मागील भागात आपण पाहिले की, सर्वांच्या छान गप्पा सुरू असताना अचानक सुपर्णा हर्षच्या घरी येते. आता पाहुयात पुढे...
"काय हे सुपर्णा! एवढा कसला विचार करतेस? ही सगळी तुझीच तर माणसे आहेत. घाबरु नकोस अगं...आत ये." सुपर्णा आली नि निलम काकीच्या आनंदाला जणू उधाण आले.
निलम काकी थोडी जास्तच विचित्र वागत होती. याचा अर्थ सुपर्णाला घरी बोलावून पुन्हा एकदा तिने मोठे कारस्थान रचले होते. हे अगदी सहज आणि स्पष्ट कोणाच्याही लक्षात येण्यासारखे होते.
सुपर्णा मात्र एक नाही की दोन नाही. सर्वांची नजर तिला आणखीच अपराधीपणाची भावना देऊन गेली.
'आता कोणत्या तोंडाने आत जावे?' हा प्रश्न तिच्यापुढे होताच.
'आता कोणत्या तोंडाने आत जावे?' हा प्रश्न तिच्यापुढे होताच.
धाडस करून ती आत गेली.
"कसे आहात तुम्ही सगळे?" घाबरतच तिने प्रश्न केला.
"देवाच्या कृपेने अजून तरी ठिकठाक आहोत. नाहीतर तुमच्यासारख्या काही स्वार्थी लोकांच्या वागण्यामुळे अधूनमधून त्रास सुरुच असतो." आजी सुपर्णाला खूपच तोडून बोलली.
आजीचे हे असे परकेपणाचे बोलणे सुपर्णाच्या खूपच जिव्हारी लागले. नयना ताईंना तर काय बोलावे तेच कळेना.
'जेवढं मी सुपर्णाला ओळखते त्यावरुन सुपर्णा इतकीही वाईट मुलगी नाही. हा...फक्त पटकन् कोणाच्याही बोलण्यात येणारी मात्र नक्की आहे. याचा अर्थ त्यावेळी देखील निलमनेच हिला फितवले होते. आताही तसेच वाटत आहे. निलमनेच मुद्दाम तिला इथे बोलावले असणार!'
हर्ष तर तिच्याकडे पाठ करुनच उभा होता. एवढे सगळे होऊन गेल्यावर सुपर्णाचे असे घरी येणे त्याला बिलकुल आवडले नव्हते.
"बस ना तू, थांब मी पाणी आणते तुझ्यासाठी." निलम काकीला सुपर्णाला कुठे ठेवू नि कुठे नाही असेच झाले होते. सुपर्णाला पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.
आई मी निघतो गं. तसंही मला एक खूप महत्त्वाची मीटिंग अटेंड करायची आहे. नेत्रा, तू लगेच येणार आहेस का? येणार असशील तर चल, मी जाता जाता तुला ड्रॉप करतो." एवढे बोलून हर्ष तयारी करण्यासाठी त्याच्या रुममधे निघून गेला. नेत्रा मात्र तिथेच अडखळली.
सुपर्णा हर्षच्या पाठमोऱ्या आकृतीकडे क्षणभर बघतच राहिली. जुन्या आठवणींनी नकळतपणे तिचे डोळे पाणावले.
सुपर्णा हर्षच्या पाठमोऱ्या आकृतीकडे क्षणभर बघतच राहिली. जुन्या आठवणींनी नकळतपणे तिचे डोळे पाणावले.
'ही मुलगी का आली असेल इथे?' नेत्राच्या डोक्यात विचारांचे काहूर उठले होते.
"मला तुमच्यासोबत महत्त्वाचे बोलायचे आहे." सर्वांचा अंदाज घेत सुपर्णा बोलली.
"अगं आधी बस तर तू. हे पाणी घे. मग आरामात बोल तुला जे बोलायचे आहे ते."
सगळेजण निलम काकीकडे अवाक् होऊन नुसते पाहत होते.
'नेमकं काय सुरू आहे हिच्या डोक्यात?' खुणेनेच नयना ताईंनी आजीला विचारले.
'काय माहित'...दोन्ही खांदे उडवत आजीनेही लगेचच रिप्लाय दिला.
"तुम्ही सगळेजण असे का भूत बघितल्यासारखे तिच्याकडे बघत आहात? बसा की, ती इथे तुमच्याशी बोलायला आली आहे. हो ना सुपर्णा?" निलम काकी मोठ्या तोऱ्यात बोलली.
त्यामुळे आजी आणि आईदेखील लगेचच सोफ्यावर टेकल्या. नेत्रा मात्र आहे तिथेच उभी होती. अचानक सुपर्णा घरी आल्यामुळे तिही कन्फ्युज झाली होती.
"तू का ढिम्म उभी? बस की तू पण! की तुला वेगळं सांगायला हवंय." रागातच निलम काकी नेत्राला म्हणाली. घाबरुन तीही मग नयना ताईंच्या शेजारी सोफ्यावर बसली.
"बरं नेत्रा चल! येतेस ना? मी जाता जाता तुला घरी ड्रॉप करतो."
हर्ष आवरुन बाहेर आला आणि नेत्राला म्हणाला.
हर्ष आवरुन बाहेर आला आणि नेत्राला म्हणाला.
"अरे हर्ष तू जा. ती जाईल नंतर. तसंही तिला ड्रॉप करायचं म्हणजे तुला पूर्ण वळसा घालून जावं लागेल. तोपर्यंत तू ऑफिसला पोहोचशील सुद्धा. त्यात तुझी महत्त्वाची मीटिंग. उगीच तुला उशीर नको व्हायला." निलम काकी प्रमाणापेक्षा थोडं जास्तच गोड सुरात बोलली.
खुणेनेच मग नेत्राने हर्षला जायला सांगितले. काहीही न बोलता तो तसाच निघून गेला. सुपर्णाकडे त्याने पाहिलेदेखील नाही.
"हा बोल सुपर्णा, काहीतरी सांगायचे होते ना तुला?" निलम काकी आल्यापासून मोजून दहा ते पंधरा वेळा हे एकच वाक्य बोलली असेल.
'निलम सुपर्णाला एवढा फोर्स का करत आहे? नेमकं काय सांगावं तिने, अशी निलमची अपेक्षा आहे?' नयना ताई मनातून विचार करु लागल्या.
"काकू, आजी... सर्वात आधी जमलं तर मला माफ करा. माहित आहे, मी जे काही वागले ते माफीच्या लायक नाहीच. पण तरीही शक्य झाल्यास मला माफ करा." बोलता बोलता सुपर्णाचे डोळे पाणावले.
निलम ककिने चमकून रागातच सुपर्णाकडे पाहिले.
'ही काय बोलायला आली आहे इथे आणि काय बोलत आहे?' निलम काकी क्षणभर विचारांत पडली.
"अगं..सगळं झाल्यावर आता माफी मागून काय उपयोग? काही गोष्टींचा आधीच विचार करायला हवा होतास तू. आम्हाला नाही निदान हर्षला तरी विश्वासात घ्यायला हवं होतंस. आधीच तो किती हळवा आहे, हे तुलाही चांगलंच माहित होतं; तरीही तू त्याचं मन तोडलंस." आजीने थोड्या स्पष्ट शब्दांतच सुपर्णाला सुनावले.
"म्हणजे तू इथे सर्वांची माफी मागायला आली आहेस? " निलम काकी रागातच बोलली.
"हो.." एक रागीट नजर निलम काकीवर टाकत सुपर्णा उत्तरली.
"हे जर असंच करायचं होतं तुला, तर मग पाठीमागे या सर्वांविषयी काहीबाही बोलण्याची गरजच काय होती?" निलम काकी आता सुपर्णाला चुकीचे ठरवण्यासाठी प्रयत्न करू लागली.
"काकी प्लीज! एकदा तुमच्या बोलण्यात येऊन मी माझ्या आयुष्याचं हे असं मातेरं करून घेतलं आहे. निदान आतातरी सर्वांची माफी मागून मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करु द्या आणि हाती आलेली ही संधी मला गमावयची नाही." सुपर्णा स्पष्टच बोलली.
"हे काय सुरु आहे तुम्हा दोघींचे? आम्हाला कळेल का?" न राहवून नयना ताई बोलल्या.
"बघा की ताई..किती खोटारडी मुलगी आहे ही. हिचे खायचे दात एक आणि दाखवायचे भलतेच." सुपर्णाकडे रागाने कटाक्ष टाकत निलमकाकी बोलली.
"निलम...आम्ही काही घरात डोळे झाकून फिरत नाही हे लक्षात असू दे. आम्हाला आधीपासूनच डाऊट होता, या सगळ्यांत तुझा हात आहे. पण तरीही मनात कुठेतरी विचार यायचा, तू इतक्या खालच्या पातळीला जायची नाही. पण शेवटी आमचा खूप मोठा गैरसमज आज दूर झाला. आता बिलकुल सारवासारव करु नकोस आणि आणखी एक, आतापर्यंत माझ्या हर्षच्या प्रत्येक सुखाच्या आड तू आली आहेस, आम्ही गप्प बसतो म्हणजे आम्हाला मूर्ख समजू नकोस. त्या लेकराने तुझे काय घोडे मारले आहे गं? दरवेळी त्याला पाण्यात बघत असतेस!" आजीने सुनेला बरेच काही सुनावले.
सुपर्णाकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत निलम काकी तिच्या खोलीत निघून गेली. इतक्यात तरी ती माघार घेणाऱ्यातली नव्हती. परंतु, सुपर्णाने मात्र ह्यावेळी तिचाच डाव तिच्यावरच पलटवला. सर्वांसमोर तिलाच तोंडघशी पाडले.
"सुपर्णा माहीत नाही तिने तुला काय सांगितले, पण तूही तिच्या बोलण्यात येशील असे स्वप्नातही वाटले नव्हते." नयना ताई म्हणाल्या.
"काकू... काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि म्हणूनच देव त्या त्या वेळी आपल्याला तशी बुद्धी देतो. मीदेखील ऐनवेळी चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला. पण असो, माझं या घरात येणं हे देवालाच मान्य नसावं आणि म्हणूनच मी निलम काकीच्या बोलण्यात आले.
हर्ष कसा वाईट मुलगा आहे, तू त्याच्या पेक्षाही जास्त हुशार मुलगा डिझर्व्ह करतेस... निलम काकींच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून मी दुसऱ्या मुलाला होकार दिला.
एवढेच नाही तर हर्ष खोटे बोलतो तुझ्यासोबत, अधूनमधून ड्रिंक देखील करतो. हल्ली खूपच वाढत चाललंय हे त्याचं. अशा बऱ्याच गोष्टी निलम काकींनी माझ्या डोक्यात भरवल्या आणि मीही अविचाराने कोणतीही शहानिशा न करता त्यांच्या बोलण्यात आले. हर्षबद्दल मी खूपच चुकीचा विचार केला. इतक्या वर्षांपासून मी त्याला ओळखते पण तरीही मी चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवला. आज मात्र त्याच गोष्टीची मी शिक्षा भोगत आहे असेच मनातून वाटते.
तसेही आपण जे पेरतो तेच उगवते, हा सृष्टीचा नियम माझ्या एकटीसाठी थोडीच ना बदलणार आहे. जे दुःख मी हर्षला आणि तुम्हा सर्वांना दिले तेच परतून आता माझ्या वाट्याला आले." रडवेल्या सुरात सुपर्णा बोलली.
हर्ष कसा वाईट मुलगा आहे, तू त्याच्या पेक्षाही जास्त हुशार मुलगा डिझर्व्ह करतेस... निलम काकींच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून मी दुसऱ्या मुलाला होकार दिला.
एवढेच नाही तर हर्ष खोटे बोलतो तुझ्यासोबत, अधूनमधून ड्रिंक देखील करतो. हल्ली खूपच वाढत चाललंय हे त्याचं. अशा बऱ्याच गोष्टी निलम काकींनी माझ्या डोक्यात भरवल्या आणि मीही अविचाराने कोणतीही शहानिशा न करता त्यांच्या बोलण्यात आले. हर्षबद्दल मी खूपच चुकीचा विचार केला. इतक्या वर्षांपासून मी त्याला ओळखते पण तरीही मी चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवला. आज मात्र त्याच गोष्टीची मी शिक्षा भोगत आहे असेच मनातून वाटते.
तसेही आपण जे पेरतो तेच उगवते, हा सृष्टीचा नियम माझ्या एकटीसाठी थोडीच ना बदलणार आहे. जे दुःख मी हर्षला आणि तुम्हा सर्वांना दिले तेच परतून आता माझ्या वाट्याला आले." रडवेल्या सुरात सुपर्णा बोलली.
इतक्या दिवसांपासून मनात खदखदत असलेल्या गोष्टी अखेर सुपर्णाच्या ओठांवर आल्याच.
एवढे बोलून पाणावलेल्या डोळ्यांनी सुपर्णा उठली.
"नेत्रा...तुला आणि हर्षला तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा." सुपर्णाने मोठया मनाने नेत्राला शुभेच्छा दिल्या.
"खरंच जमलं तर तुम्हीही मोठ्या मनाने मला माफ करा." जाता जाता पुन्हा एकदा सुपर्णाने सर्वांची हात जोडून माफी मागितली. मनातून आज तिला खूपच हलके वाटत होते.
सर्वांशी बोलून तडक ती तिथून बाहेर पडली. सर्वजण तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिले.
रात्री मग नयना ताईंनी दिवसभरातील सारा वृत्तांत माधवरावांना कथन केला. आजची प्रत्येक बातमी त्यांच्यासाठी खूपच शॉकिंग होती.
क्रमशः
आता पुढे काय होणार? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
©® कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा