आणि पांडुरंग हसला
"माऊ उठ लवकर, माझे झाले आवरून. नव्या! चला उठा उठा, निघायचं आहे आपल्याला लवकर."
दोघी मुलींना झोपेतून उठवत मी माझेही आवरत होते.
"आई काय ग इतक्या पहाटे पहाटे उठवतीये, थांब ना अजून थोडा वेळ झोपू दे."
असे म्हणून माऊ पुन्हा अंगावर घेऊन झोपली.
"माऊ आपल्याला लवकर जायचं आहे आणि तिकडे खूप वेळ लागतो."
मी दोघींना पुन्हा उठवत बोलले. तशी नव्या लगेच उठून बाथरूममध्ये गेली आणि आवरून बाहेर सुद्धा आली, तरी माऊ अजून बेडवर लोळत फोन बघत होती.
"आई, मी हा ड्रेस घालायचा आहे ना!"
नव्या मला विचारत ड्रेस हातात घेऊन जवळ आली.
नव्या मला विचारत ड्रेस हातात घेऊन जवळ आली.
"हो, हा छान दिसतो तुला आणि आपल्याला मंदिरात जायचं आहे तर तुमचे ते जीन्स पँट आणि टीशर्ट नका घालू. जरा चांगले कपडे घाला."
असे म्हणून मी पुन्हा दोघींना सुनावले.
असे म्हणून मी पुन्हा दोघींना सुनावले.
"हो आई, तू म्हणशील तेच घालू. बास!"
असे म्हणत माऊ बेडवरून आळस देत उठली आणि आवरू लागली.
असे म्हणत माऊ बेडवरून आळस देत उठली आणि आवरू लागली.
छानशी काठापदराची गुलाबी साडी आणि त्यावर मोत्याचे दागिने घालून मी तयार झाले. दोघी मुलींना पण छान आवरून खाली घेऊन आले. पाण्याच्या बाटल्या भरल्या आणि त्यासोबतच वरचेवर खायला पण थोडाफार खाऊ पिशवीत भरला.
इतक्या सकाळी कोणाला काही खावेसे वाटणार नाही म्हणून नाश्ता केला नाही. नुसता चहा घेऊन आम्ही गाडीत जाऊन बसलो. आम्ही दोघे नवरा बायको आणि आमच्या दोन्ही मुली, सोबत सासू सासरेही... असे आम्ही सगळे जण पांडुरंगाच्या दर्शनाला निघालो होतो.
पहाटेच साडे पाच वाजता निघालो; त्यामुळे बाहेर थोडा अंधार वाटतं होता. घराच्या समोरच असलेल्या जास्वंदीच्या झाडाला दोन फुलं नुकतेच उमलेले दिसत होते. त्यातले एक फुल तोडून गाडीतल्या गणपती जवळ ठेवले. अर्धा एक तासाने उजाडेल म्हणून आम्ही देवाचं नाव घेऊन प्रवासाला निघालो. गाडीत बसल्यावर पांडुरंगाचे छान भजन चालू केले. वातावरण एकदम भक्तिमय करून टाकले.
चार वर्षांपूर्वी पंढरपूरला गेलो होतो, तेव्हा खूप गर्दी होती; म्हणून बाहेरूनच मंदिराचे दर्शन घेऊन घरी परतावे लागले. आता ह्यावेळी तरी चांगले दर्शन होईल, असे म्हणून घरातून पहाटे लवकरच निघालो. पोहोचल्यावर बघतो तर काय? मंदीरात खूप गर्दी, चार पाच तास लागतील दर्शनाला आणि पास पण मिळणारं नाही असे सांगितल्या गेले. मनातून तर खूप वाटतं होते की पटकन् जाऊन रांगेत उभ राहावे, पण इतक्या वेळ थांबायला कोणी तयार नव्हते; त्यामुळे फक्त मुखदर्शन घेता येईल असे म्हणून मुखदर्शनाच्या रांगेत उभे राहिलो. त्यातही खूप गर्दी आणि लोकांची धक्काबुक्की सुरू होती. मनात मात्र पांडुरंगाला विनवणी सुरू होती, आता तरी दर्शन दे पांडुरंगा!
"चला माऊली, हळूहळू पुढे चला." मागून लोकं एकमेकांना सांगत होते आणि लोटत पुढे जात होते. ह्यावेळी पण दर्शन होईल की नाही शंकाच वाटतं होती. लांबून किमान पांडुरंगाचा चेहरा तरी दिसावा अशी खूप ईच्छा होती. गेल्या वेळी मुखदर्शन पण झाले नव्हते किमान ह्यावेळी ते तरी होईल म्हणून पायांच्या टाचा वर करून बघत होते, पण गर्दीमुळे माझा पांडूरंग काही दिसत नव्हता. फक्त वरचा पिवळा टोप तेव्हढा दिसत होता.
साधारण एंशी पंच्याइंशी वयाचे, पांढरा शुभ्र सदरा आणि धोतर नसलेले बाबा आतल्या रांगेतून समोर येताना दिसले. मी आपोआप त्यांच्या समोर जाऊन उभी राहिले आणि त्यांना म्हणाले," बाबा तुम्ही आतमध्ये जवळून दर्शनाला जाताय तर ही तुळशी माळा आणि हार घेऊन जाल का?" त्यांनी लगेच हात पुढे केला आणि मी त्यांच्या हातात माझ्या जवळचे ते हार फुले सगळे देऊन टाकले. आपोआप त्यांच्यासमोर हात जोडल्या गेले आणि त्यांनी हसून माझ्या डोक्यावर हात ठेवत सुखी रहा म्हणून आशीर्वाद दिला. अंगावर एकदम शहारे आले. त्या बाबांच्या रुपात मला माझा पांडुरंग हसताना दिसला.
©®तृप्ती कोष्टी
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा