. तुझ्या आईसारख्या श्रद्धालू लोकांना फसवणं सोपं असतं."

शेखर आणि स्वरा दोघांनी मिळून शास्त्रीबुवांवर शोध सुरु केला.

त्यांना कळलं.
"बुवा पुण्यात बँकेत क्लर्क होते. फसवणूकीच्या आरोपमुळे नोकरी गेली. मग त्यांनी कुंडली वाचन शिकून धंदा शुरु केला."

त्यांनी बनावट प्रमाणपत्र काढली होती. अनेक घरातून पैसे उकळेले होते. काहीनां तर लग्न मोडायला लावलं होते.

शेखरनी सगळे कागदपत्र गोळा केली. फसवणूक झाली होती त्या माणसांसोबत बोलला. रेकॉर्ड केलं.

शेखरनी आईला पुरावे दाखवले.
"आई हेच तुमचे बुवा, फसवे आहेत."

लीलाताईंचे डोळे भरून आले.
"पण त्यांनी सांगितलेलं कित्येकदा खरं ठरलं....."
स्वरा खवाळली —
"आई चुकून एकदा योगायोगानं काही जमलं, की तुम्हाला वाटतं बुवा मोठे. हे सगळं खेळ आहे."

अनंतराव पण म्हणाले —"लीला आता पुरे. "

गावात शास्त्रीबुवांनी मोठ्या हवनाचं आयोजन केलं. प्रत्येक घरातून वीस हजार रुपये द्यायची मागणी केली.
"नाहीं दिलंत तर गावावर रोगराई येईल,"त्यांनी धमकी दिली.

अनंतराव ठामपणे म्हणाले —" मीं या अंधश्रद्धेसाठी काही देणार नाहीं. "

शेखरनी लोकांसमोर पुरावे मांडले- बनावट प्रमाणपत्र, पैशांच्या उकळणीचे पुरावे.
गावाकऱ्याच्या डोळ्यातून पडदा सरकला.

पोलीसला बोलावले आणि त्या शास्त्रीबुवांना जेल झाली.

लीलाताईनीं सगळ्यांशी माफी मागितली.


देशमुख कुटुंबाला मोठा धडा मिळाला. भीती, अंधश्रद्धा,आणि ढोंग यातून बाहेर पडून त्यानीं शिक्षण आणि विश्वासाचं जग निवडलं.

आज त्यांचा घरात पुन्हा हास्य आहे.

समाप्त.
©® निकिता पाठक जोग
0