Login

अनोखी गाठ २० मराठी कादंबरी

------

अनोखी गाठ भाग २०    # मराठी _ कादंबरी

© आरती पाटील

( मागच्या भागात आपण पाहिलं की, सरस्वती ताई अर्थात मोठ्या जाऊबाईंसोबत कावेरी ची छान गट्टी जमली होती. दोघीही एकमेकींसोबत आनंदित राहू लागल्या. एक दिवस अचानक कावेरीच्या सासूबाई आपल्या देखरेख करणाऱ्या बरोबर उंची वस्त्रे आणि दागिने पाठवून 'उद्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. तयार रहा.' असा निरोप पाठवतात. याचं कावेरी आणि सरस्वती दोघीनाहीं आश्चर्य वाटतं. दुसऱ्या दिवशी कावेरी उठल्यावर सरस्वती तिथे नसते. नंतर कावेरी सरस्वतीच्या खोलीचा दरवाजा वाजवते तेव्हाही सरस्वती दरवाजा उघडत नाही. सासूबाईंच बोलावणं आल्यामुळे कावेरीला सरस्वतीला न भेटताच जावं लागतं. मंदिरात कावेरी पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला पहाते. मंदिरातून परत आल्यावर कावेरीचा गृहप्रवेश केला जातो. संध्याकाळी एकटी असलेल्या कावेरीला सरस्वतीची आठवण येतं असते. त्यामुळे रात्री कानोसा घेत ती वाड्याच्या मागच्या दाराने सरस्वती ताई कडे जातं असताना, कावेरीची सासूबाई तिचा हात पकडतात आणि मी सांगितल्याशिवाय सरस्वतीला भेटायचं नाही किंवा मागे जायचं नाही असं बजावतात. कावेरीला स्वतःसोबतच सरस्वतीच्या एकटेपणाबद्दल वाईट वाटतं असतं. याचं विचारत तिला झोप लागते. आता पुढे.....)

आजी आपली गोष्ट पुढे नेते, " मला झोप उशिरा लागल्यामुळे पहाटे उठायला थोडा उशीर होतो. दरवाजावरच्या टकटकने मला जाग आली. डोळे उघडल्यावर खिडकीतून येणाऱ्या उन्हामुळे मी खडबडून जागी झाली. एवढा उशिरापर्यंत मी यापूर्वी कधीच झोपली नव्हती. रात्री आठवण, एकटेपणा यामुळे मला उशिरा झोप लागली होती. मी घाईघाईत दरवाजा उघडला. समोर सासूबाई उभ्या होत्या. मी दरवाजा उघडताच सासूबाईंनी माझा हात धरला आणि आत आल्या. त्या माझ्यावर खूप चिडल्या होत्या. त्या म्हणू लागल्या," अपशगुनी मुलगी पदरात टाकली ती टाकली पण किमान काही संस्कार तरी करून पाठवायला हवं होतं तुझ्या आई - बापाने. एवढ्या उशिरापर्यंत झोपणं चांगलं लक्षण नाही. नोकर माणसांसमोर बोलणं चांगला नाही. आज मी त्यांच्यासमोर बोलले तर उद्या ते तुझा मान ठेवणार नाहीत म्हणून आज समजावते. पुन्हा असं झालं तर तुझ्या अपमानाला तूच जबाबदार अशील. " असं म्हणून त्या निघून गेल्या.

मला स्पष्टीकरण देण्याची संधी सासूबाईंनी दिलीच नाही. आणि दिली असती तरी मला त्यांच्यासमोर बोलता आला असता का नाही माहित नाही. मी पटापट तयार होऊन खाली आले. देवपूजा आधीच झाली होती. मी देवाचं दर्शन घेऊन साखरबाईंना स्वयंपाक घर कुठे आहे? ते विचारलं. साखरबाईंनी हातानेच मला स्वयंपाक घराकडे इशारा केला. त्यावेळी सासूबाई तिथे नव्हत्या. मी स्वयंपाक घरात गेले तिथे तीन - चार बायका आधीपासून जेवण बनवत होत्या. मी तिथे गेले, थोडी बावरले होते. 'मी काही मदत करू का?' असे विचारले तेव्हा सर्व म्हणाल्या, " नको मालकीण बाई, आम्ही करतो. तुम्ही आराम करा. " माझ्या हाताला काहीतरी काम हवं होतं. नाहीतर एकटीपणा मुळे मला वेड लागलं असतं. म्हणून मी त्यांना म्हणाले, " एखादा पदार्थ तरी मी बनवते. " त्यावर त्यांचा नाईलाज झाला आणि त्यांनी मला एक चूल मोकळी करून दिली. सकाळची वेळ होती म्हणून मी न्याहारीसाठी ' झणझणीत उपीट ' बनवायचं ठरवलं. माझ्या हातचं उपीट माहेरी सर्वांना खूप आवडायचं. त्यामुळे तेच बनवावं असं मला वाटलं. उपीटला मी फोडणी दिली आणि वाफवायला ठेवलं. त्यानंतर झाकण काढल्यावर त्याचा दरवळ पूर्ण स्वयंपाक घरात उधळला. स्वयंपाक घरात उपस्थित सर्वांनी जो दीर्घ स्वास घेतला तेव्हाच माझ्या लक्षात आलं की उपीट छान झालं असणार.

तिथे असलेल्या स्वयंपाकी बाई पैकी एकीने न्याहारी बाहेर नेली. बाहेर पुरुष मंडळींची न्याहारी झाली आणि त्यानंतर सासूबाई न्याहारीला आल्या. त्यांनी न्याहारीला उपीट पाहून स्वयंपाकीन बाईंना विचारले, " न्याहारीत उपीट कोणाला विचारून बनवलंत? न्याहारी, जेवण मला विचारून बनवत जा सांगितलं आहे ना मी? " स्वयंपाकीन बाई घाबरत उत्तर देतात की न्याहारी त्यांनी बनवली नसून  मी म्हणजेच कावेरी, धाकट्या मालकीण बाईंनी बनवली आहे. ते ऐकून सासूबाईंना खूप राग आला. त्या स्वयंपाक घरात आल्या मला ओरडू लागल्या. म्हणू लागल्या, " काल घरात आलीस आणि आज मला न विचारात कारभार करायला सुरुवात केलीस? " मला त्यांच्यासमोर काय बोलावं कळतं नव्हतं. मी जेमतेम १३ वर्षांची होते. कारभार हातात घेणे, सत्ता गाजवणे असं काही मनातसुद्धा नव्हतं माझ्या. मला फक्त त्या घरात आणि सगळ्यांच्या मनात माझी जागा तयार करायची होती. म्हणून मी माझ्याकडून एक प्रयत्न केला होता. पण सगळं उलटचं झालं. मी माझ्याकडून सफाई देण्याचा प्रयत्न केला पण सर्वच फोल ठरलं. सासूबाई पुढे म्हणाल्या, " या घरात पहिल्यांदा काही बनवलस तर ते उपीट? मी तूला गोडाच बनवायला सांगणार होते. सासरी घरात पहिल्यांदा गोड पदार्थ बनवतात माहित नव्हतं का? " मला खरंच लक्षात आलं नव्हतं की मला गोड पदार्थ बनवायला हवा होता तोही सासूबाईंना विचारून. कारण मला तिथे येऊन ८ महिन्यांपेक्षा जास्त वेळ झाला होता. पण त्या घरात, वाड्यात पहिल्यांदा आले होते सासूबाईंच्या मते.

मी रडतचं माझ्या खोलीत गेले. कोवळ वय, सोबत कोणी नाही. बोलायला, व्यक्त व्हायला, मनातलं सगळं सांगून मोकळं व्हायला सोबत हवी होती. ती सोबत सुद्धा हिरावून घेतली गेली होती माझ्याकडून. सरस्वती ताईंची मला खूप आठवण येतं होती. त्यांच्या कुशीत शिरून मन मोकळं करावं असं वाटतं होतं पण ती मुभा पण मला नव्हती. वाड्याच्या मागच्या बाजूला होते तेव्हाच किमान सरस्वती ताईंची सोबत होती. सुख - दुःख वाटायला एक सोबती होती. ओठांवर हसू होतं. भावगीत होतं. पण भव्य वाड्यात येवून मी एकटी पडले होते. सतत नजर कैदेत असल्यासारखं वाटायचं. रात्री विचार थैमान घालायचे. माणूस रिकामं असलं, आणि डोक्याला चालना नसली की नकारात्मक विचार आपल्या डोक्यात जागा मिळवतात. तसंच काहीसं माझ्यासोबत होतं होतं. दिवसा मुलं असायची काही वेळ माझ्यासोबत माझ्या देखरेखीसाठी ठेवलेल्या बाई प्रेमाबाई सुद्धा असायच्या सोबत पण सासूबाईंच्या धाकामुळे त्यासुद्धा जेवढ्यास तेवढ्या वागायच्या आणि बोलायच्या. दिवस कसातरी संपायचा पण रात्र? खूप त्रास त्यांची. आयुष्य असं सोन्याच्या पिंजाऱ्यात जाणार असं वाटतं होतं. आपली माणसं, सुख - दुःख वाटणारं कुटूंब, माया करणारी मोठी माणसं असं घर असावं असं वाटतं होतं पण एक माया लावणार सरस्वती ताई भेटल्या होत्या त्यासुद्धा दुरावल्या. त्याशिवाय महादेवाच्या मंदिरात जाण्याआधी मी ताईंच्या खोलीचा दरवाजा किती वेळ वाजवत होते. ताईंनी दार का उघडलं नाही? हा प्रश्नसुद्धा मला शांत बसू देत नव्हता.

दिवस असेच पुढे सरकत होते. सासूबाई माझ्याशी मोजकंच बोलायच्या. घरात त्यांची एकहाती सत्ता होती. एके दिवशी दुपारी मी माझ्या खोलीच्या गच्चीत उभी होते. अस्वस्थ वाटतं होतं. हात पाय, पोट दुखत होतं पण सासूबाईंना जाऊन सांगायची हिम्मत नव्हती. प्रेमाबाई माझ्या खोलीचा दरवाजा वाजवून आत आल्या मी पाठमोरीच उभी होते. आत आल्यावर त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या मालकीण बाई जश्या आहात तश्याच उभ्या रहा मी लगेच आले असं म्हणून त्या लगबगीने बाहेर गेल्या. मला त्यांना का? कशासाठी? असे प्रश्न विचारायचे होते पण त्या आधीच त्या गेल्या. थोड्या वेळात त्या सासूबाईंना सोबत घेऊन आल्या. मला कळेना काय झालं म्हणून त्यांनी सासूबाईंना बोलावलं. सासूबाई खोलीच्या बाहेरच उभ्या होत्या. त्यांनी मला तिथूनच आवाज दिला आणि त्याच्या त्या भारदस्त आवाजात म्हणाल्या, " कावेरी, आजपासून पुढचे चार दिवस तू वाड्याच्या मागच्या खोलीत राहायचं. प्रेमाबाई बाकीचं सर्व सांगतील. वाड्यात कोणत्याही वस्तूला हात लावू नकोस. " त्यांनी प्रेमाबाईंना सांगितलं की, " कावेरी वाड्यामागच्या खोलीत गेल्यावर ही खोली स्वच्छ करा. पवित्र करा. " असं म्हणत त्या तिथून निघून गेल्या. मी अपवित्र आहे का? माझ्या मनात अचानक विचार आला. मग सासूबाई असं का म्हणाल्या? मी काय पाप केलं? मला अचानक वाड्या मागच्या खोलीत का पाठवतायत? एक ना अनेक प्रश्न मला पडले होते. मी प्रेमाबाईंना विचारलं सासूबाई असं का म्हणाल्या? त्यावर त्या एवढंच म्हणाल्या की ' मालकीण बाई तुम्ही मोठ्या झालात. त्यामुळे आता दर महिन्याला तुम्हाला ४ दिवस वाड्याच्या मागच्या खोलीत राहावं लागेल. माझ्यासोबत चला मी तुम्हाला मागे घेऊन जाते. ' मी त्यांच्या मागे चालू लागले.

मला आज माझी तब्बेत नरम वाटतं होती. मागे आले तेव्हा तिथे कोणी नव्हतं. कदाचित दुपारची वेळ असल्यामुळे कोणी नसावं. ताईंच्या खोलीचा दरवाजासुद्धा बंद होता. मला माझे लुगडं थोडं ओलं आहे असं वाटलं. प्रेमाताई पाणी गरम करण्यासाठी न्हनिघरात गेल्या होत्या. लुगडं ओलं कसं बघायला मी हाताने लुगडं थोडं पुढे करून पाहिलं तर ते रक्ताने भिजलं होतं. ते पाहून मी घाबरले आणि जोरात किंचाळले. माझा आवाज ऐकून प्रेमाबाई धावत आल्या आणि सरस्वती ताई सुद्धा बाहेर आल्या. मी रडत होते. दोघींही माझ्याजवळ आल्या तश्या सरस्वती ताईंनी मला विचारलं, " काय झालं? एवढ्या मोठ्याने का ओरडलीस? काही लागला का? " त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठीची काळजी स्पष्ट दिसत होती. मी घाबरतच लुगडं ताईंना दाखवलं. प्रेमाताई सरस्वती ताईंना म्हणाल्या, " मालकीण बाई मी ही गोष्ट थोरल्या मालकीण बाईंना सांगितली आहे. त्यांनीच ह्यांना येथे राहायला सांगितलंय ४ दिवस. " त्यांचं बोलणं ऐकून सरस्वती ताई त्यांना म्हणाल्या, " प्रेमाबाई तुम्ही जा. मी बघते काय ते. " सरस्वती ताईंच बोलणं ऐकून प्रेमाबाई तिथून गेल्या. माझ्या डोळ्यातील असमंजसपणाचे भाव सरस्वती ताईंना कळतं होते. त्यांनी मला न्हणीघरात  नेलं आणि काही गोष्टी समजावल्या.

मला खूप अवघडल्यासारखं वाटतं होतं पण पर्याय नव्हता. मी न्हनिघरातून येईपर्यंत ताईंनी माझी खोलीत व्यवस्थित केली. मी खोलीत गेले खूप प्रश्न पडले होते मला...... "

"मला पण." जानकी मध्येच बोलली.

"तूला आणि काय प्रश्न पडलेत गं?" आजीने विचारलं.
जानकी बोलू लागली, " आजी मी पण ऐकलं होतं मम्मा कडून भारतात असं वागतात म्हणून. बट आज पिरियड येणं चांगली गोष्ट आहे ना? मग असं काय वागतात इंडिया मध्ये? "
आजी काही बोलणार तोच अभिषेक मध्ये जानकीला उत्तर देते, " जानकी, इंडिया मध्ये असं करतात कारण या दिवसात स्त्रियांना आरामाची गरज असते. आता काही लोकं चुकीची प्रथा आहे मोडून काढली पाहिजे असं म्हणतात. काही भागात खरंच खूप वाईट वागतात तिथे बोललंच पाहिजे पण पूर्वी आणि आताही ४ दिवस वेगळं राहावं. "

जानकी म्हणते, " अभिषेक तू आजच्या पिढीतला असून असा विचार करतोस? " अभिषेकचं बोलणं आणि जानकीचा प्रश्न ऐकून समीरासुद्धा अभिषेककडे बघत असते.

क्रमश.....

 

अनोखी गाठ भाग १    #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-1-marathi--kadambari_5839

अनोखी गाठ २  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-2---marathi--kadambari_5870

अनोखी गाठ ३  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-3---marathi--kadambari_5889

अनोखी गाठ ४  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-4---marathi--kadambari_5986

अनोखी गाठ ५   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-5---marathi--kadambari_6023

अनोखी गाठ ६   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-6-marathi-kadambari-_6109

अनोखी गाठ ७  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-7-marathi-kadambari-_6145

अनोखी गाठ ८   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-8-marathi-kadambari-_6221

अनोखी गाठ ९     # मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-9--marathi--kadambari_6331

अनोखी गाठ   भाग १०

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-10---marathi--kadambari_6468

अनोखी गाठ भाग ११ # मराठी _कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-11-marathi-kadambari-_6943

अनोखी गाठ भाग १२ # मराठी _कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-12---marathi--kadambari_6979

अनोखी गाठ  १३  # मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-13---marathi--kadambari_7010

अनोखी गाठ भाग १४    #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-14---marathi--kadambari_7049

अनोखी गाठ भाग १५     #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-15---marathi--kadambari_7090

अनोखी गाठ भाग १६      #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-16----marathi--kadambari_7128

अनोखी गाठ भाग १७       #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-17---marathi--kadambari_7183

अनोखी गाठ भाग १८      #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-18---marathi--kadambari_7220

अनोखी गाठ भाग १९     #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-19---marathi--kadambari_7727

0

🎭 Series Post

View all