आकिंचन धर्म

अपरिग्रहाविषयी

१.रतनशेठ अरबपती व्यावसायिक होते. त्यांनी सचोटीने आणि प्रामाणिकपणे व्यापार करून अब्जावधीची संपत्ती अर्जित केलेली होती.
व्यापार करतानाही त्यांनी सामाजिक आणि आपलं धर्माप्रतीचं कर्तव्य चांगल्याप्रकारे जोपासलेला होतं. वर्षभरामध्ये जे काही गरजेपेक्षा जास्त कमावलेलं असेल, ते सर्व दान-धर्म करण्यामध्ये खर्च करण्याचा त्यांचा दंडक होता.
शाळा ,मंदिर जीर्णोद्धार, हॉस्पिटल ,वृध्दाश्रम ,अनाथ आश्रमांना, ते भरभरून दरवर्षी दान देत असत.
हे सारं करताना ,त्यांनी त्यांची राहणी अगदी साधी ठेवलेली होती.
साधे कपडे ,गरजेपुरतं घर, साधारण असा मोबाईल, त्यांची येण्याजाण्याची गरज पूर्ण करू शकेल अशी साधी
कार.
एकदा एका व्यक्तीने त्यांना विचारलं,
" शेठजी तुमखी कमाई भरपूर आहे, मग एवढ्या साध्या कारमध्ये तुम्ही का बरं फिरता ?एक चांगली महागडी कार घ्या की."
रतनशेठजी त्या माणसाकडे बघून हसले आणि म्हणाले, "तुम्हाला असं वाटतं का ही कार माझी ओळख आहे ."
अर्थातच ती व्यक्ती हो म्हणाली.
रतनशेठ म्हणाले,"माझी जेवढी गरज आहे,तेवढेच मी घेतो,वापरतो.बाकी कशावरही माझा मालकीहक्क नाही,खरेतर सायकल वापरली,तरी माझे काम होत राहिल.ही कारही गरजेपेक्षा जास्तच आहे."
धन्य ती आकिंचन्यजवळ पोहचणारी विचारसरणी.

२.पर्युषण पर्व निमित्त जिनमतीने ,पंधरा दिवस आधीच घराची साफसफाई करायला सुरुवात केली होती.
फेंगशुईचा नियम आणि मिनिमिलियस्टिक जीवनशैली, याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम ,तिच्यावर आणि तिच्या घरच्यांवर या लाॅकडाऊन काळामध्ये झालेला होता.
त्यामुळे यंदाच्या वर्षी पर्युषण पर्व निमित्त ,जी आवराआवर करायची होती ,त्याला वेगळेच महत्त्व होतं.
वर्षानुवर्ष साचलेले कपडे ,काही वस्तू ,आणि निरुपयोगी भांडी ,कधीतरी दुरुस्त करू म्हणून ठेवून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ,या साऱ्यांचं तिने नीट वर्गीकरण केलं.
ज्या वस्तू देण्यासारख्या होत्या, त्या कामवाल्या बायांना, घंटा गाडी वाल्या कर्मचाऱ्यांना, देऊन टाकल्या. काहीच उपयोग होणार नव्हत्या, त्या भंगारमध्ये चक्क विकून टाकल्या .
पुस्तकांमध्येही जे रद्दीत देण्यासारखे होते ते रद्दीत देऊन टाकले, वाचून झालेली धार्मिक पुस्तकं होती ,ती रिसायकलिंग ला देऊन टाकली.
आवरलेलं घर छानच दिसत होतं आणि आता पुढील आयुष्यातही अगदी गरजेचे असेल ,तीच वस्तू ,कपडे, पुस्तके इलेक्ट्रॉनिक वस्तू ,विकत घ्यायच्या .उगाचच मोहात पडून वस्तू वाढवायचा नाही, याचा संकल्प घरातल्या सगळ्यांनी केला.
पर्युषण पर्व सुरू होण्याआधीच तिने तिच्या घरांमध्ये, अकिंचन या धर्माचा अवलंब करण्याचा प्रयत्न सुरु केला.
घरातल्या सदस्यांनी फक्त घरच आवडलं नाही, तर मनही आवरलं ,एकमेकांशी चर्चा करून, काही नातेवाईक, एकमेकांबद्दल ,मनामध्येअसणारी कटुता कमी केली,स्वः जवळ पोहचण्याचा प्रयत्न करायचे सार्‍यांनी ठरवले. मनालाही स्वच्छ केलं आवरलं. मनातला ही कचरा काढून टाकला .सर्वांबद्दल प्रेमभाव आणि क्षमाभाव ठेवण्याचा निश्चय केला.
आकिंचन म्हणजे व्यावहारिक आयुष्यात सामाजिक,शारिरीक,मानसिक,स्तरावर इतरांपासून अलिप्तता, स्वतःला विथड्राॅ करता येणे. मुक्त करता येणे आणि जास्तीत जास्त स्वतःपर्यत,स्वःताच्या आत्मस्वभावाजवळ पोहचण्याचा,प्रयत्न.
या धर्माचे मर्म समजणे खरे तर अवघडच.

भाग्यश्री मुधोळकर

🎭 Series Post

View all