Login

अनोखी नात्यांची गाठ भाग ४

Anokhi Natyanchi Gatha
ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
संघ वनिता

अनोखी नात्यांची गाठ भाग ४

आज ती कोणाची तरी आक्का झाली होती. कोणाची बहीण हेच तिला खूप सुखावह वाटत होतं. ती जांभळी नवी कोरी साडी नेसून तिनं तुटक्या आरशात पाहिलं. आज ती खूप गोजिरवाणी दिसत होती. स्वतःकडे बघून खुदकन हसली. सगळे आवरून ती तिच्या कामाला निघाली.

सुंदर खडे असणारी राखी तिनं बॉक्स मधून वेगळी ठेवली. त्याला देण्यासाठी तिच्याकडे काही नव्हतंच. तिच्या मनात शंका आली.
“येईल का तो?”
“ येणारच तो तिचे मन तिला सांगत होते”. इकडे त्याची परिस्थिती पण वेगळी नव्हती का कोण जाणे त्याचे मन त्याला सांगत होते की हिचं आणि आपलं जन्माच नातं आहे. सिग्नल वर घडलेला सगळा प्रसंग त्याने आपल्या आईला सांगितला. आई बोलली, “दादा काळजी करू नको मी पण तुझ्यासोबत येते. कदाचित आपल्याला आपली सोनू भेटेल. “देवा ती मुलगी आमची सोनूच असू दे रे बाबा”.असे बोलून ते झोपी गेले.

दोघांच्या मनात मात्र भेटीची हुरहूर लागली. किती दिवसांनी असा एखादा आनंदाचा क्षण येतो, की त्यांची आपण कधी कल्पना केलेली नसते. ती वाट पहात उभी राहिली. आपले काम करत राहिली. एकदाचा तो क्षण आला. दोघांनी लांबून एकमेकांना बघितले.

तो स्कुटर घेऊन तिच्याजवळ आला. एका बाजूला स्कूटर उभी केली. आज तो एकटा नव्हता. कुणीतरी वयस्कर बाई त्याच्यासोबत आली होती. गाडी लाऊन उभा राहिला “आक्का, मी आलोय.” आक्का तू माझ्या शब्दाचा मान ठेवला,
ही साडी नेसून आली खूप छान वाटलं.
“ अगं तुझ्यावर हा रंग खूप छान दिसतो.”
“जणू असे वाटते की तूच माझी ताई आहेस.”
पाठीमागे असणाऱ्या बाईची त्याने मायाला ओळख करून दिली.


आक्का ही माझी आई आणि आई ही आपली आक्का. काल मी तुला सांगितले होते ना की आपली हरवलेली साडी सापडली. ह्याच त्या बाई त्यांना साडी सापडली. दोघी एकमेकींकडे बघून हसल्या. जणू काही एकमेकींना त्या बऱ्याच दिवसापासून ओळखत होत्या.
तो बोलला “आक्का, राखी बांधतेस ना ?”
तिनं आशाळभूत नजरेने त्याच्याकडे पाहिलं. त्यानं मानेनंच होकार भरला आणि हात पुढे केला.

तिनं आपल्या पिशवीतून राखी काढली आणि त्याच्या हातात बांधली.मायाला खूप आनंद झाला कोणीतरी हक्काचं माणूस तिला भाऊ म्हणून मिळाला होता. या आयुष्यात प्रेमाने आम्ही हक्काने राखी बांधून घेणारा भाऊ भाऊराया तिला मिळाला. तिला खूप आनंद झाला, गहिवरून आलं. नकळत दादा म्हणून हुंदका दाटून आला.

त्याच्या आईनं तिच्याकडे प्रेमाने पाहिलं, तिला आपल्या हातातील मिठाई भरवली आणि जवळ घेतलं. तिचा हात हातात घेतला आणि एकदम ओरडल्या,
“ तुझ्या हाताला गाठ आहे.”
“पाठीवर पण हाये ना गाठ?”
“ हो नं पोरी.”
माया हो बोलली.
“तुम्हांस कसं ठाव माझ्या पाठीवर गाठ आहे ते?”
“ बाळा माझ्या लेकीच्या हातावर आणि पाठीवर अशीच गाठ होती.” एक आईला आपलं लेकरू कसं आहे हे सगळं माहित असतं गं. माझी लेक सोनू मला आई म्हणायची. पोरा ही नक्की तुझी आक्काच आहे. माझं मन मला सांगतय. पोरी तुला एक विचारू?
“तुला कृष्ण आवडतो का?”