दाराची बेल वाजते...
तशी मालिनी दार उघडते.
काय हो मिलिंद किती उशीर मी कधीची तुम्हाला फोन करते.....
अग फोन सायलेंट वरती होता. मिलिंद बोलतो....
बरं चला पटकन फ्रेश होऊन घ्या मी जेवण वाढते...
अग आज ऑफिसमध्ये एकाचा बर्थडे होताना त्यांनी पार्टी दिली... तू घे जेवण करून मिलिंद बोलतो.
आधी फोन करून नाही का सांगता येत मालिनी रागानेच बोलते... आठवड्यातून चार दिवस रोज मला शिळे जेवण खावे लागते.
मिलिंद sorry baby घे ना समजून....
आता मालिनी एकटीच जेवायला बसते आणि उरलेले जेवण सर्व फ्रीजमध्ये ठेवून देते...
दुसऱ्या दिवशी मंदिरात जात असताना मालिनीला रस्त्यात त्यांच्या सोसायटीचे सिक्युरिटी काका वडापाव खाताना दिसतात.
मालिनी सहजच सिक्युरिटी वाल्या काकांना मस्करी मध्ये बोलते,"काय काका वडापाव तुम्हाला जास्तच आवडतो वाटतं! आज काल मी तुम्हाला रोज वडापाव खाताना बघते".

अहो नाही ताईसाहेब. वडापाव म्हणजे माझं एक वेळच जेवण. सिक्युरिटीवाले काका बोलतात...
मालिनी बोलते तुम्ही रात्री जेवत नाही.
सिक्युरिटी वाले काका बोलतात नाही. मी रोज त्या नाक्यावरून पोळी भाजी केंद्रातून तीन चपात्या आणि भाजी घेऊन येतो आणि दुपारी तेच खातो आणि रात्रीच्या वेळी मात्र फक्त वडापाव खातो.

मालिनी पण का? त्याने तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल.
हो पण सिक्युरिटी मध्ये फक्त दहा ते पंधरा हजार रुपये पगार मिळतो. त्यातच घराचं भाडं ,एक वेळचे जेवण आणि त्याच्यातूनच काही पैसे मला गावाला सुद्धा पाठवावे लागतात. गावाला माझ्या दोन lमुली ,बायको ,एक मुलगा आणि माझी आई असे छोटे कुटुंब आहे. त्यांचा खर्च भागवणे ही माझी जबाबदारी आहे.
सिक्युरिटी वाल्या काकांचे बोलणे ऐकून मालिनीला रात्री काही झोप लागत नाही. आपल्या घरामध्ये रोज कितीतरी जेवण वाया जाते ही गोष्ट तिला अस्वस्थ करून टाकते.
ही फक्त आपल्या घराची गोष्ट आहे. आपल्या सोसायटीत जवळजवळ 500 ते 600 रूम आहेत यामध्ये किती जेवण वाया जात असेल.... हा विचार करत करतच मालिनी झोपून जाते.
ही फक्त आपल्या घराची गोष्ट आहे. आपल्या सोसायटीत जवळजवळ 500 ते 600 रूम आहेत यामध्ये किती जेवण वाया जात असेल.... हा विचार करत करतच मालिनी झोपून जाते.
दुसऱ्या दिवशी सकाळी मालिनी सोसायटीतील सर्व महिलांना बोलवून. सोसायटीतील महिलांना एक प्रश्न विचारते .तुमच्या सर्वांपैकी शिळे जेवण कोण खाते? हा प्रश्न विचारल्यानंतर जवळजवळ सर्वच महिलांनी वरती हात केला. नंतर मालिनी सर्वांना शिळे अन्न खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला होणारे अपाय समजावून सांगते.
नंतर ती महिलांना बोलते आपल्याला अन्न कचऱ्यात टाकून द्यावे असे वाटत नाही. म्हणून आपण ते दुसऱ्या दिवशी खातो पण हे शिळे अन्न कचऱ्यात टाकून देण्याची वेळच आली नाही तर.
सर्व महिला बोलतात म्हणजे काय?
आपण सर्वजण नेहमी आपल्या घराला लागेल तेवढेच जेवण बनवतो .पण तरी कधी कधी थोडे का असेना पण जेवण हे शिल्लक राहते. मग हे जेवण आपण दुसऱ्या दिवशी सकाळी खातो .पण असे न करता आपण रोज रात्री आठ ते नऊच्या मध्ये घरातील सर्वांनी जेवण करायचे व जेवण करून झाल्यानंतर उर्वरित जेवण रात्री सोसायटीच्या खाली तीन डब्बे ठेवण्यात येतील पोळ्यांसाठी एक डबा, भाजीसाठी एक डबा आणि भातासाठी एक डबा अशा भांड्यांमध्ये हे जेवण आणू ठेवायचे. तेही रात्री नऊ पर्यंत.आपल्या सोसायटीमध्ये चार ते पाच सेक्युरिटी वाले आहेत , त्यानंतर साफसफाई करणे कामगार आहेत, कोणाकोणाच्या घरी काम करण्यासाठी महिला आहेत.ज्यांना कुणाला हे जेवण हवे असेल त्यांना हे जेवण द्यायचे. आपण रोज असे केले तर घरी जेवण शिल्लक राहणार नाही व लोकांना ताजे अन्न देखील मिळेल. सोसायटीतील गरजूंनी हे जेवण घेतल्यानंतर, उर्वरित जेवण आपण रेल्वे स्टेशन वरती, उद्यानाच्या भोवती असणाऱ्या गोरगरिबांमध्ये वाटून टाकायचे. स्टेशनला व उद्याना भोवतीच्या लोकांना जेवण देण्याचे काम हे आपल्या सोसायटीतील टू व्हीलर वर फिरणारी मुले करतील.....
मालिनीची ही कल्पना सर्व महिलांना खूप आवडली.
दुसऱ्या दिवशीपासून सोसायटीमध्ये अन्नवाया न घालवण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू झाला....
सर्वांनी याच्यामध्ये भरभरून प्रतिसाद दिला...
गोरगरीब लोकांना नेहमी शिळे अन्न आणून दिले जाते. पण ताजे अन्न आणून देण्याची कल्पना सर्वांना खूप आवडली.
अनेक गोरगरीब लोकांनी सोसायटीतील लोकांना भरभरून आशीर्वाद दिले.
भुकेल्या लोकांचे पोट भरलेले बघून मालिनीला रात्री शांत झोप लागली...