Login

अनिका 17

Anika and her work appreciated ..her journey conitunes .

https://www.irablogging.com/blog/anika16_5930

पार्ट 1१६साठी वर क्लिक कर ..

काही अर्थ आहे का ह्याला ?"-अनु डेस्क वर फाइल आपटत बोलली ...

"हेय  chill ...काय झाले ?'  पाणी पी.... हे घे ...-रेवा  ने तिला बॉटल दिली .अनु ने ती गटागटा घश्याखाली उतरवली ...

"  तुझा बॉस ..डोक्यात जातो कधी कधी ....फक्त रागावणे माहित आहे त्याला .मला एक कळत नाही ह्याला मीच सापडते का ?"-अनु अजूनही वैतागली होती ..तिची अन केदारची वादावादी झालेली दिसत होती ...

"हो का ..आमचा बॉस मग तुझा कोण ?"-रेवा हसतच 

"प्लिज मी मस्करीच्या मूड मध्ये नाहीये ..."-अनु 

"ओके ,ok ....chill कर अन कामावर फोकस कर .तसही लक्षात आहे न पंडित सर येणार आहे आज ...."-रेवा तिला समजावत होती ..तेवढ्यात तिचा फोन वाजतो आणि ती फोनवर बोलता बोलता बाहेर जाते ...अनु लॅपटॉप उघडून कामाला सुरवात करते पण तीच चित्त थाऱ्यावर नसत .....तिकडे केदार हि विचार करत असतो ...त्याचा हि मूड खराब असतो ....

अनु काम करत असताना ती डेस्कवर कोणीतरी येऊ तिला विचारतो ,

"excuse me ,तुमची तब्बेत ठीक नाहीये का ?"-एक ४५   ते ५० वयोगटातील माणूस  तिला विचारता होता. 

अनु च्या चेहऱयावर वैतागलेले भाव स्पष्ट दिसत होते ....तिने त्यांच्याकडे पहिले आणि 'तुला काय करायचं असं विचारणार तेवढ्यत तिने  त्यांचं वय आणि चेहरा बघता आपलं प्रश्न गिळून टाकला आणि फक्त "मी ठीक आहे ..काही झालेलं नाही"एवढाच ती बोलली ..ते कोण आहेत एवढा विचरण्याच भानही तिला नव्हतं .....

"ओह अच्छा ..मिस इथे मिस्टर केदार कुठे भेटतील ते सांगू शकता का ?"-ती व्यक्ती ..परत केदारच नाव ..तिच्या डोक्यात परत सनक गेली आणि तिने रागानेच त्या व्यक्ती कडे पाहिलं ...तिच्या डोळ्यात राग दिसत होता ...ती फक्त त्या व्यक्ती कडे पाहत होती ...तिच्या मानत तर आलेलं कि सांगावं "त्या तिरसट आणि आकडू माणसाबाद्ल मला विचारू नका. मला माहित नाही .....मला त्याच नावही ऐकायचं नाही पण हे सगळं ती मनातच बोलत होती ..तेव्हड्यात त्या व्यक्ती ने एक चुटकी वाजवली आणि परत म्हणाला ,

"मिस are you ok?"-ती व्यक्ती ..अनु  काही बोलणार तेवढ्यात ओमी तिथे आला आणि त्याने त्या व्यक्तीला पाहिलं ..

"ओह हॅलो सर ,केव्हा आलात ?तुम्हाला बघून खूप छान वाटले ....कसे आहात?"-ओमी 

"हाय ,मी मजेत तुम्ही  सगळे कसे आहात? ... अरे मी केदार ची केबिन शोधत आहे, मी ह्या मिस ना पण तेच विचारात होतो पण ..anyway .."-ती व्यक्ती 

ओमी त्यांचं बोलणं मध्येच तोडत ..."हा ते सर आता वरती बसतात ..त्यांच्या केबिनच्  काम सुरु होत आणि तसही मोनिका मॅम आणि बोस सरानी त्यांना सांगितलेलं ..चला मी दाखवतो .."-ओमी त्यानं घेऊन वर जायला निघतो ते परत मग वळून 

"मिस .तुम्हाला त्रास दिल्याबद्द सॉरी .. ....by the way मी आशुतोष पंडित ...भेटूया संध्याकाळी .."- चेहऱ्यावर हलकीशी smile देत पंडित सर  ओमी सोबत निघून गेले ..

जे पंडित सर भारताबाहेर होते आणि जे आज ऑफिसला येणार असल्याचं केदारने सकाळी सांगितलं होत तेच हे पंडित सर ....अनु शॉक मध्येच परत चेअर वर बसली ..

"आज चा दिवसचं खराब आहे ,पहिले तो केदार आणि आता हे ..काय विचार करत असतील ते ? किती वेंधळेपणा आहे हा माझा ..शी ....सगळं ..सगळं त्या खडूस मुळे ....काय यार ?"-अनु स्वतःशीच विच करत होती आणि त्याच विचारात तिने पेन पटकला...अन डोक्याला हात लावून बसली .. 

"हेय ,हेय ,तुझं सुरूच आहे का अजून ?'-रेवा बाजूला बसत बोलली .."अनु ठीक आहे यार ,होत असं कधी कधी ..फक्त कामावर फोकस कर ...."-रेवा 

"हेय गर्ल्स  ,आज पार्टी आहे .."-ओमी 

"काय ? कशासाठी ?आणि तुला कस कळलं ?'-रेवा 

'अरे मी आता पंडित सरांना केदार सरांच्या केबिन मध्ये सोडून आलो ....बाहेर आलो तर हे कानावर पडलं .."-ओमी 

"वाह मस्तच ...सर कधी आले .."-रेवा 

"अग थोड्यावेळापूर्वी ....  "-अन 

"तुला भेटले का? तू ओळखलस ?"-रेवा .

"नाही म्हणजे मी नाही ओळखलं ..मी तर फक्त घोळ घातलाय .."-अनु 

" काय?काय केलास तू ?"-रेवा आश्चर्याने .....अनिका ने सगळं सांगितलं ....

"अनु यार काय हे ?तू खूप हुशार आहेस ..कामात प्रवीण आहेस ..तू कामावर फोकस कर ..आजकाल तू दुसऱ्याच विचारात असतेस ....."-तेवढ बोलून रेवा तीच काम करायला सुरवात करते ..अनुला सुद्धा तीच म्हणणं पटत ....

"केदार my boy ..मस्त ..आमच्या गैरहजेरीत एकदम मस्त सांभाळाल सगळं.."-आशुतोष सर 

"ते तर माझं कामच होत ..सर "-केदार हसतच त्यांच्याशी बोलत होता ....मोनिका पण तिथं होती ..

"सर ,केदार  ने खरंच खूप मेहनत घेतली आहे ...मागच्या २,३ महिन्यात आपल्या चॅनेलच रेटिंग चांगलंच वाढलय .."-मोनिका 

"गुड व्हेरी गुड ..nice वर्क केदार .."-पंडित सर 

"सर हे फक्त माझाच काम नाहीये ,ह्यात पूर्ण टीम चा सहभाग आहे ..काही नवीन लोक सुद्धा जॉईन झालेत ..त्यांनीही छान काम केलाय .."-केदार नम्र पाने बोलत होता 

"हम्म .अरे हो त्यावरून आठवलं खाली मी एका मुलीला भेटलो ....मी तिला काही विचारत होतो पण ती जरा वेगळ्याच विश्वात असल्यासारखी भासत होती ..नवीन जॉईंनी आहे का ?"-पंडित सर अनु बदल बोलत होते ..

"हो ते ..."-केदार काही बोलणार तेवढ्यात मोनिका मध्येच बोलते ....

"सर ,तुमची ट्रिप कशी झाली ..? ह्यावेळेस बऱ्याच दिवस इथे नव्हता .."-मोनिका ..केदार ने एक क्षण तिच्याकडे बघितले आणि मग नजर दुसरीकडे फिरवली ....

बराच वेळ त्यांचं बोलणं सुरु होत आणि मग तिघेही खाली आले सगळ्यांच्या समोर... एकदम मध्ये उभे राहिले ...सगळेच स्टाफ त्यांना बघून उभा राहिला आणि केदार बोलू लागला ,

"हॅलो ऑल ...आज बऱ्याच महिन्यानंतर आपले लाडके आशुतोष सर परत ऑफिस मध्ये आले आहे .....आपली मागच्या काही महिन्यातील प्रगती  बघता त्यांना खूपच आनंद झाला आहे.त्यासाठी तुमच्या सर्वांचे अभिनंदन ....तुमच्यापैकी बरेच जण ह्यांना ओळखत नसतील (केदार अनु कडे बघत बोलतो )पण आता तुमची चांगलीच ओळख होईल कारण सर उद्यापासून ऑफिस जॉईन करत आहेत .."-केदार असं बोलत असताना सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या ..मध्येच पंडित सर बोलू लागले ...

"आणि आज त्याचमुळे संध्याकाळी आपण पार्टी करणार आहोत ..नाही म्हणजे उद्यापासून ऑफिस जॉईन करायचं आहे न ..तर मग आधी मज्जा आणि मग काम .."-आशुतोष सर .हसतच म्हणाले .आणि एकच जल्लोष सुरु झाला ....

सगळे आनंदात होते ....ते तिघेही परत कामाला निघून गेले ..पंडित सरांना केदार आणि मोनिका ने पूर्ण ऑफिस दाखवलं ..बरेच बदल त्या ऑफिसमध्ये झाले होते ..

"हेय ,अनु चल थोडी शॉपिंग करू ?"-रेवा 

"अग ,काम सोडून कस जायचं ..तसही मला फिल्ड वर जायचं आहे ..सकाळीच ऑर्डर निघाली आहे बाई .."-अनु परत तोंड वाकड करून ...

"अरे यार ..तू पार्टी ला अशी जाणार आहेस का ?"-रेवा 

"अनु स्वतः कडे एकदा बघितलं ..."का  काय झालं ?सगळं तर छान आहे ...."-अनु 

"अरे ,हे बघ तू नवीन जॉईन आहेस .पंडित सर नक्कीच तुझ्याशी पण बोलतील ..पाहिलं impression चांगलं नको का ?...तसा हि आता जो घोळ घातला तो पण कव्हर करता येईल नाही का ....आणि दिवसभर ह्याच कपड्यात  आणि त्याच कपड्यात पार्टी ..कस दिसत ते ...."-रेवा 

"आग बाई घरी जाऊन यायला खूप वेळ लागेल ..."-अनिका 

"तेच तर, म्हणूनच म्हणतेय चल शॉपिंग करू ..तू फील्ड चा काम आटोपून घे ..मी पण आवरते अन तुला भेटते ..मग सोबत जाऊ शॉपिंग ला ..तेवढ्यात ऋचा पण त्यांना जॉईन करते ..

"शॉपिंग वाव ..कोण करताय ..?तुम्ही जाणार का ?मी येणार मग ."-ऋचा .अनु ने हलकीच smile दिली .....ती तिच्या कामात व्यस्त होऊन गेली ..ती बाहेर जाण्यासाठी सगळी बॅग घेऊन तयार झाली आणि निघाली ...काल ज्या ठिकाणी आग लागली होती तिथे जाऊन सगळे माहिती गोळा करून काही फोटोज काढून तिने साहिल ला फोन केला 

"हॅलो ,साहिल ऐक ना ..अरे आजचा प्लॅन रद्द करावा लागेल .."-अनु 

"का ? म्हणजे उगीचच तू म्हणत होतीस न.....आम्हीच वेडे आहोत बरोबर आहे ..विश्वास ठेवतो  तुझ्यावर .."-साहिल हलकेच रागात बोलत होता, इकडे अनु वैतागली होती मध्येच त्याच बोलणं तोडत ती म्हणाली ,

"ये बंद कर रे फालतुगिरी .....हे बघ आज मला एका पार्टी ला जायचं आहे ..ऑफिस ची पार्टी आहे ...त्यामुळे आपला प्लॅन आपण येणाऱ्या रविवारी करू ....आणि हो घरी सांग मी उशिरा येणार ते .."-अनु 

"ओहो म्हणजे मॅडम आमचा मूड स्पॉईल करून स्वतः मज्जा मारणार तर ....चल ठीक है ..माफ किया ,तुम भी क्या याद करोगे ?"-साहिल ने हसतच बोलणं पूर्ण केलं आणि फोन ठेवला ..

अनु ने पण फोन ठेवला आणि रेवा ने सांगितलेल्या मॉल मध्ये गेली तिथे रेवा आणि ऋचा तिचीच वाट बघत होते ...

"काय हे किती उशीर ?चल लवकर .."-ऋचा 

तिघी मिळून शॉपिंग करत होत्या ...रेवा ने तर २ टॉप घेतले ..ऋचा ने नव सॅंडल ,टॉपआणि कानातले घेतले ..अनु ने पण एक टॉप घेतला ...ऑफिस मध्ये लेगिन्स टॉप ,तर कधी कधी जीन्स अँड लॉन्ग कुर्ता घालून ती येत असे ..आज तिने जीन्स घातली होती सो त्याला सूट होईल असा  पायापर्यंत लांब असा एक टॉप घेतला ...

"बाप रे ,भूक लागली यार ..शॉप्प्पिंग करून "-ऋचा 

"हो न ,पण छान झाली नाही शॉपिंग ...चला काहीतरी ऑर्डर करू "-रेवा 

तिघी पण तिथेच एका कॉफे मध्ये बसल्या होत्या ..तिघींनि कॉफी ....आणि  स्नॅक्स ऑर्डर केले ..गप्पा मारत मारत खान पिन हि चालू होत ..

"मी तर खूप excited आहे ...."-ऋचा 

"हं, खूप दिवसांनी ऑफिस मध्ये पार्टी होत आहे ...अनु तुला माहितेय आशुतोष सर तसे खूप चांगले आहेत ..हसत खेळत वातावरण ठेवतात ऑफिस मध्ये ,पण कामाच्या बाबतीत त्यांना हयगय चालत नाही .."-रेवा 

अनु ऐकत होती आणि सहज तिची नजर समोर गेली तर कोफी शॉप बाहेर तोच तरुण तिला परत दिसलं ,ज्याने तिला काल वाचवलं होत ..तिने हात tissue ला पुसले आणि बाहेर येऊन त्याला बघू लागली पण तोपर्यंत तो व्यक्ती गर्दीत गायब झाला ....ती परत आत आली ..

"काय ग ,कुठे गेली होती अचानक ?'-रेवा 

"काही नाही असाच ..मला तिथे कोणीतरी ओळखीचं दिसलं म्हणून .."-अनु 

"ए चला यार निघायला हवं ..आपल्याला उशीर होतोय ..."-ऋचा .तिघीपण तिथेच तयार होऊन पार्टी साठी क्लब वर पोहचल्या ....