ओ ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
संघ वनिता
संघ वनिता
अनोखी नात्यांची गाठ भाग ५ अंतिम
आईने आपल्या पिशवीतून छोटी मातीची कृष्णाची मूर्ती काढली. सोनू हीच ती मूर्ती तू लहानपणी घेऊन खूप खेळायची. तुला कृष्ण खूप आवडायचां. कृष्णाची मूर्ती तिला ओळखीची वाट होती.
भर रस्त्याच्या कडेला भान विसरून त्याच्या आईनं तिला जवळ घेतलं आणि तिचे मुका घ्यायला सुरुवात केली. मायाला कळत नव्हते की यावर काय प्रतिक्रया द्यावी. आज एक अनोळखी बाई तिला आपली मुलगी म्हणत होती.

दादा बोलला “आई, खरं सांगते का गं”
हीच “माझी आक्का आहे का?”
“हो र पोरा ही तुझी आक्का आहे.”
तिच्या हातावरची ही गाठ बघ ह्यावर थोडासा काळसर डाग आहे. आपल्या सोनूच्या हातावर पण असाच होता. मी तुला खात्रीने सांगते की तुझी बहीण आहे. माझी सोनू असे म्हणून ती माऊली रडायला लागली. दोघांनी तिला सावरले.

त्या बोलल्या “पोरी तू सहा वर्षांची होती तेव्हा तुझ्या हातावर आणि एक पाठीवर गाठ आली होती”. तुझ्या बापाला वाटलं कॅन्सरची गाठ आहे. कॅन्सर वर खर्च करायला खूप पैसे लागतात.
त्यात आपली गरिबी. एवढा खर्च पोरीवर कोण करणार म्हणून कुठेतरी तुला सोडून आला. मला बोलला,“आपली पोरगी हरवली”.
मी खूप रागावले चिडले असा कसा पोटचा गोळा तुम्ही हरवला सांगा ना? मी खूप रडले. त्याचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. काही दिवसांनी त्यालाच कॅन्सर झाला. तुझा बाप जग सोडून गेला.

मरण्याआधी तुझ्या बापाने स्वतःचा गुन्हा माझ्याजवळ कबूल केला. तेव्हा मला कळले की माझी मुलगी जिवंत आहे. तेव्हापासून तुला शोधतो गं पोरी “माझी सोनूली बाय.”
“सोनू कुठं होती तू?”
“मी खूप शोधलं तुला बाळा”,
तू हरवलीस तेव्हा खूप लहान होती.
“मला कशी ओळखणार” पण देवाची इच्छा बघा ती पिशवी काय पडावी, तुझी आणि दादांची भेट व्हावी. चल, बाळा आपल्या घरी जाऊ. पण देवाने ऐकले ग आपले आणि आपली भेट घडवून आणली.
“पोरा, आता हिला नाही इथं राहू द्यायचं.” नाहीतर मी राहीन तिच्याबरोबर.
“माझी सोनू बाय ”
अशी सिग्नलवर राहते. बाळा ह्या आईला माफ कर. इतके दिवस तुला शोधू नाही शकले. याचं खूप वाईट वाटतं.आईचं हृदय पिळवटून निघालं.
“आक्का”, आपण चल घरी जाऊ जन्माच्या गाठी अशा पक्क्या असतात. या गाठीवरून तू भेटलीस. मला माझी हक्काची बहीण मिळाली. आक्का आपल्या घरी चल.
माया गांगरून गेली होती. आज अनपेक्षितपणे तिचं नशीब उजळून निघालं होतं. एक सुखद धक्का तिला मिळाला. रक्षाबंधनाच्या दिवशी रक्षण करणार भाऊ आणि मायेने जवळ घेणारी आई दोघं ही भेटली होती.
तिने कमरेला बांधलेली मोठी सुरी तिथेच फेकून दिली. सुरीची गरज संपली होती आज तिचा आवडीचा कृष्ण आणि रक्षणकर्ता भाऊ, दोघे ही तिच्या सोबत होते. आज खऱ्या अर्थाने मायाला तिच्या हक्काची माणसं मिळाली होती. इतक्या दिवस शरीरावर असणारी गाठेने तिला तिच्या हक्काचं घरं मिळवून दिल होतं.अनोखी नात्याची गाठ आज पक्की झाली होती. आज खऱ्या अर्थाने तिचे रक्षाबंधन पूर्ण झाले होते.

बहिण भावाच्या प्रेमाला
नाही तोड जगात कशाची,
भाऊ असे जर पाठीराखा
नसे जीवनी झळ दुःखाची.
समाप्त
ॲड श्रद्धा मगर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा