अनोखी गाठ भाग २६ # मराठी _ कादंबरी
© आरती पाटील
( मागच्या भागात आपण पाहिलं की, महादेवराव इनामदार यांनी आपल्या पत्नीला म्हणजेच कावेरीला ," तू घोळ शोधल्यास आणि तूच भाऊरावांना खटला भरून किंवा पंचायत बोलावून शिक्षा दिली तर पूर्ण घराला झळ सोसावी लागेल असं सांगितलंस तेव्हा आता तूच सांग की , भाऊरावांना काय शिक्षा द्यायची ? आणि जो पर्यंत तू सांगत नाहीस तोपर्यंत अभ्यास पुढे जाणार नाही. " यावेळी कावेरीकडे मार्ग नसतो म्हणून ती भाऊरावांना काय शिक्षा करावी यावर विचार करत होती. तिला शिक्षा सुचते आणि ती आपल्या पतीला सांगते. दुसऱ्या दिवशी महादेव राव भाऊराव आणि त्यांच्या वडिलांना बोलावतात. महादेव काका म्हणजेच भाऊरावांचे वडील आपल्या मुलाकडून झालेल्या चुकीबद्दल स्वतः क्षमा मागतात आणि तुम्ही द्याल ती मंजूर आहे असं म्हणतात. महादेव इनामदार आपला निर्णय सांगतात, " भाऊरावांवर खटला भरला तर पूर्ण कुटुंबाला नाहक त्रास होईल म्हणून आम्ही फक्त त्यांच्याकडून लेखापाल / मुनीम ची नोकरी काढून घेत आहोत आणि तुम्हाला शेतावर एका मजुराप्रमाणे काम करावं लागेल." त्यांचा निर्णय ऐकून भाऊराव आणि काकांनी त्यांचे पाय पकडले. आणि महादेवरावांच्या मनात कावेरीबद्दलचा आदर अजून वाढला. आता पुढे........)
" किती भारी ना आजी ." स्वाती डोळे मोठे करत बोलते.
" हो ना , तू किती मोठा प्रॉब्लेम सहज सॉल्व्ह केलास. शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराधाला शिक्षा होऊ नये. असंच वागलीस तू." अभिषेक.
" तुम्ही शांत बसा. आजी तू पुढे सांग." जानकी मध्येच म्हणाली.
आजी आपली गोष्ट पुढे नेते," आदल्या दिवशी जे वाड्यात वातावरण होतं आज त्या उलट होतं. सर्वांना एक समाधान होतं. यातून मला एक ऊर्जा मिळाली. शिक्षण असेल तर आपण खूप गोष्ट योग्य पद्धतीने करून शकतो, शिक्षण असेल तर आयुष्याला एक आधार राहतो. त्या आधीपर्यंत मी शिक्षण फक्त ह्यांच्या साठी घेत होते. या घटनेनंतर मी शिक्षण माझ्या आनंदासाठी आणि समाधानासाठी घेऊ लागले. जेव्हा सरस्वती ताईंना मी ही गोष्ट सांगितली त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. त्या नंतर माझा अभ्यास आधीपेक्षा जास्त जोमाने होतं होता. 'हे' देखील त्यामुळे खुश होते.
असेच दिवस जात होते. एके दिवशी एक माणूस एक पत्र घेऊन आला. ते पत्र सासूबाईंच्या माहेरून आलं होतं. पण वाड्यात ना आबा होते आणि ना 'हे' होते. त्यामुळे पत्र वाचता येत नव्हतं. सासूबाई म्हणाल्या ," राहू दे , 'हे' किंवा महादेव आला की वाचून दाखवेल. पण त्यांचं मन बेचैन होतं , हे कळत होतं मला." मी त्यांना म्हणाले," सासूबाई , 'हे' आणि आबा तालुक्याच्या गावी गेले आहेत . आज काम नाही झालं तर तिथेच थांबतील ते. शिवाय काम वाढल्यास त्यांना तिथून दुसरीकडे जावं लागेल. तोपर्यंत पत्र तसंच ठेवायचं का?" त्यावर सासूबाई म्हणाल्या," मग इथे कोणाला वाचता येतंय? ते आल्याशिवाय काही करू शकत नाही आपण. तू एक काम कर हे पत्र घे आणि माझ्या खोलीत ठेवून ये. " मी वाचू शकते , हे मी त्यांना सांगू शकत नव्हते. हे आल्यावर वाचून दाखवतील. खुशालीच पत्र असणार त्यामुळे हे आल्यावर सुद्धा वाचलेलं चालेल. मी माझ्या मनाची समजूत काढत सासूबाईंच्या खोलीकडे जात होते. कपाटात पत्र ठेवताना माझ्या मनात काय आलं माहित नाही पण मी ते पत्र उघडून वाचू लागले.
पत्र वाचल्यानंतर मी पत्र घेऊन तशीच धावत खाली आले. मी थोडी घाबरले होते. मी विसरून गेले होते की , माझ्या शिक्षणाबद्दल कोणालाही काहीही सांगायचं नाही. मला घाबरलेलं पाहून सासूबाई विचारू लागल्या," काय झालं कावेरी? अशी धावत का आलीस? घाबरलेली का आहेस?" मी त्यांना सांगितलं," सासूबाई, या पत्रात लिहिलं आहे की , तुमच्या भावाची तब्बेत खूप खराब आहे. तुम्हाला आपल्या इथला एक चांगला वैद्य घेऊन लगेच बोलावलं आहे नाही तर जीवावर बेतू शकतं." माझं बोलणं ऐकून त्या मटकन खाली बसल्या. भावाची अवस्था ऐकून त्यांना रडू आवरत नव्हतं. मी त्यांना सावरायचा प्रयत्न करत होते. मी त्यांना म्हणाले," सासूबाई, वैदय नेण्यापेक्षा तुम्ही डॉक्टरांना सोबत न्या. त्यामुळे जास्त फरक पडू शकतो. " मी त्यांच्या जाण्याची तयारी करायला सांगितली. डॉक्टरांना बोलावणं पाठवलं. त्यांच्या कपडे बंधू लागले. त्यांचे कपडे घेऊन मी खाली आले. त्यांच्या काहीतरी लक्षात आलं आणि त्या माझ्यावर उसळल्या," कावेरी,तुला कसं माहित पत्रात काय लिहिलेलं आहे?" मी त्यांच्या प्रश्नाने बावरले. मला सुचत नव्हतं काय बोलावं. त्या माझ्यावर खूप चिडल्या.
मी त्यांना म्हणाले," सासूबाई ही वेळ हा प्रश्न करण्यासाठी योग्य नाही. तुम्ही परत आल्यावर बोलू ." माझ असं बोलणं ऐकून त्या अजूनच चिडल्या. त्या म्हणाल्या," माझ्याच घरात तू मला सांगणार का? योग्य वेळ ? गुन्हा करायचा वर असं उलट बोलायचं ?" मी त्यांना विनंती केली ," सासूबाई मी उलट नाही बोलत. मी फक्त एवढंच म्हणाले की तुम्ही लवकरात लवकर निघा. हे पत्र कधी लिहिलं असेल काय माहित ? आज मिळालं आहे. तुम्हाला उशीर झाला तर अनर्थ होऊ शकतो." त्या माझ्यावर खूप चिडल्या होत्या पण त्यावेळी त्यांना तिथून निघणं क्रमप्राप्त होतं. त्या निघाल्या तेव्हा मी म्हणाले," सासूबाई थोडं थांबा डॉक्टर येतील त्यांना सोबत घेऊन जा." पण त्या चिडल्या होत्या म्हणाल्या," नव्या गोष्टीचा आणि विचारांचं खुळ भरलंय तुला. डॉक्टर काय करणार? मी जाता - जाता वैदय बुवांना घेऊन जातेय. तुझ्याकडे मी आल्यावर बघते." असं म्हणून त्या निघून गेल्या."
" किती वाईट आहे आजी हे ? तू पत्र वाचल्यामुळेच तर त्यांना कळलं ना की, त्यांच्या भाऊ आजारी आहे आणि त्यांना उपचाराची गरज आहे आणि त्यांच्या आधाराची सुद्धा. तरी असं कसं बोलू शकतात त्या. त्यांना एखाद्याच्या आयुष्यापेक्षा स्त्रीने न शिकणं महत्वाचं वाटत ?" समीरा.
"तो काळ तसाच होता बाळा, जीव गेला तरी परंपरा राहिली पाहिजे." आजी म्हणते.
" अगं आजी, तू काय गुन्हा केला नव्हतास ना मग ?" जानकी.
" त्या काळी तो गुन्हाच होता बाळा, सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंनी खूप कष्ट केले स्त्री शिक्षणासाठी पण त्या वेळेपर्यंत ते पडसाद कान्याकोपऱ्यापर्यंत पोहचले नव्हते. " आजी .
" बरं मग पुढे काय झालं?" स्वाती.
आजी पुढे गोष्ट सांगू लागते," सासूबाई गेल्या पण मला आता आपलं काय होणार ? ही भीती वाटत होती. या वाडयात ८ महिन्यांनी प्रवेश मिळाला होता. आता पुढे काय याची कल्पनाही करवत नव्हती. मला कापरं भरली होती. दोन -तीन तासांनी गडी डॉक्टरांना घेऊन आला. सासूबाई कधीच निघून गेल्या होत्या शेवटी पण डॉक्टरांनी म्हणालें," डॉक्टर, माझ्या सासूबाईंचे भाऊ आजारी आहेत. त्यांना नक्की काय झालं आहे माहित नाही पण ते गंभीर आहेत. सासूबाई काळजीत होत्या म्हणून पुढे गेल्या. मी तुमच्या जाण्याची व्यवस्था करते. तुम्ही जाल का ? तू खर्च होईल तुम्हाला देऊ. तुमच्या खाण्या- पिण्याची, राहण्याची सर्व सोय करू. तुमच्या सोबत एक गडी पाठवते. एवढी मदत कराल का ?" माझे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले आणि जायला होकार दिला. मी त्यांच्या सोबत एक गडी दिला आणि त्यांना सासूबाईंच्या माहेरी पाठवलं.
माझी अवस्था खूप वाईट होती. दोन - तीन दिवसांनी सासूबाई परत आल्या. मी त्यांच्यासाठी पाणी घेऊन गेले. त्यांनी पाण्याचा ग्लास जोरात जमिनीवर फेकून दिला. मी घाबरले. त्या म्हणून लागल्या," तू आधी ज्यांच्यासोबत लग्न ठरलं त्याला खाल्लास , त्यानंतर माझ्या मुलावर काय जादू केली काय माहित ? त्याने सगळं माहित असून तुला लग्न करून आणलं. तुझ्यावर दया करून तुला घरात घेतलं. वाडयात येऊन तीन वर्षे जास्तच झाली अजून मुलं नाही. वांज आहेस तू असं असूनही तुला अजून घरात ठेवलं तर तू शिक्षण घेण्याचं पाप करतेस ? लाज नाही वाटत का ? " मला काय बोलावं कळत नव्हतं. मला वांज ठरवून मोकळ्या झाल्या होत्या सासूबाई. हे सर्व ऐकताना खूप त्रास होत होता मला. त्या मला म्हणाल्या," अश्या पापिणीला माझ्या घरात जागा नाही. लगेच निघ या घरून." हे ऐकून मला चक्करच यायची बाकी होती. 'हे' घरी नव्हते. सासूबाई मला घराबाहेर काढत होत्या. मी कुठे जाणार होते? काहीच कळत नव्हतं. मी उभीच आहे हे पाहून त्या चिडल्या आणि माझ्या हाताला धरून मला वाड्याच्या बाहेर ढकललं. संध्याकाळची वेळ होती ती. मी पुढे काय करणार ? माझं वय त्यावेळी जेम- तेम सोळा सुरु होत. जगाची माहिती नाही. घराबाहेर पाऊल ठेवलं नव्हतं कधी. कधी कुठे जायचं झालंच तर चार जण सोबत असायचेच. मी खूप रडत होते. काही वेळा पूर्वी वाड्याची मालकीण होते मी आणि काही क्षणात रस्त्यावर होते. माझी अवस्था खूप वाईट होती.
