आणि तिची दिवाळी साजरी झाली...
"सत्या दिवाळी जवळ येत आहे, पैशाची जुळवा जुळव कर थोडी. माझ्या पैशाने सगळं भागणार नाही आहे. परीला पण नवीन कापडं घ्यायची आहेत. नुसता दिवसभर लोळत पडलेला असतोस. काहीतरी कामधंदा केला असतास तर हाताशी दोन पैसे आले असते पण नाही तुला दिवसभर हुंदळायचं असतं." गंगूची काम करता करता बळबळ सुरू होती.
"ये गंगे तुझी बळबळ बंद कर, जास्त जीभ चालवायची नाही, अति होतंय तुझं सगळं."
गंगू काही न बोलता निघून गेली.
गंगू आणि सत्याचं पाच वर्षांपूर्वी लग्न झालेलं, सत्या गाडी चालवायचा, घराची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे गंगू आणि सत्या दोघांनी शहरात येऊन काम करण्याचं ठरवलं.
शहरात आले, एका ठिकाणी चाळ मध्ये ते राहू लागले. गंगू मोठ्या मोठ्या घरांमध्ये जाऊन धुणं भांडी आणि इतर काम करायची. सत्या गाडी चालवायचा, गंगूला बऱ्यापैकी कामे मिळालेली होती त्यामुळे पैसेही तसेच बऱ्यापैकी मिळायला लागले.
दोन वर्षानंतर त्यांच्या आयुष्यात परी आली. परी लहान असल्यामुळे गंगू कमी घरचे कामे करू लागली. तिला आता मुलीकडे वेळ द्यावा लागत असायचा. सत्या पण कामात टाळाटाळ करायला लागला. कधी जायचा कधी नाही जायचा. कधी कधी दिवसभर बाहेर फिरत बसायचा, हुंदळायचा.
गंगूने कितीही सांगितल तरी तो ऐकायचा नाही. सतत पैसे उधळायचा. आता तर त्याला दारूचे व्यसन लागलेलं होतं. दारू पिऊन पडून राहणे एवढेच काम सुरू असायचं. परी हळू मोठी व्हायला लागली, गंगू परीला सोबत घेऊन जाऊन कामे करायची.
एक दिवस तर चक्क सत्याने गंगू वर हात उचलला, तिला मारहाण केली. ती ज्या घरी काम करायची ते मेहता कुटुंब खूप चांगलं होतं, तेथील सीमाताईंना तिच्या शरीरावरचे ओरखडे लक्षात आले, त्यांनी गंगूला विचारलं पण गंगू काही सांगायला तयार नव्हती. खूप फोर्स केल्यानंतर गंगूने सगळं सत्य सांगितलं. सीमाताईंनी पोलिसात तक्रार नोंदवली. दोन दिवस सत्या जेलमध्ये होता. जेलमधून सुटून आल्यानंतरही त्याने बऱ्याचदा गंगूला मारझोड करण्याचा प्रयत्न केला. पण आता गंगूही ताठर बनलेली होती.
दिवस जातं होते, गंगूने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला.
गंगू लहान असतानाच आई तिला सोडून गेली. वडिलांनी दुसरं लग्न केलं. सावत्र आई खूप त्रास द्यायची. तिच्याकडून दिवसभर काम करून घ्यायची, धड जेवायला अन्नही देत नव्हती. बऱ्याच हालअपेष्टा शोषून झाल्यानंतर गंगूने तिथून पळ काढला होता. त्यानंतर ती एका आश्रमात राहू लागली.
आश्रमात राहून ती छोटे-मोठे काम करायची आणि स्वतःचे पैसे स्वतः कमवून, स्वतःचा खर्च भागवू लागली. गंगू स्वभावाने शांत आणि प्रेमळ असल्यामुळे सगळ्यांनी तिला आपलंसं केलं होतं, ती सगळ्यांशी प्रेमाने वागत असे.
सत्याशी लग्न झालं तेव्हा ती खूप आनंदात होती. सत्या आधी खुप चांगला वागायचा हळूहळू त्याच्यात खुप बदल झाले.
गंगूने एका चाळीत दोन खोलीचं घर भाड्याने घेतलं. ती आणि परी दोघीही तिथे राहू लागल्या. परी दिवसभर शाळेत असायची. परी घरी येईपर्यंत गंगू घरी आलेली असायची.
तिला कामाचा उरक भरपूर होता. घरकाम लवकर लवकर करायची. मुख्य म्हणजे आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायची. कधीकुठली तक्रार नसायची.
गंगूने घर सोडलं तेव्हा तिने त्याला कुठे जाते कुठे राहतें काहीच सांगितलं नव्हतं. त्यानेही लक्ष दिलं नव्हतं, दारू पिऊन पडलेला असायचा.
त्याला कधी कष्ट करणं जमलंच नव्हतं,
त्याने कधी स्वत:च काहीतरी करण्याचा प्रयत्न केला नव्हता की कधी पैसे वाचवून बचत केली नव्हती. तिरकस स्वभाव असल्यामुळे सतत त्याचे सगळ्या सोबत भांडण व्हायची.गंगू काही बोलायला गेली की तो तिच्याच अंगावर धावायचा.
त्याने कधी स्वत:च काहीतरी करण्याचा प्रयत्न केला नव्हता की कधी पैसे वाचवून बचत केली नव्हती. तिरकस स्वभाव असल्यामुळे सतत त्याचे सगळ्या सोबत भांडण व्हायची.गंगू काही बोलायला गेली की तो तिच्याच अंगावर धावायचा.
चिडखोर वृत्ती आणि एकाकीपणा यांचे मिश्रण होऊन विचित्र स्वभाव आकाराला आला होता.
कुठून तरी त्याला गंगू कुठे राहते हे कळलं.
दिवाळीचा दिवस उगवला. गंगू आवरून कामाला गेली. तिला कामावरून यायला उशीर झाला, घरी आली बघते तर काय दार उघडं होतं, तिच्या छातीत धस्स झालं विचार करण्याच्या आधीच तिने घरात पाऊल टाकला. बघते तर काय सत्या परीला मांडीवर घेऊन बसलेला होता आणि ती चॉकलेट खात होती. त्याच्याकडून तिने परीला ओढून घेतलं.
"तू इथे का आलायस? इथे आम्हाला त्रास द्यायला आलायस?"
"तुम्ही दोघी इकडे निघून आलात आणि मी एकटा पडलो. गंगू आपल्या घरी चल ग, मी एकटा पडलो, मला तुझी गरज आहे."
"नाही मी तुझ्यासोबत आता येणार नाही."
दोघांमध्ये वादावादी झाली, त्याने तिला मारहाण करून तिच्या कडून पैसे घेतले. गंगू डोक्यावर हात धरून बसली.
'आता कुठून पैसे आणायचे दिवाळी कशी साजरी करायची?'
"गंगू अशी का बसलीस?"
"गंगू अशी का बसलीस?"
"मॅडम तुम्ही इथे?"
"मग माझ्या घरची दिवाळी छान व्हावी म्हणून किती तळमळ करतेस, तुझीही दिवाळी साजरी नको व्हायला. हे घे तुला साडी, परीला ड्रेस आणि फराळ."
गंगूचे डोळे पाणावले,
ती तयार झाली, चहूकडे दिवे लावले.
"ताईसाहेब आज तुमच्यामुळे आमची दिवाळी साजरी झाली."
ती ताईसाहेब समोर नतमस्तक झाली.
समाप्त: