अनोखी गाठ भाग १ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-1-marathi--kadambari_5839
अनोखी गाठ २ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-2---marathi--kadambari_5870
अनोखी गाठ ३ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-3---marathi--kadambari_5889
अनोखी गाठ ४ #मराठी _ कादंबरी
कावेरी आजी बोलून गेल्यापासून भालचंद्रला आपल्या वागण्यातली चूक कळली होती आणि श्रावणीसाठी त्याला वाईटही वाटतं होतं. तर दुसरीकडे श्रावणीला,' आपल्याला भालचंद्र बद्दल, त्यांच्या स्वप्नांबद्दल, त्यांच्यात असलेल्या महत्वकांक्षेबद्दल सर्व माहित होतं तरी सुद्धा आपण असं वागत होतो याचं वाईट वाटतं होतं. दोघेही जण अपराधबोध मध्ये होते.
भालचंद्र बागेतील काही सुंदर बकुळ फुले घेऊन आपल्या खोलीत येतो आणि विचारात गुंतलेल्या श्रावणीच्या ओंजळीत हळूच ती फुले टाकतो. आपल्यात विचारात गुंतलेली श्रावणी दचकते आणि मागे फिरून बघते तर भालचंद्र कान पकडून उभा असतो. श्रावणीला भरून येतं आणि ती भालचंद्रला मिठी मारते.
"मला माफ कर श्रावणी. मी माझ्याच जगात वावरत होतो. एकत्र कुटुंबात वाढलेली तू. त्या अनोळखी शहरात माझ्यासोबत, माझ्या विश्वासावर आलीस आणि मी? तूला एकटं वाटतं असेल असं माझ्या डोक्यात पण आलं नाही. तूला खूप गृहीत धरलं मी. प्लीज मला माफ कर." भालचंद्र.
भालचंद्रचं बोलणं ऐकून श्रावणीला वाईट वाटतं की, आपला नवरा आपल्यावर किती प्रेम करतो. फक्त आपल्याला वेळ देऊ शकला नाही म्हणून आपण किती दुःखी होऊन बसलो होतो?
श्रावणी सुद्धा भालचंद्रची माफी मागते. ती म्हणते, " तुम्ही माफी नका मागू. मी सुद्धा तुम्हाला समजून घेण्यात कुठे ना कुठे कमी पडलीच आहे ना? वडिलोपार्जित एवढी संपत्ती असताना आपली वेगळी ओळख करण्यासाठी,एवढा कष्ट करणारा नवरा मिळाला आहे मला. काहीजण तर स्वतः काही करत नाही अपयशाचं खापर बायकोवर फोडतात. तिचा पायगुण म्हणून हिन वागणूक देतात. आणि माझा नवरा एवढा मेहनती आणि भक्कम असून मी मात्र दुसरीच बाजू बघत राहीले. मला पण तुम्ही क्षमा करा. "
दोन मन त्या वेळी मनात साचलेलं बोलून मोकळी झाली. दोन व्यक्तींमधलं एक नाजूक धागा असलेलं नातं त्या दिवशी घडवून आणलेल्या त्या सुसंवादने न तुटता अजूनच घट्ट झालं होतं. हा सुसंवाद आता कधीही कमी होणार नव्हता. ते नातं आता प्रत्येक ऋतूमध्ये बहरणार होतं.
कावेरी आजीची दोघांच्या नात्याबद्दल खात्री झाल्यानंतर आजीने भालचंद्रला अमेरिकाला जाण्याची परवानगी दिली. एका छोट्याश्या गावात जन्मलेल्या श्रावणीने कधी स्वप्नातही परदेशीं जाण्याचा विचार केला नव्हता पण आज भाग्य तिला सात समुद्रा पार नेणार होतं. सासर - माहेर दोन्हीकडे कौतुक तर होतंच पण हुरहूर पण होती. आपली मुलं आपल्या नजरे आड सात समुद्रा पार असणार म्हणून कंठ दाटला होता. वर्षे दोन वर्षातून येऊन भेटेन असं म्हणून भालचंद्रने आणि श्रावणीने सर्वांचा निरोप घेतला.
.............….................
अमेरिकेत स्थिरस्थावर व्हायला, तिथल्या वातावरणाशी जुळवून घ्यायला थोडा वेळ लागला. सुरुवातीला श्रावणीला तिथे फारच विचित्र वाटत होतं. छोटे - छोटे कपडे घालणाऱ्या मुली, गळ्यात गळे घालून फिरणारी मुले - मुली, आई - वडील हयात असताना वेगळी राहणारी मुले. आई - वडील, शिक्षक मुलांना ओरडू शकत नव्हते तर मारण्याचा तर प्रश्नच येतं नाही. आणि भारतात ओढणी सुद्धा इकडे तिकडे झालेले चालायची नाही. मुलं - मुली गळ्यात गळे घालून फिरणं तर दूरच, मुलगा - मुलगी एकटे बोलताना जरी दिसले तर प्रलय यायचा ( अगदी नातेवाईक, लांबचे नातेवाईक, शेजारी किंवा शेजार्यांचे नातेवाईक कोणीही असो, तुमची मुलगी एका मुलाशी बोलताना पाहिली ही बातमी मुलगी पोहचायच्या आधी घरी पोहचलेली असायची) . आई - वडिलांचा मार तर लांबची गोष्ट, त्यांची नजरच आम्हाला दहशत म्हणून पुरेशी होती. आणि शिक्षणाचा मार खाल्याशिवाय शाळा पूर्णच होऊ शकत नाही. घरच्यांपासून वेगळं राहण्याचा तर प्रश्नच येतं नव्हता.
नव्या वातावरणात, नव्या संस्कृतिशी जुळवून घेताना श्रावणीला नक्कीच खूप त्रास झाला परंतू तिला तिथल्या काही गोष्टी मनापासून आवडल्या. तिला तिथली स्वच्छता आवडली. तिथे प्रत्येक जण आपल्याकडून कचरा होणार नाही याची खबरदारी घ्यायचा. तिथले लोकं स्वावलंबी होते. प्रत्येकजण स्वतःच काम स्वतः करत होते. भेदभाव फारसा जाणवला नाही तिला. आपण स्त्री - पुरुष समानता म्हणतो पण तिथे लोकं ते अमलात आणत होते. तिथली लोकं मदतीला धावून येतं होते. तिथल्या प्रशासनाने नागरिकांची पुरेपूर काळजी घेतलेली श्रावणीला जाणवत होती. प्रत्येकाला आपले निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार होता. एवढं असूनही एक शिस्त दिसत होती त्या देशात. आपल्या हक्काबरोबर आपल्या कर्तव्याचं पालनही सर्वजण त्याचं पद्धतीने करत होते. आणि या गोष्टी श्रावणीला आवडतात.
श्रावणी हळूहळू स्वतःला त्या वातावरणात ढाळते पण या सर्वांत ती स्वत्व हरवू देत नाही. सुरुवातीला तिचा गोंधळ उडत असे. इंग्लिश ती गावातल्या शाळेत सातवी नंतर शिकली होती, ते ही I, AM, IS, ARE...... त्यात अमेरिकेतील इंग्रजी बोलण्याची पद्धत वेगळी त्यामुळे सुरुवातीला तिला समोरचा काय बोलतोय हे कळायला वेळ लागायचा. पण श्रावणीने स्वतः मध्ये हळूहळू बदल केला. ती इंग्रजी शिकली, स्वतः गाडी चालवू लागली. पण मराठीपण रक्तातच होतं ना. एवढ्या मोठ्या अमेरिकेत सुद्धा तिने हिंदू मंदिर शोधून काढलं. आठवड्यातून एकदा तरी ती मंदिरात जात असे. तिथेच तिच्या ओळखी तिथे वसलेल्या भारतीयांशी झाल्या. त्यामुळे तिला खूप बरं वाटलं.
सुरुवातीला अधूनमधून ते भारतात आपल्या गावी यायचे भेटायला पण हळूहळू भालचंद्राचा व्याप वाढला आणि भारतात जाणं कमी -कमी होवून नंतर - नंतर अशक्य होऊ लागलं. यथा अवकाश त्यांच्या संसारवेलीवर दोन कळ्या उमलल्या, समीरा आणि जानकी नावाच्या.
श्रावणी आपल्या मुलींमध्ये भारतीय संस्कार रुजवण्याचा पूर्ण प्रयन्त करते पण अमेरिकेत जन्मलेल्या, तिथे वाढत असेल्या आणि जन्मापासून आजूबाजूला तेच वातावरण पाहिल्यामुळे मुलींमध्ये परदेशाच्या मातीत भारतीय संस्कारांची बीजे रुजत नव्हती. श्रावणीला माहित होतं त्यासाठी मातीसुद्धा भारताचीच लागेल, त्यामुळे ती बऱ्याचदा भालचंद्रला अधूनमधून भारत जाण्याविषयी बोलें पण यश, कीर्तीच्या मागे भालचंद्रला वेळ मिळत नव्हता. परिणामी मुली अमेरिकन होतं होत्या.
........,..................
हॉल मध्ये टीव्ही सुरु झाला आणि त्या आवाजाने श्रावणीच मन भूतकाळातून पुन्हा वर्तमानात आलं होतं. गॅसवर कॉफी उकळत होती. श्रावणी गॅस बंद करते आणि कॉफी घेऊन ती पुन्हा भालचंद्रच्या बेडरूम मध्ये येवून बसते. समोर भालचंद्र झोपला होता पण त्याच्या चेहऱ्यावर ताण दिसतंच होता. आपल्या मुली अमेरिकेत वाढल्या असल्या तरी, कधीतरी आपली मुलगी येवून आपण लिवइन मध्ये रहाणार आहोत असा निर्णय सांगेल असं दोघांनाही वाटलं नव्हतं.
श्रावणीच्या समोर मुलींच्या बालपणापासूनचे चित्र फिरू लागले. एक - एक प्रसंग दिसू लागले. त्यांचं रांगनं, हळूहळू ढोपरवर चालणं, दिसेल ती वस्तू खेचणं, बोबड बोलणं, बाबा घरी असेल तेव्हा त्यांच्या केसांना रबर लावणं, सायकलीसाठी केलेला हट्ट, आणि सायकल घेतल्यानंतर त्यावरून पडणं. एक ना अनेक आठवणी आज पाठपुरावा करत होत्या.
समीरा आणि जानकीच्या शाळेचा पहिला दिवस आठवला. शाळेसाठी बॅग , बुक्स , वॉटर बॉटल , टिफिन खरेदी करताना मला अशीच बॅग हवी. त्यावर कार्टून हवं. वॉटर बॉटल वर प्रिन्सेस हवी. बुक्स कव्हरला टॉम अँड जेरीचे स्टिकर्स हवे एक ना अनेक मागण्या. सर्व डोळ्यासमोर तरळत होतं.
जे होत आहे ते कसं थांबवायचं ? लिवइन बद्दल ऐकूनच भालचंद्रची ही स्थिती झालीये, पुढे कसं होणार ? काहीतरी मार्ग काढणं गरजेचं होतं. त्यामुळे मन शांत आणि स्थिर करण्यासाठी श्रावणी मंदिरात जायला निघते. मंदिरात पोहचेपर्यंत तिच्या मनात अनेक विचार पिंगा घालत होते. मंदिरात पोहचल्यावर तिथल्या निर्मळ वातावरणात तिला जरा बरं वाटलं. दर्शन घेतल्यानंतर ती मंदिरात डोळे लावून बसली. थोडया वेळाने तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. तिने चमकून मागे पहिले तर , अमेरिकेत आल्यावर पहिल्यांदा याच मंदिरात त्यांच्यासोबत ओळख झाली होती त्याच होत्या ' रश्मी देसाई'. बऱ्याच महिन्यात त्यांची भेट झाली नव्हती. आणि आज खूप दिवसांनी त्या दोघी भेटल्या होत्या.
रश्मीने श्रावणीला विचारलं आज चेहरा मलूल का दिसतोय ? काही झालं आहे का ? श्रावणीच्या डोळ्यात पाणी तरळलं . श्रावणीने सर्व प्रकार रश्मी देसाईंना सांगितला. त्या बोलू लागल्या, " श्रावणी आपण या देशात आपला देश सोडून एक महत्वकांक्षा घेऊन येतो, पुढे जाण्याची. आपण त्यात बऱ्याचदा यशस्वी देखील होतो पण एका वेळेनंतर लक्षात येत की आपण जेवढा कमावलं त्यापेक्षा खूप काही गमावलं सुद्धा असतं. आपण आपल्या देशात राहिलो , लहानपणी तिथले संस्कार आपल्यावर झालेत. त्यामुळे आपण कितीही प्रगती केली तरी कुठेतरी आपल्या मनात ते संस्कार असतात आणि या वातावरणात जन्मलेली आणि वाढलेली मुले ,त्यांनी काही निर्णय घेतला की चुकीचे वाटू लागतात. पण खरंतर त्यांच्या लेखी ते बरोबर असतं. "
"म्हणजे आता माझ्या मनात समीराला थांबवण्याचा विचार येतोय तो चुकीचा आहे का ?" श्रावणी .
" अजिबात नाही. आपली मुलं चुकीच्या मार्गावर जात असतील तर ते चुकीचंच आहे आणि आपण त्यांना योग्य तो मार्ग दाखवायलाच हवा. फक्त वेगळ्या पद्धतीने. नाहीतर माझ्यासारखं होईल तुझं देखील." रश्मी.
" तुझ्यासारखं म्हणजे ?" श्रावणी.
" माझ्या मुलाने सुद्धा लिवइन मध्ये राहण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी आम्हाला सांगितलं होता. आम्ही पण तुझ्याचसारखे हवालदिल झालो आणि आमच्यात कधी नव्हे तो भारतीय पालक जागा झाला. आम्ही त्यावर स्पष्ट नाही सांगितलं. तो ऐकायला तयार नव्हता तर आम्ही त्याच्यावर हे न करण्याकरिता दबाव टाकला आणि इथेच आमचं चुकलं. आम्ही त्याच्या मनाचा विचार करून हळूहळू त्याच्या कलेनं त्याला समजवायला हवं होत. हळूहळू त्याला कळलं देखील असतं पण आमचा राग अनावर झाला होता. त्यावरचा दबाव वाढला आणि त्याने आमच्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली. तुला तर माहीतच आहे की , या देशात आपल्या मुलांवर देखील आपला हक्क नसतो. दोन महिने आम्ही जेलमध्ये होतो. माझ्या मुलगा त्या मुलीसोबत निघून गेला. खूप गोष्टी गमावल्या होत्या मी. सत्य परिस्थिती आम्ही स्वीकारली, रादर स्वीकारावी लागली. अजून दोन महिन्यांनी हॉस्पिटल मधून कॉल आला की ताबडतोब हॉस्पिटल मध्ये या तुमच्या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हे ऐकून आभाळ कोसळलं आमच्यावर. आम्ही धावतपळत हॉस्पिटलला गेलो. तिथे पाहिलं तर त्याच्या पायाला प्लास्टर होत, डोक्याला पट्टी होती, अंगावर खूप जखमा होत्या. रडू आवरत नव्हतं मला.
चौकशी केल्यावर कळलं की त्या मुलीच आधी लग्न झालं होतं. आणि ती डिवोर्स न घेताच याच्यासोबत राहत होती. शिवाय तिने हि गोष्ट माझ्या मुलापासून लपवली होती. जेव्हा माझ्या मुलाला ही गोष्ट कळली तेव्हा तो जाब विचारायला गेला. ती म्हणाली की मी कोणालाही उत्तर द्यायला बांधील नाही. शिवाय ती आता त्याला सोडून दुसऱ्या मुलासोबत राहायला जात असल्याचं कळलं. माझ्या मुलाला हे सर्व सहन झालं नाही आणि त्याने टेरेस वरून उडी मारली. म्हणून इतके दिवस मी मंदिरात येत नव्हते.
त्याची आम्ही खूप काळजी घेतली. प्रेम दिलं, त्याला विश्वासात घेतलं. तो बरा झाला पण त्याचा पाय पूर्ण बरा नाही झाला. चालताना थोडा लंगडतो तो आता. पण देवाचे आभार की माझा मुलगा जिवंत आहे. त्याचे वडील त्याच्याशी आजही बोलत नाहीत. आपल्याच मुलाने आपल्याला तुरुंगात पाठवलं ही गोष्ट अजूनही सलते त्यांना. त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू दिसतात मला. पण कायमच अधूपन आणि वडिलांच्या मनात कायमची एक अढी असं सर्व झालंय. त्यामुळे मी सल्ला देतेय तूम्ही घाईत काहीही करू नका. तिला समजावण्याचा प्रयत्न करा." रश्मी.
रश्मीचं बोलणं ऐकून श्रावणीच्या काहीतरी डोक्यात आलं. आणि आता ती आपल्या मुलीला यातून बाहेर काढायला सज्ज झाली.....
क्रमश ..............
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा