अनघाचे नवीन कॉलेजमध्ये झोकात स्वागत झालं . सगळे कलिग्स खूप छान होते . तिच्या गोड , लाघवी स्वभावामुळे आणि हुशारीमुळे तिने लवकरच सगळ्यांची मने जिंकली . घरी राधा होतीच त्यामुळे परीची काळजी नव्हती . जवळच एक छान शाळा होती . तिथे परीच एडमिशन झालं . हळूहळू तिलाही नवीन शाळा , नवीन मित्र - मैत्रिणी आवडू लागले होते . सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला आधार द्यायला तिचा भक्कम आधारस्तंभ म्हणजे तिचे बाबा सोबत होते . आजोबा आणि नातीची मस्त गट्टी जमली होती .
विनयला ती सारखी इकडे ये म्हणत होती . पण तो सारखं दुकान दुकान करत होता . पप्पांशी ती कधीकधी फोनवर बोलायची पण मम्मी मात्र तिच्याशी एकदाही बोलल्या नव्हत्या . तिनेही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नव्हता .
दोन महिन्यांनी विनय अनघा आणि परीला भेटायला आला पण दोनच दिवसात परत गेला. त्याची तब्येत थोडीशी खालावलेली वाटली . आणि एक रुक्ष , कोरडेपणा त्याच्या वागण्यात जाणवत होता .
बाबांनीसुध्दा विनयला लवकर इकडे या म्हणून विनवले .
" जावईबापू , अहो दोन महिन्यांच्यावर होऊन गेले . आता या इकडे लवकर .पोरीला बापाच्या मायेची गरज असते . कोणाचेही वडील पाहिले की परी तुमच्याबद्दल विचारते . आणि मलाही इकडे असं कितीस राहता येणार आहे ? जावं लागेल मला लवकरच . तुमचं बस्तान हलवा आता पटकन . "
विनय म्हणाला " बाबा तुमचं खरं आहे . पण इतक्या लगेच मला नाही येता येणार . तिकडचे व्याप खूप आहेत . जवाबदारी आहे .शिवाय मी एकुलता एक मुलगा . मम्मी पप्पांचा विचार करावा लागेल ना . "

" हा डिसिजन आपण दोघांनी मिळून घेतला होता ना मग आता हे काय नवीन ? परीला तुझी गरज आहे हे विसरतो आहेस तू . मम्मी पप्पाची जवाबदारी सोडायला मी आजिबात सांगत नाहीये . आणि त्यांच्यामुळेच आपण हा निर्णय घेतला आहे ना . तिथे त्यांचं सगळं छान आहे . घरात कामाला माणसे आहेत . अधून मधून जाऊ शकतोच ना आपण .
मी इथे यावं अशी तुझीच इच्छा होती ना मग आता असं का वागतोयस ? तब्येत सुद्धा किती खराब झालिये तुझी . काळजी घे जरा स्वतःची " अनघा काकुळतीला येऊन म्हणाली .

" तू उगीच इश्यू करते आहेस अनघा , तुला वाटतं तसं खरंच काही नाहीये . मी येईन लवकरच . मलाही काळजी आहेच की तुमची ." विनयने सारवासारव केली .
दिवस सरत होते . अनघा तिच्या अभ्यासात मग्न होती . आता फक्त परी आणि अभ्यास हे एकच ध्येय तिच्यापुढे होते . राधा असल्यामुळे तिला कुठलीच काळजी नव्हती . परी शाळेत गेल्यावर , खेळायला गेल्यावर राधाला कंटाळा येऊ लागला होता . काहीतरी करायचे तिच्या मनात होते .
" राधा अगं दोन बिल्डिंग सोडून फॅशन डिझायनिंगचा क्लास आहे . जातेस का तू ? तुला शिवण कामाची आवड आहे आणि तुला थोडंफार येतही ना ? " अनघाने राधाला विचारले .
राधाला खूप आनंद झाला . अगदी तिच्या मनातलं ओळखलं होतं अनघाने .

राधा क्लासला जाऊ लागली . मन लावून शिकू लागली . परीसाठी तिने सुंदर फ्रॉक शिवला . अनघासाठीही कुर्ता शिवला . आता क्लास संपत आला होता . पण घरी मशीन नव्हतं .
\" काय करावं ? एखादं जुनं मशीन मिळालं तर आपण थोडफार काम करून पैसे मिळवले असते . ताईंना मागावे का पैसे ? \" राधा मनातल्या मनात विचार करत होती .

रविवार होता . अनघा सकाळीच कुठेतरी बाहेर गेली होती . परत आली ते सोबत दोन माणसं काहीतरी मोठ्ठा बॉक्स घेऊन आले . काय आहे याची उत्सुकता राधा आणि परी दोघींनाही होतीच .
" राधा हळदी कुंकू आणि पूजेचं साहित्य आण बरं . " अनघा म्हणाली . राधा समान आणेपर्यंत मायलेकीनीं सरप्राइज उघडलं .
राधा येताच " सरप्राइज" असं ओरडत दोघींनी राधाला जवळ घेतलं . राधा बघतच राहिली . अगदी एडवान्स शिलाईचं मशीन होतं ते . राधाच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते . तिने हात जोडले .
" ताई अहो हे काय केलंत . माझ्यासारखीला तुम्ही इतकं प्रेम दिलंत तेच खूप आहे . आता तुमचे उपकार कसे फेडू मी " राधाच्या डोळ्यात पाणी आलं .
" अग वेडे उपकार तर तू केलेस माझ्यावर . माझ्या परीला सांभाळलंस , माझ्या घराला सांभाळतेस इतकंच काय मलाही सांभाळतेस . चल आता पूजा कर आणि हा बघ बोर्ड \" राधास क्रिएशन \" कसं आहे नाव ? आता पटापट ऑर्डर घे . परी आता मोठी झालिये . आणि हे घे ( असं म्हणून अनघाने तिच्या हातात एक सुंदरसे ड्रेस मटेरिअल ठेवले . सोबत राधाचा मापाचा ड्रेस होता ) तुझी पहिली ऑर्डर . आमच्या राधासाठी मस्त ड्रेस शिवायचा बरं का . " अनघा म्हणाली आणि राधाने भावनाविवश होऊन अनघाला मिठी मारली .

" नाही ताई मी पहिला ड्रेस तुम्हालाच शिवणार ." राधा म्हणाली
" आणि मलाही छान ड्रेस शिवणार ना मावशी " परी म्हणाली आणि राधाला बिलगली .
अनघाच्या मैत्रिणी आणि ओळखीचे याच्याकडून राधाला शिवणाच्या ऑर्डर्स मिळू लागल्या. ती खूप खुश होती . शेवटी तिला तिचा आनंद सापडला होता .
बाबांना काम असल्यामुळे परत जावं लागलं होतं . मग काहि दिवस आई अनघासोबत राहिली तर कहिदिवस अंजू . दिवस चालले होते पण विनयच बस्तान हलवण्याच काही चिन्ह दिसत नव्हतं . अधूनमधून येऊन दोन तीन दिवस राहून तो जात होता . अनघा खूप दुखावली गेली होती . आई बाबांनाही खूप काळजी वाटत होती .

काय करावं काहीच कळत नव्हतं . आपली इतकी चांगली हुशार लेक पण कसल्या लोकांच्या हाती सोपवली आपण याचं राहून राहून त्यांना वाईट वाटत होतं . इतके दिवस अनघाने त्यांना काहीच कळू दिलं नव्हतं पण आता सगळी परिस्थीती समजल्यावर ते खूपच हळवे झाले होते .या वयात पोरीला मिळणारं दुःख त्यांच्याचानी बघवत नव्हतं .
शेजारच्या फ्लॅटमध्ये रमेश राहायचा . राधाला तो मनातून आवडू लागल्याचे राधाच्या नजरेतून सुटले नव्हते . रमेश अनाथ होता . त्याच्या मावशी बरोबर तो राहत होता . मनाने खूप चांगला आणि प्रेमळ असा रमेश कोणालाही आवडेल असा होता . खाऊन पिऊन सुखी होता . राधा आनंदात राहील अशी खात्री पटली आणि अनघाने पुढाकार घेऊन राधा - रमेशच लग्न लावून दिलं.राधा शेजारीच राहत असल्यामुळे परीचा प्रश्न नव्हता .कितीतरी वर्षांनी राधाच्या चेहेऱ्यावर समाधान दिसत होतं .
अंजुचेही लग्न मनोजशी झालं . दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं . मुलगा महितीतला होता तरी यावेळी मात्र आई बाबांनी आणि अनघाने मुलाची कसून चौकशी केली होती . अनघा आणि परी पंधरा दिवस राहून मस्तपैकी लग्न एन्जॉय करून आल्या होत्या . कितीतरी दिवसांनी दोघीही अगदी खुश होत्या .
विनयला अनघा आणि परिसोबत राहण्याची खूप इच्छा होती . तसं प्लॅनिंग सुद्धा त्याने केलं होतं . पण मम्मीच्या डोक्यात मात्र वेगळ्याच हालचाली सुरू होत्या . त्यांनी मुद्दाम आजारी पडण्याचे नाटक केले .
" अरे देवा उचल मला आता . कोणी नाही माझं करायला . एकुलता एक मुलगा पण तो सुद्धा आई बापाला वाऱ्यावर टाकून बायकोकडे निघालाय . "
मम्मी रोज काही ना काही नाटकं करून विनयला मानसिक बोचणी देऊ लागल्या . त्याच्या तब्येतीवर याचा परिणाम होऊ लागला. अधून मधून पोटही दुखायला लागलं होतं .
\" इकडे आड तिकडे विहीर \" अशी विनयची अवस्था झाली होती . पण अनघा त्याला नेहमीच \" आई बाबांची काळजी घे , त्यांना त्रास होईल असं वागू नकोस .\" असच सांगायची . विनयच इन्कम खूपच कमी झालं होतं . अनघाची मात्र चांगली प्रगती होत होती . सारखे पैसे पाठवायची ती विनयला .

परीलाही बाबांची खूप कमतरता जाणवू लागली होती . अनेकदा ती रडायची , \" माझे ड्याडू आपल्यासोबत का नाहीत ? मी खूप अनलकी आहे . \" असं ती सारखं म्हणायची . अनघाला आता तिची काळजी लागून राहिली होती . तिला एक कल्पना सुचली .
अनघा कधीकधी अनाथ आश्रमात जायची . तिथल्या मुलांना काही वस्तू भेट द्यायची . ती परीला आपल्या सोबत तिकडे घेऊन गेली .त्या मुलांना बघून परीला खूप वाईट वाटलं .
" बघ परी या मुलांना ना आई , ना बाबा तरी बघ किती आनंदी आहेत . त्यांच्याकडे घरही नाही आणि हवा तो खाऊसुद्धा घेऊ शकत नाहीत ते . तरीपण बघ किती छान राहतात . आणि तू स्वतःला अनलकी समजतेस ? " अनघाचं बोलणं आणि त्या मुलांची परिस्थिती बघून परीला स्वतःची लाज वाटली.

" सॉरी मम्मा . माझं खूप चुकलं . मी खरंच खूप लकी आहे . आता मी कधीच असं नाही म्हणणार . आणि मी या मुलांना माझे खाऊचे पैसे देऊ का ? तू त्यांच्यासाठी खाऊ आण .पण तितके पैसे कमी पडतील ना ? तू माझ्या बर्थडेला सुद्धा यांना बोलावं पार्टीला आणि मी माझ्या फ्रेंड्सना सुद्धा सांगेन मदत करायला ." छोट्याश्या परीच बोलणं ऐकून अनघा मनोमन आनंदली .
परीच्या शाळेत कार्यक्रम होता . परीने एक छोटेसे नाटूकले केले आणि त्यातून अनाथ मुलांना मदत करा असा संदेश दिला. जमलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले . सगळ्यांनीच आपापल्या परीने मदत करायची तयारी दाखवली . परीला स्टेजवर बोलावण्यात आले . सगळ्यांनी मिळून परीचे अभिनंदन केले आणि अनघाचेही खूप कौतुक केले . अनघाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले .

अनघाच्या ओळखीने दुकानासाठी एक चांगली जागा मिळत होती . तिने लगेच विनयला फोन करून बोलावून घेतले .
विनय औषधं घ्यायचे नेहेमी विसरायचा . मम्मीने त्याचा फायदा घेतला . त्याला औषधे दिलीच नाहीत आणि विनयची तब्येत खूप बिघडली . अनघा पटकन आली . डॉक्टरच्या सल्याने आणि अनघाच्या देखभालीने विनय लवकर बरा झाला . हे सगळं मम्मीच्या पथ्यावरच पडलं . थोडे दिवस थांबून अनघा परत गेली .

ती मनातून खचत चालली होती . पण जिद्दीने तिने तिचा अभ्यास सुरू ठेवला होता . आता शिक्षण पूर्ण करून एक चांगली नोकरी करून परीच भविष्य सुखकर करणे हेच तिचं ध्येय होतं . आणि त्यासाठी ती अहोरात्र परिश्रम करत होती .
दिवस चालले होते अनघा मनातून झुरत होती . आई बाबांना त्रास होऊ नये म्हणून वरवर आनंदी असल्याचं दाखवत होती . आई बाबांना अनघाची अवस्था बघवत नव्हती . तिने वरवर दाखवलं तरीही तिच्या मनात किती वादळ आहे हे ते जाणून होते . तिची पी.एच.डी.पूर्ण व्हायला थोडेच दिवस बाकी होते ते झालं की अनघाला आपल्या घरी घेऊन जायचं आणि मग ठोस निर्णय घ्यायचा अस त्यांनी पक्क ठरवलं होतं.आपल्या पोरीची होणारी वाताहत आता त्यांना बघवत नव्हती .

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा