तुरतूमड्याचे पाटील म्हणजे मोठ प्रस्थ होत. म्हणजे कोणे एके काळी नक्कीच होत. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पूर्वजांना त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल १२ गावची पाटीलकी देवू केली होती. पण वर्ष सरत गेली आणि पाटीलकी सुद्धा संपुष्टात आली. जो तो आपल्या मार्गी लागला. ज्यांना राजकारणात गती होती ते राजकारणात घुसले बाकीचे आपापल्या वाटेला आलेल्या जमिनी कसू लागले. पोटापाण्यासाठी भटकत त्यांच्या पिढ्या विखुरल्या गेल्या.
मूळ गावी तूरतुमड्याला प्रस्तुत पिढीचे वारस मात्र टिकून होते. सदानंद तूरतुमडे पाटील उर्फ अण्णा म्हणजे चहा गाळून चोथा राहावं अश्या व्यक्तिमत्त्वाचे.एक सहा फुटी उंची आणि एक फुटी पोटाचा घेर एवढच काय ते वंशपरंपरागत अस त्यांच्या वाटेला आल होत. छत्रपतींच्या सरदाराचा वारसा सांगणारे अण्णा मात्र सश्याच्या काळजाचे होते. कधी कष्टाची काम करायची वेळच आली नाही त्यामुळे दंडावर बेटकुळी येण्याऐवजी वातामुळे पायात असह्य कळा तेव्हढ्या यायच्या. थोडक्यात काय भेंडी सारखं मुळमुळीत व्यक्तिमत्त्व, त्यामुळे घरात फार मान नव्हता.
एकुलता एक मुलगा शेखर रेशनिंगच दुकान चालवायचा. तो फार व्यवहार चतुर होता. फार शिकला नसला तरी धंदा कसा चालवावा ते मात्र त्याला छान अवगत होत. आजूबाजूच्या आदिवासी पाड्यावरच्या ठाकरांना सरकार कडून अनुदानात मिळणारे गॅसचे सिलेंडर १०० रुपयात घेवून गावात तिप्पट किमतीत पुरवायचा की ती ठाकरं पुन्हा चुली आणि आलेला पैसा दारूत फुंकायला मोकळे. रेशनिंगची सगळी कागदपत्रं चोख पुरवायचा एखाद कमी पडलं की बापूंच्या फोटोवाल्या कागदपत्रांनी त्याची उणीव भरून काढायचा. पंचक्रोशीत त्याला भाऊसाहेब म्हणून मान होता. गेल्या इलेक्शनला अण्णांच्या सौ अनुसुया बाई प्रचंड मताने पडल्या पण त्यांनाही वहिनीसाहेब म्हणून बोलवायला ते एक कारण पुरेस होत. शेखरने मोठ्या घरची पोर पळवून आणली होती जी आधीच ताईसाहेब होती. आता या पूर्ण घरात एक अण्णाच काय ते फक्त अण्णा होते. नाही म्हणायला गेले कित्येक वर्ष ते गावातलं एकूलतं एक किराणा मालाच दुकान चालवत होते, ते बघता तरी त्यांना किमान अण्णा सेठ म्हणायला हवं होत पण पूर्ण गावासाठी ते अण्णुंच दुकान होत.
आपल्याला हवा तसा मान मिळत नाही हे शल्य अण्णांना बोचे. पण जिथे मुदलात कुटुंबच फार मान देत नाही तिथं चक्रवाढ व्याजी गाव कश्याला मान देईल. रोज सकाळी लवकर उठून दुकानासमोरचा रस्ता झाडून स्वच्छ करत. मग स्वतः ला आणि बायकोला चहा ठेवत. अन्ह्याईक उरकून ते परत दुकान उघडायला येत. ढेरी खाली धोतर लावून उघड्याबंब अवस्थेत एका हातात उदबत्ती घेवून बंद दुकानाला ओवळत ती उदबत्ती एका कोपऱ्यातल्या फटीत अडकवून देत. मग कनवटीला लावलेली चावी काढून ते बाबा आदमच्या काळातल भलं थोरल लोखंडी कुलूप खोलायचे. कुलूप पुन्हा कडीलाच अडकवून दुकानाच्या दोन्ही दरवाज्याच्या फळ्या कपड्याच्या घड्या घातल्यागत उघडायचे.
दुकानात समोरच डाव्या कोपऱ्यात एक जुनाट बाकड टाकलं होत. समोर गल्ल्याला लागून एक कंबर भर उंचीच काचेच कपाट होत. त्याच्यात बिस्किटांचे पुडे, फरसाणाच्या पिशव्या तत्सम माया मांडलेली असायची. कपाटावर रांगेत दोनतीन काचेच्या बरण्या होत्या, त्यात लिमलेटच्या गोळ्या, चणे फुटाणे भरलेले असायचे. त्याच्याच बाजूला लोखंडी तारेने छताला एक तराजू बांधलेला होता. एक आणि दोन किलोची वजन सोडली तर बाकीच्या वजनासाठी वेगवेगळ्या आकाराचे दगड ठेवले होते. पण यावर ना वजन करून देणाऱ्याला ना वजन करून घेणाऱ्याला काही आक्षेप होता.गल्ल्यावर एक कसलासा छोटा फोटो ठेवला होता तो एवढा जुना होता की नक्की त्यात कोणता देव आहे ते तो परमेश्वराचे जाणे पण अण्णा मात्र मन लावून गल्ल्या पाठोपाठ त्या फ्रेम ला सुध्धा नमस्कार करून गल्ला उघडायचे. त्यांना बसायला एक त्यांच्या एवढीच जुनाट लाकडी खुर्ची होती. अण्णांच्या कुरकुरत्या गुढग्यांना खुर्चीच्या कुरकुरणाऱ्या गुढग्यांची साथ होती. त्यांच्या मागे एक लाकडी फळ्यांची डुगडुगती मांडणी होती. त्यात हारिने पत्राच्या डब्यातून डाळ, कडधान्य , साखर, गुळाच्या ढेपी, तिखट,मीठ वैगरे मांडून ठेवलेले होत. एका कोपऱ्यात एका कागदी खोक्यात विड्या,तंबाखू तत्सम मसाला ठेवलेला असायचा. अण्णांनी शेखरला ती मांडणी दुरुस्त करण्याविषयी खूपदा सुचवलं होत पण शेखर ने आज करू उद्या करू म्हणून फक्त टाळायचं काम केलं होत. त्या झुलत्या मिनारी मागे कांदे बटाटे आणि तांदुळाच्या गोणी ठेवलेल्या असायच्या. तिथूनच एक दरवाजा काढला होता जो मुख्य घरात जायचा. शेखरच रेशनिंग च दुकान स्वतंत्र जागेत होत.त्याने ते आपल्या मनाजोगत बनवून घेतलं होत. त्यात तो शेठाच्या थाटात बसायचा. किराणा मालाच्या दुकानात लोकांचा सतत राबता असायचा तरी उधारीमुळे उत्पन्न कमी होत. ' अरे म्हाद्या तुझं १० रुपयाचं उधार आहे ' अस अण्णा म्हाद्याला बोलले की तोही वरच्या आवाजात ' काय अण्णा देतो की उद्या कुठे पळून चाललो !' म्हणून त्यांना चुना लावायचा . मग बरीच थकबाकी झाली की सारा व्यवहार वहिनी साहेब स्वतः हातात घ्यायच्या आणि प्रत्येकाकडून थकबाकी वसूल करायच्या.
थंडीचे दिवस होते ताई साहेबांची ओटभरणी होती. शेखर ने अगदी थाटामाटात सगळा कार्यक्रम केला. ताईसाहेब सासरचे वडिलोपार्जित ठेवणीतले दागिने आणि माहेरून आलेले दागिने घालून साक्षात लक्ष्मी वाटत होत्या. वहिनी साहेबही तसूभर मागे नव्हत्या.माहेर लांब असल्याने रात्री निघण्या ऐवजी सकाळी उठून प्रवास करावा असे ठरलं. बाकी मंडळी आपापल्या घरी परतली असली तरी ताई साहेबांच्या आई , वहिनी मागे थांबल्या होत्या. बायकांनी घराचा कब्जा घेतला.रात्र झाली तसे शेखर, त्याचे सासरे आणि दुकानातला नोकर रेशनिंगच्या दुकानात झोपायला गेले. अण्णांची रवानगी अर्थात किराणा मालाच्या दुकानात झाली. दुकानाच्या फळ्यांच्या दाराच्या फटिंतून फार गार वार यायचं म्हणून अण्णांनी डुगडुगणार्या मांडणीच्या आणि तांदुळाच्या गोणीच्या मधल्या जागेत आपलं अंथरूण घातलं. आपला सहा फुटी देह अंगावरच्या घोंगडीत गुंडाळून ते झोपले. मध्यरात्र झाली असावी, अचानक त्यांना गार वाऱ्याच्या झुळकेने जाग आली. त्यांनी आपली कांबळी डोक्यावरून ओढून घेतली तरी हुडहुडी थांबेना. अचानक एवढा गार वारा कुठून यायला लागला म्हणून नाईलाजाने त्यांनी डोक्यावरची घोंगडी खाली करून पत्रांच्या डब्ब्यांच्या फटीतून दाराकडे पाहिलं. त्यांना तिथे जे दिसलं त्यानी त्यांच्या पाचावर धारण बसली. दुकानाच्या दाराची एक फळी उघडली होती त्या समोर एक काळाकुट्ट माणूस उभा होता अर्थात तो जरी नीट दिसत नसला तरी त्याच्या हातातलं लखलखणार पात स्पष्ट दिसत होत. तो कोणाला तरी इशारे करत होता. म्हणजे तो एकटा नसणार.तो कोणाला इशारे करतोय ते अण्णांनी जरा मान उंच करत पाहिलं, तर त्यांच्या गल्ल्यासमोर त्याचा साथीदार खुडबुड करत होता त्याने मदतीसाठी दारात उभ्या असलेल्या आपल्या साथीदाराला बोलावलं आणि दोघेही दुकानाचा गल्ला उघडायचा प्रयत्न करायला लागले. अण्णा त्यांच्या पासून एक फुटाच्या अंतरावर होते हे जर त्या दोघांच्या लक्षात आलं असतं तर अण्णांचा स्वर्गवासी अण्णा व्ह्यायला वेळ लागला नसता. या विचाराने अण्णांच्या घश्याला कोरड पडली. सर्वांगाला कापर भरलं. ते आवाज न करता उठले, सुदैवाने घरात जायचं दरवाजा उघडा होता, बहुदा या दरोडेखोरांनी उघडला असावा. या दरवाज्याने जावं आणि सगळ्यांना गोंगाट घालून बोलवावं असा बेत अण्णांनी आखला. पण हाय रे किस्मत ते उभे राहिले आणि वातामुळे आधीच हाय खाल्लेल्या गुढग्यांनी दगा दिला. असह्य कळांनी ते किंचळले आणि त्या दरोडेखोरांनी आपली किंचाळी नक्की ऐकली असणार या भीतीने पुन्हा बोंबा मारून त्यांनी स्वतःला त्या डगमगत्या कपाटा मागे लपवण्याचा प्रयत्न केला आणि पुढे जे काही घडलं त्याचा त्यांनी कधीच विचार केला नव्हता. त्यांची किंचाळी ऐकून दरोडेखोर सर्तक झाले ते त्यांच्यावर चाल करून आले. त्याच वेळी अण्णांच्या त्या धडपडीने आधीच हालणारी ती मांडणी सगळ्या मुद्देमालासह धाडकन त्या दोघांवर कोसळली. आणि अण्णा त्या जमीनदोस्त झालेल्या संपत्तीवर आपले गुढगे धरून बसले. ती जरी डुगडुगती असली तरी असल्ल शिसवी लाकडाची होती, त्यामुळे खाली सापडलेले ते दरोडेखोर चारीमुंड्या चीत झाले. या सगळ्या गोंगटाचा आवाज पुऱ्या गावाने ऐकला. काही मिनिटातच घरातले आणि गावातले सारे तिथे गोळा झाले. समोर 'वाचवा वाचवा' म्हणून ओरडणारे दोन दरोडेखोर, त्यावर पसरलेली लाकडाची अख्खी मांडणी त्यावर राजाच्या दिमाखात एक पाय दुसऱ्या मांडीवर ठेवून लोकांकडे पाहणारे अण्णा अस विलोभनीय दृश्य सगळ्यांना पाहायला मिळालं.घरातलेच नाही तर शेजारा-पाजार्यांचे दाग-दागिने वाचवले म्हणून तमाम बायकांनी अण्णांची मिठमोहरीने दृष्ट काढली. सकाळपर्यंत अण्णांचा दिग्विजय गावभर झाला. त्या अट्टल दरोडेखोरांना रंगेहाथ पकडुन दिल्यामुळे अण्णांना पोलिसांनी रोख इनाम दिलं. चार दैनिकात त्यांचा पराक्रम फोटोसकट छापून आला. गावकऱ्यांनी त्यांची गाजत वाजत मिरवणूक काढली त्यांना अण्णासाहेब पदवी बहाल केली आणि गावाच्या चावडीवर त्यांचा एका तुटक्या लाकडी मांडणीवर बसलेला पुतळा उभारला. आता त्यांना कोणीही नुस्त अण्णा म्हणत नाही. अगदी वहिनी साहेब सुध्धा,'आमचे हे म्हणजे ना सरदारांचे वंशज आहेत शेवटी !!' म्हणून कानशिलाशी बोट मोडतात. घरा दारात आता त्यांना मोठा मान असतो. अण्णा माफ करा हं ! अण्णा साहेब आता आपले दुखरे पाय कुरवाळत आलेल्या गेलेल्यांना आपल्या पराक्रमाची कथा मिठमसाला लावून सांगतात. तुमची कधी तुरतुमडयाला फेरी झाली तर त्यांच्या तोंडून कथा नक्की ऐका आणि गावाच्या चावडीवरचा त्यांचा पुतळा पण नक्की बघा. हा पण त्यांच्या पराक्रमामागचं गुपित मात्र गुपित राहू द्या बरं.
हर्षदा सचिन गावंड

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा