अनामिका ऽऽऽऽऽ....... ध्रुवची आर्त किंकाळी हवेत विरूनही गेली. त्या बर्फाळ प्रदेशात तीच निपचित पडलेल शरीर मांडीवर घेऊन, ध्रुव धाय मोकलून रडत होता. त्याला जाणीव झाली होती, ती... त्याची अनामिका कधीच परत येणार नव्हती......
ध्रुवच खूप प्रेम होत अनामिकावर. तिला कसलातरी दुर्धर आजार होता त्यामुळे ती थोडेच दिवस जगणार होती. हे माहीत असूनही त्यान खूप प्रेम केल तिच्यावर. प्रेमच नाही तर लग्नही केल. अनामिकाची खूप इच्छा होती, मनाली पहायची. तिला बर्फाळ प्रदेश खूप आवडायचा आणि शेवटचा श्वास ही तिला तिथेच घ्यायचा होता. तिच्या इच्छेखातर लग्नाच्या दोन दिवसानेच ते मनालीत आले होते. त्या चार पाच दिवसाच्या सानिध्यात दोघांनीही एकमेकांना भरभरून प्रेम दिल होत. ध्रुवला तर ते दिवस संपूच नये अस वाटत होत. तो एकएक क्षण त्याच्या हातातून निसटून जात आहे असच जणू त्याला वाटत होतं....
आपला मृत्यू होणार हे माहीत असतानाही अनामिकाच्या मनात कसलीच भीती नव्हती. पण डोळ्यात मात्र विरहाच दुःख दाटून येत होत. अश्याही परिस्थितीत ध्रुवने तिची साथ दिली होती, प्रेम केल होत, लग्न केल होत. आणि शेवटी तो विरहाचा क्षण आलाच होता. अनामिका त्याला एकट्याला सोडून कायमची निघुन गेली होती.....
तसच तीच निर्जीव शरीर मांडीवर घेऊन तो कितीतरी वेळ बसला होता. आणि अचानक पाठीमागून कुणीतरी त्याच्या खांद्यावर अलगद हात ठेवला. त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. कारण तो स्पर्श त्याला अगदीच ओळखीचा वाटला. डबडबलेल्या डोळ्यांनी त्यान पाठीमागे वळून पाहिल तर त्याचा विश्वासच बसेना. चक्क अनामिकाच त्याच्या समोर उभी होती.... डोळ्यातील पाणी पुसून त्याने पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न केला तर, हो.... ती खरच अनामिका होती. त्यान झटकन मान वळवून आपल्या मांडीकडे पाहिल तर अनामिकाच ते प्रेत जसाच्या तश्या अवस्थेत तिथच पडून होत. मग जिने माझ्या खांद्यावर हात ठेवला ती कोण?.... कदाचित माझा भास असावा असच त्याला वाटलं.
"ध्रुव ऽऽ..." आवाज त्याच्या कानी पडला. तो आवाज अनामिकाचाच होता. आता मात्र त्याला कळून चुकल की तो भास नाही... खरंच ती अनामिका आहे. पण तीच निर्जीव शरीर माझ्या समोर पडलेल असताना ही कोण? का तिची आत्मा?.... त्या बर्फाच्या थंडीतही त्याला दरदरून घाम फुटला. पण मनातून त्याला आनंद झाला होता. कितीही झालं तरी त्याची चालती बोलती जिवंत अनामिका...त्याच प्रेम त्याच्यासमोर उभ होत.....
"ध्रुव.... अरे मीच आहे अनामिका.... असा वेड्यासारखा काय पाहतोयस."
"तू... तू अनामिका आहेस तर मग ही कोण?" त्याने स्वताच्या मांडीकडे पाहिल तर पुन्हा एकदा त्याला धक्का बसला. आता तिथ ते अनामिकाच प्रेत गायब झाल होत. ध्रुव पुरता भांबावून गेला होता.
"तू... तू अनामिका आहेस तर मग ही कोण?" त्याने स्वताच्या मांडीकडे पाहिल तर पुन्हा एकदा त्याला धक्का बसला. आता तिथ ते अनामिकाच प्रेत गायब झाल होत. ध्रुव पुरता भांबावून गेला होता.
"मी परत आलेय ध्रुव... तुझ्यासाठी.... तुझ्या प्रेमासाठी.... चल उठ आता इथून... कुणीच नाही तिथे. आपल्याला घरी निघायला हवं. आईबाबा वाट पाहत असतील ना...." अनामिका हसत हसत त्याच्या हाताला धरून उठवते. जाता जाता दोघेही प्रेत पडलेल्या ठिकाणी वळून पाहतात पण दोघांच्याही चेहर्यावर वेगवेगळे भाव उमटले होते..... ध्रुवच्या चेहर्यावर एक प्रकारची भीती आणि आश्चर्य तर अनामिकाच्या चेहर्यावर आनंद आणि हसू...... ते प्रेत तिथेच होत पण अनामिकाच्या आत्म्याने त्याला अदृश्य केल होत. ध्रुवला ते असूनही दिसू शकत नव्हत.........
अगदी पहिल्याप्रमाणेच त्यांच आयुष्य आनंदाने चालू होत. ध्रुवने जे काही घडल त्यातला एकही शब्द आईबाबांना कळू दिला नव्हता. फक्त त्या दोघांनाच माहीत होत. त्यांनाही आश्चर्य वाटत होत की अनामिका खरोखरच ठणठणीत बरी आहे. तिला काहीच नाही होणार. कदाचित डॉक्टरच चुकले असावेत. खरतर ते सगळ अनैसर्गिक होत. ध्रुवला ते जाणवत ही होत पण त्यातही त्याला एक प्रकारचा आनंद मिळत होता. म्हणून तो सहसा दुर्लक्ष करू लागला.
काही दिवसातच ध्रुव आणि अनामिकाने नवीन घर घेतले. आता त्या नवीन घरात पूजा घालायची होती. त्यासाठी आईबाबांनी भटजींना बोलावून घेतले. मात्र भटजींनी त्या घरात प्रवेश करताच त्यांना काहीतरी अनैसर्गिक जाणवले. जे मानवीय नव्हते.
"काहीतरी आहे या घरात. जे मला जाणवतेय. काहीतरी विलक्षण, अमानवीय...भटजींनी आल्या आल्या चौफेर नजर फिरवली. आता मात्र ध्रुव आणि अनामिकाची धाकधूक वाढली. त्यांनी अनामिकाच्या आत्म्याला ओळखलच तर? असा प्रश्न पडला......

तरीही काहीकेल्या भटजींना कळत नव्हत. ते काय आहे. जेव्हा त्यांनी दिव्यदृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनामिकाचा चेहरा त्यांना समोर दिसला.
"माफ करा... एका प्रेतआत्म्याला बरोबर घेवून तुम्ही ही पवित्र पूजा नाही करू शकणार." भटजींचे डोळे अनामिका वर रोखले होते. आईबाबांना कळत नव्हत ते काय बोलताहेत.
"काय... कसली प्रेतआत्मा... काय बोलत आहात तुम्ही गुरुजी?.... आईबाबांनी प्रश्न केला.
" हो... ही जी तुमची सून आहे ती एक आत्मा आहे. एक अतृप्त आत्मा. जी तिच्या प्रेमासाठी परत आलेय. हव तर तुम्ही ध्रुवला विचारू शकता. हे ऐकून आईबाबांच्या पायाखालची जमीनच सरकते. शेवटी ध्रुव आणि अनामिका दोघेही कबुल करतात. झालेला सगळा प्रकार सांगून टाकतात. ईतके दिवस आपण एका आत्म्यासोबत राहत आहोत यावर त्यांचा विश्वासच बसत नाही......

"तुम्हा दोघांच प्रेम इथेच दिसून येतय. पण निसर्गाच्या नियमांविरुद्ध जाण म्हणजे खूप मोठी चूक आहे. तुझी आत्मा मुक्त करायला हवी. ते काम मी करेन. " भटजी.
"नाही नाही... तस काहीच नाही होणार. माझ्या ध्रुवल सोडून मी कुठेच जाणार नाही. आणि मी परत आलेय ती फक्त एका अटीवर..." अनामिका.
" ती कोणती अट?...." भटजी.
" ती कोणती अट?...." भटजी.
"जोपर्यंत ध्रुवच माझ्यावर असलेल प्रेम कमी होणार नाही तोपर्यंत मी परत जाणार नाही. जोपर्यंत मी त्याला दुसर्या कुणाचा होताना बघणार नाही तोपर्यंत मला मुक्ती ही मिळणार नाही." अनामिका.
"अस कस शक्य आहे... अनामिका. माझ तुझ्यावरच प्रेम कधीच कमी होणार नाही. मग..." ध्रुव.
"यावर एकच उपाय आहे. आणि तो म्हणजे ध्रुवच लग्न. एकदा त्याच लग्न झाल आणि तो कुणा दुसर्याचा झाला की अनामिकाला आपोआप मुक्ती मिळेल." भटजी.
"मी लग्न नाही करणार... अनामिका नंतर मी कोणावरच प्रेम नाही करणार मग लग्न तर लांबच." ध्रुव जोरात ओरडत होता.
खूप प्रयत्न करून, समजावून भटजींनी दोघांनाही विश्वासात घेतले. शेवटी नाईलाजाने दोघेही तयार झाले. ज्या ठिकाणी अनामिकाचा मृत्यू झाला त्याच ठिकाणी ध्रुवचे लग्न लावण्यात आले. अनामिका दुरूनच ते सगळ बघत होती. तिच्या डोळ्यानी ती ध्रुवला दुसर्याचा होताना बघत होती. ध्रुव सुद्धा रडवेल्या चेहर्याने तिच्याकडेच बघत होता. लग्न झाल.... आता ती मुक्त होणार होती. तशीच ती माघारी वळून हात वर करणार इतक्याच तिला ध्रुवची किंकाळी कानावर पडली. अनामिका...
तिने वळून पाहिल तर ध्रुव रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला होता. तडफडत होता. पण ती त्याच्या जवळ जाऊ शकत नव्हती. लग्न होताच त्याने स्वताच्या हाताने धारदार सुरा पोटात भोसकून घेतला होता. आता तिचा आत्मा अनंतात विलीन होत होता. ईकडे ध्रुवने सुद्धा प्राण सोडला होता. ती वर खेचली जात होती आणि अचानक कुणीतरी तिच्या हातात हात दिला. तिने पाहिल तर तो ध्रुव होता. तिच्यासोबत आता तो हो अनंतात विलीन होणार होता...

"बघ.... आलो ना... सांगितल होत ना मी कधीच तुझी साथ सोडणार नाही." ध्रुव.
दोघांचेही आता पूर्ण मिलन झालं होत. दोघेही एकमेकांना बिलगून मुक्त होत होते...
दोघांचेही आता पूर्ण मिलन झालं होत. दोघेही एकमेकांना बिलगून मुक्त होत होते...
शेवटी इतके दिवस बर्फाखाली पडलेल्या अनामिका च्या प्रेताचा आणि ध्रुवच्या प्रेतावर यथाविधी अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघांनाही एकत्रच अग्नी देण्यात आला... दोघांचही प्रेम अमर झालं होत... एक अनोखे प्रेम...
समाप्त!
©®प्रणाली निलेश चंदनशिवे.