अंगणी सुखाचा पारिजात फुलला भाग 4 (अंतिम)
मागील भागात आपण पाहिले नयन कुटुंब आणि वत्सलाबाई यांच्या प्रेमाने हळुहळू सावरू लागते . जाई तिला मुलांना गाणे शिकवायची ऑफर देते . आता पाहूया पुढे .
दुसरा दिवस उजाडला तो एक अनामिक हुरहुर घेऊनच . आपल्याला पुन्हा जमेल का गाणे ? नयन साशंक होती . तिने आपले आवरले . सासू सासरे आणि आईला नमस्कार केला . नयन बाहेर पडली तेव्हा कोपऱ्यातील पारिजातक कोंब धरू लागल्याचे तिला दिसले . तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले . अमेय गाडी घेऊन आला .
" चल मी सोडतो तुला ." त्याने दार उघडले .
" नको अमेय जवळच जायचे आहे ." नयन म्हणाली .
तरीही अमेयने हट्ट केला आणि तिला सोडायला आला . नयन गाडीतून उतरली आणि शाळेकडे चालू लागली . जाई आणि तिच्या मैत्रिणी तिथे आधीच हजर होत्या .
तरीही अमेयने हट्ट केला आणि तिला सोडायला आला . नयन गाडीतून उतरली आणि शाळेकडे चालू लागली . जाई आणि तिच्या मैत्रिणी तिथे आधीच हजर होत्या .
" ताई,आपल्याला ह्या मुलांना गाणे शिकवायचे आहे ." जाई म्हणाली .
साधीशी निरागस मुले पाहून नयन आनंदी होती . तिने मुलांशी गप्पा मारायला सुरुवात केली .
" तुम्हाला कोणती गाणी आवडतात ?"
तिने पहिला प्रश्न विचारला आणि धडाधड उत्तरे येऊ लागली .
तिने पहिला प्रश्न विचारला आणि धडाधड उत्तरे येऊ लागली .
चित्रपट गीते मुलांना त्यांच्या ठेक्यासह पाठ होती .
" तुम्हाला मी गाणे शिकवणार आहे . आवडेल ना ?" तिने विचारले .
सगळ्यांनी मोठ्या सुरात होकार दिला . पहिल्या दिवशी मुलांसोबत गप्पा मारून नयन परत आली .
संध्याकाळी अमेय घरी आल्यावर त्याच्या आवडीचा बेत होता . छान गप्पा मारत जेवण झाले . बेडरूममध्ये आल्यावर नयन थोडी शांत दिसली .
" नयन काय झाले अचानक अशी शांत झालीस ?" अमेय तिच्याजवळ बसला .
" काही नाही रे,आज मुलांसोबत खूप छान वाटले . पण भितीदेखील वाटते . पुन्हा सगळे तसेच घडले तर ?" नयन म्हणाली .
अमेयने हळूवार तिच्या डोक्यावर थोपटले . नयन हळूच त्याच्या खांद्यावर डोके ठेवून विसावली . कितीतरी दिवसांनी असा निवांत स्पर्श अमेय अनुभवत होता . मन शांत झाले होते .
" नयन लवकर खाली ये ." सकाळीच आईचा आवाज ऐकून नयन खाली आली .
" गरम तेल लावते केसांना आणि तुझ्या सासूबाईंनी शिकेकाई आणला आहे . छान केस धुवून घे . "
किती वर्षांनी आई असे केसांना तेल लावत होती . खूप छान वाटत होते . नयन नकळत गुणगुणू लागली .
किती वर्षांनी आई असे केसांना तेल लावत होती . खूप छान वाटत होते . नयन नकळत गुणगुणू लागली .
मोहर तुझ्या प्रेमाचा मनी बहरला .
अंगणी सुखाचा पारिजात फुलला .
डोळे बंद करून नयन गात होती . आईचा हात थांबला आणि तिचे सुर देखील थांबले .
"जा आता वर जाऊन छान अंघोळ कर ."
आईने सांगितले .
नयन मस्त गरम पाण्यात न्हाऊन बाहेर आली . ओलेते केस,मुग्ध चेहरा आणि त्यात निरागस हसू पाहून अमेय नकळत तिच्या जवळ आला .
कपाळावर आलेली केसांची ओली बट बाजूला सारून त्याने हळूवार स्पर्श केला आणि त्याच क्षणी नयन त्याच्या मिठीत विसावली . पारिजात इथेदेखील फुलला होता . अमेयच्या छातीवर डोके ठेवून नयन विसावली . इतक्यात शाळेला जायला उशीर होत असल्याचे लक्षात आल्याने ती झटकन उठली .
तरीही अमेयने तिला पुन्हा जवळ ओढले . खरेतर त्याचा अनावृत्त देह तिलाही स्वतः कडे ओढत होता . परंतु स्वतःला सावरत नयन आवरून खाली गेली .
नयन छान आवरून बाहेर पडली . तितक्यात रागिणी समोर मैत्रिणीशी गप्पा मारताना तिला दिसली .
" आत्महत्या करण्याचा प्रयत्न कायद्याने गुन्हा आहे ना ?"
रागिणी मुद्दाम मोठ्याने मैत्रिणीला विचारत होती .
क्षणात नयन उदास झाली .
तितक्यात एक आश्वासक आवाज कानी आला," असे चिखलाचे डबके जागोजागी असतात . त्याने पाय भरला तर पाण्याने पाय धुवून पुढे जावे ."
वत्सलाबाई हसून म्हणाल्या .
" काकू किती छान बोलता तुम्ही . ऐकत रहावे वाटते . " नयन पुन्हा हसली .
तितक्यात एक आश्वासक आवाज कानी आला," असे चिखलाचे डबके जागोजागी असतात . त्याने पाय भरला तर पाण्याने पाय धुवून पुढे जावे ."
वत्सलाबाई हसून म्हणाल्या .
" काकू किती छान बोलता तुम्ही . ऐकत रहावे वाटते . " नयन पुन्हा हसली .
" मग आणखी एक ऐकशील ?" वत्सलाबाई अंदाज घेत म्हणाल्या .
" तुमचे ऐकणार नाही असे होईल का ?" नयनने विचारले .
" वासंती गाडगीळ,माझी मैत्रीण प्रसिद्ध प्रसुतीतज्ञ आहे . आज संध्याकाळी जायचे आहे तुम्ही दोघांनी ." वत्सलाबाई म्हणाल्या .
" काकू,केवळ तुमच्या शब्दाखातर जाईल मी ."
नयन त्यांचा निरोप घेऊन निघाली .
नयन त्यांचा निरोप घेऊन निघाली .
आज सकाळासूनच घडणारे प्रसंग तिला आपल्या भोवती असणारे सुखी कुटुंब जाणवून देत होते . शाळेत पोहोचल्यावर नयनने मुलांना शुभंकरोती आणि काही श्लोक शिकवले . मुलांना ते प्रचंड आवडले . नयन तिचा तास संपवून जायला निघाली . शाळेत काम करणाऱ्या मावशी पुढे आल्या .
" मॅडम आमच्या पोरांना येवढं मस्त शिकवताय लई झ्याक वाटतय बघा ."
असे म्हणून त्या निघून गेल्या .
असे म्हणून त्या निघून गेल्या .
संध्याकाळी काहीशा अनिच्छेने नयन डॉक्टरांकडे जायला निघाली . डॉक्टर वासंती गाडगीळ स्वतः खूप कमी रुग्ण हाताळत असत आता . त्यांनी अमेय आणि नयन दोघांना आत बोलावले . दोघांचे सगळे रिपोर्ट त्यांनी पाहिले . डॉक्टर काय सांगणार याचा प्रचंड ताण दोघांनाही आला होता .
" तुम्ही दोघे आधी रिलॅक्स व्हा . दोघांचेही रिपोर्ट अगदी नॉर्मल आहेत . आपल्याला फक्त काही ट्रीटमेंट फॉलो करायच्या आहेत . मानसिक ताण न घेता दाम्पत्य जीवनाचा आनंद घ्या ."
डॉक्टर गाडगीळ अगदी शांत स्वरात समजावत होत्या . त्यांनी काही औषधे दोघांना दिली आणि पुढील भेटीसाठी येण्याची तारीख सांगितली .
आता नयन रोज शाळेतील मुलांना उत्साहाने शिकवत होती . अंगणात बागेत रमत होती . तिचे नैराश्य पळून गेलेले पाहून अमेयदेखील अगदी आनंदी होता .
एक दिवस सकाळी उठल्यावर नयन नेहमीप्रमाणे डबे करायला गेली . फोडणी टाकली आणि अचानक तिला उमदळले . पळत जाऊन बेसिनकडे गेली पण उलटी झाली नाही .
त्यानंतर दिवसभर तिला अस्वस्थ जाणवत होते . घरी आल्यावर आईने मस्त थालीपीठ केले होते . नयनने घास तोडला आणि तोंडाजवळ घेताच तिला पुन्हा उमदळून आले .
" आई सकाळपासून असेच होत आहे . उलटी आल्यासारखे वाटते पण होत नाही ." नयन तक्रार करत होती .
आईने तिला हळूच कानात काहीतरी सांगितले .
" आई उगीच खोटी आशा नको ना ! "
नयन नाराज झाली .
नयन नाराज झाली .
पण आई आणि सासूबाई दोघींनी गर्भ चाचणी कीट आणले .
नयन आत गेली आणि थोड्या वेळाने नयन बाहेर आली . तोपर्यंत ऑफिस वरून आलेला अमेय दारातच होता . नयनने कीट आईच्या हातात दिले .
दोन लाल रेषा पाहून आई पटकन म्हणाली," आजीबाई आणि आजोबा चला देवापुढे साखर ठेवा ."
नयन लाजली आणि बाहेर पळत निघाली ती नेमकी अमेयला धडकली .
नयन लाजली आणि बाहेर पळत निघाली ती नेमकी अमेयला धडकली .
दोघे अंगणात आले . समोरच्या पारिजातकावर चिमुकल्या कळ्या डोकावत होत्या . सुखाचा पारिजात फुलला होता आणि त्यात सगळे कुटुंब रंगून गेले होते .
निराशा कोणत्याही साध्या प्रसंगातून माणसाचे जीवन व्यापून टाकू शकते . अशा वेळी कुटुंब सोबत असेल तर सुखाचा पारिजात पुन्हा नक्कीच फुलतो .
©® प्रशांत कुंजीर .
अष्टपैलू 2025 स्पर्धा .
अष्टपैलू 2025 स्पर्धा .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा