Login

अनोखी गाठ  ४९        # मराठी _ कादंबरी

-------

अनोखी गाठ  ४९                 # मराठी _ कादंबरी

© आरती पाटील

( मागच्या भागात आपण पाहिलं की,  समीरा आणि अभिषेकमधलं प्रेम बहरू लागलं आहे. काशीच्या दिव्य वातावरणात चौघे आनंद घेत आणि आणि सरस्वती आजीचा शोध सुद्धा सुरु आहे. दोन दिवस शोधाशोध करूनही समाधानकारक माहिती मिळत नाही. संध्या- आरतीसाठी घाटावर आल्यावर अभिषेकाची भेट एका साधू बाबांसोबत होते. बोलण्या बोलण्यात अभिषेक साधूबाबांना आपण आपली पणजी सरस्वती आजीला शोधायला आल्याचे सांगतो. साधूबाबा ते एका सरस्वती नावाच्या स्त्रीला अनेक वर्षांपूर्वी भेटल्याचे सांगतात. अभिषेक त्यांच्या कडून पत्ता घेतो. साधूबाबा अभिषेकला सांगतात की, ती स्त्री तुझी पणजीच असेल याची खात्री त्यांना नाही. अभिषेक स्वाती, जानकी आणि समीराला सर्व सांगतो पण सर्वजण प्रयत्न करून बघायचं ठरवतात. आता पुढे........)  

हॉटेलवर.......

स्वाती - दादा तुला खात्री आहे का ? की साधूबाबा ज्यांच्याबद्दल बोलले त्या सरस्वती आजीचं आहेत ?

अभिषेक - नाही...... पण एकदा प्रयत्न करून बघुयात. त्या नसतील तरी तिथून सरस्वती आजी विषयी दुसरी काही माहिती मिळते का ? ते पाहू.

समीरा - बरोबर... आपण आलो आहोत तर प्रत्येक शक्यता पडताळून पाहुयात. 

जानकी -  आय अग्री ....

स्वाती - हो आलो आहोत तर प्रयत्न तर करायचे . मी फक्त विचारलं की , काय वाटतं त्या आपल्या आजीचं असतील का ? असो उद्यासाठी मी खूप उत्सुक आहे. ( हात जोडून ) देवा काशी- विश्वेश्वरा एवढी वर्षे आजीने तुलाच दिलीत, आता आम्हांला तिचा सहवास आणि प्रेम मिळू दे. 

अभिषेक - तथास्तु .... .

सर्वजण त्याच्याकडे पाहून स्मितहास्य करतात. 

दुसऱ्या दिवशी.........

अभिषेक एका गाडीला हात दाखवून थांबवतो आणि त्या आश्रमाबद्दल विचारतो. गाडीवाल्याला ती जागा माहित असल्यामुळे सर्वजण त्या गाडीतून निघतात. 

जानकी- मला ना खूप छान वाटतंय असं वाटतंय की काहीतरी हाती नक्की लग्न आज. 

समीरा - तसंच होईल. ( गाडीच्या मागच्या सीटवर बसलेली समीरा पुढ्याच्या सीटवर बसलेल्या अभिषेककडे आरश्यात पाहत म्हणते.) 

सर्वांना आजच्या दिवसात सकारत्मकता जाणवत असते. काही वेळाने गाडी एका शांत जागी थांबते. ड्राइव्हर एका रस्त्याकडे हात दाखवतो सांगतो की ," या रस्त्याने ५ मिनिटे सरळ चालत गेलात की समोर आश्रम दिसेल. विधवा , महिला आश्रम असल्यामुळे थोड्या शांत जागी आहे. " अभिषेक त्यांना पैसे देत , त्यांचे आभार मानत सर्वांसोबत त्या रस्त्याने चालू लागतो.  सर्वांना सरस्वती आजीला भेटण्याची ओढ लागली होती. कुठेतरी मनात सर्वांना वाटत होतं की आजी भेटेल आपल्याला. थोड्या वेळ चालल्यावर त्यांना समोर एक जुना आश्रम दिसू लागला. आश्रम जुन्या बांधणीचा तरी भक्कम आणि मजबूत दिसत होता. 

चौघे आत आले तसे त्यांना एका २० - २२ वर्षाच्या मुलाने रोखलं. अभिषेकने त्याला आपण आपल्या आजीला शोधत आल्याचे सांगितले. त्या मुलाने चौघांना बाहेर बाकड्यावर बसायला सांगितले आणि आत गेला. एक १० मिनिटांनंतर एक  वय वर्षे ५० च्या आसपासची बाई आली आणि त्यांची चौकशी करू लागली. 

त्या बाई-  नमस्कार, मी सुमती, या आश्रमाची व्यवस्थापक. आपलं नक्की काय काम आहे ? 

जानकी स्वातीच्या कानात विचारते," व्यवस्थापक म्हणजे ? " 

स्वाती - ( हळू आवाजात ) मॅनेजर . 

जानकी-  ओह....

अभिषेक ( सुमतीजी ना  ) - नमस्कार, मी अभिषेक. खरंतर आम्हांला आमच्या पणजी आजीबद्दल काही दिवसांपूर्वी कळलं. त्यावेळी जे झालं त्यात बदल नाही करता येणार पण आता आम्हांला आजीला शोधायचं आहे. एका साधूबाबांची काल घाटावर भेट झाली. त्यांनी इथला पत्ता दिला. आम्ही फक्त चौकशीसाठी आलो आहोत. आमची तुम्हाला नम्र विनंती आहे की आम्हांला थोडं सहकार्य करा.  

जानकी पुन्हा स्वातीच्या कानात विचारते," सहकार्य म्हणजे ? "

स्वाती जानकीला कोपर मारते आणि म्हणते," नंतर एकदम विचार सर्व. नंतर सांगेन." 

सुमती- ठीक आहे.  तुम्ही आत ऑफिसमध्ये या. 

सुमती सर्वांना घेऊन आश्रमाच्या ऑफिसमध्ये येतात. त्यांना समोर बसवतात आणि म्हणतात. 

सुमती - मी तुम्हांला माहिती देईन पण त्याआधी तुमच्या सर्वांचे २ -२ ओळखपत्र मला द्या. मी प्रिंट करून ऑफिस रेकॉर्डला ठेवीन. त्यानंतर माहिती तुम्हांला देईन. 

स्वाती- पण असं का ? आम्ही तर फक्त चौकशीसाठी आलो आहोत. 

सुमती - बरोबर आहे. तुम्ही फक्त चौकशीसाठी आला आहेत पण असं सर्वजण येऊन इथल्या स्त्रियांविषयी चौकशी करू लागला आणि उद्या काही प्रसंग ओढवला तर जबाबदारी कोण घेणार ? आमच्याकडे तुमच्या डिटेल्स हव्या ना ? 

अभिषेक - काही हरकत नाही मॅडम, आम्ही देतो तुम्हाला आमचे कागदपत्र फक्त आम्हाला माहिती द्या. ( असं म्हणून अभिषेकने आपल्या बॅगमधून ओळखपत्र काढले. ते पाहून बाकीच्यांनी सुद्धा आपले ओळखपत्र दिले.) 

सुमतीजी सर्वांच्या प्रिंट घेऊन त्यांना त्यांचे ओळखपत्र परत करतात. 

सुमती - हा आता विचारा तुम्हांला काय विचारायचं आहे ? 

अभिषेक - आमच्या चुलत पणजीला काही कारणांमुळे काशीला यावं लागलं. त्यांचं नाव ' सरस्वती '.  त्यांच्या बद्दल आम्हांला आता काही दिवसांपूर्वी कळालं आणि त्यांचा शोध घेत आम्ही या आश्रमपर्यंत आलो आहोत. आम्हांला फक्त एवढी माहिती हवी आहे की कोणी सरस्वती नावाच्या वयस्कर आजी इथे राहतात का ? 

सुमती - मी गेले २० वर्षे इथे काम करते. आतापर्यंत या आश्रमात ४ सरस्वती आल्या. त्यापैकी ३ मी इथे यायच्या आधीपासून होत्या तर १ मी आल्यावर वर्षभराने आल्या. म्हणजे आधीच्या ३ तुमच्या पणजीच्या वयाच्या. त्यामधल्या १ सरस्वती वृद्धपकाळाने ४ वर्षांपूर्वी वारल्या. एक हा आश्रम सोडून स्वतः निघून गेल्या. त्यांच्याबद्दल आता आम्हांला माहिती नाही आणि एक आहेत त्या काही दिवसांपूर्वी द्वारकेला गेल्या आहेत. उद्या येतील. आज भेट नाही होऊ शकत. 

अभिषेक- आता आम्हाला कसं कळणार की यामध्ये आमची पणजी आहे की नाही ? 

सुमती - फाईल मध्ये फॉर्मला लावलेले फोटो आहेत. हवं तर मी ते दाखवते. 

अभिषेक - मॅडम, त्यांच्याबद्दल आम्हांला कळलंच काही दिवसांपूर्वी. आम्ही त्यांना कधीच पाहिलेलं नाहीये. फोटो पहिला तरी आम्ही नाही सांगू शकत की त्यातली आमची पणजी कोणती.

सुमती - मग तुम्ही उद्या या. मी त्यांच्याशी भेट करून देईन. 

समीरा - मॅडम, एक विनंती करू का ? 

सुमती- बोला ना.

समीरा - आज आम्ही इथे थांबू का ? उद्या आजींना भेटूनच जाऊ. म्हणजे तुमची हरकत नसेल तर. आम्ही कोणालाही त्रास देणार नाही.  

स्वाती - हो मॅडम, आम्ही हवं तर आश्रमाच्या कॉरिडॉर मध्ये थांबू आत पण येणार नाही. खूप दिवस आम्ही आजीला शोधतोय. त्यांना भेटल्याशिवाय जायची इच्छा नाही होत. तुम्ही आमचे कागदपत्र पण घेतले आहेतच ना.  

सुमती मॅडमना त्यांच्या डोळ्यातला खरेपणा जाणवतो त्यामुळे त्यांचं मन मोडवत नाही. त्या म्हणतात.

सुमती- ठीक आहे. तुमच्यासाठी एक खोली देते पण तुमच्यामुळे इथं कोणाला त्रास झाला नाही पाहिजे. कारण इथे प्रत्येक स्त्री स्वतःच्या विश्वात असते. समाजाने त्यांना या जगात जागा दिली नाही. त्यामुळं त्यांनी स्वतःच जग तयार केलं आहे. त्यात त्यांना त्रास चालत नाही. 

स्वाती- नाही मॅडम, शब्द देतो आम्ही आमच्याकडून कोणाला इथे त्रास होणार नाही. 

सुमती मॅडम त्यांना ए खोली दाखवून जातात. एक छोटेखानी कौलारू खोली. मोठी खिडकी त्यामुळे खेळती हवा. बाहेर मोठं - मोठी हिरवीगार झाडे. खोलीत एक बाजूला दोन चटई आणि काही सतरंजी होत्या. सुविधा काही नव्हत्या तरी सुद्धा मनाला प्रसन्न वाटत होतं. 

सर्वजण आपापलं सामान ठेवून खोली न्याहाळत होते. थोड्या वेळाने आधी ज्या मुलाने अडवलं होतं , त्यानेच येऊन जेवायला बोलावलं. सूर्यास्तापूर्वी आश्रमात जेवण होत असे. अगदी साधं- सात्विक जेवण होतं. त्याची चव सुद्धा गोड लागत होती. जेवण झाल्यावर सार्वज खोलीत आले अन त्यांच्यात बोलणं सूरु झालं. 

समीरा - काय वाटत अभि, आपल्याला सारस्वत आजी भेटतील ? आपण फक सरस्वती नावावरून शोधत आलो आहोत. 

अभिषेक - माहित नाही. इथे आजच्या युगात सोसिअल मीडिया असून हरवलेल्याना शोधणं कठीण आहे. त्यात सरस्वती आजींना कसं शोधणार ? पण प्रयत्नांती परमेश्वर म्हणायचं आणि सुरु ठेवायचं. 

स्वाती- एक सरस्वती आजी वारल्या असं म्हणाल्या त्या. त्या आपल्या सरस्वती आजी असतील तर ? किंवा ज्या आश्रम सोडून गेल्या त्या असतील तर ? कळणार कसं ? 

जानकी- हो ना , त्यांचा फोटो वगैरे पण नाही आपल्याकडे. जुना सुद्धा.

अभिषेक - आत सकारत्मक विचार करा. उद्या द्वारकेवरून येणाऱ्या सरस्वती आजींशी बोलू. त्यांच्या कडून आपल्याला बाकी २ आजी विषयी चौकशी करता येईल. एवढे वर्षे त्या सोबत होत्या म्हणजे त्यांना माहित असेल की बाकी दोघींचं मूळ गाव कोणतं वगैरे. त्यातून सुद्धा माहिती मिळू शकते. 

समीरा - हो, प्रयत्न तर करूच शकतो. 

सर्वजण मानेने एक सकारात्मक होकार देतात आणि झोपेची तयार करतात. उद्याचा सूर्य नक्की काय घेऊन येतोय याची वाट पाहत असतात. 

क्रमश :  .........

0

🎭 Series Post

View all