मी रडत - रडत गोठयात जाऊन बसले. रडून - रडून डोळे सुजले होते. माहेरची तर मी राहिले नव्हते. ज्यावेळी सरस्वती ताईंनी मला सांगितलं होतं की , माझं लग्न होतं त्यादिवशी नवरा मुलगा वारला, त्यानंतर माझ्याच घरचे मला देवाला सोडणार होते. त्यादिवसानंतर मी माहेरी गेलेच नव्हते. आता या घरात पण जागा नाही म्हणजे मला मरण जवळ करणे हीच गोष्ट शिल्लक होती. पोटात भुकेचा डोम उसळला होता आणि डोळ्यात अश्रूंचा. 'हे' कधी येणार हे सुद्धा माहित नव्हतं. पूर्वी एकदा कामासाठी बाहेरगावी गेलेला माणूस परत कधी येईल याची खात्री नसायची. मी गोठयात एका कोपऱ्यात बसून होते. देवाचा धावा करत होते की 'हे' लवकर यावेत. डास , दुर्गंध यामुळे माझा जीव गुदमरत होता. एकवेळ मनात आलं की, सरस्वती ताईकडे जावं धावत पण मग पुन्हा मनाला सावरलं. मला सरस्वती ताईंनी आत घेतलंय हे पाहून सासूबाईंनी ताईंनाच घराबाहेर काढलं तर ? माझं आयुष्य तर पणाला लागलंच होतं पण माझ्यामुळे ताईंना त्रास झालेला मला चालला नसता. 'ती' खोली ताईंची साथी होती, ताईंची सुरक्षा होती. माझ्यामुळे ते सुद्धा गेलं असतं ताईंच्या हातून तर ?
रात्रभर मला झोप नाही लागली. डासांचा त्रास, दुर्गंध , मानसिक ताण एक ना अनेक गोष्टी होत होत्या. सकाळ होता - होता मला सडकून ताप भरला. मी थंडीने कापत होते. अर्धवट शुद्धीत असताना मला ताईंचा आवाज कानावर पडत होता. ताईंनी मला छातीशी घट्ट पकडलं होतं आणि म्हणत होत्या," बाळा ,रात्रभर अशी का राहिलीस ? यायचं होतं माझ्याकडे. ताई म्हणतेस आणि अशी वेड्यासारखी वागतेस ? त्यांनी माझ्या चेहऱ्यावर पाणी मारलं मला थोडी तरतरी आली. मी ताईंना पाहून रडू लागले. त्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी होतं. त्यांनी मला उभं केलं आणि म्हणाल्या," चल माझ्यासोबत ." मी नको म्हणत असताना सुद्धा त्या मला गोठयाच्या बाहेर घेऊन आल्या. ताई मला घेऊन वाड्याच्या मागे जायला वळणार तोच सासूबाई समोर उभ्या राहिल्या."
आजीसोबत जे घडलं ते ऐकून स्वाती, जानकी, समीरा आणि अभिषेकच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
क्रमश........
अनोखी गाठ भाग १ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-1-marathi--kadambari_5839
अनोखी गाठ २ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-2---marathi--kadambari_5870
अनोखी गाठ ३ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-3---marathi--kadambari_5889
अनोखी गाठ ४ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-4---marathi--kadambari_5986
अनोखी गाठ ५ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-5---marathi--kadambari_6023
अनोखी गाठ ६ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-6-marathi-kadambari-_6109
अनोखी गाठ ७ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-7-marathi-kadambari-_6145
अनोखी गाठ ८ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-8-marathi-kadambari-_6221
अनोखी गाठ ९ # मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-9--marathi--kadambari_6331
अनोखी गाठ भाग १०
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-10---marathi--kadambari_6468
अनोखी गाठ भाग ११ # मराठी _कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-11-marathi-kadambari-_6943
अनोखी गाठ भाग १२ # मराठी _कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-12---marathi--kadambari_6979
अनोखी गाठ १३ # मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-13---marathi--kadambari_7010
अनोखी गाठ भाग १४ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-14---marathi--kadambari_7049
अनोखी गाठ भाग १५ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-15---marathi--kadambari_7090
अनोखी गाठ भाग १६ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-16----marathi--kadambari_7128
अनोखी गाठ भाग १७ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-17---marathi--kadambari_7183
अनोखी गाठ भाग १८ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-18---marathi--kadambari_7220
अनोखी गाठ भाग १९ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-19---marathi--kadambari_7727
अनोखी गाठ भाग २० #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-20----marathi-kadambari-_7806
अनोखी गाठ भाग २१ # मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-20--marathi--kadambari_7882
अनोखी गाठ भाग २२ # मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-bhag-22-----marathi-kadambari-_7930
अनोखी गाठ भाग २३ # मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-23----marathi-kadambari-_7945
अनोखी गाठ भाग २४ # मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-24---marathi--kadambari_7973
अनोखी गाठ भाग २५ # मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-25---marathi--kadambari_8004
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा