अनोखी गाठ भाग १ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-1-marathi--kadambari_5839
अनोखी गाठ २ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-2---marathi--kadambari_5870
अनोखी गाठ ३ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-3---marathi--kadambari_5889
अनोखी गाठ ४ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-4---marathi--kadambari_5986
अनोखी गाठ ५ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-5---marathi--kadambari_6023
अनोखी गाठ ६ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-6-marathi-kadambari-_6109
अनोखी गाठ ७ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-7-marathi-kadambari-_6145
अनोखी गाठ ८ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-8-marathi-kadambari-_6221
अनोखी गाठ ९ # मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-9--marathi--kadambari_6331
अनोखी गाठ भाग १०
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-10---marathi--kadambari_6468
अनोखी गाठ भाग ११ # मराठी _कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-11-marathi-kadambari-_6943
अनोखी गाठ भाग १२ # मराठी _कादंबरी
( मागच्या भागात आपण पाहिलं की आजीच्या अनोख्या स्टोरी बद्दल जाणून घेण्यासाठी समीरा उत्सुक असते. प्रयन्त करूनही समीराला आजीशी या विषयावर बोलायला मिळत नाही. त्यामुळे ही गोष्ट ती अभिषेकला सांगते. अभिषेक जेवताना खूप दिवसात आजीच्या हाताने तेल लावून घेतलं नाही आणि गच्ची वर बसून गप्पा मारल्या नसल्याचं सांगतो आणि आज आपण वर गच्चीवर झोपायचं असं आजीला सांगतो. आजी त्याचं म्हणणं मान्य करते. रात्री सर्व ( जानकी, स्वाती, समीरा, आजी आणि अभिषेक ) गच्चीवर येतात. प्रेमविवाह विषयी बोलता बोलता समीरा आजीच्या लग्नाविषयी विचारते आणि आजी स्टोरीला सुरुवात करते. आता पुढे......)
आजी पुढे सांगत होती, "मी दाग दागिन्यांनी, फुलांनी सजवून बसली असताना बाहेरून आरडा ओरडाच्या आवाज येवू लागले. घरातील मोठ्या वयस्कर बाया बाहेर शक्य तितका कानोसा घेऊन बाहेर नक्की काय चालू आहे याचा अंदाज घेत होत्या. पुढे पुढे आवाज मोठा झाला. मी घाबरून मोठया आईला ( काकी ) मिठी मारली. माझी आजी धीर करून बाहेर गेली. थोड्या वेळाने आता येवून रडू लागली. आजीला रडताना पाहून मला पण रडू येत होतं. आई, काक्या, आत्या आजीला काय झालये बाहेर विचारू लागल्या. आजी म्हणाली की, " व्हराड लग्नासाठी निघालं आणि रस्त्यात त्यांना दरोडेखोरांनी अडवलं. त्या झटपटीमध्ये दरोडेखोरांनी व्हराडामधील काही लोकांना तलवारी आणि कोयत्याने मारलं. त्यात कावेरीच्या नवऱ्याला पण खूप मार लागला. वैद्यकडे नेईपर्यंत त्याने जीव सोडला.
हे ऐकून घरात सर्वांना घाम फुटला. बाहेर ज्या मुलाशी माझं लग्न ठरलं होतं त्याचे आई - वडील आणि बाकी नातेवाईक होते. जे मला दोष देत होते. मी पांढऱ्या पायाची आहे, माझ्या मुळे त्यांच्या मुलाचा जीव गेला असं म्हणून जोर - जोरात ओरडत होते. जेमतेम १२ वर्षांची होते मी त्यामुळे नक्की काय चालू आहे हे फारस कळतं नव्हतं. पण जे काही सुरु होतं त्यामुळे मी खूप घाबरले होते. घरच्यांना आता खूप टेन्शन आलं होतं की माझं पुढे कसं होणार? कारण मी ना धड कुमारिका होते कारण मला हळद लागली होती आणि ना विधवा कारण लग्न लागलं नव्हतं. त्यावेळी एका मुलीची वरात दोनदा कधी आली नव्हती. त्यात मी अपशकुनी ठरवले गेले होते. "
समीरा आणि जानकी आजीकडे डोळे मोठे करून, मन लावून ऐकत होत्या. जानकी म्हणाली, " पणजी आजी अगं त्यात तुझा काय दोष होता ? तुला का बोलले ते लोक ? तू थोडी ना पाठवलं होतंस दरोडेखोरांना ? असे कसे वागू शकतात ते लोक ?" जानकीला आपल्या आजीला कोणीतरी कारण नसताना वाईट बोललं होतं हे ऐकून खूप राग येत होता आणि तो तिच्या बोलण्यातून कळतही होता. जानकीचं बोलणं ऐकून आजीला बरं वाटत आतापर्यंतच्या आयुष्यात जानकी , समीरा परदेशी राहिल्या होत्या पण मनात भारत नक्कीच होता म्हणून तर आयुष्यात पहिल्यांदा भेटलेल्या आजीला भूतकाळात कोणीतरी वाईट बोललं हे ऐकून त्यांना वाईट वाटत होतं. मायेची , आपलेपणाची ओढ , जाणीव जानकीच्या बोलण्यातून सर्वांना कळत होती.
आजी पुढे बोलतात, " जानकी , बाळा तो काळ तसाच होता. काही वाईट झालं की स्त्री च्या माथी मारायचं. अगदी स्त्री सुद्धा स्त्रियांना त्रास द्यायच्या . अजूनही फार काही बदललं नाहीये. आजही मुलीचा पायगुण असं म्हणतात. पुरुष यातून मुक्त आहेत. नवरा मेला तर बायकोमुळे , त्यामुळे पुढचं आयुष्य विधवेचं आणि अधिक खडतर . दुसरीकडे बायको मेली तर तीच तेरावही पूर्ण होत नाही तोपर्यँत पुरुषच्या दुसऱ्या लग्नाचा घाट. असाच काळ होता तो. यातून असंख्य स्त्रिया गेल्या आहेत. त्याच कशाला जवळजवळ सर्वच स्त्रिया त्रास, अपमान या गोष्टी होत्याच. देवाने प्रत्येकाला स्वतंत्र जीव, अस्तित्व दिलं आहे. ज्यावर त्या जीवाचा हक्क आहे. पण स्वतःच्या फायद्यासाठी काहींनी आपआपल्या परीने धर्म अर्थ सांगितला आणि त्यानुसार वागणे बंधन बनवलं. आपल्या देशात पूर्वी पासून स्त्री पुरुष समानता पूर्वीपासून असती तर आज हा देश जगात सर्वांत पुढे असता. विचार कर. शतकानुशतके या देशातली अर्धी लोकसंख्या घरात होती . त्यांना बाहेर पडून त्याचं कौशल्य दाखवायचं भाग्य नव्हतं. ज्यांना ज्यांना भाग्यांनी साथ दिली त्यांनी इतिहास घडवला. महाराणी ताराराणी बाईसाहेब याचं उदाहरण घे. जेव्हा स्वराज्याची धुरा त्यांना हाती घ्यायची व आली त्यावेळी त्या फार फार तर २४ - २५ वर्षांच्या असतील आणि समोरचा शत्रू औरंगजेब ? त्याच्या पाठीशी लाखोंचं सैन्य , असंख्य लढाईचे अनुभव, तो कपटी आणि धूर्त राजकारणी होता. त्याने आपल्या सख्या बापाला आणि भावांनाही सोडलं नाही अश्या हैवानाशी सामना करायला त्या सज्ज झाल्या. आपल्या हाताशी असलेलं सैन्य पुन्हा नव्याने उभं केलं. एक स्त्री स्वराज कसे सांभाळणार आणि एवढ्या मोठ्या शत्रूशी कसा सामना करणार ? याबाबतीत लोक साशंक होती. पण त्यांना लढाई मैदानात शत्रूची धूळधाण उडवताना पाहून पाहणाऱ्याला साक्षात भद्रकाली तांडव करत असल्याचा भास होतं असे. आपल्या महारानीला असं लढताना पाहून सैन्यात एक वेगळी ऊर्जा , एक वेगळी वीज उसळत असे. नंतर जनसामान्यात देखील साक्षात भद्रकाली आपलं आणि स्वराजाचं रक्षण करतेय याची खात्री झाली आणि लोक निर्धास्त झाले. ७ - ८ वर्ष औरंगजेब जिवंत असेपर्यंत हा संग्राम सुरु होता. यासर्वांत औरंजेबाला जी गोष्ट आतल्या आत खात होती ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यासारख्या लढवय्या पुरूषासोबत लढणारा , संभाजी महाराजांसारख्या अजिंक्य योद्धयाला कपटाने का होईना पण पकडणारा एक मुरलेला राजकारणी एक स्त्रीला हरवू शकत नव्हता. ती भद्रकाली स्वराजरक्षणासाठी एवढ्या मोठ्या बलाढ्य शत्रू समोर तेवढ्याच ताकदीने उभी राहत होती. आयुष्यात स्वतःला 'आलमगीर ' म्हणवून घेणारा आयुष्याचं शेवटी एका स्त्रीकडून हरला ही गोष्ट त्याला कलंक वाटत होती. शेवटी त्याला याच स्वराज्याच्या मातीत जीव सोडावा लागला.
महाराणी ' येसूबाई साहेब ' सुद्धा तेवढ्याच पराक्रमी. आपल्याकडे २६ / ११ ला हल्ला झाला तेव्हा जवळजवळ संपूर्ण मुंबई शहारली होती. लोक प्रचंड घाबरले होते. तेच आपल्या स्वराज्यासाठी आपल्या आयुष्याची २९ वर्ष त्या माउलीने शत्रूच्या नजरकैदेत काढले. पर मुलुख , परकी लोकं, वेगळा धर्म असलेल्या ठिकाणी राहायचं. त्याकाळी बळ जबरीने धर्म परिवर्तन केले जाई अश्या परिस्थिती , जिथे उद्या नक्की कसा उगवेल हे माहित अश्या परिस्थितीत त्यांनी आपली २९ वर्षे काढली. एवढं धैर्य , एवढं बळ , सर्वच अतुलनीय.
राणी लक्ष्मीबाई ' झाशीवाली ' त्यांनी येणार संकट बरोबर हेरलं होतं. त्यामुळे त्यांनी आसपासच्या राजांना एकत्र येऊन लढण्याचं सांगितलं होतं. पण विलासात बुडालेल्या आणि दूरदृष्टी नसलेल्या त्या राजांना एका स्त्रीच ऐकायचं नव्हतं म्हणून सरळ नकार दिला. खचून न जाता राणी लक्ष्मीबाई स्वतःच्या पूर्ण ताकदीने सामना करण्याची तयारी करू लागल्या. त्यांनी जी तारीख इंग्रजांविरुद्ध हल्ला करण्यासाठी निवडली होती आणि त्यानुसार तयारी सुरु होती त्याच्या काही दिवस आधीच मंगल पांडेने बंड केलं आणि गाफील इंग्रज सावध झाले. त्यामुळे त्यांनी देखील हालचाल लवकर करावी लागली. इंग्रजांनी एक- एक राजांचा पाडाव करायला सुरुवात केली आणि मदमस्त मस्त असलेले राजे काही प्रहरात ( १ प्रहर- ३ तासांचा असतो .) हार मानू लागले. राणी लक्ष्मीबाईंनी रयतेला आदेश दिला 'आपली आपली पिके २ दिवसात कापून घ्या . त्यानंतर सर्वत्र आग लावा. महालाच्या ४ -५ मैलाच्या आसपासची सर्व झाडे तोडा.' राणीच्या आदेशानुसार काम झालं. इंग्रज एवढा प्रवास करून आले पण रखरखत ऊन , आपसापास जळालेला परिसर , सावलीसाठी एकही झाड नाही. त्यामुळे इंग्रज बेहाल झाले. गडाचे दरवाजे बंद केले गेले होते. इंग्रजांनी हल्ला केला , प्रतिउत्तर आले. जिथे अनेक राजांना काही प्रहारांमध्ये हरवलं , तिथे एक स्त्री, ते अवघ्या २३ वर्षांची दिवस संपला तरी इंग्रज हरवू शकले नाही. जवळपास ७ दिवस सर्व प्रयत्न करूनही राणी लक्ष्मीबाई शरण येत नाही हे पाहून इंग्रजांना आश्चर्य वाटलं. तोफा एकाच तटबंदीवर केंद्रित करून तोफेचा मारा सुरु केला. संध्याकाळच्या वेळी महालाचा ती तटबंदी ढासळली . इंग्रजांच्या चेहऱ्यावर कपटी हरू आलं. भक्कम तटबंदी पडल्याचे पाहून इंग्रजांनी सकाळी महाल काबीज करायचे ठरवले.
सकाळी इंग्रज महाल काबीज करायला आले आणि पाहतात तर कल संध्याकाळी पडलेली तटबंदी आता पुन्हा उभी होती तेही पूर्वीसारखीच भक्कम. इंग्रजांनी डोक्याला हात लावला. त्यानंतर आपली मात्रा चालत नाही हे पाहून इंग्रजांनी महालाच्या आत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरींमध्ये आपल्या आतल्या हेरांमार्फत विष मिसळलं. त्यामुळे राणी समोर दुसरा पर्याय नव्हता. युद्ध झालं. पण असं की त्या युद्धात सामील असलेल्या एक इंग्रज अधिकाऱ्याने आपली डायरीमध्ये लिहून ठेवलं की , " अशी पराक्रमी स्त्री मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिली नाही. असे योद्धे आमच्याकडे असते तर भारत काबीज करायला आम्हाला एवढा काळ लागला नसता."
एक ना अनेक उदाहरणे आहेत. भारताच्या पहिल्या डॉ . आनंदीबाई, भारताच्या दुसऱ्या सराव करणाऱ्या डॉ. रखमाबाई , रखमाबाई ज्यांनी भारतात पहिल्यांदा स्वतः स्त्री असून घटस्फोट मागितला. त्यासाठी न्यायालयाने त्यांना आर्थिक दंड ठोठावला होता. पण त्यांनी आपला हक्क मिळवला. सावित्रीबाई फुले, कल्पना चावला, सुधा मूर्ती एक ना अनेक आहेत. असो...... विषय खूपच भरकटला."
"आजी तू फक्त बोलत रहा, मला तू जे - जे बोलतेयस ते सर्व ऐकायला खूप आवडतं." समीरा गालावर हात ठेवून आजीकडे एकटक पाहत म्हणाली.
" आजी पुढे तुझं लग्न कसं झालं मग ? पुढे सांग ना लवकर प्लिज .........." जानकी.
आजी पुढे सांगायला सुरुवात करते, " माझ्या घरटी सर्वांच्याच डोळ्यात पण होतं माझ्या सर्व काकी, आई, आज मला धरून रडत होत्या. शेजारच्या बायका कुजबुजू लागल्या. ' आता हीच कसं होणार ? हिच्यामुळे हिच्या घरच्यांना प अपमान सहन करावा लागेल. वगैरे ... वगैरे..." य सर्वांत मला एकच गोष्ट कळत होती , ती म्हणजे आपल्यासोब काहीतरी वाईट झालं आहे , जे मी माहित नाही. जवळजवळ १ प्रहर हे सुरु होतं. घरातील मोठी कर्ती मंडळी सुद्धा खु चिडचिड करत होते. काह जणांचा राग माझ्यावर निघत होता, तर काही जण भरल्या डोळ्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवत होते. खूप विचित्र अवस्था होती माझी आणि माझ्या बरोबरच माझ्या घरच्यांची सुद्धा.
थोड्या वेगाने माझे मोठे काका आत आले अन म्हणाले," कावेरीला लग्नासाठी तयार करा." एवढं बोलून त बाहेर गेले. आता काह वेळापूर्वी माझं लग्न ज्यांच्यासोबत ठरलं होतं तो गेल्याची बातमी आली आणि आता मला लग्नसाठी तयार करा असं काका सांगू गेले. मी काहीच कळत नव्हतं. मी फक्त जे चाल आहे ते स्वीकारत होते. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता."
क्रमश .................
( वाचक कथेला देत असलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा