©®प्रज्ञा बो-हाडे
अनोळखी दिशा भाग ८
रिदांशला मूर्तीच्या मागे काहीच सापडत नाही. तो मंदिरात गोलाकार फिरुन शोधण्याचा अनेक दिवस प्रयत्न करत असतो. त्याच दिवसांमध्ये रिदांशने जी घरी शेतजमिनीच्या नोटिस बाबत खोट सांगतिलेल असते. ते खर होते. एके दिवशी मंदिराचा शोध घेण्यात रिदांश इतका गुंग होतो की घरी जाण्याचे भान त्याला राहत नाही. तिथेच मंदिरात झोपी जातो. घरी जावून पाहतो तर..काय? घराजवळ त्याला एक पत्र दिसते. जवळ जावून पाहतो,पत्र नसून ती नोटिस असते. रिदांश द्विधा मन:स्थितीत सापडला नोटिस बाबात धावपळ करायची की मूर्ती जवळ काही सापडेल का? याचा शोध घ्यायचा.
सगळा शोध घेवून काहीच उपयोग झाला नाही. पण काॅलेजला कधी प्रोजेक्ट करावा लागल्यास पुरेशी माहिती मात्र गोळा करता आली. आत्ता नाही पण कधी ना कधी प्रोजेक्ट करावा लागणारच आहे. घरी आत्ता जरी खोट बोललो तरी त्यात सत्यता मात्र नक्कीच आहे. रिदांश या विचारांनी सुखावला.
आता सकाळची वेळ आहे. आजूबाजूला कोणी ना कोणी रस्त्यावरुन जात आहेत. त्यापेक्षा उद्या पहाटे उठून ह्या पाय-या उतरुन तिथे नक्की काय आहे ते पाहायला हवे.
रात्रभर रिदांशला एक तासाने जाग येत होती. झोपायच्या आधी पहाट झाल्यावर लागणा-या वस्तू यांची बॅटरी, कंटील जमावाजमव करुन झोपी गेला होता. तरी देखील मनात थोडी भिती आणि उत्सुकता दोन्ही होती.
आतापर्यंत कोणालाच कसे माहित नाही यावर रिदांशचा विश्वासच बसत नव्हता. हे सगळ घरी जावून आई आणि दादाला सांगायला हव. पूर्वजांचा आशिर्वाद आहे हा. आता परिस्थिती बदलेल. सगळे काही चांगले होईल. गरीब असल्याचे संकट शेवटी देवी आईने या प्रकारे दूर केले यावर रिदांशचा विश्वास बसला.
रिदांश आता लगबगीने जिन्याने वर आला मूर्ती व्यवस्थित ठेवली. घराला लाॅक लावून घरी निघाण्याच्या तयारीला लागला. कधी एकदा आईला सांगतो हे सत्य अस त्याला झाल होत. बस स्टाॅपवर रिदांश उभा होता. गाडी एक तास उशीरा येणार होती. गावताल्या मित्रांपैकी एका मित्राने रिदांशला तिथे पाहिले. त्याने रिदांशचा अंदाज पाहता शहराकडे जाणार असल्याचे त्याच्या लक्षात येते. तो आपल्या इतर साथदारांना याबाबत माहिती देतो.
मैत्रीचा मान म्हणून थोड तरी दारु प्यायला हवी. अश्या मित्रांच्या हट्टाला रिदांश बळी पडतो. तो चार दिवस सगळ भान विसरुन त्यांच्या सोबत त्यांच्या घरी जावून राहतो. पुन्हा दिवसरात्र पिण्याचे रिदांशचे प्रमाण वाढते.
विहान रिदांश घरी का आला नाही म्हणून गावी पाहायला येतो. त्याला तो दिवसाढवळ्या एका रस्त्याच्या कडेला झोपलेला आढळतो. तरीच याला गावी यायच होत. जवळच्या दवाखान्यात रिदांशला अॅडमिट करण्यात येते.
तीन दिवसांत रिदांशला हाॅस्पिटल मधून सोडण्यात येते. विहानची रिदांश माफी मागतो. मी पुन्हा अस करणार नाही. आपल्या नोटिस बाबातचे काम पूर्ण केले मी अशी स्वत:ची बाजू सावरल्यावर विहान माफ करेल हि समजूत रिदांशची चूकीची ठरली. विहानने तोंडातून एक अक्षरही काढले नव्हते.
रिदांश देखील परीक्षा झाल्यावर ब्लॅंकेट घेताना हातात सापडलेली चिठ्ठी आणि नकाशा पाहून कसे पूर्वजांनी साठवून ठेवलेले धन याबाबत सांगण्याचे ठरवतो.
रिदांशने मन लावून तर अभ्यास केलेला आहे. रिदांश परीक्षेला खरच बसू शकेल का? की व्यसनाच्या पुन्हा अधीन होवून परीक्षा देण्याच्या अवस्थेत च नसेल हे पाहणार आहोत पुढच्या भागात.क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा