अंगणी सुखाचा पारिजात फुलला भाग 3
मागील भागात आपण पाहिले की नयन आत्महत्या करायचा प्रयत्न करते . वत्सलाबाई अमेयकडून सगळी माहिती काढतात . आता पाहूया पुढे .
अमेय आत आला . निस्तेज नजरेने नयन त्याच्याकडे बघत होती . अमेय एकही शब्द न बोलता तिचा हात हातात घेवून फक्त शांतपणे थोपटत होता . नयन हळूहळू शांत झाली . आपण काय केले होते याचा विचार करून आता तिला स्वतः ची लाज वाटत होती . अमेय शांतपणे बाहेर गेला .
वत्सलाबाई हळूच आत आल्या .
" नयन दोन घास खाऊन घे आधी ."
त्यांनी बोलायची संधीच न देता डबा उघडला .
नयन शांतपणे खात होती तरी मनातली खळबळ चेहऱ्यावर दिसत होतीच . रात्रभर विश्रांती घेतल्यावर सकाळी अमेय बराच सावरला होता . आईबाबा पोहोचले होते . नयनची आईदेखील आली होती . तिघेही धक्क्यात होते .
"अमेय,मी घेऊन जाते तिला . तुम्ही दुसरे लग्न करा ."
नयनची आई रडू आवरत म्हणाली .
नयनची आई रडू आवरत म्हणाली .
" विहीन बाई काय बोलताय हे ?" अमेयची आई चिडली .
" अहो अशी डोक्यावर परिणाम झालेली ही पोर किती दिवस सांभाळतील ते ? "
नयनची आई व्यवहार बोलत होती . तेवढ्यात वत्सलाबाई पुढे झाल्या .
नयनची आई व्यवहार बोलत होती . तेवढ्यात वत्सलाबाई पुढे झाल्या .
" तुमची हरकत नसेल तर तुम्ही तिघे माझ्यासोबत घरी चला . त्यांना दोघांना थोडावेळ देऊ आपण ."
कसेबसे समजावून त्यांना तिघांना वत्सलाबाई घरी घेऊन आल्या.
" खर तर माझी अन तिची दोन दिवसांची ओळख आहे . पण त्या पोरीला जगावे वाटत नाही हे मला जाणवले होते . अगदी पहिल्याच भेटीत ."
त्यांचे बोलणे ऐकून तिघांचेही डोळे भरून आले .
"पण असे हरून चालणार नाही . मनाचे आजार औषधे नाही तर कुटुंब बरे करते हा माझा स्वतः चा अनुभव आहे . "
वत्सलाबाई तिघांचा अंदाज घेत होत्या .
" नयन आणि अमेय सुखी व्हावे यासाठी आम्ही काहीही करण्यास तयार आहोत ."
नयनच्या सासूबाई म्हणाल्या .
नयनच्या सासूबाई म्हणाल्या .
" मग पुढचे सगळे आपण मिळून करायचे ."
वत्सलाबाई मिश्किल हसून चहा करायला गेल्या .
वत्सलाबाई मिश्किल हसून चहा करायला गेल्या .
दोन दिवसांनी नयन घरी आली . घरात जाताना अंगणातील पारिजातक वाळलेल्या फांद्या छाटून आणि छान आळे करून नीटनेटका केलेला दिसला . घरात आली तर समोर आई अन सासूबाई .
" नयन अंघोळ करून घे . मस्त गरम थालीपीठ लावते ."
आई पटकन म्हणाली .
नयन अंघोळीला गेली . तीन चार दिवस घडलेल्या घटना तिला आठवत होत्या . अंगावर पडणारे कोमट पाणी आणि स्थिर झालेले मन तिला आपण काय चूक केली याची जाणीव करून देत होते . छान अंघोळ केल्यावर कितीतरी दिवसांनी तिला बरे वाटले .
आई पटकन म्हणाली .
नयन अंघोळीला गेली . तीन चार दिवस घडलेल्या घटना तिला आठवत होत्या . अंगावर पडणारे कोमट पाणी आणि स्थिर झालेले मन तिला आपण काय चूक केली याची जाणीव करून देत होते . छान अंघोळ केल्यावर कितीतरी दिवसांनी तिला बरे वाटले .
" नयन तुला वत्सला बाईंनी भेटायला बोलावले आहे . खर तर लगेच जावे असे नाही पण त्यांना बरे नाही दोन दिवस . त्यामुळे तुलाच भेटायला ये दवाखान्यातून आल्यावर असा निरोप आहे ." सासूबाई म्हणाल्या .
" आई डब्यात चार थालीपीठ दे . आजीला खाऊ घालेन ."
नयन खाणे संपवत म्हणाली .
"मी येऊ का सोबत ?" अमेय पटकन बोलला .
नयन खाणे संपवत म्हणाली .
"मी येऊ का सोबत ?" अमेय पटकन बोलला .
" नको,मी जाईन ."
नयन डबा घेऊन निघाली . वाटते काही बायका तिच्याकडे बघत कुजबुजत होत्या . झपझप चालत नयन आजीकडे पोहोचली . जाईने दार उघडले .
" आजी, नयनताई आलीय . बरं झालं आलीस . दोन दिवस ताप येतोय तिला ." जाई सांगत होती .
" आहे कुठे आजी ?" नयन काळजीने म्हणाली .
" मागच्या अंगणात आहे ."
जाईने उत्तर दिले .
जाईने उत्तर दिले .
नयन मागच्या अंगणात गेली . तिथे छान बाग होती . आजी झाडांशी बोलत होती . कोणाला रागवत होती तर कोणाचे कौतुक चालले होते .
" आजी,कशा आहात ?"
नयन हळूच म्हणाली .
" अय्या नयन, ये बस इथे ."
नयन जवळ गेली आणि आजीच्या गळ्यात पडून रडायला लागली .
नयन हळूच म्हणाली .
" अय्या नयन, ये बस इथे ."
नयन जवळ गेली आणि आजीच्या गळ्यात पडून रडायला लागली .
" तुम्ही माझ्या डोळ्यात वाचलेले ना ? खरं सांगा ?"
नयन रडत म्हणाली .
नयन रडत म्हणाली .
" पोरी,माझ्याइतके ते भाव कोणीच ओळखू शकत नाही . आपल्याला वाटतं आपण संपलो की संपेल सगळा त्रास . असाच विचार करत मी निघाले होते तेच पाप करायला . कर्ता मुलगा आणि सून गेल्यावर जगायचे कशाला ? बाहेर निघाले आणि छोट्या जाईने पदर ओढला . बस त्याच क्षणी भिरकावले सगळे विचार . पोरी तुझ्याकडे इतका छान, समजूतदार नवरा आहे . आई,सासू सासरे आहेत ."
आजी तिला थोपटत कितीतरी वेळ बोलत होती . आजीने बरेच समजावले आणि नयन घरी आली .
आजी तिला थोपटत कितीतरी वेळ बोलत होती . आजीने बरेच समजावले आणि नयन घरी आली .
दुसऱ्या दिवशी नयन आपण लावलेल्या पारिजातकाच्या झाडा जवळ गेली . त्याच्यावर प्रेमाने हात फिरवला आणि अचानक मागून अमेय गाऊ लागला .
"अंगणी सुखाचा पारिजात फुलला ." ते ऐकूनच नयन हसत सुटली .
" काहीही काय गातोस अमेय ? असे नाहीय ?"
इतके म्हणून तान घ्यायला सुरुवात करता करता नयन गप्प होऊन आत निघून गेली .
"अंगणी सुखाचा पारिजात फुलला ." ते ऐकूनच नयन हसत सुटली .
" काहीही काय गातोस अमेय ? असे नाहीय ?"
इतके म्हणून तान घ्यायला सुरुवात करता करता नयन गप्प होऊन आत निघून गेली .
घरचे सगळेच तिला वेगवेगळ्या कामात गुंतवत होते. नयन देखील मनापासून प्रयत्न करत होतीच . एक दिवस सकाळी सकाळी जाई घरी आली .
" नयन ताई माझे एक काम करशील ?"
नयन हसली," आधी काम तर सांग ?"
" आधी तू वचन दे नाही म्हणणार नाहीस ." जाईने हट्ट केला.
" बरं बाई,करेल तुझे काम ." नयन म्हणाली .
" ऐक तर आम्ही आपल्या कॉलनी जवळ एक सरकारी शाळा आहे तिथे मुलांसाठी काही उपक्रम करत असतो . त्या मुलांना गाणे शिकवशील ?"
नयन क्षणभर शांत झाली .
नयन क्षणभर शांत झाली .
"प्लीज ताई, अग प्रजासत्ताक दिन एक महिन्यावर आलाय . तेवढ्यापुरते तरी शिकव ."
जाई आपला मुद्दा पुढे रेटत म्हणाली. शेवटी उद्यापासून यायचा शब्द घेऊनच जाई उठली .
"आई मी शब्द दिला खरा पण एवढ्या सकाळी कसे जमेल ? अमेयचा डबा,घरची कामे ?" नयन चिंतेत होती .
" अग आम्ही दोघी म्हाताऱ्या आहोतच की तू सुरुवात तर कर ." शेवटी उद्या जाऊन पाहून तर येऊ असे म्हणून नयन आत निघून गेली .
नयन येईल का नैराश्यातून बाहेर ?
मुलांना ती पुन्हा शिकवू शकेल ?
वाचा पुढील भागात .
©® प्रशांत कुंजीर .
अष्टपैलू 2025 स्पर्धा
मुलांना ती पुन्हा शिकवू शकेल ?
वाचा पुढील भागात .
©® प्रशांत कुंजीर .
अष्टपैलू 2025 स्पर्धा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा