अनोखी गाठ १८ # मराठी _ कादंबरी
© आरती पाटील
( मागच्या भागात आपण पाहिलं की, खूप रात्र झाल्याने आजी पुढची कथा उद्या सांगते असं म्हणते. दुसऱ्या दिवशी स्वाती, जानकी आणि समीरा शेतात जातात. शेतात समीरा आणि जानकी दोघींच मन रमत. अभिषेक घेत असलेली मेहनत पाहून समीरा त्याला शहरात जावून स्वतःची प्रगती करण्याचा सल्ला देते पण अभिषेक म्हणतो, " ज्या बदलाची सुरुवात पणजी आजीने केली तो बदल तो पुढे चालवणार. त्याकाळात तिथे स्त्रियांना बाहेर पडायची मुभा नव्हती. त्यावेळी आजीने शेतीत बदल काय केले? याची उत्सुकता समीराला लागली. आता पुढे.........)
" आजीने...?" समीरा आश्चर्यचकित होऊन विचारते.
" हो समीरा, शेतीत, शेतीच्या पद्धतीत बदल या गावात सर्वांत पहिल्यांदा आजीने केला. आजी तिची गोष्ट पुढे सांगेल तेव्हा तूला कळेलच ते. पण आता तूला मी जे विचारतो त्याचं मला उत्तर दे. " अभिषेक.
समीरा प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे बघते.
अभिषेक म्हणतो, " भारताच्या पहिल्या शिक्षिका कोण आहेत माहित आहे का? "
समीरा यावर नकारार्थी मान हलवते.
" तूला माहित नसेल वाटलंच होतं मला. तुझा जन्म अमेरिकेचा, लहानची मोठी तू तिथेच झालीस. त्यामुळे तू हे माहित नसेल हे मी गृहीतच धरलं होतं. पण.... ज्यांना तू ओळखत नाहीस, ज्यांचं नाव तूला माहित नाही, त्याचे आपल्या सर्वांवर खूप उपकार आहेत. " अभिषेक समीराकडे पाहून म्हणतो.
समीरा म्हणते, " अभिषेक हे बघ मी भारतातच पहिल्यांदा आली आहे सो त्यांचा आणि माझा काय संबंध? कशाचे उपकार? "
समीराचं बोलणं ऐकून अभिषेक हसतो आणि म्हणतो, " आहेत तुझ्यावरही त्यांचे उपकार आहेत. कसे? ते मी सांगतो. या भारतात पूर्वी स्त्री शिक्षण हे एक पाप होतं. जी स्त्री कोणत्याही कारणाने घराबाहेर पाय ठेवेल तिला पापी म्हणायचे, तिचं जगणं कठीण करायचे. काही ठिकाणी तर मुलांना गुरु शिकवत असताना बाजूने स्त्री, छोट्या मुली जरी गेल्या, त्यांच्या कानावर विद्येचा एक शब्द जरी पडला तर त्या स्त्रीच्या कानात शिसाचा उकळता रस ओतला जायचा. " अभिषेकचं बोलणं ऐकून समीरच्या अंगावर काटा आला. शिक्षण घेण्याची एवढी मोठी शिक्षा? तिचं अंग शहरलं.
अभिषेक पुढे बोलतो, " ज्या वेळी अशी परिस्थिती होती. त्यावेळी ज्यांना आम्ही महात्मा म्हणतो, महात्मा म्हणजे ' महान आत्मा ' असे महात्मा जोतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा वसा उचलला. सर्वांत आधी त्यांनी आपल्या पत्नीला शिकवलं. त्यांना लिहायला वाचायला येऊ लागलं तसं त्यांनी इतर मुलींना शिकवावं असं जोतिबाने त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना सांगितलं. हे काम खरंच सोपं होतं असं तूला वाटतं समीरा? एका प्रकारे समाजाला आव्हान दिल्यासारखे झाले. जोतिबांनी घेतलेल्या निर्णयाला सर्वांत पहिला विरोध हा त्यांच्याच घरातून झाला. जेव्हा जोतिबा आपल्या निर्णयावर ठाम राहीले तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना घर सोडायला सांगितले. जेव्हा सावित्रीबाई मुलींना शिकवायला जायच्या तेव्हा लोकं त्यांच्यावर चिखल, शेण, दगड फेकून मारत. किती कष्ट, किती वेदना, किती मानसिक आणि शारीरिक त्रास त्यांनी झेलला असेल विचार कर.
काही दिवसांनी सावित्रीबाईना सारखा ताप येवू लागला. अगदी रोजच. जोतिबा म्हणाले, " आपण वैद्यांना बोलावू. " त्यावर सावित्रीबाई म्हणाल्या, " वैद्य काही करू शकतं नाही. मला माहित आहे माझा ताप कसा जाईल. " त्यावर जोतिबाना आश्चर्य वाटले आणि त्यांनी विचारलं, " कसा जाईल सांग मी तो उपाय करतो. " त्यावर त्या म्हणाल्या, " मला फक्त एक लुगडं आणून द्या. " पत्नीचे बोल ऐकून जोतिबाना वाईट वाटलं. आपण जे काम हाती घेतलं आहे त्यात पैसे वाया घालवणं परवडणार नाही, तरी सावित्री लुगडं मागते? तरी त्यावेळी काही न बोलता जोतिबांनी पत्नीसाठी लुगडं आणलं आणि खरंच त्यांना त्यांना ताप नाही आला. जोतिबांना या गोष्टीच आश्चर्य वाटलं. त्यांनी त्यांच्याच शाळेत शिकणाऱ्या एका मुलीला त्यांनी विचारलं असता त्यांना जे कळलं ते ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. " अभिषेक जे सांगत होता ते ऐकून समीराचीही उत्सुकता वाढली होती. ती म्हणते, " काय सांगितलं होतं त्या मुलीने? "
अभिषेक म्हणतो, " तिने सांगितलं, "आधी बाई जेव्हा शाळेत यायच्या तेव्हा वाटेत लोकं त्यांना चिखल, माती, शेण फेकून मारायचे. विद्यार्थांसमोर असं ज्या जावू शकतं नव्हत्या. म्हणून शाळेत पोहचल्यावर त्या अंगावर पाणी ओतून सर्व घाण स्वच्छ करत आणि दुसरं लुगडं नसल्याने त्या ओल्या लुगड्यातच मुलींना शिकवित. अश्या ओल्या कपड्यात सारखं राहिल्यामुळे त्यांना ताप येत होता. आता त्या येतात. अगं स्वच्छ करून लुगडं बदलून शिकवतात म्हणून त्यांना ताप येत नाही. " जोतिबाना जेव्हा सत्य समजल तेव्हा वाईट वाटलं. मुलींच्या शिक्षणात बाधा येवू नये म्हणून सावित्रीने लुगडं मागितलं.आता तू मला सांग समीरा, जर त्यांनी स्त्री शिक्षणाचा वसा घेतला नसता, तर कोणती स्त्री शिकू शकली असती? त्यांनी बदल घडवायचा निश्चय केला. त्यांनी तो घडवला. त्यांनी स्त्रियांना एक अधिकार दिला त्यामुळे पुढे तुझी आई शिकली, बाहेर जाऊ शकली, त्यामुळे तुझा जन्म भारताबाहेर झाला. आता पुन्हा विचार कर ' जर जोतिबा आणि सावित्रीबाईनी असा विचार केला असता की, कशाला समाजाशी वाकडं घ्यायच? स्वतःचा विचार करून सुखाने जगू शकले असते ना ते? फक्त स्वतःची प्रगती करू शकत होते ना ते? मग? जगासाठी करत बसायची काय गरज होती त्यांना? "अभिषेक समीराला विचारतो.
अभिषेकच्या प्रश्नाचे उत्तर समीराकडे नव्हते. अभिषेक म्हणतो, " समीरा, या जगात आपण येतो ना तेव्हा काही तरी ध्येय नक्की ठेवायचं असतं. काही जणांचं ध्येय फक्त स्वतःची प्रगती असतो. ते चुकीचं सुद्धा नाही. पण मला समाधान हवं आहे जे मला फक्त माझ्या वैयक्तिक प्रगतीमध्ये नाही मिळणारं. म्हणून हा सर्व खटाटोप आहे. पैशापेक्षा जास्त महत्वाचा असतो समाधान. ते नसेल ना तर गर्भश्रीमंत माणसाला त्याची श्रीमंतीसुद्धा टोचू लागते. काही दिवस माझ्यासोबत रहा. समाधान कसं असतं? किती मनाला सुख देत? कुठे मिळत? सर्व जाणवेल तूला. " अभिषेकचं बोलणं समीराला विचार करायला भाग पाडत होतं.
अभिषेक आपल्या कामाला निघून जातो. समीरा मात्र अभिषेकने बोललेल्या प्रत्येक वाक्याचा विचार करत असते. तिला कुठे तरी अभिषेकचं बोलणं पटत होतं. 'प्रत्येक माणसाचं एक ध्येय असावं. ' या वाक्याचा ती वारंवार विचार करत होती. आपल्या आयुष्यात काय ध्येय आहे? हा विचार समीरा करू लागली. आयुष्यात जन्मापासून सुख - सोयी, हवं ते मिळत होतं. आयुष्यात ' एन्जॉयमेंट ' एवढंच शब्द आपण जगला. मॉम - डॅडने कधी कोणत्या गोष्टीची कमी कमी पडू दिली नाही. त्यामुळे आयुष्याचा आपण कधी एवढ्या गांभीर्याने विचारही केला नाही. आज अभिषेकला माहित आहे त्याला काय करायचं आहे. पण मला....?
अजून काही तरी तर मला माझं आयुष्य नक्की कसं हवं? याचा विचार तरी मला करायला हवा. मला अभिषेक सोबत काही दिवस घालवावे लागतील. त्यांच्यासोबत आणि आजीसोबत राहून कदाचित माझ्या आयुष्याचं ध्येय शोधायला मदत होईल. झाडाखाली बसलेल्या समीराच्या अंगावर वाऱ्याची छान झुळूक आली आणि अभिषेकच्या कपाळावरून उतरणाऱ्या घामाकडे बघत समाधानाची व्याख्या नक्की काय याचा विचार समीरा करू लागली.
सर्वजण घरी परत आले तेव्हा पणजी आजी फोनवर समीराच्या मॉम - डॅड शी बोलत होती. आजीने समीरा आणि जानकीला आवाज दिला. समीरा तिच्या मॉम - डॅडशी बोलत होती. मॉम -डॅड फोन स्पीकर वर ठेवतात.
डॅड, " बेटा बोल कधी येवू तुम्हाला न्यायला? आम्हाला पण करमत नाही इकडे. "
समिरा, " डॅड, एवढ्यात नको येवूस, i mean आम्हाला न्यायला नको येवूस. तुम्हाला राहायचं असेल इकडे तर या मी अजून काही दिवस इकडे राहणार आहे. "
मॉम, " बाळा, १ महिन्याचं बोललो होतो आम्ही. आज २० दिवस झाले आहेत. आम्ही येवू ४ दिवस राहू १ महिना होईल आपण निघेपर्यंत. "
समीरा, " i know mom, but please try to understand. मला काम आहे थोडं. त्यामुळे मला इथे काही दिवस अजून राहायचं आहे. ""मला पण." मागून जानकी ओरडून बोलते.
डॅड, " अजून काही दिवस म्हणजे नेमके किती दिवस? तसं मी विमानाचं बुकिंग करून ठेवतो. "
समीरा, " नेमक मला सांगता येणार नाही डॅड. नंतर मी कॉल करून सांगेन. पण आता नाही यायचं मला. "
आपल्या लेकीच्या तोंडून हे शब्द ऐकून समीराच्या आई - वडिलांना खूप बरं वाटतं. आजीने आपलं काम केलंय याची त्यांना कल्पना आली.
" ओके बेटा, तुम्हाला जेव्हा यायचं असेल तेव्हा मला कळवा. मी येईन. " असं म्हणून समीराचे डॅड निश्चिन्त मनाने फोन ठेवतात.
आजी मागून समीरा आणि जानकीच बोलणं ऐकत असते. आजीलाही समीरा आणि जानकीचं बोलणं ऐकून खूप बरं वाटतं, आणि आता आपल्या नातवंतांमध्ये नवीन बदल करायला सुरुवात करायची असं आजी मनोमन ठरवून समीरा आणि जानकी जवळ येवून म्हणते, " काय गं काय काय बनवता येतं तुम्हाला जेवणात? " आजीचा प्रश्न ऐकून दोघींनाही कळतं नाही काय बोलावं. दोघी मान खाली घालून म्हणतात, " आजी आम्हाला काहीही येतं नाही बनवता. आम्हाला कधी गरजचं पडली नाही. " त्यावर आजी म्हणते, " बाळा या जगात आपली भाकरी कमवायला आणि बनवायला आलीच पाहिजे. आणि ज्याला हे जमतं तो या जगात कुठेही राहू शकतो, संघर्ष करू शकतो. "
आजीचं बोलणं कुठेतरी दोघींना पटत असतं. पण याआधी कधीही किचनमध्ये पाय न ठेवल्याने त्या दोघींना ते नको होतं. आजी दोघींना म्हणते, " चला माझ्यासोबत स्वयंपाक घरात मी रोज एक - एक पदार्थ शिकवेन तुम्हाला. " नाईलाजाने त्या दोघी आजीसोबत स्वयंपाक घरात जातात. आजी म्हणते, " आज मी पहिली गोष्ट शिकवणार ती म्हणजे 'शिरा ' सर्वांत सोपा. चमचा कसा फिरवायचा? किती पाणी घालायचं? किती प्रमाणात रवा आणि साखर घालायची? सर्व बघा. स्वयंपाक घरात छोटी - छोटी काम करा. भाजी निवडणे, भाजी चिरणे, डाळ - तांदूळ निवडणे, ताक घुसळणे ही छोटी - छोटी कामे करा आणि जेवण बनवताना लक्ष ठेवा. हळूहळू जमेल. "
" पण आजी तू जेवण बनवायला शिकवणार आहेस ना? मग छोटी - छोटी कामे का करायला सांगतेस? " जानकी लटक्या रागाने म्हणाली.
" बाळा, तू सरळ कॉलेज मध्ये जावून बसलीस का? नाही ना? पहिली, दुसरी, तिसरी... या इयत्ता पार करत कॉलेजला गेलीस ना? मग स्वयंपाक पण तसाच शिकायचा असतो. आजी शिरा बनवायला घेते. तूप, रवा - साखर, इलायची - जायफळ, केशर त्यानंतर काजू - बदाम..... याची रंगत आणि लाजत त्या दोघी अनुभवत होत्या. सुगंधाने स्वयंपाक घर सोबत देवघरही दरवळत होतं. रात्री सर्वजण जेवायला बसल्यावर 'शिऱ्याची ' गोडी समीरा आणि जानकीला जास्त वाटली.
सर्व जेवणे आटोपल्यावर स्वाती, जानकी आणि समीरा गच्चीकडे धावल्या. आज स्वातीला अंथरून घालायला , पाण्याचा गडवा भरून ठेवायला, आजीचा पान- सुपारीचा डब्बा आणायला समीरा आणि जानकी मदत करत होती. सर्वच जण आजीची पुढची कथा ऐकायला आतुर होते. ..........
क्रमश ..........
अनोखी गाठ भाग १ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-1-marathi--kadambari_5839
अनोखी गाठ २ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-2---marathi--kadambari_5870
अनोखी गाठ ३ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-3---marathi--kadambari_5889
अनोखी गाठ ४ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-4---marathi--kadambari_5986
अनोखी गाठ ५ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-5---marathi--kadambari_6023
अनोखी गाठ ६ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-6-marathi-kadambari-_6109
अनोखी गाठ ७ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-7-marathi-kadambari-_6145
अनोखी गाठ ८ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-8-marathi-kadambari-_6221
अनोखी गाठ ९ # मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-9--marathi--kadambari_6331
अनोखी गाठ भाग १०
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-10---marathi--kadambari_6468
अनोखी गाठ भाग ११ # मराठी _कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-11-marathi-kadambari-_6943
अनोखी गाठ भाग १२ # मराठी _कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-12---marathi--kadambari_6979
अनोखी गाठ १३ # मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-13---marathi--kadambari_7010
अनोखी गाठ भाग १४ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-14---marathi--kadambari_7049
अनोखी गाठ भाग १५ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-15---marathi--kadambari_7090
अनोखी गाठ भाग १६ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-16----marathi--kadambari_7128
अनोखी गाठ भाग १७ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-17---marathi--kadambari_7183
