©®प्रज्ञा बो-हाडे
अनोळखी दिशा भाग १० अंतिम
सर्वांत पहिला संशय पोलिसांचा नुकत्याच जाॅईन झालेल्या कंपनीवर जातो. चौकशी दरम्यान काही कामाचा तणाव अथवा भांडणे, राजकारण केल जात होत का? या गोष्टींविषयी माहिती मिळवली असता, राजकारण सगळ्यांच्याच बाबतीत थोड्याफार प्रमाणात सगळीकडेच चालते. इतकं टोकाला जाण्याइतपत तर काही घडले नसल्याचे यातून उत्पन्न होते.
काकांना असा निरोप रिदांशच्या बहिणीकडून म्हणजेच दिव्या कडून आला असे समजते. लहानपणीचा छोटा - मोठा वाद डोक्यात घालून दिव्या ने तर हा प्रकार केला नसेल कशावरुन. दिव्याची देखील याबाबत चौकशी केली जाते.
गावाकडील मित्रांसोबत रिदांशचे भांडण झाले होते. हि गोष्ट पोलिसांच्या कानावर येते. पोलिस त्या मित्रांना रिदांशच्या गावी जावून चौकशी करतात. त्यांच्याकडूनही पुरेशी माहिती मिळत नाही.
नक्की कोण असणार या खूणामागे पोलिस देखील हाताश होत असतात. शेवटचा उपाय म्हणून एकदा पुन्हा रिदांश ज्या जागी सापडला त्याची पाहणी करतात. काही क्लू नव्याने सापडतो आहे का हे पाहण्याकरता रस्त्यावरील सी. सी. टिव्ही फुटेज चेक करण्यात येतात. त्यातही काही आढळून येत नाही.
पोलिस रिदांश जिथे सापडला तिथून निघत असताना त्यांना एक पिशवी दृष्टीस पडते. त्यात एक मोबाईल नंबर आणि पत्ता लिहलेला आढळतो. पोलिस त्या दिलेल्या पत्यावर जातात. आणि आश्चर्याचा खूप मोठा धक्का त्यांना बसतो.
तो मोबाईल नंबर दुस-या कोणाचा नसून विहानचा म्हणजेच रिदांशच्या भावाचा असतो. आणि पत्ता देखील रिदांशच्या घरचा असतो. रिदांशची आई आणि भाऊ कबूल करतात की आम्ही दोघांनी रिदांशचा खूण केला आहे. तो ही ह्या रुम मध्ये. रिदांशच्या अंगावर गरम पाणी ओतून त्याला एका पोत्यात बांधले आणि घाटावरुन ढकलून दिले.
हे कृत्य करताना जरा ही पाऊल डगमगले नाही का? या पोलिसांच्या प्रश्नाला आईने उत्तर द्यायला सुरवात केली. दारुच्या व्यसनामुळे हा वाईट परीस्थितीत आधार द्यायचा सोडून जन्मदात्या आईला मारत होता. घरात अन्नाचा कण नसताना गावाला मित्रांसोबत दारू, सिगरेट ओढत असायचा, काॅलेजमध्ये रात्रभर थांबायचा. जिथे जाईल त्यांच्याशी भांडत बसयचा. कबड्डी तर रिदांशचा आवडता खेळ. त्या खेळाडूंशी कायमच वैर पत्कारुन कबड्डी खेळाला मुकला. अक्षयाला पाहायाल आलेल्या लोकांसमोर तमाशा केला. त्या मुलीची नाचक्की केली. मुलीची जात आरश्या सारखी असते, एकदा का तिला तडा गेला की कोणी परत नाही. तिची झालेली बदनामी कशी सहन करणार तिच्या घरचे लोक. रिदांशची आई सांगू लागली दिव्या देखील आमची मुलगी आहे. तिच्या बाबत अस काही बाही घडले असते तर आम्ही त्या नाचक्की करणा-या मुलाला कधीच ठार केले असते.
त्या मनाने अक्षयाच्या घरचे लोक समजूतदार आणि संयमी निघाले. रिदांशला प्रत्येक वेळी समज देण्याचा आतोनात प्रयत्न सुरु होता. पण तो कधी सुधारायचा तर कधी पुन्हा त्याच वाईट मार्गावर पाऊल ठेवू लागला.
ती माहेरी गेल्यानंतर विहानच्या मदतीने रिदांशच्या अंगावर गरम पाणी ओतले. त्याला एका पोत्यात बांधले घाटाजवळच खाली ढकलून दिले. सर्व तपास होताच विहानला पोलिस परत एकदा त्या ठिकाणी चौकशी करता जाणार आहेत, ही बातमी कळताच विहानने स्वत:च मोबाईल नंबर आणि घरचा पत्ता त्यात दिला.
वाईट संगत, वाईट प्रवृत्ती, व्यसने जडायला एक क्षण देखील पुरेसा असतो. त्या प्रवृत्ति इतक्या टोकाला जावून पोहचतात तिथे कोणाच न वय पाहिले जात ना कोणतेही नाते.
समाप्त :
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा