Login

अनोखी गाठ भाग २१    # मराठी _ कादंबरी

----------

अनोखी गाठ भाग २१    # मराठी _ कादंबरी


© आरती पाटील


( मागच्या भागात आपण पाहिलं की, कावेरी आजी आपली गोष्ट पुढे सरकवते. कावेरी आजीच्या सासूबाई त्यांच्याशी कठोरपणे वागतात. सकाळी उठायला उशीर झाला म्हणून आधी त्यांना तंबी देतात आणि नंतर आजी हौसेने सर्वांसाठी उपीट बनतात तेव्हा मला न विचारता बनवलं म्हणून ओरडतात. या सर्व गोष्टीत एकटी पडलेली लहान कावेरी बावरते त्या त्यांना न्हान येतं ही गोष्ट प्रेमाबाई त्यांच्या सासूबाईंना सांगतात. सासूबाई कावेरीला वाड्याच्या मागच्या खोलीत जा, कोणाला हात नको लावू, कोणत्या गोष्टीला स्पर्श नको करू एक ना अनेक गोष्टी सांगतात पण नक्की जे सांगायला हवं ते सांगत नाही. प्रेमाबाईंना कावेरीकडे बघायला सांगतात आणि जातात. प्रेमाबाई कावेरीला घेऊन वाड्याच्या मागे येतात. छोटी कावेरी लुगडंयावर डाग पाहून ओरडते. सरस्वती ताई आणि प्रेमाबाई धावत तिच्या जवळ येतात. सरस्वती ताईंच्या प्रकार लक्षात येतो आणि त्या प्रेमबाईंना जायला सांगतात. आणि कावेरीला न्हान करून यायला सांगतात. गोष्ट ऐकत असताना जानकी मध्ये आजीला म्हणते पिरियड येणं चांगली गोष्ट आहे मग असा काय वागायचे वगैरे.... अभिषेक म्हणतो स्त्रियांनी या दिवसात बसावं. या गोष्टीवर जानकी चिडून म्हणते ' तू या आताच्या पिढीचा असून असं बोलतोस?'  समीरा पण या प्रश्नावर अभिषेककडे पाहत असते. आता पुढे....)


जानकीच्या प्रश्नावर अभिषेक म्हणतो, " आजच्या पिढीतला आहे म्हणूनच असं म्हणतोय. मी असं अजिबात नाही म्हणत की स्त्रिया अशुद्ध असतात वगैरे. मला असं म्हणायचं आहे की पूर्वी स्त्रिया पहाटे उठल्यापासून झोपेपर्यंत कामाला जुपल्या असायच्या आणि आताच्या मानाने तेव्हाची काम अवजड होती. जात्यावर दळणे, ताक घुसलने, विहिरीतून पाणी काढते, दुरून पाणी आणणे, कमीत कमी १० ते १५ जणांचा स्वयंपाक बनवणे एक ना अनेक कामे असायची. या दिवसात किती त्रास होतो त्यात अशी कामे केली की त्रास वाढेल म्हणून स्त्रियांनी बाहेर बसावं म्हणजेच आराम करावा असं बोललं जातं. हे झालं आधीच आताच म्हणशील तर आताच्या परिस्थितीत स्त्रियांना जास्त आरामाची गरज असते. बघ आताची स्त्री घराचं सर्व आवरून वेळेत ऑफिसला जाते. प्रवास, ऑफिस काम, मग परत घरी आल्यावर काम अगदी झोपेपर्यंत, त्यातही उद्या सकाळच्या भाजीचही टेन्शन असतं त्यांना. त्या सर्वांत या दिवसात आम्ही पाळत नाही किंवा मानत नाही असं म्हणून त्या दिवसातही काम करतात. त्रास होतोच पण त्यांना ब्रेक मिळत नाही. वर्षानुवर्षे काम मग वयाच्या एका टप्यावर आजारपण शिवाय स्वतःला वेळ न दिल्याची खंत असतेच. आता ज्याने त्याने स्वतःच्या मर्जीने निवडावं पण माझं मत विचारलं तर स्त्री त्या दिवसात मस्त खाऊन - पिवून आराम करावा, छंद जोपसावेत. कोणाला वाचायला आवडते, कोणाला गायला, कोणाला चित्र काढायला आवडतात तर कोणाला कलाकुसर करायला. ४ दिवस यात वेळ घालवला तर स्वतःसाठी जगलेच नाही अशी खंत देखील रहाणार नाही. शिवाय चार दिवस आराम केल्यावर महिनाभर काम करण्यासाठी एक फ्रेशनेस मिळतो.


अभिषेकचं बोलणं आपण चुकीच्या पद्धतीने घेतलं याची जाणीव जानकीला झाली. जानकी अभिषेकला म्हणाली, " सॉरी मला वाटलं... की... "" तूला वाटलं की माझी बुद्धी भारतीय असल्यामुळे बुरसटलेली आहे. बरोबर ना? " अभिषेक जानकीकडे पाहत म्हणतो. जानकी खजिल होते. अभिषेक पुढे बोलतो, " आता भारतातील लोकं पण बदलू लागली आहेत. रूढी - परंपरा आणि विज्ञान याची सांगड घालता येते भारतीयांना ते ही आधी पासूनच. " अभिषेक हसत समीरा आणि जानकीकडे पाहत म्हणाला.


अभिषेक पुढे म्हणतो, " आजी हे सर्व सो, तू सांग पुढे. "  आजी आपल्या गोष्टीकडे वळते, " मी खोलीत आले तेव्हा सरस्वती ताईंनी खोली आवरून ठेवली होती. माझ्या पोटात खूप दुखत होतं शिवाय हात - पाय सुद्धा त्रास देत होते. मी पोटाला हात लावून बसल्याच पाहून सरस्वती ताईनी प्रेमाबाईंना एक निरोप पाठवला. काही वेळाने प्रेमाबाई आल्या आणि त्यांनी एक पिशवी सारखी दिसणारी वस्तू ताईंच्या हातात दिली. तिला वस्तू घेऊन सरस्वती ताई बाहेर गेल्या आणि थोड्या वेळाने आत येवून ती वस्तू माझ्याकडे देत म्हणाल्या, " कावेरी हे घे. यात गरम पाणी आहे याने पोटाला शेक दे आणि मी पाणी कोमट करून आणते ते सारखं पी म्हणजे तूला जास्त त्रास वाटणारं नाही. " ताईंना मी विचारलं, " ताई यात गरम पाणी कसं रहात? पिशवी तर कपडाची असते ना? " ताईंनी हसून उत्तर दिलं, " कावेरी अगं घरातील पुरुष मंडळी बाहेर अनेक ठिकाणी जातात तेव्हा जे नवीन दिसेल ते आणतात. एकदा भाऊजी असेच बाहेर गेले होते कामानिमित्त तिथे पाणी दूर वरून आणावं लागत होतं त्यामुळे पाण्याची ने - आन करण्यासाठी ते लोकं चामडीच्या पिशवीचा वापर करत. भाऊजींना ती पिशवी आवडली आणि येताना ते एक छोटी पिशवी घेऊन आले. पण सासूबाईंना ते आवडलं नाही. चामडयाच्या पिशवीतून पाणी आणणं किंवा पिणं त्यांना पटणारं नव्हतंच. म्हणून ती तशीच पडून होती. आता त्यात गरम पाणी भरून शेक घेतला तर काही फरक पडणार नाही. " ताईंना ते वेळेवर सुचलं म्हणून बरं झालं.


संध्याकाळी प्रेमाबाई माझ्यासाठी जेवण घेऊन आल्या पण आत आल्या नाहीत दरवाज्यात ताट ठेवलं आणि ताट ठेवलंय असं सांगून निघून गेल्या. मला अस्पृश्य असल्यासारखं वाटतं होतं. सरस्वती ताई सोडल्यास कोणी माझ्या बाजूला येतं नव्हतं. माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहीले. ताईंनी मला जवळ घेतलं आणि जेवण भरवू लागल्या आणि समजावू लागल्या, " कावेरी, आज जे तुझ्यासोबत होतंय ते या जगातच्या जवळपास सर्व स्त्रियांसोबत होतं. अगदी माझ्या आणि सासूबाईंसोबत सुद्धा. " मी ताईंकडे बघत, जेवत त्या काय सांगतायत ते ऐकू लागले. त्या पुढे म्हणाल्या, " याला मासिक धर्म म्हणतात. प्रत्येक महिन्यातून चार दिवस असे असतात प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात. ही निसर्गाने स्त्रीला मातृत्वाची दिलेली पहिली - वहिली चाहूल असते. निसर्ग आपण आत मोठे झालो असं सांगत असतो. लोकं आल्याशी या दिवसात फटकून वागतात पण आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. सर्वापासून लांबच राहायचं पण आनंदी राहायचं. दुसऱ्याच्या वागणुकीचा स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. तूला जे करायला आवडतं ते कर. हा तुझा हक्काचा वेळ आहे असं समज. " ताईंनी जे समजावलं त्यामुळे माझी बरीचशी भीती कमी झाली होती. मी ताईंच्या म्हणण्यानुसार या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहायचं ठरवलं.


 झोपतात माझ्या अचानक लक्षात आलं आणि मी सरस्वती ताईंचा हात धरून त्यांना विचारलं, " ताई त्या दिवशी जेव्हा मला मंदिरात जायचं होतं तेव्हा तुम्ही दार का नाही उघडल? " त्यावर सरस्वती ताई म्हणाल्या, " कावेरी तू पहिल्यांदा आपल्या पतिसोबत दर्शनाला जात होतीस. मला भेटून गेली असतीस आणि ही गोष्ट सासूबाईंना समजली असती तर त्या तूला ओरडल्या असत्या. म्हणाल्या असत्या, " पहाटे - पहाटे दर्शनाला जाण्याआधी विधवेच तोंड पाहिलंस वगैरे. " शिवाय एखादं वेळी त्यांनी दर्शनाला जाण सुद्धा रद्द केलं असतं. तूला मिळाली ही संधी माझ्यामुळे गेली असती तर? म्हणून मी दार उघडलं नाही. " सरस्वती ताई माझी आईसारखी काळजी करत होत्या. त्यांच्यासोबत मला खूप छान  वाटतं होतं. दुसऱ्या दिवशी ताईंनी मला अगदी पहाटे उठवून अंघोळ करून यायला सांगितलं. दुसऱ्यांची कामे सुरु असताना मी मध्ये मध्ये व्हयला नको म्हणून.


दुपारी सर्व काम झाल्यानंतर वाडयाच्या मागच्या बाजूला कोणी नव्हतं तेव्हा मी आणि ताई बोलत बसलो होतो. तेव्हा मी ताईंना प्रश्न केला, " ताई मला सासूबाईंनी अचानक वाड्यात का घेतलं ते मला अजून कळलं नाही. " सरस्वती ताई माझ्याकडे बघत म्हणाल्या, " कावेरी मी तूला म्हणाले होते ना, वाड्यातल्या सर्व गोष्टी आज ना उद्या माझ्यापर्यंत येतात. माझ्या देखरेखसाठी ठेवलेल्या बाई त्या अधून मधुन येतात तेव्हा सांगतात. मला सुद्धा सासूबाईंच्या वागण्याचं नवल वाटलं होतं. पण त्यांनी मला कारण सांगितलं. आपली सरकार दरबारीं एका मोठ्या जमिनीचा खटला सुरु होता काही वर्षांपासून. तू ज्या दिवशी लग्न करून आलीस त्याचं दिवशी त्या खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लागला. त्याचे पत्र आपल्याला मिळेपर्यंत बराच वेळ गेला. तोपर्यंत तुझी रवानगी या खोलीत होऊन सत्यनारायण पूजेही झाली होती. आधी सासूबाईंना ही गोष्ट योगायोग वाटली म्हणून त्यांनी त्यांचा हुकूम मागे घेतला नाही. 

वाड्यात एक - एक करून चांगल्या गोष्टी घडू लागल्या. तूला दर्शनाला नेण्यापूर्वी एक महिना आधीच सासूबाईंना बातमी मिळाली की त्यांच्या मुलीला म्हणजेच आपल्या नणंद बाईंना दिवस गेलेत. अनेक वर्षे त्यांना मुलं नव्हतं म्हणून त्यांच्या पतीच दुसरं लग्न लावणार होते तिच्या सासरचे. सासूबाई या गोष्टीला रोखू शकतं नव्हत्या. कारण पहिली पत्नी मुलं देऊ शकत नसेल तर पती दुसरं लग्न करून शकतो आपल्या समाजात. पण वन्सना दिवस गेले आणि तुझा पायगुण म्हणून भाऊजी आणि बाबा ( सासरे ) यांनी सासूबाईंना तूला वाड्यात घ्यावं असं सुचवलं. त्यांनी तूला हट्टाने या खोलीत पाठवलं म्हणून त्यांना तूला वाड्यात घेऊन स्वतःचा शब्द पडू द्यायचा नव्हता. पण मुलीच्या आनंदची बातमी ऐकून त्यांनी मनावर दगड ठेवून तूला वाड्यात घेतलं आहे. त्यांची सत्ता आहे या वाड्यावर. तू आपली त्यांच्या कलाने घे. त्यांना कुठेही असं वाटू देऊ नकोस की तू सुद्धा या वाड्याची मालकीण आहेस. आज ना उद्या तुझ्या हातात सर्व येईलचं पण त्यांना असं वाटलं की त्यांची सत्ता तू घेऊ पाहतेस तर त्या खूप वाईट वागतील. तेव्हा वागताना, बोलताना विचार करून कर. " ताईंनी मला खास शिकवण दिली होती त्यावर मला वाड्यात तग धरायचा होता.


चार दिवस संपत आले आणि माझी आणि सरस्वती ताईंची ताटातूट होण्याची सुद्धा वेळ जवळ आली होती. चौथ्या दिवशी रात्री ताई मला समजावत होत्या. म्हणाल्या, " कावेरी, उद्यापासून तुझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात होणार आहे. आयुष्यात पुढे जाताना धीर आणि संयम नेहमी बांधून ठेवावा. उद्यापासून तूला भाऊजींच्या खोलीत पाठवतील. संसाराची गोड सुरुवात असते. घाबरायचं नाही. मला फार काही कळलं नाही पण ताई म्हणतेय तर त्याला मी मानेनेच होकार दिला. सरस्वती ताईंना पुन्हा भेटायला या खोलीतचं यावं लागणार होतं पुढच्या महिन्यात. तोपर्यंत एकाच ठिकाणी राहूनही आठवण काढत राहायचं. जेवढंच हाती होतं.


क्रमश........ 
 

अनोखी गाठ भाग १    #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-1-marathi--kadambari_5839

अनोखी गाठ २  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-2---marathi--kadambari_5870

अनोखी गाठ ३  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-3---marathi--kadambari_5889

अनोखी गाठ ४  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-4---marathi--kadambari_5986

अनोखी गाठ ५   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-5---marathi--kadambari_6023

अनोखी गाठ ६   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-6-marathi-kadambari-_6109

अनोखी गाठ ७  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-7-marathi-kadambari-_6145

अनोखी गाठ ८   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-8-marathi-kadambari-_6221


अनोखी गाठ ९     # मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-9--marathi--kadambari_6331

अनोखी गाठ   भाग १०

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-10---marathi--kadambari_6468


अनोखी गाठ भाग ११ # मराठी _कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-11-marathi-kadambari-_6943


अनोखी गाठ भाग १२ # मराठी _कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-12---marathi--kadambari_6979

अनोखी गाठ  १३  # मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-13---marathi--kadambari_7010

अनोखी गाठ भाग १४    #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-14---marathi--kadambari_7049

अनोखी गाठ भाग १५     #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-15---marathi--kadambari_7090

अनोखी गाठ भाग १६      #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-16----marathi--kadambari_7128

अनोखी गाठ भाग १७       #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-17---marathi--kadambari_7183

अनोखी गाठ भाग १८      #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-18---marathi--kadambari_7220

अनोखी गाठ भाग १९     #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-19---marathi--kadambari_7727

अनोखी गाठ भाग २०      #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-20----marathi-kadambari-_7806

0

🎭 Series Post

View all