चॅम्पियन ट्रॉफी 2025
जलद कथालेखन स्पर्धा
जलद कथालेखन स्पर्धा
शीर्षक आणि तिने लढाई जिंकली - भाग दोन
आणि तिने लढाई जिंकली - भाग दोन
मागील भागात आपण पाहिलं कि, अस्मिताच्या मानेवर डाग दिसल्यामुळे तिला सासरहून हाकलून लावतात. आता पाहूया पुढे;
दारातून बाहेर पडलेल्या तिच्या पावलांनी आपोआप माहेर गाठलं. चेहऱ्यावर अपमानाचे ओरखडे होते, डोळ्यात अश्रू आणि मनांत न संपणारी वेदना. दार उघडलं गेलं तेव्हा आई घाईघाईने धावत आली.
“कायं झालं गं, अचानक कसं कायं येणं केलसं? अशी कायं अवस्था झाली आणि जावईबापू कुठे आहेत? "
ती आईच्या कुशीत शिरली आणि हुंदके देत सारं काही तिने सांगितलं. आईने केसावरून हात फिरवला, पण त्यांच्या नजरेतही काळजी आणि निराशा होती.
“मुलीला लग्नानंतर असं परत यायला लागलं म्हणजे लोक कायं म्हणतील?”, आईचा हलकासा पुटपुटलेला प्रश्न तिला आणखी आतून तोडून गेला. आईवडील मनातून खिन्न झाले होते, पण तरी त्यांनी तिला घरात घेतलं.
“जग काहीही बोलो, तू आमची मुलगी आहेस... आम्ही बघू तुला.” असं आईने म्हणतं तिच्या हातातून पिशवी घेतली.
दिवस पुढे सरकत होते. मात्र तिच्या चेहऱ्यावर सतत थकवा आणि डोळ्यांत न संपणारी काळजी दिसत होती. कधी ती मोकळी बसायची, तर कधी काम करताना विचारांच्या गर्तेत हरवून जायची.
एका संध्याकाळी मात्र सगळं अचानक घडलं. तस काही दिवसापासूनच तिला अंगात अशक्तपणा, सततची मळमळ, काहीच खावंसं न वाटत नव्हतं. त्या दिवशी ती अंगणात उभी असताना तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला.
“आईऽऽ…” एवढं म्हणत ती थरथरत खाली कोसळली.
घरात गोंधळ उडाला. आई घाबरून ओरडली,
“लवकर पाणी आणा, तिला शुद्धीवर आणा!”
वडीलही हतबल झाले. शेवटी सगळ्यांनी तिला घाईघाईने जवळच्या डॉक्टरांकडे नेलं.
वडीलही हतबल झाले. शेवटी सगळ्यांनी तिला घाईघाईने जवळच्या डॉक्टरांकडे नेलं.
डॉक्टरांनी तपासणी सुरू केली. खोलीत सगळे थांबले होते. आई, वडील, वहिनी, भाऊ, बहिण. काही मिनिटांनी डॉक्टर बाहेर आले.
“घाबरायचं कारण नाही. ही गरोदर आहे.”
गरोदर असल्याची बातमी कळताच तिच्या मनात जरी आशेचा किरण उमलला होता, तरी माहेरात वेगळाच गोंधळ माजला होता.आईच्या व बाबांच्या चेहऱ्यावर काळजीचं सावट पसरलं होत.
गरोदर असल्याची बातमी कळताच तिच्या मनात जरी आशेचा किरण उमलला होता, तरी माहेरात वेगळाच गोंधळ माजला होता.आईच्या व बाबांच्या चेहऱ्यावर काळजीचं सावट पसरलं होत.
“बाळ होणार म्हणजे आनंदाची गोष्ट आहे, पण… आता हिचं आणि बाळाचं काय होणार? परत सासरी पाठवलं तर तिला स्वीकारतील का?”
आई म्हणाली तसं अस्मिताच्या वडिलांनी खोल श्वास घेतला. त्यांच्या मनात काहूर माजल होत.
“लग्न झालेल्या मुलीला परत माहेरी ठेवायचं म्हणजे समाज वेगवेगळ्या प्रश्नांनी छळेल. आणि आता बाळ झालं तर जबाबदारी किती वाढेल याचा विचार करा. त्यात खरंच पण वाढेल, कामावणारा एक आणि खाणारी तोंडे मात्र वाढतच चालली आहेत.”
मोठी बहीण गप्प होती, पण तिच्या नजरेत माया होती. मात्र वहिनीने मात्र टोमणे मारायचं सोडलं नाही.
तिच्या मनातला जखमांचा डोंगर अजून वाढत गेला पण तरीही ती स्वतःला सावरत राहिली.
तिच्या मनातला जखमांचा डोंगर अजून वाढत गेला पण तरीही ती स्वतःला सावरत राहिली.
अस्मिता आता काय करेल???
क्रमश :-
@हर्षला "सान्वी"
@हर्षला "सान्वी"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा