Login

अनोखी गाठ ७ मराठी कादंबरी

--------

अनोखी गाठ भाग १    #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-1-marathi--kadambari_5839

अनोखी गाठ २  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-2---marathi--kadambari_5870

अनोखी गाठ ३  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-3---marathi--kadambari_5889

अनोखी गाठ ४  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-4---marathi--kadambari_5986

अनोखी गाठ ५   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-5---marathi--kadambari_6023

अनोखी गाठ ६   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-6-marathi-kadambari-_6109

अनोखी गाठ ७  #मराठी _ कादंबरी

गाडी वाड्याजवळ थांबली. सॅम, जेनी आणि स्वाती गाडीतून उतरत असताना वाड्यातून आवाज ऐकू येतो. सॅम म्हणते, " एवढा आवाज कसला आहे? आत काही झालंय का? "
त्यावर स्वाती म्हणते, " नाही गं सर्वजण आले असतील तुम्हाला भेटायला म्हणून एवढा आवाज येतोय. "
" एवढा आवाज येतोय. आम्हाला भेटायला एवढी लोक आले आहेत? " जेनी.
" ते आत गेल्यावर कळेलच. " तरुण.

सर्वजण आत जातात आणि अपेक्षेप्रमाणे सर्वजण सॅम आणि जेनीला भेटायला आलेले असतात. एवढी लोक पाहून दोघीना जरा गांगरायला होतं. स्वाती परिस्थिती सांभाळत म्हणते, " आजी, मी, समीरा आणि जानकी जरा  पायावर पाणी घेऊन येतो. " स्वाती त्यांना घेऊन आत जाते आणि समीरा म्हणते, " अगं किती लोक आहेत बाहेर आणि आम्ही कोणालाही ओळखत नाही. आम्ही त्यांच्याशी काय बोलणार? बाहेर जायलाचं हवं का? "
त्यावर स्वाती म्हणते, " अगं असं काय करतेस? ते सर्व तुम्हालाच भेटायला आले आहेत. बाहेर जायलाच पाहिजे का म्हणजे काय विचारतेस? आणि ओळखीचं म्हणशील तर भेटल्याशिवाय ओळख कशी होणार? तसही जवळजवळ सर्व आपल्या जवळ आणि लांबचे नातेवाईकच आहेत. त्यामुळे टेन्शन नका घेवू. आजी ओळख करून देईल सर्वांशी. "
दोघीही नाईलाजाने मान हलवतात.

तिघींही फ्रेश होऊन बाहेर येतात. आजी एक एक करून सर्वाशी ओळख करून देते. सर्वजण दोघीना बघून खुश होतात. त्यांची चौकशी करतात. विचारतात किती दिवस आहात? त्यानुसार प्रत्येकाकडे एक एक दिवस जेवायला या. असं आमंत्रण देतात. स्वाती सर्वांसाठी चहा घेऊन येते. अश्या वातावरणाची सॅम आणि जेनीला सवय नव्हती शिवाय असं प्रत्येकाकडे जेवायला जाणं तेही फारशी काही ओळख नसताना त्यांना पटत नव्हतं.  आजी म्हणते, " महिनाभर तरी त्या आहेत इथे तेव्हा येतील आरामात त्या जेवायला. " चहा पाणी उरकून सर्वजण दोघीना भेटून जातात.

सॅम - जेनी टेन्शन मध्ये असतात.आजीने सर्वांना त्या दोघी घरी जेवायला येतील असं सांगितल्यापासून. सॅम टेन्शन मध्ये इकडे - तिकडे फिरत असते, तोच समोर येणाऱ्या 'त्या ' तरुणाचा धक्का सॅमला लागतो. सॅमला खूप राग येतो. ती म्हणते, " बघून चालता येतं नाही का? " त्यावर तो तरुण म्हणतो, " मॅडम, हेच मी सुद्धा बोलू शकतो. " सॅम अजूनच चिडते. ती काही बोलणार तोच तो तरुण हात पुढे करून म्हणतो," हा तुमचा नवीन फोन आणि सिमकार्ड, याने तुम्ही इंटरनॅशनल कॉल सुद्धा करू शकता. आजीने सांगितलं होतं.आणि हो आजीने तुम्हां दोघीना जेवायला खाली बोलावलं आहे. फोन पाहून सॅम खुश होते. " मॉम - डॅडला पण पोहचल्यावर कॉल केला नव्हता. " सॅम स्वतःशीच बोलते. त्यावर तरुण म्हणतो, " मी सकाळी तुम्ही उठायच्या आधीच तुमच्या घरी कॉल करून तुम्ही पोहचल्याच कळवलं होतं. " असं बोलून तो निघून जातो.

सॅम नवीन फोन सुरु करते आणि डेव्हिडला फोन करत असते. पण फोन लागत नाही. कंटाळून ती आणि जेनी जेवायला खाली जातात. जेवताना आज आपण जरा जास्तच जेवलो असं दोघीना वाटलं. जेवण झाल्यावर सॅम म्हणाली, "आजी मला खूप काही विचारायचं आहे तूला." त्यावर आजी म्हणते, " बाळा आज नको, आज तुम्ही खूप थकला आहात. शिवाय जानकीच्या डोळ्यांवर झोप आहे. आज आराम करा आपण उद्या बोलूयात. " आजीचं बोलणं मान्य करून दोघीही झोपायला निघून जातात.

सकाळी सॅमची झोप एका आवाजामुळे मोडते. तीची चिडचिड होते. ती कसला आवाज आहे हे पहायला खिडकीत येते. बाहेर तोच तरुण बैलांना काही शिकवत होता. सॅम खिडकीतून त्याला विचारते, " दुसरं कोणी भेटलं नाही का शिकवणीसाठी? " त्यावर तो म्हणतो, " कसं आहे ना, माणसांना मी सांगितलेलं पटत नाही, त्यांना मी सांगितलेलं दुसरीकडून कन्फर्म करायचं असतं. आणि या बैलांचं म्हणशील तर मी सांगेन ते त्यांना पटत आणि ते ऐकतात सुद्धा. " ( हसत )
हे ऐकून सॅमला त्याचा राग येतो आणि ती काहीही न बोलता निघून जाते. छान तयार होऊन आणि नाश्ता करून दोघीजणी स्वातीसोबत बाहेर फिरायला जातात. गावाचा आठवडी बाजार असतो. सॅम आणि जेनी लहान मुलांप्रमाणे तिथे खरेदी करत असतात. त्यांना असं पाहून स्वातीलाही हसू येतं असतं. सर्व शॉपिंग करून तिघींही पुन्हा वाड्यावर येतात.

संध्याकाळी वाड्यात आरती झाल्यावर आजी समीराला नैवद्याचं ताट आतून आणायला सांगते. समीरा स्वयंपाक घरात जाते आणि पहाते तर स्वाती सर्व ताट वाढत होती. ती स्वातीला नैवद्याच्या ताट बद्दल विचारते. तेव्हा स्वाती हाताने इशारा करून दाखवते. नैवद्याचं ताट नेताना ती आजूबाजूची ताटे सुद्धा पाहत होती तेव्हा तिच्या लक्षात येतं की बाकी सर्व ताटात मीठ वाढलं आहे फक्त नैवद्याच्या ताटात नाही वाढलं, कदाचित घाईघाईत स्वातीकडून राहिलं असेल म्हणून स्वाती स्वतः नैवद्याच्या ताटात मीठ वाढायला जाते, तोच स्वातीचं लक्ष तिच्याकडे जातं. स्वाती पटकन ओरडते, " थांब, समीरा मीठ नको वाढू त्या ताटात. "  समीरा स्वातीकडे प्रश्नात्मक नजरेने पहाते. आणि विचारते, " बाकी सर्व ताटात तर वाढलं आहे  ना? मग नैवद्याच्या ताटात का नको? "
" ते तू आजीलाच विचार. मी फक्त एवढंच सांगू शकते की नैवद्याच्या ताटात कधीही मीठ वाढत नाहीत. " स्वाती.

समीरा जरा नवलंच वाटतं.

नैवेद्य दाखवून सर्वजण जेवण करतात. रात्री सर्वजण बाहेर बसतात तेव्हा समीरा आजीला म्हणते, " आजी काल मला खूप काही विचारायचं होतं पण तू आराम करायला सांगितलंस, आज तरी सांग. " आजी हसते आणि म्हणते, " विचार बाळा विचार, काय काय विचारायचं आहे सर्व विचार. "
समीरा बोलायला सुरुवात करते, " आजी आधी मला सांग अमेरिका आणि इंडिया च्या फूड मध्ये फरक असेल पण मिल्क मध्ये कसा? इथलं मिल्क वेगळा आहे टेस्टला. "
आजी म्हणते, " अरे बाळा, ती अमेरिका आहे. तिथे सर्व वस्तू पॅकेट मध्ये असते आणि पॅकेट मधील वस्तू जास्त वेळ टीकावी म्हणून त्यात प्रेजर्वेटिव्ह मिक्स करतात. पॅकेट मधल्या जवळजवळ सर्व वस्तूंवर वस्तू / पदार्थ जास्त काळ टीकावी म्हणून त्यावर एक प्रकारे रासायनिक प्रक्रिया केली जाते. आणि आपल्या घरी सगळं अस्सल असतं. शिवाय आपल्या घरी दूध पूर्णपणे गोवरीवर तापवलं जातं. त्यामुळे पण चव वाढते त्याची. "

आजीच प्रेजर्वेटिव्ह आणि इतर ज्ञान पाहून समीरा आणि जानकी चकित होतात. समीरा पुढे विचारते, " आजी आम्ही काल मंदिरात गेलो होतो तेव्हा मंदिराच्या भिंतीवर काही चित्र होती. त्यामध्ये एक चित्र होतं ते म्हणजे एक माणूस एका बाईचे केस ओढतोय. असं इंडिया मध्ये आधी पासूनच आहे ना? "
आजी म्हणते, " बाळा, पहिली गोष्ट म्हणजे ते चित्र महाभारतातलं आहे. दुशासन द्रौपदीला दरबारात केसाला धरून खेचून आणतो तो प्रसंग आहे. त्यामुळे पुढे खूप मोठं युद्ध झालं. ते खूप मोठं आहे. तू आहेस ना इथे तर तुला रोज थोडं थोडं सांगेन. आता दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रीवर अत्याचार होणारा भारत एकमेव देश नाहीये. जवळजवळ सर्वच देशात स्रियावर अन्याय झाला आहे. मध्ययुगीन इतिहास वाचला अशील तर लक्षात येईल की अमेरिका, युरोप, रशिया, चीन इतकंच कशाला तर जपान सारख्या देशात सुद्धा स्त्रियांवर अन्याय झाला आहे. आणि इतर देशाच्या तुलनेत भारतात कमी आहे. असो तू कदाचित वेगळा इतिहास वाचला अशील तू आहेस ना तोपर्यंत मी तुला खऱ्या इतिहासाशी ओळख करून देईन हो. "

जसं जशी आजी प्रश्नाची उत्तर देत होती तसं तसं समीरा आणि जानकीची उत्सुकता अजून वाढत होती. समीरा पुढचा प्रश्न विचारते, " आजी आज नैवद्याचं ताट वाढताना मी मीठ वाढायला गेले तर स्वातीने मला थांबवलं आणि म्हणाली की ' नैवद्याच्या ताटात मीठ वाढत नाही. असं का? आणि सर्वांच्या ताटात मीठ आहे आणि देवाच्याच नाही तर ते ताट अपूर्ण नाही का? " समीराचा प्रश्न ऐकून आजीला हसू आलं. आजी म्हणाली, " बाळा, भारतात अनेक प्रथा आणि परंपरा आहेत. बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला ते पटेल असं नाही. आणि सर्वच प्रथा बरोबर आहेत असंही नाही. पण काही प्रथा - परंपरा आपल्यासाठी चांगल्या आहेत. एक - दोन प्रथा चुकीच्या असू शकतात, सर्वच नाही ना बाळा. आता बघ, स्त्रिया लग्नानंतर काही दागिने घालावेच लागतात. जसं मंगळसूत्र, जोडवी, पैंजण, बांगडी वैगेरे. काहींना वाटतं की स्त्रियांना का घालव लागतं? पुरुषांना का नाही? स्त्रियावर अन्याय आहे हा. पण खरं पाहिलं तर लग्नानंतर एका स्त्रीच्या शरीरात खूप बदल होतात. तुम्ही म्हणता ना हॉर्मान्स वगैरे तेच. त्यावेळी आपल्या शरीरातील सर्व चक्र स्थिर ठेवण्यासाठी या गोष्टी मदत करतात. सहस्त्रार चक्र ते मुलाधार चक्र सर्व नियंत्रित ठेवते. कपाळावरच कुंकू, गळ्यात असलेलं डोरलं, तुमचं एक एक चक्र नियंत्रित करतो. पैंजण, जोडवी चांदीचे असल्यामुळे शरीरातील गरमी नियंत्रित करते. जोडवी पायाच्या एका विशिष्ट बोटात घालून ते दाबतात त्यामुळे काही विशिष्ट नसा दाबल्या जातात त्यामुळे शरीर संतुलित राहतं.  बांगडी आणि करगोटा यामुळे आपल्या नसांवर एक विशिष्ट वजन राहतं त्यामुळे ते सुद्धा संतुलित रहात. गजरा आधी सर्व बायका आवडीने लावायच्या आता फारस कोणी नाही लावत. पण गजरा किंवा फूल लावल्यामुळे त्यांच्या मधल्या थंडाव्यामुळे डोकं थंड राहतं, उष्माघात वगैरे नाही होतं त्यामुळे ते सुद्धा महत्वाचं आहे. आपल्या पूर्वजानीं / ग्रंथात दिलेले १६ शृंगार केले तर स्त्रियांचे ४० - ६० % आजार बरे होतील किंवा होणारच नाहीत.

तुम्ही म्हणता स्त्री - पुरुष समानता आहे त्यामुळे मुलींनी दारू पिली तर काय बिघडतं? मान्य आहे स्त्री - पुरुष समानता आहे. आणि स्त्रीला हवं ते करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. तो तिचा हक्क सुद्धा आहे. पण कसं आहे ना बाळा, स्त्रीला आपलं शरीर स्वतःच जपायला हवं. पुरुषाचं ठीक आहे. त्यांना ना दर महिन्याला मासिक धर्म आणि ना बाळंतपनाच्या कळा, पण स्त्रीच्या शरीरात सतत बदल होतं असतो. त्यामुळे दारुमुळे ते शरीर आधीच खराब करून घेऊ नये एवढंच मला म्हणायचं आहे. आधीच दारुमुळे खराब आणि कमकुवत शरीरातून सुदृढ बाळ कसं जन्म घेईल?"

आजी पुढे बोलतात,"आता तू म्हणालीस त्या मुद्यावर येऊ. नैवद्याच्या ताटात मीठ का वाढत नाही? तर नीट ऐक मी तुला अध्यात्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारण सांगते. पूर्वी प्रत्येक घरात ५ नैवेद्य बनवायचे, काही घरात आजही बनवतात. एक देवाला, दुसरा तुलसीला, तिसरा गायीला, चौथा अग्नीला म्हणजेच चुलीला आणि पाचवा कुत्र्याला किंवा इतर प्राण्याला. अध्यात्मिक कारण असं म्हणत की, देवाला नैवेद्य मध्ये वेगळं मीठ वाढणं म्हणजे आपण आपला अहंभाव देवाला दाखवतो किंवा वाढतो. मीठ हे अहंभावाचं प्रतीक असतं. आता वैज्ञानिक कारण, आता आपण देवाला नैवेद्य दाखवला की तेच ताट घरातील कोणी जेवायला घेतो पण पूर्वी असं नव्हतं. देवाला दाखवलेला नैवेद्य देवाचाच असायचा.दुसऱ्या दिवशी तो नैवेद्य उचलायचे. मिठाला उघड्यावर असेल तर त्याला पटकन पाणी सुटतं. त्यामुळे बाकीचे पदार्थ त्या पाण्यामुळे खराब होतात. रात्रभर तसंच राहिल्यामुळे बुरशीसुद्धा पकडते. म्हणजेच जंतू तयार होतात. आता नैवेद्य उचलायला जाणाऱ्या प्रत्येकाची रोग प्रतिकारक शक्ती चांगली असेलच असे नाही. त्यामुळे त्या जंतूमुळे त्या व्यक्तीला अनेक रोग होऊ शकतात. त्यामुळे पूर्वी नैवेद्यच्या ताटात मीठ वाढलं आणि कोणी आजारी पडलं तर देव कोपला वगैरे म्हणायचे.  त्यामुळे नैवेद्यच्या ताटात मीठ वाढत नाही. कळलं का? " आजी हसून विचारते.

सॅम आणि जानकी सस्मित होऊन होकार देतात. त्यांना या सर्व गोष्टींचा कधी विचारच केला नव्हता. या सगळ्यावरून एक गोष्ट तर सॅम आणि जेनीला नक्की कळली होती की आपली आजी खूप हूशार आणि अपडेट आहे.

क्रमश......

0

🎭 Series Post

View all