मागील भागात आपण पाहिले की हर्ष आणि नेत्राचा विवाहसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आता पाहुयात पुढे.
नेत्राचा इनामदारांच्या घरात मोठी सून म्हणून गृहप्रवेश होणार होता. नयना ताईंनी सर्व तयारी आधीच करून ठेवली होती.
उंबऱ्यातील तांदळाचे मापटे ओलांडून नेत्रा आत येणार तोच हर्षिता आणि तिच्या काही मावस बहिणी, आते बहिणी तसेच मामे बहिणींनी दार अडवून धरले. गृहप्रवेशाचे सर्व सोपस्कार पार पडले आणि शेवटी उखाण्यासाठी सर्वांचा आग्रह सुरू झाला.
उंबऱ्यातील तांदळाचे मापटे ओलांडून नेत्रा आत येणार तोच हर्षिता आणि तिच्या काही मावस बहिणी, आते बहिणी तसेच मामे बहिणींनी दार अडवून धरले. गृहप्रवेशाचे सर्व सोपस्कार पार पडले आणि शेवटी उखाण्यासाठी सर्वांचा आग्रह सुरू झाला.
"उखाणा घेतल्याशिवाय मी तुम्हाला आत सोडत नसते हे दोघांनीही लक्षात ठेवा. चला आवरा पटपट आणि हो...आधीच सांगते फक्त नावं नकोत. तुमची नावं आम्हाला माहीत आहेत. त्यामुळे फक्त उखाणा म्हणजे उखाणाच हवाय." हर्षिताची जवळपास दादागिरीच सुरू होती.
"ये मला नाही येत तो उखाणा बिखाणा तसलं काही." चिडक्या स्वरात हर्ष बोलला.
"ते काही माहीत नाही मला. घरात एन्ट्री हवी असेल तर उखाणा तर घ्यावाच लागेल. जोपर्यंत उखाणा नाही तोपर्यंत घरात एन्ट्री मिळणार नाही." हर्षिता म्हणाली.
"अगं हर्षु दमलेत गं सगळे उगीच टाइमपास करत बसू नका. आवरा बरं पटापट." नजरेतूनच हर्षने नयना ताईंना खुणावले. मग त्याही लगेच लेकाच्या मदतीला धावून आल्या.
"बरं वहिनी, तू घे गं आधी उखाणा..तोपर्यंत दादाला तयारीला वेळ मिळेल. हो ना दादा?"
"आता नेत्राने उखाणा घेतला काय आणि मी घेतला काय दोन्हीही एकच ना गं हर्षु!" विनवणीच्या सुरात हर्ष बोलला.
"अजिबात नाही. एक कसं असेल? ती तुझ्या नावाचा उखाणा घेणार मग तू तिच्या नावाचा नको का घ्यायला बुद्धू. कमीतकमी तिच्या आनंदाचा तरी विचार कर. जास्त काही अपेक्षा नसतात रे मुलींच्या. अगदी छोटछोट्या गोष्टीतही त्या आनंद मानतात." हर्षिताने काही गोष्टी हर्षच्या कानात सांगितल्या. तोही मग तयार झाला उखाणा घ्यायला.
"बरं नेत्रा...आधी तू घे तोपर्यंत मी विचार करतो." हर्षच्या बोलण्यावर नेत्रानेही मग हसून मान डोलावली आणि तिने मग एक छानसा उखाणा घेतला.
"अनोळखी हे बंध वाटतात आता हवेहवेसे
हर्षवर्धनच्या साथीने पहिले पाऊल टाकते संसाराचे.." लाजतच नेत्राने उखाणा घेतला.
हर्षवर्धनच्या साथीने पहिले पाऊल टाकते संसाराचे.." लाजतच नेत्राने उखाणा घेतला.
"क्या बात वहिनी. खूप छान गं.. चला नवरदेव, आता तुमचा नंबर." हर्षिता म्हणाली.
हर्षने देखील मग एक सुंदर उखाणा घेतला.
"अनोळखी दिशा आज अखेर एक झाल्या
नेत्राच्या साथीने करतो संसाराचा श्रीगणेशा..."
नेत्राच्या साथीने करतो संसाराचा श्रीगणेशा..."
लगेचच हर्ष आणि नेत्राची नजरानजर झाली. दोघांनीही एकमेकांकडे पाहून गोड स्माइल दिली.
"वाव...ये हुइ ना बात! पण किती छुपा रुस्तुम निघालेस रे दाद्या. उखाणा येत नाही म्हणायचं आणि सगळ्यांना एकदम असा शॉक द्यायचा असतो होय. दोघांनीही आधीच उखाणा पाठ करून ठेवला होता वाटतं. अनोळखी दिशा काय...पण लय भारी. आता येवू शकता तुम्ही आत." हर्षिताने मग दोघांचाही आत येण्याचा मार्ग मोकळा केला.
उंबऱ्यावरचे माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी नेत्राने इनामदारांच्या घरात प्रवेश केला.
पुढे अर्धा ते एक तास मग खेळ खेळण्यातच गेला. सर्वजण अगदी मनापासून एन्जॉय करत होते. आनंदी आणि उत्साही वातावरणात सर्व विधी पार पडले.
नेत्रा आणि हर्ष दोघेही खूपच खुश होते. आयुष्यात मनासारखा जोडीदार मिळणे ही भाग्याचीच गोष्ट. त्याबाबतीत दोघेही खूपच नशीबवान होते.
अखेर ही माझी बायको 'नेत्रा हर्षवर्धन इमानदार' ही हर्षने अर्पिताला अगदी सहज बहाल केलेली नवी ओळख आज सत्यात उतरली होती. कसा असतो ना हा नियतीचा खेळ! अगदी मनी ध्यानी नसतानाही कोणीतरी असं आयुष्यात यावं आणि नकळतपणे आयुष्याचाच एक भाग होऊन जावं. म्हणतात लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात ते काही खोटे नाही.
हर्ष आणि नेत्राचा विवाह सोहळा तर मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. नव्या नवरीचा गृहप्रवेश, सत्यनारायण, देवदेव सारे काही विधिवत पार पडले.
नेत्राचा आज सून म्हणून किचनमध्ये पहिलाच दिवस होता. सर्वांसाठी तिने मग गोडाचा शिरा बनवला. तसेही सून म्हणून लग्नाआधीच तिने स्वतःला सिद्ध केले होते. त्यामुळे वेगळी अशी कोणतीही सांसारिक परीक्षा देण्याची तिला गरजच नव्हती. त्यात घरातील सर्वांचीच तिला आधीपासूनच माहिती असल्यामुळे तिला पुढेही सोपेच जाणार होते, यात मुळीच शंका नव्हती.
नेत्रा किचनमध्ये होती त्यामुळे हर्षची देखील तिथेच लुडबूड सुरु होती.
"हर्ष तुला काही हवंय का बाळा?" नयना ताईंनी मुद्दाम विचारले.
"काही नाही गं आई, ते आपलं असंच. घरभर शिऱ्याचा नुसता घमघमाट सुटलाय म्हणून आपसूकच पाय किचनकडे वळले." हर्ष बोलला.
"आता शिऱ्याचा घमघमाट की आणखी काही कारण आहे ते आम्हाला काही माहिती नाही बाबा." डायनिंग टेबलवर बसलेल्या आजीने सवयीप्रमाणे हर्षला टोमणा मारला.
नेत्रालाही मग हसू आवरेना.
"बरं नेत्रा... तो शिऱ्याचा बाऊल दे इकडे आणि पाच सहा कप चहा ठेव बाळा. साखर थोडी कमीच टाक. हवं तर दोघे मिळून करा. पुन्हा नव्याचे नऊ दिवस संपले की हा काही मग इकडे फिरकणार नाही. त्यामुळे आताच संधी आहे असं सोडू नको त्याला." हसतच नयना ताई बोलल्या आणि शिऱ्याचा बाऊल घेवून त्या बाहेर गेल्या.
"बायको...खूप छान दिसतेस. साडीत तर खूपच भारी दिसतेस यार. आपलं खरंच लग्न झालंय आणि खरंच तू इथे आज किचनमध्ये आहेस, यावर अजूनही माझा विश्वास बसत नाहीये." थोडं रोमँटिक मूडमध्ये हर्ष बोलला.
"आ....अगं ये काय होतं हे? एवढया जोरात कोणी चिमटा काढतं का?" कसनुसे तोंड करत हर्ष रागात बोलला.
"आता तरी बसला का विश्वास? खरंच मी आहे इथेच!" हसतच नेत्रा बोलली.
"तुला मी नंतर बघतो." लटक्या रागातच हर्ष बोलला आणि बाहेर सर्वांसोबत डायनिंग टेबलवर जाऊन बसला.
आता लग्न झाले म्हणजे नव्या जोडप्याला ओढ असणार ती म्हणजे प्रेमाच्या त्या गोड गुलाबी क्षणांची. हा विचार करून घरच्यांनी दोघांनाही बाहेर कुठेतरी फिरायला पाठवण्याचा आधीच प्लॅन केला होता.
हसत खेळत सर्वांनी मिळून नाश्ता केला. नेत्राचे कौतुक देखील करून झाले.
"बाबा आज गुप्ताजींसोबत मीटिंग आहे ना?" हर्षने विचारले.
"हो... दुपारी आहे." माधवराव उत्तरले.
"चालेल मग मी थोडं उशिराच येतो आज ऑफिसला." हर्ष म्हणाला.
"कशासाठी? अरे चारच दिवस झालेत तुमच्या लग्नाला आणि लगेच ऑफिस सुरू! दिस इज नॉट फेअर हर्ष." माधवराव म्हणाले.
नाश्ता झाल्यावर माधवराव आणि नयना ताईंनी हर्ष आणि नेत्राच्या हातात एक बंद पाकीट सोपवले.
"बाबा! काय आहे यात?" आश्चर्यकारकरित्या हर्षने विचारले.
"अरे आधी उघडून तर बघ." हसतच नयना ताई बोलल्या.
हर्षने उत्सुकतेने पाकीट उघडले. नेत्रालाही उत्सुकता होती, पाकीटात काय आहे हे जाणून घेण्याची.
हर्षने पाकीट उघडले. त्यात दोन तिकिटं होती. हर्ष आणि नेत्रासाठी हनिमून पॅकेज थ्रू माधवरावांनी एक महिन्यासाठी युरोप टूर बुक केली होती.
"बाबा... अहो हे सगळं कशासाठी? तेही पंचवीस दिवस! त्यात आऊट ऑफ कंट्री. कशासाठी हे सगळं बाबा?"
"त्यात काय! कामाचा व्याप रोजच सुरू असतो आणि यापुढेही सुरुच राहणार आहे. आता छान संधी आणि निमित्तही आहे, मग या थोडं फिरुन."
'अजून घ्या लेकाला आणि सुनेला डोक्यावर.' निलम काकी मनातच बोलली.
नेत्रा आणि हर्षसाठी हे खूप मोठ्ठं सरप्राईज होतं. खरंतर दोघांनाही खूपच आनंद झाला. नेत्राच्या डोळ्यात नकळत पाणी आले.
'देवा खूपच भाग्यवान आहे मी. कुठे होते आणि कुठे आणून ठेवलंस तू मला! खरंच त्या दिवशी तो प्रसंग घडला नसता तर आज मी इथे असते?' मनातच नेत्रा विचार करू लागली.
'देवा खूपच भाग्यवान आहे मी. कुठे होते आणि कुठे आणून ठेवलंस तू मला! खरंच त्या दिवशी तो प्रसंग घडला नसता तर आज मी इथे असते?' मनातच नेत्रा विचार करू लागली.
"बाबा तुमच्या त्या मित्राला एकदा फोन करून बघाल का?" घाबरतच हर्ष बोलला.
"तू काळजी करू नकोस, ते आहे माझ्या डोक्यात. तुम्ही परत येईपर्यंत आरोपी जेरबंद असेल. विश्वास ठेव माझ्यावर. तुम्ही तुमच्या आयुष्यातील हे दिवस एंजॉय करा. कारण गेलेली वेळ पुन्हा फिरुन कधीच येत नाही आणि पुढे जाऊन ठरवून देखील वेळ मिळत नाही. म्हणून आताचे हे सोनेरी क्षण मनापासून जगून घ्या." माधवराव म्हणाले..
पुढच्या दोनच दिवसांत हर्ष आणि नेत्रा दोघेही टूरवर निघाले. सोबतीतला हा प्रत्येक क्षण दोघेही भरभरून जगले.
"हर्ष, खरंच माझ्या लायकी पेक्षाही खूप काही दिलंस तू मला." पाणावलेल्या डोळ्यांनी हर्षच्या मिठीत नेत्रा अलगद शिरली.
"बस...आता बाकी कुठलाही विचार मनात सुद्धा आणायचा नाही आणि स्वतःला कमी लेखणे बंद कर आधी. आता इथे फक्त तू आणि मी आहोत. हेच तर हवं होतं ना आपल्याला. मग आता बाकी विचार आणि विषय अजिबात नको." हर्ष बोलला आणि नेत्रानेही मग सारे काही विसरून हर्ष भोवतीची मिठी आणखीच घट्ट केली. हर्षच्या मिठीत जगाचाही तिला मग विसर पडला.
मर्यादेची सारी बंधने आता गळून पडली. नवरा बायकोच्या नात्याचा सुखद असा प्रवास अखेर सुरू झाला.
एकमेकांच्या मिठीत दोन जीव अलगद विसावले. सोबतीतला प्रत्येक क्षण सहवासाने आणखीच गोड होत गेला. आठवणींच्या मळ्यात प्रितीची फुले दिवसागणिक फुलत होती. मनातील फुलपाखरे त्या फुलांवर अलगद येऊन विसावत होती. गोड आठवणींची साठवण हृदयाच्या कप्प्यात बंदिस्त केली जात होती. प्रेमाच्या मिठीची ऊब दोघांनाही हवीहवीशी वाटत होती.
लग्नानंतर हर्ष आणि नेत्राचे आयुष्यच बदलून गेले. अनोळखी दिशा अखेर एकरूप होवून प्रेमाच्या वाटेवर मार्गस्थ झाल्या.
क्रमशः
©® कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा